चिखलदरा संपूर्ण माहिती Chikhaldara Information in Marathi

chikhaldara information in marathi चिखलदरा संपूर्ण माहिती, आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्र राज्यातील तालुक्याचे शहर म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा या शहराविषयी माहिती घेणार आहोत. चिखलदरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे आणि हे अमरावती हा शहरापासून १०० किलो मीटर अंतरावर आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १०८८ मीटर उंचीवर आहे आणि या प्रदेशातील हे ठिकाण एकमेव कॉफी उत्पादक आहे. चिखलदरा या शहराचा शोध हा हैद्राबाद रेजिमेंटचे कॅप्टन रॉबिन्सन यांनी १८२३ मध्ये लावला. चिखलदरा हिल स्टेशन हे अनेक पर्यटन स्थळांनी वेढलेले आहे.

चिखलदरा हे ठिकाण अनेक पौराणिक कथांनी समृध्द असे ठिकाण आहे जे पर्यटकांना देखील एक मोहक आनंद देते. हे महाराष्ट्रातील एकमेव हिल स्टेशन आहे आणि हे १११८ मीटर उंचीवर सातपुडा डोंगर रांगेच्या एका शाखेवर वसलेले आहे. हे ठिकाण एकमेव कॉफी पिकवणारे ठिकाण म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिध्द आहे तर हे शहर १८३९ मध्ये ब्रिटीश काळामध्ये कॉफी लागवडीचे आणि स्वच्छता गृह म्हणून स्थापन केलेले ठिकाण होते आणि म्हणून आपल्या चिखलदरा या ठिकाणी आजही ब्रिटीश कालीन बंगले पहायला मिळतात.

ज्यांना निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आवडते जसेच जे निसर्गप्रेमी आहेत अश्या लोकांच्यासाठी चिखलदरा हिल स्टेशन हे एक चांगले ठिकाण आहे आणि या ठिकाणी मॅग्पी, पँथर्स, स्लॉथ बिअर, बार्बेट, हायना, चार शिंगी काळवीट, नीलगाय, वाघ आणि रंगीबेरंगी पक्षी यासारखे अनेक प्राणी या ठिकाणी आहेत तसेच आपल्या पावसाळ्यामध्ये धबधब्यांचे चित्तथरारक दृष्ये देखील पहायला मिळतात.

या ठिकाणी एक व्याघ्र प्रकल्प देखील आहे जो मेळघाट प्रकल्प म्हणून प्रसिध्द आहे आणि या ठिकाणी ८२ वाघ आहेत. चिखलदरा हा परिसर अनेक निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय स्थळांनी परिपूर्ण आहे म्हणजेच त्या ठिकाणी मेळघाट व्याघ्र प्रकल्प, भीमा कुंड, शक्कर तलाव, सनसेट पॉइंट, हरिकेन पॉइंट, गोराघाट पॉइंट अशी अनेक ठिकाणे आहेत. चिखलदरा या ठिकाणाला आपण ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यामध्ये भेट देण्यासाठी उत्तम वेळ आहे.

chikhaldara information in marathi
chikhaldara information in marathi

चिखलदरा संपूर्ण माहिती – Chikhaldara Information in Marathi

ठिकाणचिखलदरा
ठिकाणाचा पत्तामहाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा आहे.
ओळखप्रेक्षणीय स्थळ आणि महाराष्ट्रातील कॉफी उत्पादन क्षेत्र
शोध१८२३ मध्ये
कोणी लावलाशहराचा शोध कॅप्टन रॉबिन्सन यांनी लावला

चिखलदरा पाहाण्यासारखी ठिकाणे – places to visit in chikhaldara area 

  • चिखलदरा हे पॅरा ग्लायडिंग, पॅरा विंचींग आणि रॉक क्लायंबिंग साठी हे ठिकाण एक उत्तम ठिकाण आहे.
  • चिखलदरा तालुक्यामध्ये भीमकुंड हा अल्लाधोह या गावाजवळ दक्षिणेस स्थित आहे आणि आपण प्रतवाडा ते मोथा मार्गे चिखलदरा या मार्गावरून अल्लाधोहला जावू शकतो. भीमकुंड हे असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी भीमाने कीचकाला मारल्यानंतर हात धुतले होते. हे ठिकाण ३५०० फुट खोल आहे आणि पावसाळ्यामध्ये हे ठिकाण धबधब्यासारखे दिसते आणि हे पावसाळ्यामध्ये एक आकर्षक दृश्य आहे.
  • गाविलगड हा किल्ला देखील दक्षि पश्चिमेस ३ किलो मीटर अंतरावर आहे आणि हा १४२५ मध्ये बहामानिंच्या राजवटीमध्ये बांधला आहे. या ठिकाणी सुंदर कोरीवकाम केलेल्या मुर्त्या आणि शिल्पे आहेत तसेच किल्ल्यावर हिंदी आणि अरबी लिपी देखील आहे आणि या किल्ल्यामध्ये १० तोफा आहेत ज्या तांबे, लोखंड आणि पितळेपासून बनल्या आहेत.
  • चिखलदरा व्याघ्र प्रकल्प हे देखील या ठिकाणाचे एक लोकप्रिय पर्यटक स्थळ आहे आणि या मेळघाट प्रकलपाची स्थापना १९६७ मध्ये झाली आणि हा प्रकल्प १६७६ चौरस किलो मीटर इतका आहे. या ठिकाणी ८२ इतकी वाघांची संख्या आहे तर ६४८ प्रजातींचे प्राणी आहेत.
  • या ठिकाणी मॅग्पी, पँथर्स, स्लॉथ बिअर, बार्बेट, हायना, चार शिंगी काळवीट, नीलगाय, वाघ आणि रंगीबेरंगी पक्षी यासारखे अनेक प्राणी या ठिकाणी आहेत. हा प्रकल्प फिरून पाहण्यासाठी प्रत्येकी २० रुपये प्रवेश शुल्क आहे आणि मुलांच्यासाठी १० रुपये प्रवेश शुल्क आहे.
  • सेमाडोह तलाव गुगामल राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारजवळ आहे आणि हे ठिकाण नौकाविहारासाठी खूप प्रसिध्द आहे आणि या ठिकाणी पर्यटक कॅम्प देखील लाऊ शकतात.
  • पंचबोली पॉइंट हा एक व्ह्यू पॉइंट आहे जो नैसर्गिक वन क्षेत्राचे संपूर्ण दृश्य पाहण्यास मदत करते.
  • देवी पॉइंट हा शक्कर तलावाजवळ आहे आणि हे ठिकाण चिखलदरा बसस्थानकापासून १.५ किलो मीटर अंतरावर आहे.
  • नरनाळा किल्ला हे देखील या भागातील एक प्रसिध्द पर्यटन ठिकाण आहे. हा किल्ला अकोट पासून २४ किलो मीटर अंतरावर आणि अकोल्यामधून हा किल्ला ६० किलो मीटर अंतरावर आहे या किल्ल्याची उंची ३१६१ फुट असून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. हा किल्ला ३८० एकर क्षेत्रफळा मध्ये विस्तारलेला आहे. त्याचबरोबर हा किल्ला मेळघाट परिसरामध्ये सातपुड्या डोंगरवर बांधला आहे. ह्या किल्ल्याला एकूण ५ दरवाजे आहेत आणि या दरवाज्यांवर कोरीव नक्षीकाम पाहायला मिळते.
  • या ठिकाणी आपल्याला आणखीन एक प्राचीन तलाव पहायला मिळते जे १८९० मध्ये ब्रिटिशांनी बांधले होते.

कसे पोहचायचे – how to reach 

चिखलदरा या ठिकाणी जाण्यासाठी आपण विमानाचा प्रवास निवडू शकतो आणि या ठिकाणहून सर्वात जवळचे विमानतळ अकोला या ठिकाणी १५० किलो मीटर अंतरावर आहे आणि आपण येथू चिखलदऱ्याला बसने किंवा टॅक्सीने जावू शकतो. तसेच जर रेल्वेने जायचे असल्यास आपण बांदेरी या ठिकाणी असलेल्या रेल्वे स्टेशनवर उतरू शकतो आणि हे रेल्वे स्टेशन चिखलदरा या ठिकानापासून ११० किलो मीटर अंतरावर आहे आणि तेथून आपण बस किंवा टॅक्सी पकडून चिखलदऱ्याला येऊ शकतो.

आम्ही दिलेल्या chikhaldara information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर चिखलदरा संपूर्ण माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या chikhaldara hill station information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि chikhaldara ghat information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!