सर्व भाज्यांची माहिती Vegetables Information in Marathi

Vegetables Information in Marathi – Vegetables Names in Marathi पाले भाज्यांविषयी माहिती आज या लेखामध्ये आपण भाजी या विषय बद्दल माहिती घेणार आहोत. भाज्या ज्या एक प्रकारच्या वनस्पती असतात ज्या खाण्या योग्य असतात आणि आपल्या रोजच्या आहारामध्ये यांचा समावेश असतो. आपण रोज वेगेवगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्या आहारामध्ये खातो त्या भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात आणि म्हणूनच ह्या भाज्या आपल्या आयुष्यामध्ये एक महत्वाची भूमिका बजावतात. भाजी हा आपल्या रोजच्या आहारामधील महत्वाचा घटक असतोच पण पालेभाज्यांना (पालक, मेथी, पोकळा) आपल्या आहारामध्ये विशेष असे महत्व आहे.

कारण पालेभाज्यांमध्ये अधिक प्रमाणात पोषक घटक असतात आणि ह्या हिरव्या पाले भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. भाजी म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर बटाटे, वांगी, पालक, मेथी, पोकळा, फ्लॉवर आणि कोबी या सारख्या अनेक भाज्या येतात. भाज्यांमध्ये आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी लागणारे जीवनसत्व, अॅंटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण आहे जे आपल्या शरीराला अनेक महत्वपूर्ण आरोग्य फायदे प्रदान करतात.

vegetables information in marathi
vegetables information in marathi

सर्व भाज्यांची माहिती – Vegetables Information in Marathi

भाजी म्हणजे काय ? 

भाजी हि एक वनस्पतीचा खाद्य भाग आहे जे सहसा त्यांची पाने, फळे, मुले किंवा बिया असू शकतात. भाज्या ह्या जगभरातील एक मुख्य अन्न आहे आणि यांना आधुनिक शेतीचा मुलभूत भाग मानला जातो कारण भाज्या आपल्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट असतात. भाज्यांमध्ये शक्यतो कॅलरीज कमी असतात, परंतु या भाज्या पोषक घटकांनी भरलेल्या असतात म्हणून लोक या भाज्या आपल्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट करतात.

भाज्या खाल्ल्याचे फायदे – Benefits of Vegetables in Marathi

 • अनेक हिरव्या भाज्यांपासून आपल्याला अनेक पोषक घटक मिळू शकतात आणि पालक या भाजीमध्ये पोटॅशियम असते आणि पोटॅशियम हे आपल्या शरीरातील सोडियम अधिक कार्यक्षमतेने शुध्द करण्यास मदत करू शकते आणि या शरीरातील प्रक्रियेमुळे रक्तदाबाचा धोका कमी होऊ शकतो.
 • भाज्यांमध्ये अगदी कमी प्रमाणात कॅलरी आणि चरबी असते त्यामुळे आपले वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
 • भाज्यांमध्ये विशेष करून फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असते जे आपले पचन चांगले होण्यासाठी मदत करू शकते.
 • जर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्या आहारामध्ये सेवन केल्या तर हृदयरोग, उष्माघात, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यासारख्या रोगांपासून संरक्षण होते.
 • भाज्या खाल्ल्यामुळे आपली त्वचा सुंदर बनू शकते तसेच भाज्यांच्या मुळे केसांची वाढ आणि संरक्षण होते.
 • हिरव्या भांज्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते आणि भाज्यामध्ये मॅग्नेशियम खूप जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यास मदत होते आणि त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.
 • भाज्यामध्ये असे देखील पोषक घटक असतात जे आपल्या डोळ्यांचे देखील संरक्षण करू शकते, उदाहरणार्थ – पालक, लाल मिरची आणि कॉर्न इत्यादी.
 • जर तुम्हाला तुमचा मेंदू तीक्ष्ण करायचा असेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये पालेभाज्यांचा समावेश करा. पालेभाज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अॅंटीऑक्सिडंट्स आणि फोलेत असते जे आपल्या मेंदूच्या प्रगतीसाठी एक मुख्य पोषक घटक आहेत.

भाज्यांची नावे – Vegetables Names in Marathi

बीट – beet 

अनेक भाज्यांपासून आपल्याला अनेक पोषक घटक मिळतात त्यामधील एक महत्वाची आणि पोषक घटक भरपूर असलेली एक फळ भाजी महणजे बीट होय. बीट हे आपण तसेच कच्चे खावू शकतो किंवा त्याचा रस बनवून पिऊ शकतो कारण या मुळे आपल्याला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. बीट मध्ये पोटॅशियम आणि फोलेट हे पोषक घटक असतात.

हि फळभाजी खाल्ल्या मुळे रक्दाब आणि मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो कारण यामध्ये अल्फा लिपोईक नावाचे अॅंटीऑक्सिडंट असते जे रक्दाब आणि मधुमेह  नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. बीट आपण सॅंडविच मध्ये वापरू शकतो, सलाड मध्ये वापरू शकतो किंवा रस बनवून पिऊ शकतो.

बीट मधील पोषक घटक (nutrition value)

पोषक घटकप्रमाण
कॅलरीज५८.५
पोटॅशियम४४२ मिली ग्रॅम
फोलेट१४८ मिली ग्रॅम

गाजर 

गाजर या फळभाजी मध्ये व्हिटॅमीन ए असते आणि ते आपली दृष्टी सुधारण्यास मदत करू शकते. तसेच गजरामध्ये असणाऱ्या काही पोषक घटकांमध्ये कर्करोगाचा धोका करण्याची क्षमता असते. गाजर या फळभाजी जास्त करून कोशिंबीर बनवण्यासाठी वापरली जाते तसेच हि भाजी कच्ची आपल्या आहारामध्ये समाविष्ट केली जाते.

गाजर मधील पोषक घटक (nutrition value)

पोषक घटकप्रमाण
कॅलरीज४१
प्रोटीन०.९ ग्रॅम
पाण्याचे प्रमाण८८ टक्के
शुगर४.७ ग्रॅम
फायबर२.८ ग्रॅम
कार्ब९.६ ग्रॅम

पालक – spinach 

हिरव्या पालेभाज्यांपैकी एक म्हणजे पालक आहे आणि हि भाजी अनेक पोषक घटकांनी भरलेली आहे. या भाजीमध्ये कॅल्शियम, लोह, जीवनसत्वे आणि अॅंटीऑक्सिडंट्स असतात. पालक मध्ये मॅग्नेशियम चे प्रमाण असते जे स्नायू आणि मज्जातंतूच्या चांगल्या कार्यासाठी मदत करते. पालक या भाजीमध्ये व्हिटॅमीन, फोलेट, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अॅंटीऑक्सिडंट्स यांचे विश्वसनीय पोषक घटकांचे स्तोत्र आहे.

पालक मधील पोषक घटक (nutrition value)

पोषक घटकप्रमाण
कॅलरीज२३
प्रोटीन२.९ ग्रॅम
पाण्याचे प्रमाण९१ टक्के
शुगर०.४ ग्रॅम
फायबर२.२ ग्रॅम
कार्ब३.६ ग्रॅम
फॅट०.४ ग्रॅम

मटार / वटाणे – peas 

मटार या भाजीमध्ये कॅलरीज, फायबर, प्रथिने, जीवनसत्व अ, क आणि के असते तसेच जीवनसत्व बी यासारखे पोषक घटक असतात. मटार हे आपल्या आतड्यासाठी चांगले असतात तसेच पाचन तंत्र निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. तसेच यामध्ये अॅंटीऑक्सिडंट्स असतात जे आपला कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. मटार हे पास्ता, नुडल्स किंवा करीमध्ये वापरला जातो.

मटार मधील पोषक घटक (nutrition value)

पोषक घटकप्रमाण
कॅलरीज१३४
प्रोटीन / प्रथिने५.४ ग्रॅम
कार्बोहायड्रेट्स८ ग्रॅम
लोह१.२ मिली ग्रॅम
फायबर९ ग्रॅम
पोटॅशियम१८४ मिली ग्रॅम
फॅट१.३ ग्रॅम
व्हिटॅमीन सी१३ मिली ग्रॅम

टोमॅटो 

टोमॅटो हि एक फळ भाजी आहे हे आपल्या सर्वाना माहित आहेच आणि भारतीय स्वयंपाक पद्धती मध्ये टोमॅटोला महत्वाचे स्थान आहे टोमॅटोचा उपयोग स्वयंपाक घरामध्ये भाजी बनवण्यासाठी, सूप बनवण्यासाठी तसेच चटणी किवा कोशिंबीर बनवण्यासाठी केला जातो. टोमॅटो मध्ये सायट्रिक अॅसिड आणि मैलिक अॅसिड हि असते. टोमॅटो पासून प्रोसेस्ड उत्पादने हि बनवली जातात.

त्याच बरोबर टोमॅटो काही औषधी फायदेही आहेत टोमॅटोमध्ये पौटैशियम आणि  विटामिन सी, विटामिन असते जे आपल्या शरीराला खूप उपयोगी असते तसेच टोमॅटो मध्ये सायट्रिक अॅसिड आणि मैलिक अॅसिड हि असते.

मटार मधील पोषक घटक (nutrition value)

पोषक घटकप्रमाण
विटामिन सी१३.७ मिली ग्रॅम
विटामिन ई०.५३ मिली ग्रॅम
फायबर१.२ ग्रॅम
प्रोटीन०.८८ गरम
कॅलरी१८ कॅलरी
पोटॅशियम२३७ मिली ग्रॅम
कॅल्शियम१० मिली ग्रॅम
शुगर२.६ ग्रॅम

भाज्यांविषयी काही अनोखी तथ्ये – facts about vegetables

 • भाज्या उगवण्यासाठी उबदार हवामानाची गरज असते.
 • वांगी, बटाटा, फ्लॉवर, मेथी, पालक आणि पोकळा या सारख्या भाज्यांची भाजी केली जाते तर काही भाज्या कोशिंबीर करण्यासाठी वापरल्या जातात जसे कि काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा आणि कोबी.
 • भाज्यांची खेडेगावामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
 • भाज्यांमध्ये आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी लागणारे जीवनसत्व, अॅंटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण आहे.
 • भाज्यांमध्ये अगदी कमी प्रमाणात कॅलरी आणि चरबी असते त्यामुळे आपले वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
 • भाजी हि एक वनस्पतीचा खाद्य भाग आहे जे सहसा त्यांची पाने, फळे, मुले किंवा बिया असू शकतात.

आम्ही दिलेल्या vegetables information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भाज्यांबाद्द्ल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vegetables list in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि vegetables name in english and marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर all vegetables name in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!