Chana Masala Recipe in Marathi चणा मसाला रेसिपी मराठी रोज लोक काही ना काही चमचमीत आणि झणझणीत बनवून खात असतात आणि त्यामध्ये पनीर मसाला, पनीर कुर्मा, पनीर टिक्का, काजू मसाला, मिल्स व्हेज यासारखे अनेक पदार्थ बनवतात आणि त्यामधील एक मसालेदार आणि चमचमीत पदार्थ म्हणजे चणा मसाला. चणा मसाला हि रेसिपी बनवताना भिजवलेले चणे कुकरमध्ये शिजवून घेतले जातात आणि गरम मसाला आणि इतर साहित्य घालून बनवलेल्या ग्रेव्ही मध्ये घातले जातात आणि ते रोटी, पुरी, नान यासोबत सर्व्ह केले जातात.
चणा मसाला हा पदार्थ मोठ्या प्रमाणात जरी पंजाब मध्ये केला जाता असला तरी हा पदार्थ भारतामध्ये इतर ठिकाणी देखील बनवला जातो आणि आवडीने खाल्ला जातो. चणा मसाला हि डिश लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांच्या साठी उत्तम आहे आणि हि घरी बनवण्यासाठी देखील खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेत म्हणजेच २५ ते ३० मिनिटामध्ये अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण रेस्टॉरंट सारखा चणा मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहूयात.
चणा मसाला रेसिपी मराठी – Chana Masala Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते ३० मिनिटे |
पाककला | भारतीय |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
चणा मसाला हि रेसिपी बनवताना भिजवलेले चणे कुकरमध्ये शिजवून घेतले जातात आणि गरम मसाला आणि इतर साहित्य घालून बनवलेल्या ग्रेव्ही मध्ये घातले जातात.
- चणा : चणा हा चणा मसाला बनवण्यासाठी लागणारा एक महत्वाचा घटक आहे जो आपण भिजवून मग तो शिजवून ग्रेव्ही मध्ये वापरतो.
- गरम मसाला आणि गोडा मसाला : गरम मसाला आणि गोडा मसाला जर आपण या रेसिपी मध्ये घातला तर आपली रेसिपी मसालेदार आणि चमचमीत बनते.
- आले लसून पेस्ट : आले लसून पेस्ट घातल्यामुळे रेसिपीला एक वेगळीच चव येते.
चणा मसाला रेसिपी – chana masala recipe
चणा मसाला एक भारतीय डिश आहे जी आपण भाजी म्हणून चपाती किंवा रोटी सोबत खावू शकतो. चणा मसाला रेसिपी हि कित्येक लोकांची आवडती डिश असल्यामुळे ते लोक हि रेसिपी घरामध्ये बनवण्याचा प्रयत्न करत असतात आणि हि रेसिपी घरामध्ये बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण चणा मसाला कसा बनवायचा आणि हा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते ३० मिनिटे |
पाककला | भारतीय |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
चणा मसाला बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही म्हणजेच आपण घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून बनवू शकतो आणि जर चणा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य जर घरामध्ये उपलब्ध नसेल तर आपण ते बाजारायून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो. चला तर मग चणा मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- १ वाटी चणा.
- १ मध्यम आकाराचा कांदा ( बारीक चिरलेला ).
- २ टोमॅटो ( बारीक चिरलेले ).
- दीड चमचा आले लसून पेस्ट.
- १/२ चमचा जिरे ( फोडणीसाठी ).
- १ चमचा गोडा मसाला.
- १/२ चमचा गरम मसाला.
- ४ चमचे तेल.
- १ चमचा लाल मिरची पावडर.
- १/४ चमचा हळद.
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- मीठ ( चवीनुसार ).
- कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
चणा मसाला रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच २५ ते ३० मिनिटामध्ये बनवला जातो. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून चणा मसाला कसा बनवायचा ते पाहूयात.
- सर्वप्रथम चणा मसाला बनवण्यासाठी चणे कमीत कमी एक तास तरी पाण्यामध्ये भिजत घालून ठेवा आणि तासानंतर त्यामधील पाणी काढा आणि मग ते कुकरमध्ये घालून त्यामध्ये स्वच्छ पाणी घाला आणि कुकरचे झाकण लावून ते मोठ्या आचेवर ठेवून ४ ते ५ शिट्या आणा आणि गॅस बंद करा.
- आणि कुकर बाजूला गार होण्यासाठी ठेवा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये तेल घाला आणि मग ते गरम झाले कि त्यामध्ये सर्वप्रथम जिरे टाका आणि जिरे फुलले कि त्यामध्ये आले लसून पेस्ट घालून ती काही सेकंद तेलामध्ये परता.
- आता त्यामध्ये कांदा घाला आणि कांदा चांगला ४ ते ५ मिनिटे लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या. कांदा चांगला भाजला कि त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घाला आणि तो देखील तेलामध्ये चांगला ५ मिनिटे शिजवून घ्या.
- आता यामध्ये गरम मसाला, गोडा मसाला, लाल मिरची पावडर, हळद घाला आणि ते मिक्स करा मग त्यामध्ये शिजवलेले चणे घाला आणि चणे शिजवलेल्या पाण्यासोबत घाला परंतु त्यामध्ये जास्त पाणी नसावे नाही तर आपला मसाला खूप पातळ होईल.
- आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घाला आणि ते ६ ते ७ मिनिटे झाकण लावून ते शिजू द्या आणि शिजल्यानंतर गॅस बंद करा.
- चणा मसाला सर्व्ह करण्यासाठी तयार झाला.
चणा मसाला कश्या सोबत खातात – serving suggestions
- चमचमीत आणि मसालेदार चणा मसाला आपण गरमागरम सर्व्ह केला तर छान लागतो आणि हा चणा मसाला आपण पुरी, चपाती, रोटी, नाना किंवा पराठ्या सोबत खावू शकतो.
टिप्स (Tips)
- चणा मसाला मध्ये आपण टोमॅटो बारीक चिरून घालण्याऐवजी टोमॅटो प्युरी देखील घातली तरी चालते.
- चणा मसाला मध्ये चवीसाठी थोडी साखर घातली तरी चालते त्यामुळे भाजीला थोडा गोड पणा येतो.
- चणा मसाला बनवताना फोडणीमध्ये कडीपत्ता देखील वापरला तरी चालतो.
आम्ही दिलेल्या chana masala recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर चणा मसाला रेसिपी मराठी lal chana masala recipe in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dry chana masala recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि kabuli chana masala recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chana masala recipe in marathi madhura Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट