पुरी रेसिपी मराठी Puri Recipe in Marathi

Puri Recipe in Marathi पुरी रेसिपी पुरी हा एक भारतीय पदार्थ आहे जो गव्हाच्या पिठापासून बनवला जातो आणि तो काही तिखट भाज्या जसे कि पनीर कुर्मा, काजू करी, पनीर मसाला, काजू मसाला, बटाट्याची पिवळी भाजी किंवा लाल भाजी या सोबत सर्व्ह केला जातो त्याचबरोबर हा पदार्थ श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी सोबत सर्व्ह केला जातो. पुरी हा पदार्थ भारतामध्ये सर्व ठिकाणी बनवला जातो आणि या पदार्थाला मोठ मोठ्या कार्यक्रमांमध्ये एक वेगळेच महत्व असते कारण मोठ मोठ्या कार्यक्रमांमध्ये जेवणामध्ये पुरी हा पदार्थ ठरलेला असतो. पुरी हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनणारा हा एक उत्तम पदार्थ आहे. आता आपण या लेखामध्ये पुरी रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

puri recipe in marathi
puri recipe in marathi

पुरी रेसिपी मराठी – Puri Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ२० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतसोपी

पुरी म्हणजे काय ?

पुरी बनवताना गव्हाच्या पिठामध्ये मीठ आणि तेल घालून त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घाला आणि ते चांगले मळून थोडा वेळ भिजवले जाते आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे बनवून मग त्याच्या पुऱ्या लाटल्या जातात आणि त्या दोन्ही बाजूने मध्यम आचेवर तेलामध्ये तळल्या जातात.

पुरी बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients

  • गव्हाचे पीठ : गव्हाचे पीठ हे पुऱ्या बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य आहे. गव्हाच्या पिठामध्ये गरम तेल, रवा आणि मीठ घालून त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून ते चांगले मळले जाते आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे बनवून पुऱ्या लाटल्या जातात आणि त्या तळल्या जातात.
  • रवा : रवा देखील या रेसिपी मधील महत्वाचा घटक आहे कारण या पिठामध्ये घातला तर पुरी जास्त मऊ पडत नाहीत त्या थोड्या कडक राहतात.
  • तेल : तेल हा देखील महत्वाचा घटक आहे कारण आपण थोडे तेल पिठामध्ये देखील वापरतो तसेच पुऱ्या तळण्यासाठी देखील तेलाचा वापर होतो.

पुरी कशी बनवायची – how to make puri recipe in marathi language

पुरी रेसिपी हि एक सोपी रेसिपी आहे जी खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच झटपट बनणारी रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये अगदी सोप्या पध्दतीने बनवली जाते आणि हि रेसिपी आपण कोणत्याही प्रकारच्या तिखट भाजी सोबत किंवा बासुंदी सारख्या गोड पदार्थांच्यासोबत खावू शकतो. चला तर आता आपण पुरी हा पदार्थ कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ२० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतसोपी

पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients 

पुरी हि रेसिपी बनवण्यासाठी मोजकेच साहित्य लागते जसे कि गव्हाचे पीठ, रवा, तेल आणि मीठ आणि हे आपल्या घरामध्ये आधीपासूनच उपलब्ध असू शकते आणि जर त्यामधी काही साहित्य घरामध्ये उपलब्ध नसेल तर आपण ते बाजारात लगेच उपलब्ध करू शकतो. चला आता आपण पुरी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • २ वाटी गव्हाचे पीठ.
  • २ ते ३ चमचे रवा.
  • २ चमचे तेल.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).

पुरी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process 

आता आपण वर दिलेले साहित्य वापरून पुरी कशी बनवायची ते पाहूयात.

  • पुरी बनवतेवेळी सर्वप्रथम एक मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यामध्ये गव्हाचे पीठ घ्या आणि मग त्यामध्ये २ चमचे गरम केलेलं तेल आणि मीठ घाला आणि ते मिक्स करून
  • मग या पिठामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून पीठ चांगले मऊ मळून घ्या ( टिप : पीठ आपण जितके चांगले आणि मऊ मळू तितक्याच पुऱ्या चांगल्या बनण्यास मदत होते म्हणून पुरीचे पीठ मळताना अगदी लक्ष पूर्वक मळा कारण हा भाग या रेसिपी मधील एक महत्वाचा भाग आहे ).
  • आता ह्या पिठाचा मोठा गोळा करून तो भांड्यामध्ये ठेवा आणि त्या पिठावर एक सुती कापड घालून ते १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा त्यामुळे ते चांगले भिजेल आणि मऊ होईल.
  • १० ते १५ मिनिटांनी हे पीठ भिजले कि हे परत थोडे तेल लावून मळून घ्या.
  • त्यानंतर हाताला तेल लावा आणि ह्या पीठाचे छोटे छोटे ( पेढ्या एवढे ) गोळे करून ठेवा.
  • मग गॅसवर मध्यम आचेवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.
  • आता आपण बनवून ठेवलेल्या गोळ्यांच्या पुऱ्या लाटा आणि त्या तेलामध्ये घालून एक एक करून दोन्ही बाजूनी चांगल्या चांगल्या तळून घ्या
  • अश्या प्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्या.
  • पुऱ्या खाण्यासाठी तयार झाल्या त्या आपण काजू करी, कुर्मा, बटाटा भाजी तसेच गोड पदार्थ श्रीखंड, बासुंदी सोबत खावू शकतो.

पुरी कश्यासोबत सर्व्ह करतात – serving suggestion

  • पुरी हा एक असा पदार्थ आहे जो आपण कोणत्याही तिखट भाजी सोबत खावू शकतो जसे कि काजू करी, पनीर मसाला, मलई कोफ्ता, काजू मसाला, राजमा, पनीर टिक्का, वेग कोल्हापुरी, पिवळी बटाट्याची भाजी किंवा लाल बटाट्याची भाजी सोबत आपण पुरी खावू शकतो. तसेच पुरी हा पदार्थ आपण आम्रखंड, श्रीखंड, फ्रुटखंड किंवा बासुंदी सोबत खावू शकतो.

टिप्स (Tips) 

  • आपण गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्याचे पीठ देखील पुऱ्या बनवण्यासाठी वापरले तरी चालते.
  • मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून त्या तेलामध्ये दोन्ही बाजूनी लालसर रंग येईपर्यंत भाजा.

आम्ही दिलेल्या puri recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पुरी रेसिपी मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या how to make puri recipe in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of puri in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये puri in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!