धपाटे रेसिपी मराठी Dhapate Recipe in Marathi

Dhapate Recipe in Marathi धपाटे रेसिपी मराठी धपाटे हा एक महाराष्ट्रामध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे आणि हा पदार्थ दोन प्रकारे बनवला जाते आणि ते म्हणजे काही वेळ धपाटे भाजून बनवले जातात तर काही वेळा धपाटे तळून बनवले जातात. तळून केलेल्या धपाट्यांना महाराष्टामध्ये वडे म्हणून देखील ओळखले जाते. तसेच काही ठिकाणी भाजलेले आणि तळलेल्या दोन्ही प्रकारांना धपाटे म्हंटले जाते. धपाटे हा शब्द मराठवाड्यातून आला आहे आणि त्याठिकाणी भाजलेले धपाटे बनवण्यास प्राधान्य दिले जाते. धपाटे हा एक असा पदार्थ आहे जो आपण नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये बनवू शकतो जो तळलेला असो किंवा भाजलेला.

धपाटे हा पदार्थ एक पारंपारिक पदार्थ आहे कारण हा पदार्थ खूप पूर्वीपासून बनवला जातो आणि हा पदार्थ अनेक लोकांचा आवडता पदार्थ आहे आणि हा महाराष्ट्रामधील स्वयंपाक घरामध्ये वारंवार बनवला जाणारा पदार्थ आहे.

आणि हा बनवण्यासाठी देखील सोपा आहे आणि आपण हा खूप कमी वेळेमध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये बनवू शकतो. चला तर आपण आज या लेखामध्ये धपाटे कसे बनवायचे ते पाहूयात.

Dhapate Recipe in Marathi
Dhapate Recipe in Marathi

धपाटे रेसिपी मराठी – Dhapate Recipe in Marathi

बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
पाककला महाराष्ट्र
बनवण्याची पध्दतखूप सोपी

धपाटे म्हणजे काय ?

धपाटे बनवताना ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, डाळीचे पीठ आणि थोडेसे तांदळाचे पीठ एकत्र केले जाते आणि त्यामध्ये तिखट, मीठ, कोथिंबीर घालून ते मळले जाते आणि त्याचे मोठे गोळे करून ते पोळपाटावर थापले जातात  आणि तव्यावर भजे जातात किंवा पीठाचे गोळे छोटे छोटे करून त्याचे लहान धपाटे बनवले जातात आणि ते तेलामध्ये तळले जातात.

धपाटे बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients

  • पीठ : धपाटे बनवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरतो जसे कि ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, हरभरा डाळीचे पीठ आणि तांदळाचे पीठ. धपाटे बनवताना आपण या हे सर्व पीठ मिक्स करून ते मळून घेतो आणि आणि त्याचे धपाटे बनवतो.
  • तेल : तेल हा देखील धपाटे बनवण्यासाठी लागणारा एक महत्वाचा घटक आहे कारण आपण धपाटे तेलामध्ये तळतो किंवा तेल लावून भाजतो.
  • तिखट आणि मीठ : तिखट आणि मीठ हे देखील दोन महत्वाचे घटक आहेत. मीठ घातल्याशिवाय धपाट्यांना चव येत नाही आणि मिरची पावडर घातल्याशिवाय तिखटपणा येत नाही.

धपाटे रेसिपी – dhapate recipe

धपाटे हि एक महाराष्ट्रीयन डीश आहे जी ३ ते ४ प्रकारचे पीठ एकत्र करून बनवली जाते आणि हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि हा पदार्थ खूप कमी वेळेमध्ये आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनतो. चला तर मग धपाटे कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
पाककला महाराष्ट्र
बनवण्याची पध्दतखूप सोपी

भाजलेले धपाटे रेचीपी – dhapate marathi recipe

भाजलेले धपाटे हे आपण केंव्हाही बनवून खावू शकतो आणि हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे. धपाटे हा शब्द मराठवाड्यातून आला आहे आणि त्या ठिकाणी ह्या प्रकारचे धपाटे बनवले जातात. चला तर मग भाजलेले धपाटे कसे बनवायचे ते पाहूयात.

भाजलेले धपाटे बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make dhapate 

भाजलेले धपाटे बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असू शकते त्यामुळे आपल्याला बाजारातून विकत आणावे लागत नाही. चला तर मग धपाटे बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • २ वाटी ज्वारीचे पीठ.
  • अर्धी वाटी गव्हाचे पीठ.
  • अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ.
  • २ चमचे तांदळाचे पीठ.
  • २ चमचे लसून पेस्ट.
  • १ चमचा लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा हळद.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • हिंग पावडर ( चिमुटभर )
  • अर्धा मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर.

भाजलेले धपाटे बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make dhapate recipe 

  • सर्प्रथम एक भांडे घ्या आणि त्यामध्ये ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, डाळीचे पीठ आणि तांदळाचे पीठ घ्या आणि त्यामध्ये लाल तिखट, हळद, लसून, हिंग, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घाला आणि ते मिक्स करा.
  • आणि मग त्या पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून ते भाकरीच्या पिठासारखे मऊसर मळून घ्या.
  • आता पीठाचे मोठे मोठे गोळे करा आणि ते पोळपाटावर भाकरी थापल्यासारखे थापून घ्या आणि मग गॅसवर गरम करायला ठेवलेल्या तव्याला तेल लावा आणि त्यावर धपाटा टाकून तेल सोडा आणि ती बाजू भाजून घ्या आणि मग धपाट्याची दुसरी बाजू देखील तेल सोडून भाजून घ्या.
  • तुमचा गरमागरम भाजलेला धपाटा तयार झाला.

तळलेले धपाटे रेसिपी

तळलेले धपाटे हे अनेक लोकांना आवडणारा पदार्थ आहे आणि हा धपाट्याचा प्रकार बहुतेकदा नाश्त्यामध्ये बनवला जातो. चला तर मग तळलेले धपाटे कसे बनवायचे ते पाहूयात.

तळलेले धपाटे बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make dhapate recipe 

  • १ गव्हाचे पीठ.
  • १ वाटी ज्वारीचे पीठ.
  • अर्धी वाटी डाळीचे पीठ.
  • २ चमचे लसून पेस्ट.
  • १ चमचा लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा हळद.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • हिंग पावडर ( चिमुटभर )
  • अर्धा मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर.

तळलेले धपाटे बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make dhapate recipe 

  • सर्प्रथम एक भांडे घ्या आणि त्यामध्ये ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ आणि डाळीचे पीठ घ्या आणि त्यामध्ये लाल तिखट, हळद, लसून, हिंग, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घाला आणि ते मिक्स करा.
  • आणि मग त्या पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून ते चांगले मळून घ्या आणि ५ ते ६ मिनिटे भिजू द्या.
  • मग गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये धपाटे तळण्यासाठी तेल घाला आणि ते तेला चांगले गरम करा.
  • आता हाताला तेल लावून या पीठाचे छोटे छोटे धपाटे थापा किंवा पापड मशीन मध्ये धपाटे बनवून घ्या आणि हे बनवलेले धपाटे तेलामध्ये घालून त्याला लालसर रंग येईपर्यंत ते तळून घ्या.
  • अश्या प्रकारे सर्व गोळ्यांचे धपाटे बनवून ते तेलामध्ये तळून घ्या.
  • आपले गरमागरम धपाटे तयार झाले हे धपाटे दह्यासोबत सर्व्ह करा.

धपाटे कश्यासोबत खातात – serving suggestions 

तळलेले किंवा भाजलेले धपाटे दही किंवा लोणी सोबत खाल्ले जातात किंवा आपण धपाटे टोमॅटो सॉस सोबत देखील खाल्ले जाते. तसेच आपण हे धपाटे हरभऱ्याच्या उसळ्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत देखील खावू शकतो.

आम्ही दिलेल्या dhapate recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर धपाटे रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dhapate maharashtrian recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि palak dhapate recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dahi dhapate recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!