मधुमेह लक्षणे व उपचार Diabetes Information in Marathi

Diabetes Information in Marathi – Sugar Information in Marathi मधुमेह म्हणजे काय ? लक्षणे व उपचार, डायबिटीज म्हणजेच मधुमेह. साधारणपणे दर दहा माणसांमागे ४ माणसांना तरी मधुमेहाची समस्या असते. तरीही याद्याप मधुमेहमुळे उद्भवणारे आजार त्यांची वैशिष्ट्ये आणि उपचार याविषयी गेल्या शतकापासून संशोधन चालू आहे. आजच्या एकविसाव्या शतकात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला किमान आपल्या आरोग्य विषयी उद्भवणारे आजाराबद्दल किमान जुजबी माहिती असणे आवश्यक आहे.

पूर्वी मधुमेह या रोगाबद्दल लोक जागरूक नव्हते मधुमेह म्हटला कि लोकं घाबरायचे, आताही घाबरतातच पण त्यातुलनेने खूप कमी, आता लोकांमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे. जगातील मधुमेहाची राजधानी म्हणून भारताला ओळखला जातो. आपल्यासाठी हि एक खेदाची गोष्ट आहे.

Diabetes Information in Marathi
Diabetes Information in Marathi

मधुमेह लक्षणे व उपचार – Diabetes Information in Marathi

मधुमेह म्हणजे काय – Diabetes Meaning in Marathi

मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही. म्हणजेच पेंक्रीयाझ नावाची एक ग्रंथी आपल्या शरीरात असते व यातून इन्सुलिन नावाचं हार्मोन शरीरात तयार होत असते आणि हेच इन्सुलिन शरीरातील रक्तात तयार होणाऱ्या ग्लुकोज अथवा साखरेची मात्रा नियंत्रित ठेवण्याचं काम करतात. परंतू आपल्या शारीरिक बदलामुळे काही वेळेस पेंक्रीयाझ इन्सुलिन तयार करू शकत नाही त्यामुळे साखरेची पातळी ही वाढत जाते आणि तो व्यक्ती मधुमेह या आजाराला बळी पडतो.

मधुमेहाची प्रमुख लक्षणे

मधुमेहाची सुरुवातीला कोणतीच लक्षणे दिसून येत नाही, म्हणूनच या आजाराला सायलेंट किलर असेही म्हणतात.

  • वारंवार लघवीला जाणे
  • ​नेहमी तहान लागल्यासारखे वाटणे
  • ​अचानकपणे वजन कमी होणे
  • ​प्रचंड भूक लागणे
  • ​दृष्टीमध्ये लक्षणीय बदल
  • ​हात किंवा पायांत सतत चमकल्यासारखे भावना होणे
  • ​थकल्यासारखे वाटणे
  • ​त्वचा कोरडी होणे
  • ​जखमा बर्‍या होण्यास वेळ लागणे
  • ​नेहमीपेक्षा अधिक वेळा संसर्ग होणे ही मधुमेहाची काही ठळक लक्षणे आहेत
  • ​मळमळल्यासारखे वाटणे
  • ​उलटीची भावना होणे किंवा पोटात अचानक दुखल्यासारखे वाटणे

काही जणांना बऱ्याच वर्षांचा जुना मधुमेह असतो आणि तो शरीरातील विविध घटकांवर त्यांचे परिणाम दिसून येतात. बऱ्याच अवयवांचे नुकसान सुद्धा होतो. त्यानुसार त्यांचे अनेक लक्षणे दिसू लागतात. जसे की मेंदूचे विकार, हृदयविकाराचा झटका, दुष्टीदोष, पायाच्या जखमा किंवा मूत्रपिंडविकार असे अनेक आजार हे जुना मधुमेहामुळे उद्भवतात.

रक्तातील साखरेचे प्रमाण किती असावे ?

जेवणाआधी (उपाशीपोटी)

  • निरोगी व्यक्तीच्या रक्तातील साखरेचं प्रमाण १०० mg/dl पेक्षा कमी नसावे.
  • ​मधुमेह असलेल्या व्यक्तींची साखरेचे प्रमाण हे ८०-१३० mg/dl पर्यंत असणे गरजेचे आहे.

जेवणानंतर (साधारणपणे१-२ तास)

  • निरोगी व्यक्तीच्या रक्तातील साखरेचं प्रमाण १४० mg/dl असावे.
  • ​मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेचं प्रमाण १८० mg/dl पेक्षा कमी असावे.

साखरेची पातळी कमी करण्यासाठी उपाय

  • व्यायाम केल्याने शरीरातील साखरेची पातळी सुधारू शकते. उदाहरण चालणे, पळणे, झुम्बा, योगा, एरोबिक्स इत्यादी दररोज चालण्यामुळे सुद्धा शरीरात रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने दैनंदिन जीवनात दररोज कोणत्याही प्रकारचा एक तरी व्यायाम केला पाहिजे जेणे करून आपण कोणत्या रोगाला बळी पडता कामा नये.
  • शिवाय मधुमेह नाहीच तर इतर आजारापासून प्रत्येक जण दूर राहू शकतो, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी पाण्याचे प्रमाण वाढवावे, मधुमेह असलेल्या व्यक्तीला आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.
  • दररोज दोन लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने शरीरात इंसुलिन सेंसिटीव्हिटी वाढण्यास मदत होते. व त्यामुळेच शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होण्यासाठी मदत होते.
  • तूळशीचे पानं खाल्ल्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते तुळशीचे पानं हे सर्वांना सहज उपलब्ध होते. तुळशीच्या पानात असलेल्या अँटी ऑक्सिडंट्समुळे रक्तात साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • याचप्रमाणे तुळशीच्या पानांमध्ये असलेले महत्त्वपूर्ण गुणधर्म असतात. जे बीटा सेल्सला इंसुलिनच्या प्रती सक्रिय बनवण्यास साह्य करते. रोज तुळशीच्या पानाचा रस घेणे किंवा तुळशीचे पानं चावून खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते
  • दररोज दालचिनीची पावडर कोमट पाण्याबरोबर घेतल्यामुळे सुद्धा साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

मधुमेहाचे प्रकार

टाईप १

पहिल्या टाईपच्या मधुमेहा मध्ये पॅनक्रिया हे कमी प्रमाणात तयार करतात किंवा शून्य इन्सुलिन असतं.

टाईप २

दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहा मध्ये शरीरातील पेशी हे इंसुलिनला प्रतिसाद देत नाहीत त्यामुळे रोगाच्या नंतरच्या टप्प्यात देखील शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही.

मधुमेहावर उपचार कोणते?

  • टाइप १ मध्ये कायमस्वरूपी इलाज नाही, म्हणून अशा व्यक्तींना इन्सुलिन घ्यावे लागते. यांच्या मदतीने ते मधुमेह वर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. टाइप-१ मधुमेहासाठीचे मूलभूत उपचार असतात. इन्शुलिनचे प्रमाण हे आहार आणि पथ्ये हे संतुलित ठेवण्याची गरज असते.
  • तसेच साखरेचे प्रमाणही अगदी बारकाईने तपासत रहणे. इन्शुलिनची इंजेक्शन, संतुलित व आरोग्यदायी आहार आणि महत्त्वाचे म्हणजे शारिरिक व्यायाम.
  • टाइप-२ या मधुमेहाची लक्षणे कोणत्याही औषधाशिवाय तसेच दैनंदिन व्यायाम, आरोग्यदायी आहार, त्याचप्रमाणे वजन नियंत्रित करून टाइप-२ पासून सुटका होऊ शकते. तथापि योग्य आहाराच्या मदतीने सुद्धा टाइप -२ मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
  • याखेरीज काही तोंडी प्रतिजैविक हे मधुमेहाची प्रगती रोखण्यास मदत करू शकतात त्यामध्ये इन्शुलिन अथवा ओरल मेडिकेशन किंवा दोन्हींच्या एकत्रित उपचारांची नितांत गरज असते. त्याचबरोबर व्यायाम, आरोग्यदायी आहार आणि रक्तातील साखरेचे प्रमाण तपासत राहणे या उपचारांची आवश्यकता असते.

मधुमेहाचे निदान काय आहे?

  • ए १ सी चाचणी किंवा ग्लाइकोहेमोग्लोबिन चाचणी
  • ​उपवास प्लाझ्मा ग्लुकोज चाचणी
  • ​तोंडी ग्लूकोज सहिष्णुता चाचणी
  • ​यादृच्छिक ग्लूकोज सहिष्णुता चाचणी

पदार्थच्या गटानुसार खालील प्रमाणे आहार घ्यावा

  1. आहारामध्ये मुख्यत्वे धान्य उदा: गहू, बाजरी, नाचणी, ओट्स इ. चा समावेश करावा. या पदार्था मधून कर्बोदके मिळतात कर्बोदकचे रूपांतर हळूहळू साखरेत होते.
  2. कडधान्ये, डाळी, दुध व दुधाचे पदार्थ, नॉन- व्हेज यांमधून शरीराला प्रोटीन्स मिळतात. ज्यामुळे शरीराची वाढ चांगल्याप्रकारे होते.
  3. जेवताना भाज्या, कच्चा भाज्या, कोशिंबीर यांचा समावेश असावा. यातून तंतुमय पदार्थ शरीरात जाऊन पोट भरल्याची जाणीव होते त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते. त्याचप्रमाणे यामधून शरीराला जीवनसत्वे व क्षार मिळतात. त्याचा उपयोग त्वचा, केस, डोळे, चाांगले राहण्यासाठी होतो.
  4. जेवणात तेल, तूप  यांचा वापर मर्यादित
  5. आहारामध्ये फळांचा समावेश

मधुमेह आहार तक्ता मराठी

मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या आहारात फायबर्स अधिक प्रमाणात असावे तसेच फॅट्स आणि साखरेचे पदार्थ हे खूप कमी असावे.

मधुमेही व्यक्तींनी काय खाऊ नये?

  • गूळ किंवा साखर, मध घातलेले सर्व पदार्थ बंद
  • ​कोकाकोला, पेप्सी, मिरिंडा, मॅंगोला, लिम्का यांसारखे सर्व कोल्ड्रिंक्स पेयपदार्थ टाळावे.
  • ​तळलेले सर्व पदार्थ बंद करा.
  • ​सर्व बेक केलेले पदार्थ बंद करा.
  • ​साबुदाणा, मैदा,रवा, खवा (मावा) यांपासून बनविलेले सर्व पदार्थ बंद
  • ​पांढरा भात, बटाटा, रताळे कमी प्रमाणात कमी वेळा खा.
  • ​अल्कोहोल टाळावे

मधूमेह व्यक्तीने काय खावे?

  • सकाळी ६-७ वाजता
  1. एक ग्लासभर कोमट पाणी घेऊन त्यात एक चमचा मेथीच्या दाण्यांची पूड (पावडर) घालून पिऊन घेणे.
  2. मेथीच्या दाण्यांमध्ये खूप फायबर असते जे शरीराची पचन प्रक्रियेचा वेग कमी करतात
  • मध्य सकाळ १०-११ वाजता
  1. एक कप ग्रीन टी सोबत भाजलेले चणे
  2. सफरचंद, अंजीर, मोसंबी, पेरू, पपया, किवी, द्राक्षे इत्यादी कमी ग्लाइसेमिक इंडेक्स असलेली फळे खावीत.
  • मधुमेह टाईप २ रुग्णासाठी नाष्ट्याचे विकल्प
  1. काकडी व ओटस
  2. व्हेजिटेबल उपमा
  3. भाजी चपाती-पालेभाज्याचा वापर जसे की पालक, मेथी, मुळा इत्यादी
  4. गव्हाचे ब्रेड किंवा चपाती सोबत ऑम्लेट
  5. कमी सायचे दूध,इडली किंवा डोसा
  6. मेथीचे पराठे
  7. ढोकला
  • दुपारचे जेवण:- दुपारी १-२ वाजता
  1. दोन वाटी ब्राऊन राईस, एक वाटी डाळ, एक पालेभाजी, दही, सॅलड
  2. डाळ खिचडी, दही
  3. दोन वाटी ब्राऊन राईस किंवा बाजऱ्याची भाकरी, २-४ पीस चिकन किंवा मच्छी आणि काकडी, टोमॅटो,
  • संध्याकाळचा नाष्टा:- संध्याकाळी ५ वाजता

संध्याकाळचा नाष्टा मधुमेह टाईप २ च्या रुग्णांसाठी अतिशय महत्वपूर्ण असतो.

  1. कमी ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असलेली फळे ( सफरचंद, पेरू, मोसंबी इत्यादी)
  2. सुखी भेळ यामध्ये टोमॅटो, काकडी, मटर, कांदा व कोथिंबीर यांचा वापर
  • रात्रीचे जेवण:- रात्री ८-१० वाजता
  • दोन चपात्या अथवा बाजऱ्याची भाकरी, पालेभाज्या ( कारल्याची भाजी), जास्तीत जास्त एक वाटी भात ( भातामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात जे शुगर वाढवतात त्यामुळे शक्यतो भात कमीत कमी खावा)
  • सलाड, काकडी, टोमॅटो, चपाती, दही, चिकन, मच्छी

आहारामध्ये प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ यांचे योग्य प्रमाण

  • प्रथिने १०% to १५%
  • ​कर्बोदके ५५% to ६०%
  • ​स्निग्ध पदार्थ २५% किंवा त्यापेक्षा कमी असावे.

मधुमेह कसा बरा होतो?

मधुमेह हा कायम स्वरुपी बरा होत नाही माञ जेवणाच्या वेळचे काटेकोर पालन आणि पथ्यपाणी सांभाळून त्यास नियंत्रणात मध्ये ठेवता येऊ शकतो. सुयोग्य आहार व व्यायाम यांची जोड हवी. तसेच व्हिटॅमिन डी ची कमतरतेमुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या. मधुमेह तंत्रज्ञाना भेटून आवश्यक सल्ला घ्या आणि मगच आहार सुरु करा.

आम्ही दिलेल्या diabetes information in marathi pdf  माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मधुमेह लक्षणे व उपचार माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या diabetes sugar information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of diabetes in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये in marathi hemoglobin information diabetes Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!