सायकलची आत्मकथा निबंध Cycle Chi Atmakatha in Marathi

Cycle Chi Atmakatha in Marathi Cycle Ki Atmakatha Essay in Marathi सायकलची आत्मकथा मराठी निबंध सकाळची वेळ होती मला कॉलेजला जायचं होतं. मी माझ्या स्कुटीवर स्वार झालो आणि कॉलेजला जायला निघालो आणि रस्त्यामध्ये ट्राफिक लागली. भल्या मोठ्या गाड्यांच्या रांगा बघून अगदी डोकं गरगरल्यासारखं झालं त्यात आधीच झालेला उशीर बराच वेळ झाला. ट्राफिक काही कमी होतच नव्हती. त्या फावल्या वेळेमध्ये मला बालपणाचे दिवस आठवले आणि मी माझ्या बालपणात रमलो. लहानपणीचे दिवस किती चांगले होते. शाळा सुटली की दिवसभर खेळायचं अभ्यासाचं तर अजिबातच दडपण नव्हतं.

शाळेतून घरी आलो की दुपारपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत बाबांनी घेऊन दिलेली सायकल चालवायची. ती सायकल मला इतकी आवडायची की अगदी छोटी-मोठी काम करण्यासाठी देखील मी ती सायकल वापरायचो. बालपणीच्या आठवणीं मध्ये रमलेलो तितक्यातच ट्रिंग ट्रिंग असा आवाज झाला आणि कानावर काही शब्द ऐकू आले, काय आली ना माझी आठवण? विश्वास नव्हता बसत पण चक्क सायकल बोलू लागली होती.

cycle chi atmakatha in marathi
cycle chi atmakatha in marathi

सायकलची आत्मकथा मराठी निबंध – Cycle Chi Atmakatha in Marathi

Cycle Ki Atmakatha Essay in Marathi

“काय आली ना माझी आठवण?”– बालपणीचे दिवस खरंच खूप छान होते. आपली पहिली ओळख आमच्या सायकलच्या दुकानात झाली. तू माझ्याकडे बोट दाखवत मला हीच सायकल हवी आहे असा हट्ट बाबांकडे करत होतास. शेवटी तुझ्या बाबांनी तुझा हट्ट पुरवला. त्यानंतर प्रत्येक दिवस आपण एकत्र खेळायचो तू प्रत्येक वेळी घरातील छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मला तुझ्या सोबत घेऊन जायचास. बऱ्याच वेळा तुला माझ्यामुळे दुखापती देखील झाल्या.

तेव्हा तू माझा इतका वापर करायचास की असं वाटलं होतं तू यापुढेही माझी अशीच काळजी घेशील. परंतु जेव्हापासून तुला स्कुटी मिळाली आहे तेव्हापासून तू मला विसरून गेलास. तुझ्या घरातल्या अडगळीच्या खोलीमध्ये मी पडून असते. असं म्हणतात स्कुटी चालवण्यासाठी आधी सायकल चालवायला शिकणे गरजेचे आहे आणि माझ्यामुळेच तू सायकल चालवायला शिकलास आणि आज खूप वेगाने स्कुटी देखील चालू शकलास. त्याचं सगळं श्रेय मला जातं.

परंतु विज्ञान व तंत्रज्ञानामुळे मनुष्य इतका पुढे गेला आहे की मानवाने दुचाकी, चारचाकी, ट्रक अशी बरीच वेगवेगळी वाहनांची निर्मिती केली. एके काळी माझ्या वर इतकं जीवापाड प्रेम करणाऱ्यांना आता मोठ्या आरामदायी गाड्या आवडू लागल्या आहेत. मला मान्य आहे मला चालवायला थोडे कष्ट लागतात परंतु त्या कष्टामुळे मनुष्याचाच फायदा आहे. पायंडल मारताना पायांचा व्यायाम होतो यामुळे मनुष्याचे स्नायू बळकट राहतात. एक काळ होता जेव्हा सर्व ठिकाणी फक्त माझीच चर्चा होती.

प्रत्येक लहान मुलाने आपल्या पालकांकडे माझ्यासाठी हट्ट धरला होता. परंतु नव्याचे नऊ दिवस ते म्हणतात ते हेच का? जेव्हा माझ्यापेक्षा अधिक चांगल्या वाहनाचा शोध लागला तेव्हा मनुष्याने माझ्याकडे पाठ फिरवली. असं म्हणतात बाळाचे सर्वांगीण विकासामध्ये आई-वडिलांचा वाटा असतो परंतु, बाळाच्या शारीरिक विकासामध्ये माझा देखील वाटा आहे. लहानपणी मनुष्याने चालवलेलं पहिलं वाहन “सायकल” म्हणजे मी आहे.

Cycle Chi Atmakatha Essay in Marathi

बाजारात जायचं असेल तर सायकलचा वापर, शाळेत जायचं असेल तर सायकलीचा वापर, बाजूच्या गावात जायचं असेल तर सायकलचा वापर असं प्रत्येक ठिकाणी माझा वापर करण्यात आला. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये माझ एक वेगळेच स्थान होतं. प्रत्येक जण मला चालवताना धडपडायचे. मी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आठवणी निर्माण केल्या. परंतु प्रत्येक काळ बदलतो त्याचप्रमाणे काळ बदलला आणि माझा वापर देखील कमी होऊ लागला. आता माझ्यापेक्षा ही चांगली आरामदायी, सोयीस्कर अशी वाहनांची निर्मिती झाली आहे‌.

त्यामुळे मी आता कोणाच्या पसंतीस येत नाही शिवाय मी इतर वाहनांच्या तुलनेमध्ये स्वस्त आहे आणि मला पेट्रोल-डिझेल यासारख्या गोष्टीचा खर्चही नाही. इतर वाहनांसाठी लागणारा हा खर्च पर्यावरणाची हानी करत आहे. डिझेल, पेट्रोल याच्या अतिरिक्त वापरामुळे पर्यावरण दूषित होत चालले आहे शिवाय वाढत्या पेट्रोल व डिझेलचे भाव मनुष्याला झेपणारे नाहीत.

इतर वाहनांमुळे अपघात होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. इतर वाहनांच्या तुलनेमध्ये मी सर्वात उत्तम आहे. मानवाची प्रगती व्हावी हे माझंही स्वप्न आहे परंतु ती प्रगती फायदेशीर ठरावी. इतर वाहनांसाठी लागणारे पेट्रोल-डिझेल यामुळे वातावरणात प्रदूषण वाढू लागले आहे आणि याचा थेट परिणाम मानवी शरीरावर दिसून येतो. शिवाय इतर वाहनांची फार काळजी देखील घ्यावी लागते आणि त्यांच्या हातून अपघाताचे प्रमाण देखील जास्त आहे.

तसं माझ्या बाबतीत नाही आहे मला चालवण्यासाठी कुठलंही डिझेल असेल किंवा पेट्रोल लागत नाही. हा फक्त थोडेसे कष्ट लागतात परंतु त्यामुळे पर्यावरण प्रदूषित होणार नाही आणि मनुष्याला ही हानी पोचणार नाही उलट मनुष्याचाच फायदा आहे. आता सायकलचा वापर कमी झाला आहे परंतु अजूनही डॉक्टर त्यांच्या बऱ्याच रुग्णांना तंदुरुस्त व निरोगी राहण्यासाठी सायकलचा वापर करायला सांगतात ते उगाचच का? माझी अशी इच्छा नाही की तुम्ही इतर वाहनांचा वापर करू नये परंतु माझाही तितकाच वापर करा आणि हे मनुष्याच्या फायद्यासाठीच आहे. इतर वाहनांचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे.

त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा लांब जाण्यासाठी माझा वापर होऊ शकत नाही परंतु छोट्या कामांसाठी, शाळेत जाण्यासाठी, बाजारात जाण्यासाठी, बागेत जाण्यासाठी तर माझा वापर नक्कीच होऊ शकतो. यामुळे थोडाफार का होईना पण प्रदूषण होणार नाही. इतर वाहनांचा फारसा खर्च देखील असतो त्यांचा एखादा भाग मोडला, तुटला बिघडला तर बरेच पैसे भरावे लागतात. परंतु माझा एखादा भाग तुटला मोडला तर त्यासाठी इतके पैसे लागत नाही.

रोज शाळेमध्ये रिक्षाने जाण्यापेक्षा माझा वापर करा. सायकल वापरा म्हणजे तुमचे पैसे देखील वाचतील आणि थोडाफार व्यायाम देखील होईल. माझा वापर हा वैयक्तिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या मानवाच्या फायद्याचा आहे. माझ्या वापरामुळे तुमचे अनेक वायफळ खर्च वाचतील. हल्ली वाहतूक कोंडी ही फार मोठी समस्या बनली आहे. कारण आज जो तो उठून कार, बाईक, रिक्षा, ट्रक, टेम्पो यांचाच वापर करत आहे. आज वायू प्रदूषणाचे प्रमाण इतके वाढले आहे की त्यातील ५० टक्के वायुप्रदूषण हे गाड्यांमुळे होत आहे.

आज जिम मध्ये देखील सायकल वापरली जाते जिम मध्ये व्यायामाची सायकल ठेवलेली असते ज्याचा वापर करून आपण वरकाउट करू शकतो. याचाच अर्थ असा की सायकल ही एक छोटा घटक आहे परंतु त्याचे फायदे व वापर फार महत्त्वाचे आहेत. सायकलीचा वापर हा शरीरासाठी फार चांगला आहे.

नियमित सायकल चालवल्या ने हृदय रोग होत नाहीत. दररोज एक तास सायकल चालवल्याने रक्तातील चरबीचे प्रमाण कमी होतं, मास पेशींची ताकद वाढण्यास मदत होते, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते तर फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर मध्ये भर पडते, रक्तातील साखर नियंत्रित राहते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि यामुळेच हार्ट अटॅक, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज यांसारख्या आजारांपासून दूर ठेवते. नियमितपणे सायकल वापरल्यामुळे हृदय, फुफ्फुसे, मांस पेशी, हाडे व सांध्यांचे आरोग्य चांगले राहते सोबतच, शरीरातील अतिरिक्त चरबी व कॅलरीज बर्न होऊन वाढलेलं वजन घटण्यास मदत होते‌.

शिवाय सायकल चालवल्याने वारंवार पायंडल मारल्याने शरीरात रक्त संचारण व्यवस्थित होतं. शिवाय माझा वापराचा फायदा मनुष्याच्या शरीरासाठी नाही तर मनासाठी देखील चांगला आहे. नियमित सायकलच्या वापरामुळे मनुष्याचा ताणतणाव कमी होतो आणि मेंदू अधिक सक्षम रित्या काम करतो. सायकल चालवल्यामुळे थकायला होतं आणि त्यामुळे मनातील वाईट विचार, ताण-तणाव, चिडचिडपणा, उदास वाटणे सगळं निघून जातं आणि रात्री झोपही चांगली येते आणि सकाळी उठल्यावर अगदी ताजतवानं वाटतं.

हे तर झाले माझे वैयक्तिक, शारीरिक आणि सामाजिक फायदे माझ्या वापराचे राष्ट्रीय फायदे देखील आहेत. माझा वापर केल्यामुळे मनुष्याला हार्ट अटॅक, मधूमेह, स्तनाचा कॅन्सर यांसारखे आजार होत नाहीत. त्यामुळे जर देशातील प्रत्येक व्यक्तीने दररोज सायकलचा वापर केला तर निरोगी देश निर्माण होण्यास मदत होईल. शिवाय माझं वजन हे हलकंफुलकं असतं त्यामुळे मला जास्त जागा लागत नाही.

आणि म्हणूनच पार्किंग सारख्या समस्या उपलब्ध होत नाही. वाहतूक कोंडी होत नाही आणि देशातील अपघाताचे प्रमाण देखील कमी होईल. इतर वाहनांसाठी लागणार डिझेल पेट्रोल हे इंधन बाहेरच्या देशांमधून मागवावे लागतं. त्यामुळे अधिकाधिक सायकलीचा वापर वाढल्याने देशातील पैसे बाहेरच्या देशात जाणार नाहीत आणि याचा देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर चांगला परिणाम होऊ शकतो.

माझा वापर केल्याने वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण होत नाही इतर वाहनांमुळे वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण होतं. माझा नियमित वापर हा वैयक्तिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक, आर्थिक व राष्ट्रीय  दृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. म्हणून तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये माझा वापर करायला विसरू नका.

आम्ही दिलेल्या cycle chi atmakatha in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सायकलची आत्मकथा मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या cycle chi atmakatha essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि cycle chi atmakatha nibandh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये autobiography of a cycle in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!