चार्ल्स डार्विन Charles Darwin Information in Marathi

Charles Darwin Information in Marathi चार्ल्स डार्विन ची माहिती माणसाच्या उत्पत्तीचे रहस्य सर्वांनाच असते. मानवाची उत्पत्ती कशी झाली, त्याचे पूर्वज कोण होते या सर्वांचे कुतूहल सर्वांनाच असतं. तर आज आपण अशाच एका शास्त्रज्ञा बद्दल वाचणार आहोत ज्यांनी मानवाच्या उत्क्रांतीचा शोध लावला. ज्याने पुराव्यासकट मानवाची निर्मिती कशी झाली हे सिद्ध केले. त्यालाच मानवी उत्क्रांतीचा जनक असे म्हणतात. आणि तो शास्त्रज्ञ म्हणजे चार्ल्स डार्विन होय. चार्ल्स डार्विन हा निसर्ग शास्त्रज्ञ होता. त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 रोजी इंग्लंड येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव चार्ल्स रॉबर्ट डार्विन Charles Robert Darwin असे होते. त्यांचे वडील हे नामांकित डॉक्टर तर आजोबा हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते.

डार्विन यांना लहानपणापासून निसर्गाची आवड होती. चार्ल्स डार्विन हे उत्क्रांतीचे नियमामुळे खूपच लोकप्रिय झाले. डार्विन यांनी माणसाची उत्पत्ती कशी झाली याबद्दल महत्वपूर्ण माहिती प्रकाशित केली म्हणून त्यांच्या संशोधनाला चार्ल्स डार्विनचा सिद्धांत असे म्हणतात.

charles darwin information in marathi
charles darwin information in marathi

चार्ल्स डार्विन मराठी माहिती – Charles Darwin Information in Marathi

चार्ल्स डार्विन                                     माहिती
जन्मस्थान12 फेब्रुवारी 1809
जन्मइंग्लंड
शिक्षणवैद्यकीय
संशोधनमानवी उत्क्रांतीचा सिद्धांत
मृत्यू19 एप्रिल 1882

शिक्षण 

1825 मध्ये चार्ल्स डार्विन यांनी वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यास केला. चार्ल्स डार्विन यांनी आपले कॉलेजचे शिक्षण एडिनबर्ग मेडिकल स्कूलमधून पूर्ण केले. कॉलेज मध्ये असताना त्यांना वैद्यकीय शिक्षणात रस नव्हता. त्यांचे मन नेहमी सागर सफारीवर असायचे.

संशोधन – डार्विन चा सिद्धांत

आरमार खात्यातील जल पर्यटनास निघालेल्या एका जहाजावर त्यांची निसर्ग शास्त्रज्ञ म्हणून नेमणूक झाल्यामुळे त्यांच्या आवडीच्या विषयावर संशोधन करण्याची व निसर्गातील वस्तूंची सूक्ष्म निरीक्षण करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. चार्ल्स डार्विन यांना इंग्लंडमधील सायंटिफिक सोसायटी मध्ये सामील करण्याची ऑफर दिली.

त्यांनी द ओरिजिन ऑफ स्पेसिस या लोकप्रिय पुस्तकामध्ये मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला होता. 1870 मध्ये त्यांच्या या सिद्धांताला  वैज्ञानीका बरोबरच सामान्य माणसाने हे स्वीकारले. अनेक शास्त्रज्ञांनी जीवनचक्र सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश मिळू शकले नाही परंतु डार्विनने वैज्ञानिक पद्धतीने ते सिद्ध करून दाखवले. 

त्यांनी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, केप ऑफ गुड होप, सेंट हेलेना येथे केलेल्या प्रवासात त्यांनी तेथील वनस्पती प्राणी खडक यांचे सूक्ष्म अवलोकन करून अनेक नमुन्यांचा संग्रह केला. प्राणी आणि वनस्पती यांच्या विविध जातींतील फरक व नैसर्गिक परिस्थितीशी समरस होण्यासाठी सजीवात झालेले शारीरिक आणि क्रिया वैज्ञानिक बदल्यांच्या निरीक्षणाने जातींच्या उगमा संबंधी त्यांच्या मनात कल्पना साकार होऊ लागल्या.

प्राचीन वनस्पतींच्या अवशेष यासंबंधी विचार करून त्यांना भूतकालीन आणि वर्तमानकालीन जातींच्या परस्परसंबंधांचे त्यांना आकलन होऊ लागले. सफारी वरून परत येईपर्यंत त्यांचा संग्रह, माहिती, त्यांच्या कल्पना अतिशय संपन्न झाल्या होत्या. त्यांचा नॅचरलिस्ट व्हॉएज ऑन द बीगल हा भाग आदर्श प्रवास वर्णन म्हणून मानला जातो.

या ग्रंथामध्ये त्यांचे सूक्ष्म निरीक्षण, लेखनशैली आणि संशोधक वृत्ती यांची कल्पना येते. कबुतरांच्या कृत्रिम रीत्या केलेल्या प्रजोत्पादनाचे माहिती त्यांनी संकलित केली. तसेच जगातील शिंपली जलचराबद्दल चार पुस्तकेही प्रसिद्ध केली होती. 1839 मध्ये ते रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवडले गेले होते. तसेच ते लंडनमधील भूविज्ञान मंडळाचे चिटणीस होते.

चार्ल्स डार्विन यांनी जवळजवळ पंचवीस वर्षे श्रुष्टि निरीक्षण आणि संशोधन करून विद्यमान जीवांच्या जातींच्या उत्पत्ती संबंधी आपला सिद्धांत तयार केला. डार्विन यांनी ओरिजिन ऑफ स्पेस इस बाय मिन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन प्रीजर्वेशन ऑफ द फेव्हर प्लेसेस इन द स्ट्रगल फॉर लाईफ हा ग्रंथ प्रसिद्ध केला.

सर्व जीव हे स्वयं जननापासून उत्पन्न झालेली असून ते आकाराने कायम आहेत.ही जुनी कल्पना निराधार असून सर्व जीव क्रमाक्रमाने विकास पावत आले आहेत व ते परिवर्तनीय आहेत ही जैव क्रमविकास सिद्धांताची मध्यवर्ती कल्पना आहे. डार्विन यांनी याला पुरावा सादर केला.

जगातील  मर्यादित जीवन साधने आणि अमर्याद जीव संख्या यामुळे जीवनात स्पर्धा उत्पन्न होऊन त्यामध्ये नैसर्गिक निवडीमुळे योग्यतम चा टिकाव लागतो असा निष्कर्ष डार्विन यांनी काढला. प्रत्येक पिढीत नैसर्गिक निवडीच्या चाळणीतून अतिशय योग्य जातींची निवड होऊन इतर नाश पावतात.

डार्विन यांचे ग्रंथ 

 1. On the various contrivances which british and foreign orcids are fertilised by insects – या ग्रंथामध्ये कीटकाकडून परागकणांची ने-आण कशी घडवून आणली जाते याचे वर्णन दिले
  On the movent and habits of Climbing plants – यामध्ये वनस्पतींची हालचाल म्हणजे त्यांचे आधाराची बिलगणे किंवा वेटोळे घालत वर वाढणे इत्यादींचा तपशील दिला आहे.
 2. The variation of animals and plants under domestication – यामध्ये पाळीव जनावरे व वनस्पती यांमध्ये घडून येणार्‍या बदनाम संबंधी माहिती दिलेली आहे.
 3. The Descent of man and selection in relation to sex – यामध्ये मनुष्य प्राण्यांचे अवतरण ते कोणत्या  पूर्वजा पासून झाले आणि त्यामध्ये बदल कसे घडून आले इत्यादी विचार ग्रथित केले आहेत.
 4. The expression of the emotions in man and animals – यामध्ये मनुष्य आणि इतर प्राणी यातील साम्य व भेद यांचा ऊहापोह केला आहे.
 5. Insectivorous plants – या ग्रंथामध्ये त्यांनी किटकांवर उपजीविका करणाऱ्या वनस्पतीत आढळणारी स्पर्श ग्राहकता  आणि कीटकांना पकडून ठेवण्याचा प्रतिसाद व शेवटी कीटकाचे पचन हा तपशील दिला आहे.
 6. Effects of cross and self fertilization in the vegetable kingdom – यामध्ये वनस्पतींतील स्व फलन आणि फलन यांची चर्चा या ग्रंथामध्ये आढळते.
 7. The different forms of flower on plants of the same species – यामध्ये परागकणांची भूमिका दाखवली आहे.
 8. The power of Movement in plants – वनस्पतींच्या चलन वलनाची क्षमता या विषयावर चर्चा केली आहे.
 9. The formation of vegetable mould through the action of verms – त्यामध्ये त्यांनी वनस्पती ज्या जमिनीतून आपले अन्न पाणी घेतात त्यातील वनस्पतिजन्य कार्बनी पदार्थ आणि त्यांच्या निर्मितीतील कृमींची भूमिका यासंबंधीची माहिती या ग्रंथात दिली आहे.

मृत्यू 

अशा या महान शास्त्रज्ञाचा मृत्यू 19 एप्रिल 1882 मध्ये  डाऊन येथे झाला.

वरील सर्व मजकूर पाहून आपणास अंदाज लागला असेल कि चार्ल्स डार्विन कोण होते charles darwin information in marathi language त्यांनी कशाचा शोध लावला व त्यांचा इतिहास काय आहे. charles darwin scientist information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच charles darwin information in marathi pdf हा लेख कसा वाटला व अजून काही चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या information about charles darwin in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!