ब्राझील देशाची माहिती Brazil Information in Marathi

Brazil Information in Marathi ब्राझील विषयी माहिती जगातील पाचव्या क्रमांकावरील असणारा ब्राझील हा देश दक्षिण अमेरिकेतील एक सर्वात मोठा देश आहे. ब्राझील या देशाचे क्षेत्रफळ ३२,८७,५९७ चौरस मीटर इतके आहे त्यामुळे हा जगातील क्षेत्रफळामध्ये ५ व्या क्रमांकावरील देश आहे. तसेच हा देश दक्षिण अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे कारण या देशाची लोकसंख्या २१२ दशलक्ष इतकी आहे. ब्राझील या देशाची राष्ट्रीय राजधानी ब्राझिलिया आहे आणि त्याचबरोबर या देशाची आर्थिक राजधानी साओ पाउलो हे आहे.

ब्राझिल या देशामध्ये ख्रिस्ती धर्माचे लोक राहतात आणि या देशामध्ये १५ व्या ते १८ व्या शतकापर्यंत पोर्तुगीजांचे राज्य असल्यामुळे येथे पोर्तुगीज भाषा बोलली जाते. ब्राझील हा देश ४७७२ किलो मीटर उत्तर दक्षिण आणि ४३३१ किलो मीटर पूर्व पश्चिमेला पसलेला आहे आणि ब्राझील हा देश दक्षिणेकडील भागामध्ये पठार आणि अमेझॉन नदीच्या खोऱ्यात विभागलेला आहे.

brazil information in marathi language
brazil information in marathi language

ब्राझील देशाची माहिती – Brazil Information in Marathi

देशाचे नावब्राझील
राजधानीब्राझिलिया हि देशाची राष्ट्र राजधानी असून ब्राझिलिया हे शहर देशातील ४ चौथे मोठे शहर आहे आणि साओ पाउलो हि देशाची आर्थिक राजधानी आहे.
देशाचे क्षेत्रफळ३२,८७,५९७ चौरस मीटर
लोकसंख्या२१२ दशलक्ष
भाषापोर्तुगीज
सरकारप्रजासत्ताक किंवा लोकशाही
देशतील साक्षरता प्रमाण९१ टक्के आहे
राष्ट्रीय प्राणीजग्वार
राष्ट्रीय पक्षीमकाऊ

भौगोलिक माहिती 

Geographic Information ब्राझिल हा देश दक्षिण अमेरिकेचा जवळ जवळ अर्धा भाग व्यापतो आणि हा दक्षिण अमेरिकेतील एक मोठा देश आहे. ब्राझील हा देश ४७७२ किलो मीटर उत्तर दक्षिण आणि ४३३१ किलो मीटर पूर्व पश्चिमेला पसलेला आहे. ब्राझील हा देश दक्षिणेकडील भागामध्ये पठार आणि अमेझॉन नदीच्या खोऱ्यात विभागलेला आहे तसेच दक्षिणी ब्राझील मध्ये प्लाटा प्रणालीद्वारे निचरा केला जातो ज्या प्रणालीमध्ये पराग्वे, उरुग्वे आणि पारान नद्यांचा समावेश आहे.

इतिहास 

History of Brazil ब्राझील या देशावर इ. स १५०० मध्ये पोर्तुगीज लोकांनी ताबा मिळवला आणि इ. स १५३२ पासून वसाहतीला सुरुवात केली आणि इ. स १५४९ मध्ये तेथे शाही वसाहती बनवल्या. पोर्तुगालच्या अधिपत्याखाली असणारा ब्राझील या देशावर ३ शतके राज्य केले आणि ३ शतकानंतर हा देश इ. स. १८२२ मध्ये स्वातंत्र्य बनला आणि हा देश दक्षिण अमेरिकेतील क्षेत्रफळामध्ये आणि लोकसंखेमध्ये मोठा देश म्हणून ओळखला जातो.

विशाल नैसर्गिक संसाधनांचा आणि मोठ्या श्रम तलावाचा वापर करून, ब्राझील हा देश इ. स १९७० च्या दशकात लॅटिन अमेरिकेची आघाडीची आर्थिक शक्ती बनली. त्याचबरोबर ब्राझीलने औद्योगिक आणि उद्योगधंद्यांचा अवलंब करण्यासाठी देशाच्या कारभारात अर्ध्या शतकाहून अधिक लष्करी हस्तक्षेपावर मात केली आहे.

ब्राझीलच्या स्वातंत्र्यानंतर पेंड्रो हा देशाचा सम्राट बनला त्यावेळी ब्राझील हे राज्य जरी प्रजासत्ताक घोषित करण्यात आले असले तरी ब्राझील या देशावर लष्करी हुकूमशाहीचे राज्य होते.

त्यानंतर महायुध्दाच्या काळामध्ये ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष वेंसलाऊ ब्राझ यांनी मित्र राष्ट्रांना सहकार्य केले आणि पहिल्या महायुद्धात जर्मनीबरोबर युद्ध घोषित केले तसेच दुसऱ्या महायुद्धात ब्राझीलने पुन्हा मित्र राष्ट्रांना सहकार्य केले आणि मित्र राष्ट्रांच्या हवाई तळांचे स्वागत केले आणि त्यांच्या मदतीने दक्षिण अटलांटिकवर गस्त घातली आणि इटलीच्या आक्रमणात सामील झाले.

इ. स. १९९९ मध्ये ब्राझील या देशाची आर्थिक परिस्थिती कोलमडली आणि त्यामुळे अर्थिक बाजारपेठेतून चलनाला चालना देण्याऐवजी ब्राझीलने चलन तरंगू देण्याचा पर्याय निवडला तसेच या देशाला इ. स २००१ मध्ये उर्जा संकटाचा हि सामना करावा लागला.

ब्राझील सरकार आणि अर्थव्यवस्था

ब्राझील या देशामध्ये एक संघीय प्रजासत्ताक आहे ज्यामध्ये अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस आणि कायदेशीर प्रणाली आहे. इ. स १८८८ पासून हा देश लोकशाहीशी संघर्ष करत होता पण इ. स १९९५ मध्ये ब्राझीलचे राजकारण आणि अर्थव्यवस्था बऱ्यापैकी स्थिर झाली.

ब्राझील मधील लोकांची स्वयंपाक पध्दती 

Food and Cuisine ब्राझिलियन लोक बहुतेक सकाळी नाश्ता करतात ज्या नाश्त्यामध्ये ब्रेड, चीज किंवा मुरब्बा आणि लोणी या सारखे पदार्थ समाविष्ट असतात आणि ते सकाळी दुधाची कॉफी घेतात या ठिकाणी लोक भरपूर प्रमाणात कॉफी पितात तसेच ते हर्बल चहा देखील पितात. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये बीन्स, फळे, तांदूळ, मांस, कोशिंबीर, बटाटे आणि ब्रेड या सारख्या आहाराचा समावेश असतो. बहुतेक येथील खाद्यपदार्थामध्ये पाम तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

Brazil Map in Marathi

ब्राझील या देशाविषयी काही अनोखी तथ्ये – facts about brazil

  • ब्राझिल हा देश अमेरिका खंडामध्ये स्थित आहे आणि हा देश अटलांटिक महासागराच्या सीमेवर आहे.
  • हा देश महान समुद्रासाठी ओळखला जात असून या देशाला ७५०० किलो मीटर इतकी किनारपट्टी आहे.
  • ब्राझीलमधील हवामान मुख्यतः देशाच्या दक्षिणेकडील भागात समशीतोष्ण हवामानासह उष्णकटिबंधीय आहे.
  • ब्राझील या देशामध्ये अमेझॉन नदी हि सर्वात मोठी नदी आहे जी ६४०० किलो मीटर लांब आहे आणि हि नदी पेरू आणि कोलंबिया मधून वाहत जाऊन टलांटिक महासागराला मिळते.
  • ब्राझीलच्या लोकांमध्ये ८००००० पेक्षा जास्त स्थानिक लोक आहेत त्यापैकी काही अमेरिकन आहेत.
  • ब्राझील हा दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा देश आणि जगातील पाचवा सर्वात मोठा देश आहे. हे अटलांटिक महासागरासह ७४०० किमीच्या किनारपट्टीसह खंडाच्या पूर्वेस एक विशाल त्रिकोण बनवते.
  • ब्राझीलमध्ये बरीच भिन्न माती आणि हवामान आहे त्यामुळे या देशमध्ये मोठ्या प्रमाणात पिके घेतली जातात आणि या देशाच्या कृषी निर्यातीमध्ये ऊस, कापूस, कॉफी, कोको बीन्स, सोयाबीन, तांदूळ आणि उष्णकटिबंधीय फळांचा समावेश आहे.
  • ब्राझील हा देश ४७७२ किलो मीटर उत्तर दक्षिण आणि ४३३१ किलो मीटर पूर्व पश्चिमेला पसलेला आहे.
  • फुटबॉल आणि सॉकर ब्राझीलमधील आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि पुरुषांच्या राष्ट्रीय संघाने विक्रमी पाच विश्वचषक स्पर्धा जिंकल्या आहेत.
  • ब्राझीलची सीमा चिली आणि इक्वाडोर वगळता दक्षिण अमेरिका खंडातील सर्व देशांना स्पर्श करते.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये brazil information in marathi language काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर brazil country information in marathi language म्हणजेच “ब्राझील देशाची माहिती” brazil animals information in marathi language या देशाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या bharat brazil mahiti या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि information about brazil in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!