Kaju Masala Recipe in Marathi काजू मसाला रेसिपी मराठी काजू मसाला हि एक महाराष्ट्रीयन डिश आहे जी महाराष्ट्रा बरोबर भारताच्या इतर भागामध्ये देखील खूप आवडीने खाल्ली जाते. लोक जर रेस्टॉरंट मध्ये गेले तर बहुतेक लोकांच्या ऑर्डर मध्ये हि काजू मसाला हि भाजी असते आणि आज आपण घरामध्ये रेस्टॉरंट सारखा काजू मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत. काजू मसाला हि एक मसालेदार भाजी आहे जी टोमॅटो, कांदा, काजू आणि काही मसाले या सर्व साहित्याच्या पेस्ट पासून ग्रेव्ही बनवली जाते आणि त्यामध्ये तळलेले काजू घातले जातात.
काजू मसाला हि रेसिपी आपण भाजी म्हणून करतो आणि ते चपाती, रोटी किंवा नान सोबत खावू शकतो. हि रेसिपी अनेक लोकांची आवडती डिश असून हि रेसिपी लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांच्यासाठी योग्य आहे.
काजू मसाला हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनते. चला तर मग आता आपण या लेखामध्ये मसालेदार आणि टेस्टी काजू मसाला रेसिपी कशी बनवायची ते आपण पाहूयात.
काजू मसाला रेसिपी मराठी – Kaju Masala Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ४० मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन ( भारतीय ) |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
काजू मसाला रेसिपी – kaju masala recipe
काजू मसाला हि भाजी आवडणारे लोक हि भाजी खावू वाटली कि ते हॉटेल मध्ये जातात आणि ऑर्डर करून मग खातात परंतु काजू मसाला रेसिपी हि इतकी सोपी रेसिपी आहे कि आपण ती घरामध्ये देखील अगदी सहजपणे आणि टेस्टी रेसिपी बनवता येते. चला तर आता आपण काजू मसाला रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
- नक्की वाचा: काजू करी रेसिपी
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ४० मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन (भारतीय) |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
काजू मसाला बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, टोमॅटो, कांदा, आले लसून पेस्ट आणि इतर काही महत्वाचे साहित्य लागते आणि यामधील काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते आणि जे साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते ते आपण बाजारातून विकत अनु शकतो. चला तर आता आपण काजू मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- १ वाटी काजू.
- १ वाटी टोमॅटो प्युरी.
- अर्धी वाटी कांदा पेस्ट.
- २ चमचे आले लसून पेस्ट.
- २ चमचे काजू पेस्ट.
- २ ते ३ चमचे फ्रेश क्रीम.
- ७ ते ८ लवंग.
- १ बदाम फुल.
- २ तमाल पत्री पाने.
- २ चमचे जिरे.
- २ तुकडे दालचिन.
- २ चमचे लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- तेल ( गरजेनुसार ).
- पाणी ( गरजेनुसार ).
- मीठ ( चवीनुसार ).
काजू मसाला हि मसालेदार आणि टेस्टी रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि हि रेसिपी झटपट बनते. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून काजू मसाला कसा बनवायचा ते पाहूयात.
- काजू मसाला बनवताना सर्वप्रथम गॅसवर मध्यम आचेवर एक कढई ठेवा आणि त्यामध्ये २ ते ३ चमचे तेल घालून ते गरम झाले कि त्यामध्ये काजू घाला आणि ते चांगले कुरकुरीत आणि लालसर रंग येईपर्यंत भाजा. काजू चांगले भाजले कि ते कढईतून बाजूला काढा.
- मग त्यामध्ये आणखीन एक चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि दालचिन, बदाम फुल, जिरे, तमाल पत्री आणि लवंग घाला आणि तेलामध्ये थोडावेळ परतून घ्या आणि ते बाजूला काढा आणि थोड्या वेळासाठी गॅस बंद करा.
- आणि हे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेवून त्याची बारीक पावडर करून घ्या आणि ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.
- आता कढई मध्ये ३ ते ४ चमचे तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये आले लसून पेस्ट घाला आणि २ सेकंद ते तेलामध्ये परता आता त्यामध्ये कांदा पेस्ट घाला आणि कांदा पेस्ट देखील चांगली भाजा मग त्यामध्ये टोमॅटो प्युरी घाला आणि ती तेलामध्ये चांगली मिक्स करून थोडा वेळ शिजू द्या.
- आता या मिश्रणामध्ये आपण बनवलेली मसाला पावडर घाला आणि ती देखील चांगली मिक्स करा.
- मग यामध्ये लाल मिरची पावडर आणि हळद घाला आणि मिक्स करा आणि त्यामध्ये थोडे पाणी घाला म्हणजे ते मिश्रण सरसरीत होईल.
- त्यानंतर यामध्ये काजू पेस्ट, फ्रेश क्रीम, मीठ ( चवीनुसार ) घाला आणि ते मिक्स करा.
- शेवटी यामध्ये आपण तेलामध्ये भाजून घेतलेले काजू घाला आणि ते ग्रेव्हीमध्ये चांगले मिक्स करून ते मध्यम आचेवर ५ ते ६ मिनिटे शिजवा आणि गॅस बंद करा.
- तुमचा मसालेदार काजू मसाला सर्व्ह करण्यासाठी तयार झाला.
काजू मसाला कश्यासोबत खातात – serving suggestions
- स्वादिष्ट काजू मसाला रेसिपी आपण चपाती, रोटी, नान, पुलके , जीरा राईस किंवा पांढऱ्या भातासोबत खावू शकतो.
टिप्स (Tips)
- काजू मसाल्यामध्ये आपण जी मसाल्यांची पेस्ट घालतो त्या ऐवजी आपण त्यामध्ये गरम मसाला पावडर देखील घालू शकतो.
- यामध्ये थोड्याश्या गोड चवीसाठी आपण थोडीशी साखर देखील घालू शकतो.
- जर आपण काजू मसाल्यामध्ये काजू पेस्ट घातली असेल तर फ्रेश क्रीम घातली नाही तरी चालेल.
- काजू मसाला बनवताना टोमॅटो, कांदा, आले, लसून, काजू आणि इतर खडे मसाले एकत्र भाजून देखील आपण त्याची पेस्ट बनवू शकतो.
- काजू मसाला गरमगरम सर्व्ह करा आणि सर्व्ह करताना त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
आम्ही दिलेल्या kaju masala recipe in marathi by madhura माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर काजू मसाला रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kaju paneer masala recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि masala kaju recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dry kaju masala recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट