धनराज पिल्ले मराठी माहिती Dhanraj Pillay Information in Marathi

dhanraj pillay information in marathi धनराज पिल्ले मराठी माहिती, भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाणारा हॉकी हा खेळ भारतामध्ये खूप लोकप्रिय आहे ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा सुवर्ण पदक आणि सलग अनेक सामने जिंकले आहेत. हॉकी हा खेळ सांघिक खेळ आहे आणि तो २ संघामध्ये खेळला जातो. हॉकी हा एक लोकप्रिय आणि मनोरंजक खेळ असून हा खेळ अनेक देशांमध्ये खेळला जातो. या खेळामध्ये ऑलिम्पिकमध्ये मध्ये खेळणारे अनेक खेळाडू बनून गेले आहेत आणि भारतामध्ये देखील हॉकी या खेळामध्ये चांगलाय प्रकारे कामगिरी करणारे आणि देशाचे नाव मोठे करणारे अनेक खेळाडू बनून गेले आणि आज आपण या लेखामध्ये अश्याच एका हॉकी खेळाडूंच्याविषयी म्हणजेच धनराज पिल्ले यांच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

धनराज पिल्ले हे हॉकी या खेळाचे एक चांगले खेळाडू होते आणि त्यांचा जन्म १६ जुलै १९६८ मध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खडकी या ठिकाणी झाला होता. ते भारतासाठी विश्वचषक, चॅम्पियन ट्रॉफीसाठी खेळले होते तसेच त्यांनी भारतासाठी चार वेळा ऑलिम्पिकमध्ये देखील खेळले होते.

त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये भारतीय राष्ट्रीय संघासाठी एकूण ३४० सामने खेळले आणि त्यांनी १७० गोल केल्याची नोंद या खेळासाठी आहेत. ते या खेळामध्ये संघामधील खेळाडू पासून त्यांनी संघाचे कर्णधार म्हणून देखील कामगिरी बजावली आणि त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली १९९८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा आणि २००३ मध्ये आशिया कप जिंकला. चला तर खाली आपण धनराज पिल्ले यांच्याविषयी सविस्तर माहिती घेवूया.

dhanraj pillay information in marathi
dhanraj pillay information in marathi

धनराज पिल्ले मराठी माहिती – Dhanraj Pillay Information in Marathi

नावधनराज पिल्ले
जन्म१६ जुलै १९६८
जन्म ठिकाणपुणे जिल्ह्यातील खडकी या गावामध्ये
ओळखहॉकी खेळाडू

हॉकी म्हणजे काय ?

हॉकी हा एक खेळ आहे. ज्यामध्ये दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळतात ज्यामध्ये हॉकी स्टिकचा वापर करून प्रतिस्पर्ध्याच्या गोलमध्ये चेंडूचा घसरण करण्याचा प्रयत्न करतात. फील्ड हॉकी, आईस हॉकी आणि रिंक हॉकी असे काही हॉकी खेळाचे प्रकार आहेत.

धनराज पिल्ले यांचे सुरुवातीचे जीवन – early life 

धनराज पिल्ले हे हॉकी या खेळाचे एक चांगले खेळाडू होते आणि त्यांचा जन्म १६ जुलै १९६८ मध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खडकी या ठिकाणी झाला होता. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये झाला होता आणि जरी त्यांचा जन्म हा गरीब कुटुंबांमध्ये झाला असला तरी त्यांच्या कुटुंबाने त्यांना चांगली साथ दिली.

धनराज पिल्ले यांना हॉकी हा खेळ खेळण्याची आवड लहानपणी पासूनच होते आणि त्यांना त्यांचा भाऊ रमेश पिल्ले यांच्या रूपाने एक प्रेरणा होती. ते तुटलेल्या हॉकी स्टिक्स एकत्र करून ते खेळत होते आणि आपल्याला या वरून समजते कि त्यांना या खेळाबद्दल किती आवड होती.

धनराज पिल्ले यांची हॉकी खेळातील कामगिरी – dhanraj pillay hockey player information in marathi

धनराज पिल्ले हे भारतातील नव्हे तर जगातील सर्वोत्तम हॉकी खेळाडूपैकी एक आहेत आणि त्यांनी त्यांच्याहून १० वर्षांनी लहान असणाऱ्या खेळाडूंना देखील मागे टाकले आहे. अतिशय नम्र पार्श्वभूमिमाधुल आलेल्या धनराज पिल्ले या खेळाडूने सिध्द केले कि कथोरे परिश्रम, दृढ निश्चय आणि क्षमता तुम्हाला इच्छित कार्य साध्य करण्यास मदत करतात.

धनराज पिल्ले यांनी १९८९ मध्ये राष्ट्रीय संघामध्ये पदार्पण केले आणि त्यांनी १९९१ मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी झालेल्या ऑलविन एशिया कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ते भारतासाठी विश्वचषक, चॅम्पियन ट्रॉफीसाठी आणि चार ऑलम्पिक साठी खेळले होते. देशांतर्गत सर्कीट मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कडून खेळताना त्याला १९९९ मध्ये मुरुगप्पा गोल्ड कपमध्ये अंतिम सामनावीर म्हणून त्यांची निवड झाली होती. त्यांनी १९९२, १९९६, २००० आणि २००४ या वर्षामध्ये ऑलम्पिक खेळामध्ये खेळ खेळले.

तसेच त्यांनी १९९०, १९९४, १९९८ आणि २००० या वर्षामध्ये त्यांनी विश्वचषकसाठी सामने खेळले होते. त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली १९९८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा आणि २००३ मध्ये आशिया कप जिंकला. चला तर खाली आपण धनराज पिल्ले यांच्याविषयी सविस्तर माहिती घेवूया. २००२ मध्ये जर्मन मधील कोलोन या ठिकाणी झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंट याने सन्मानित केले होते.

१९९४ मध्ये सिडनी या ठिकाणी झालेल्या विश्वचषक मध्ये विश्व अकराव्या संघात स्थान मिळवणारे धनराज पिल्ले हे एकमेव भारतीय खेळाडू होते. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये एकूण भारतीय राष्ट्रीय संघासाठी एकूण ३४० सामने खेळले आणि त्यांनी १७० गोल केल्याची नोंद आहे.

धनराज पिल्ले यांना मिळालेले पुरस्कार – awards 

धनराज पिल्ले हे एक चांगले आणि सर्वोत्तम हॉकी खेळाडू होते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे परंतु त्यांनी या खेळामध्ये महत्वपूर्ण आणि मोलाची कामगिरी करून त्यांनी आपले आणि आपल्या देशाचे नाव उंचावले आणि म्हणून त्यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

  • त्यांना इ.स १९९९ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • तसेच धनराज पिल्ले यांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी १९९८- १९९९ या काळामध्ये के. के. बिर्ला हा पुरस्कार देऊन देखील गौरव करण्यात आला.
  • १९९४ मध्ये सिडनी या ठिकाणी झालेल्या विश्वचषक मध्ये विश्व अकराव्या संघात स्थान मिळवणारे धनराज पिल्ले हे एकमेव भारतीय खेळाडू होते.
  • २००० मध्ये धनराज पिल्ले यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळाला.
  • तसेच त्यांना १९९५ मध्ये अर्जुन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.
  • त्यांना अंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले.

आम्ही दिलेल्या dhanraj pillay information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर धनराज पिल्ले मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dhanraj pillay hockey player information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि dhanraj pillay information in marathi wikipedia माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!