दादाभाई नौरोजी यांची माहिती Dadabhai Naoroji Information in Marathi

dadabhai naoroji information in marathi दादाभाई नौरोजी यांची माहिती, आज आपण या लेखामध्ये भारतीय शिक्षकतज्ञ, विचारवंत, भारतीय लढ्यातील राजकारणी आणि कापूस व्यापारी म्हणून ज्यांची संपूर्ण भारतामध्ये ओळख आहे अश्या दादाभाई नौरोजी यांच्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. दादाभाई नौरोजी हे एक दिग्गज भारतीय राजकारणी, सामाजिक नेते, विचारतज्ञ आणि शिक्षणतज्ञ होते आणि त्यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया (grand old man of India) म्हणून देखील ओळखले जात होते. दादाभाई नौरोजी यांचा जन्म हा ब्रिटिश भारतामधील मुंबई या शहरामध्ये एका पारशी कुटुंबांमध्ये झाला होता.

असे म्हणतात कि त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती त्याचबरोबर दादाभाई नौरोजी हे युनायटेड किंग्डम हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पक्षाचे सदस्य म्हणून देखील काम केले आणि त्यांनी संसद सदस्य मानून देखील आपली कामगिरी पार पाडली.

dadabhai naoroji information in marathi
dadabhai naoroji information in marathi

दादाभाई नौरोजी यांची माहिती – Dadabhai Naoroji Information in Marathi

नावदादाभाई नौरोजी
जन्म४ सप्टेंबर  १८२५
ठिकाणमुंबई (महाराष्ट्र)
कुटुंबपारशी
मृत्यू३० जून १९१७

दादाभाई नौरोजी यांचे प्रारंभिक जीवन आणि प्रवास – Early life and accomplishment 

दिग्गज राजकारणी आणि सामाजिक नेते दादाभाई नौरोजी यांचा जन्म ४ सप्टेंबर १८२५ मध्ये ब्रिटिश भारतातील मुंबई या शहरामध्ये पारशी कुटुंबामध्ये झाला होता आणि त्यांची प्रमुख भाषा गुजराती होती. त्यांनी आपले कॉलेज शिक्षण एल्फीन्स्टन इन्स्टिट्यूट या शाळेमध्ये झाले. दादाभाई नौरोजी यांचा विवाह वयाच्या फक्त ११ व्या वर्षी गुलबाई यांच्याशी झाला.

१८५५ मध्ये त्यांनी एल्फीन्स्टन या कॉलेजमध्ये गणित आणि नैसर्गिक तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून ते झाली आणि अश्या चांगल्या प्रतिष्ठेवर काम करणारे ते पहिले भारतीय ठरले तसेच त्यांनी १८५५ मध्येच लंडनला जाण्याचे ठरवले आणि मग त्यांनी लंडन मध्ये कामा अँड कंपनी स्थापन केली आणि हि लंडनमध्ये स्थापन होणारी पहिली भारतीय कंपनी होती.

तसेच त्यांनी १८५९ मध्ये दादाभाई नौरोजी अँड कंपनी या कंपनीची स्थापना केली आणि हि एक कापूस कंपनी होती. तसेच त्यांनी लंडन मध्ये असणाऱ्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजराती भाषेचे प्राध्यापक म्हणून देखील कामगिरी बजावली होती.

दादाभाई नौरोजीयांच्या विषयी महत्वाची माहिती – information about dadabhai naoroji in marathi 

  • दादाभाई नौरोजी यांचा जन्म ४ सप्टेंबर १८२५ मध्ये ब्रिटिश भारतातील मुंबई या शहरामध्ये पारशी कुटुंबामध्ये झाला होता.
  • दादाभाई नौरोजी यांच्या वडिलांचे नाव नौरोजी पालनजी दोर्डी असे होते आणि आईचे नाव मानकबाई नौरोजी दोर्डी असे होते.
  • ते १८५५ मध्ये भारतातून लंडनला गेले आणि त्या ठिकाणी स्थापन झालेली कामा अँड कंपनी ह्या भारतीय कंपनीमध्ये ते भागीदार बनले होते.
  • दादाभाई नौरोजी यांचा विवाह त्यांच्या ११ व्या वर्षी गुलाबाबाई ह्यांच्याशी झाला होता.
  • दादाभाई नौरोजी यांना कापूस व्यापारी म्हणून देखील ओळखले जाते.
  • इ.स १८७४ मध्ये बडोद्याच्या महाराजांचे दिवान म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांची राजकीय कारकीर्द देखील येथूनच सुरु झाली.
  • भारतातील साहित्यिक, राजकीय आणि सामाजिक विचार मांडण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी १८६५ मध्ये लंडन इंडिया संस्थेची स्थापना केली.
  • दादाभाई नौरोजी यांना लिखाणाची देखील खूप आवड होती आणि त्यांनी त्यांच्या लिखाण कारकिर्दीमध्ये अनेक पुस्तके लिहिली पण सर्वात प्रसिध्द आणि लक्षणीय म्हणजे भारतातील गरिबी आणि ब्रिटीश राजवट हे आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी भारतामध्ये ब्रिटिशा राजवटीने निर्माण केलेल्या संपत्तीच्या निचरा विषयी माहिती दिली.
  • पारशी लेखक मंडळीचे ते संस्थापक आणि पहिले संपादक होते.
  • इ.स १८८३ मध्ये दादाभाई नौरोजी यांना ब्रिटीशांनी जस्टीस ऑफ पीस (Justice of peace) हा किताब देऊन सन्मानित केले.
  • १८८५ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या संस्थापक सदस्यांच्यापैकी एक होते आणि या पक्ष्याच्या स्थापनेमुळे भारतीयांना एक मोठे व्यासपीठ मिळण्यास मदत मिळाली.
  • त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक चांगल्या कामगिऱ्या पार पडल्या परंतु त्यामधील उल्लेखनीय कामगिरी म्हणजे इ.स १८९२ मध्ये जेव्हा ते हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये निवडून आले त्यावेळी ते हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून येऊन ब्रिटिशा खासदार बनणारे पहिले भारतीय होते.
  • त्याच बरोबर ते लिबरल पक्षाचे प्रतिनिधी म्हणून फिन्सबरी सेन्ट्रल मधून निवडून आले होते.
  • त्यांचे अनेक कागदपत्रे आणि भाषानांच्यामधून त्यांना ड्रेन सिध्दांत मांडण्यासाठी सांखीकीय माहिती दिली.
  • दादाभाई नौरोजी यांनी बाळ गंगाधर ठीळक, महात्मा गांधी आणि गोपाळ कृष्ण गोखले यांना स्वातंत्र्यासाठी कसे लढायचे या विषयी मार्गदर्शन देखील केले
  • त्यांनी १८५९ मध्ये दादाभाई नौरोजी अँड कंपनी या कंपनीची स्थापना केली आणि हि एक कापूस कंपनी होती.
  • १८४८ ते १८५५ या काळामध्ये दादाभाई नौरोजी यांनी विविध नवीन संघटनांच्यामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली.
  • धोबी तलाव या ठिकाणी असणाऱ्या फ्रामजी कावसजी संस्थेसाठी निधी उभारण्यासाठी त्यांनी महत्वाची भुमका बजावली आणि मदत केली.
  • खगोलीय तत्वांना बळकटी देण्यासाठी अनेकदा ते आपल्या विद्यार्थ्याना रात्रीच्या आकाशाखाली मैदानी धडे देत होते त्यामुळे विद्यार्थ्यांना समजण्यास सोपे जात होते.
  • दादाभाई नौरोजी यांना महात्मा गांधी यांनी राष्ट्रपिता म्हणून संबोधले होते.

दादाभाई नौरोजी यांचा मृत्यू – death 

दादाभाई नौरोजी यांचा मृत्यू वयाच्या ९२ व्या वर्षी म्हणजेच ३० जून १९१७ मध्ये महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरातील वर्सोवा या ठिकाणी त्यांच्या स्वताच्या राहत्या घरी झाला.

आम्ही दिलेल्या dadabhai naoroji information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर दादाभाई नौरोजी यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dadabhai naoroji information in marathi in short या article मध्ये update करू, मित्रांनो हि dadabhai naoroji information in marathi pdf माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!