क्रिकेट खेळाडूंची नावे व माहिती Cricket Player Information in Marathi

cricket player information in marathi क्रिकेट खेळाडूंची नावे व माहिती, क्रिकेट हा खेळ कोणाला माहित नाही असे नाही तर हा खेळ जगातील अनेक लोकांना चांगला परिचित आहे आणि आपल्या भारतामध्ये तर या खेळला खूप महत्व आहे आणि हा खेळ लहान मुलांच्या पासून ते मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना क्रिकेट आवडते आणि सर्वजण क्रिकेट हा खेळ आवडीने पाहतात तसेच खेळतात देखील. क्रिकेट हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला जातो आणि या खेळामध्ये अनेक वेगवेगळ्या देशाचे खेळाडू आपल्या संघामार्फत घखेळतात आणि आपल्या भारतीय संघामध्ये देखील अनेक क्रिकेट खेळाडू आहेत.

आणि आज आपण या लेखामध्ये क्रिकेट या खेळामध्ये विश्वविक्रम करणाऱ्या क्रिकेट खेळाडूंच्याविषयी माहिती घेणार आहोत. भारतीय क्रिकेट संघामध्ये अनेक खेळाडू होऊन गेलेत आणि आज देखील अनेक खेळाडू आपल्या संघासाठी क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळून आपल्या देशाचे नाव उंचावत आहेत.

cricket player information in marathi
cricket player information in marathi

क्रिकेट खेळाडूंची नावे व माहिती – Cricket Player Information in Marathi

भारतीय क्रिकेट संघातील काही लोकप्रिय खेळाडूंची नावे आणि भूमिका – indian cricket players information in marathi

खेळाडूचे नावभूमिका
विराट कोहलीफलंदाज
कुलदीप यादवगोलंदाज
हार्दिक पांड्याफलंदाज
रवींद्र जडेजाअष्टपैलू
रविचंद्रन अश्विनगोलंदाज
शिखर धवनफलंदाज
केएल राहुलविकेट कीपर
शुभमन गिलफलंदाज
रिशब पंतविकेट कीपर
जसप्रीत बुमराहगोलंदाज
अजिंक्य रहाणेफलंदाज
भुवनेश्वर कुमारगोलंदाज
रोहित शर्माफलंदाज

 काही प्रसिध्द क्रिकेट खेळाडूंची माहिती – information about cricket players in marathi

भारतीय संघामध्ये अनेक क्रिकेट खेळाडू होऊन त्यामधील काहींनी चाहत्यांच्या मनामध्ये घर केले आणि आपल्या देशाचे नाव देखील उंचावले त्यामधील काही लोकप्रिय खेळाडूंची माहिती आता आपण खाली पाहूया.

महेद्रसिंग धोनी हे एक भारतीय क्रिकेट टीममधला एक लोकप्रिय खेळाडू आहेत आणि हे खेळाडू भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते. क्रिकेटच्या इतिहासात इतर कर्णधारांपेक्षा अधिक यश मिळवल्यामुळे त्यांना सर्व काळातील महान कर्णधार म्हणून ओळखले जाते. महेंद्रसिंग धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ मध्ये रांची, बिहार येथे झाला होता, आणि हे मूळचे उत्तराखंडमधील एका राजपूत कुटुंबात आहेत.

तसेच ते सर्वात यशस्वी भारतीय कर्णधारांपैकी एक आहे आणि त्याच्या कर्णधारपदासाठी अनेक विक्रम आहेत आणि त्यामधील उल्लेखनीय म्हणजे, भारतीय संघ त्याच्या कर्णधारपदाखाली २००९ मध्ये १ नंबर कसोटी संघ बनला. त्याचबरोबर त्यांनी २००७ च्या आयसीसी वर्ल्ड २०-२० आणि २०१३ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यांनी त्यांची टीम चेन्नई सुपर किंग्जला २०१० आणि २०११ मध्ये दोन वेळा आयपीएल जिंकण्यास मदत केली.

रोहित शर्मा हा एक भारतीय लोकप्रिय क्रिकेटपटू आहे ज्याचे पूर्ण नाव रोहित गुरुनाथ शर्मा असे आहे आणि त्यांचा जन्म ३० एप्रिल १९८७ मध्ये झाला. रोहित शर्मा या खेळाडूने एकदिवसीय सामन्यामध्ये २९ शतके बनवली होती आणि हे तिसऱ्या क्रमांकावरील शतक बनवणारा खेळाडू आहे तसेच विश्वचषकामध्ये एक पाठोपाठ एक अशी ३ शतक करणारे रोहित शर्मा हे खेळाडू दुसऱ्या क्रमांकावरील खेळाडू आहेत. रोहित शर्मा या खेळाडूने आपल्या क्रिकेट खेळाच्या प्रवासामध्ये जवळ जवळ ४० शतके बनवली आहेत आणि हा खेळाडू सर्वाधिक शतके बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये बहुतेक १५ व्या क्रमांकावर आहे.

या लोकप्रिय भारतीय खेळाडूने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण ७ शतके बनवली तर श्रीलंकेविरुध्द ६ शतके बनवली आहेत. रोहित शर्मा या खेळाडूने एकदिवसीय सामन्यामध्ये २९ शतके बनवली होती आणि हे तिसऱ्या क्रमांकावरील शतक बनवणारा खेळाडू आहे आणि यांच्या अगोदर सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली हे खेळाडू पहिल्या आणि दुसरया क्रमांकावर होते.

सचिन तेंडूलकर हे नाव कोणाला माहित नाही असे नाही तर हे नाव सर्वांना माहित आहे आणि हे नाव क्रिकेट विश्वातील मोठे आणि लोकप्रिय नाव आहे. सचिन तेंडूलकर यांचे पूर्ण नाव सचिन रमेश तेंडूलकर असे आहे आणि त्यांचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबई या शहरामध्ये झाला. सचिन तेंडूलकर यांची क्रिकेट क्षेत्रातील खरी वाटचाल हि १९९२ च्या दरम्यान झाली. सचिन तेंडूलकर ह्या खेळाडूने कसोटी सामन्यामध्ये ११ वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला होता.

तसेच त्यांनी दोनशे कसोटी सामने आतापर्यंत खेळले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी एकूण १५००० हजार पेक्षा जास्त धावा बनवल्या आहेत तसेच त्यांनी २००७ मध्ये ३०००० हजार धावांचा टप्पा पार पाडला आहे. सचिन तेंडूलकर यांना क्रिकेट मधील अनमोल कामगिरी साठी भारतरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार आणि राजीव गांधी पुरस्कार हे पुरस्कार मिळाले.

  • विराट कोहली

विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघातील एक लोकप्रिय खेळाडू आणि सध्याच्या क्रिकेट संघाचा कर्णधार अशी त्याची ओळख आहे. सचिन तेंडूलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर क्रिकेटमध्ये लोकप्रिय असणारे नाव म्हणजे विराट कोहली. विराट कोहली याचे पूर्ण नाव विराट प्रेम कोहली असे आहे आणि या खेळाडूचा जन्म हा ५ नोव्हेंबर १९८८ मध्ये दिल्ली या शहरामध्ये झाला. विराट कोहली याला क्रिकेटची आवड असल्यामुळे त्याला वयाच्या ९ व्या वर्षी पासूनच क्रिकेट क्लबला पाठवण्यास सुरुवात केली.

अश्या प्रकारे ते क्रिकेट खेळामध्ये गुंतत गेला आणि मग २०११ मध्ये त्याला क्रिकेट विश्वकप खेळण्याची संधी मिळाली आणि त्यावेळी भारताची क्रिकेट टीम विजयी देखील झाली आणि २०११ मध्ये या स्पर्धेत या खेळाडूने शतक बनवले होते तसेच तो अंतरराष्ट्रीय पध्दतीने होणाऱ्या सामन्यात १०००, ३०००, ४००० आणि ५००० धावा बनवणारा पहिलाच खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे.  

  • रवींद्र जडेजा 

रविद्र जडेजा हा देखील एक क्रिकेट मधील लोकप्रिय खेळाडू आहे आणि या खेळाडूची ओळख क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आहे. रवींद्र जडेजा या खेळाडूचा जन्म ६ डिसेंबर १९८८ मध्ये गुजरात मधील नवग्रामगढ या ठिकाणी झाला. वयाच्या खूप कमी वयामध्ये तो क्रिकेट खेळू लागला आणि त्याने २००९ मध्ये श्रीलंके विरुध्द आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाची सुरुवात त्याने केली आणि मग तो टी २० खेळ देखील खेळू लागला. तसेच या खेळाडून २०१२ मध्ये इंग्लंड विरुद्ध आपला पहिला सामना खेळला. रवींद्र जडेजा या खेळाडूने वनडे सामन्यामध्ये आजपर्यंत २००० हून अधिक धावा बनवल्या आहेत.

हार्दिक पांड्या हा देखील क्रिकेट खेळामधील लोकप्रिय खेळाडू आहे आणि आपल्या भारतीय संघातील एक चांगला फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. हार्दिक पांड्या याचा जन्म ११ ऑक्टोबर १९९३ मध्ये गुजरात मधील सुरात या ठिकाणी झाला आणि याला भारतामध्ये एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाते.

हार्दिकला लहानपाणी पासूनच क्रिकेटच खूप वेढ होत त्यामुळे त्याने लवकरच किरण मोरे क्रिकेट अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला आणि क्रिकेट खेळ खेळण्याची सुरुवात केली. २०१३ मध्ये हार्दिकने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पहिले पाऊल टाकले आणि क्रिकेट मधील आपली वाटचाल चालूच ठेवली आणि २०१६ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय खेळामध्ये पहिले पाऊल ठेवले.

आम्ही दिलेल्या cricket player information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर क्रिकेट खेळाडूंची नावे व माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या indian cricket players information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about cricket players in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये all indian cricket players information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!