Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi – Speech On Dr Babasaheb Ambedkar Jayanti in Marathi डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण प्रथमतः आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सूत्रसंचालक आणि आयोजक यांना मी नमस्कार करते. कारण, आज त्यांच्यामुळे मला याठिकाणी महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलण्याची संधी मिळतेय. मित्रहो, शिक्षणाची अखंड पेटती मशाल हाती घेणारे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा नारा सतत आपल्या मुखामध्ये ठेवणारे, भारतीय राज्यघटनेचा खरा शिल्पकार, महामानव, भारतरत्न पुरस्कार विजेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माझा सर्वप्रथम मानाचा त्रिवार मुजरा !
आपल्या स्वतंत्र भारत देशाचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीन-दलीत लोकांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या आणि मागासलेपणाच्या शृंखला तोडून टाकणारे, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत प्रज्वलित करणारे तसेच, स्वतःच्या अलौकिक विद्ववतेचा वापर समाजहितासाठी आणि जनतेचे आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी करणारे, आपल्या देशातील पहिले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
“अंधारचं होता नशिबी ज्यांच्या,
त्यांना प्रकाशाचं दान दिलं.
तुमचे मानावे किती उपकार,
तुम्हीच देशाला संविधान ही दिलं.”
डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण – Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi
Dr Babasaheb Ambedkar Bhashan
मित्रांनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आपल्या भारत देशातील मध्य प्रांतात झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील इंदौर जवळ असलेल्या महु येथे रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आले. जेंव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता.
तेंव्हा त्यांचे वडिल रामजी हे इंडियन आर्मीत सुभेदार होते आणि त्यांची नेमणुक इंदौर येथे झाली होती. त्यानंतर मात्र जवळजवळ तीन वर्षानंतर म्हणजेच १८९४ साली, बाबासाहेबांचे वडिल रामजी मालोजी सकपाळ निवृत्त झाले आणि संपुर्ण कुटूंब महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यात स्थानांतरीत झाले.
- नक्की वाचा: शिक्षक दिनाचे भाषण
खरंतर मित्रांनो, भिमराव रामजी आंबेडकर हे आपल्या आई-वडिलांचे चौदावे आणि शेवटचे अपत्य होते. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या कुटुंबांतील सर्वात छोटे सदस्य असल्याने, ते सगळयांचे लाडके होते.
याशिवाय, भिमराव आंबेडकर हे आपल्या महाराष्ट्रातील मराठी परिवाराशी देखील संबंधित होते आणि त्यांचे मुळगाव रत्नागिरी जिल्हयातील आंबवडे हे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महार या जातीतील असल्याने, त्यांच्यासोबत सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात मोठा भेदभाव केला जात असे.
इतकेच नाही तर आपले बाबासाहेब दलित असल्याने त्यांना शिक्षण घेणे देखील अवघड झाले होते. बाबासाहेबांना उच्च शिक्षण घेण्याकरिता कठोर परिश्रम आणि फार मोठा संघर्ष देखील करावा लागला होता. तरीही, त्यांनी समाजातील सगळया कठीण परिस्थीतीवर मात करत उच्च शिक्षण प्राप्त केले आणि जगासमोर स्वतःला सिध्द करून दाखवले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात गेले होते. परदेशातील फेलोशिप संपल्यानंतर मात्र, त्यांना भारतात परतावे लागले. ब्रिटनच्या मार्गे ते भारतात परत येत असताना, ‘स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्स अॅण्ड पाॅलिटीकल सायन्स’ यात त्यांनी एम.एस.सी आणि डी.एस.सी व विधि संस्थानात बार.एट.लाॅ करीता त्यांनी आपले रजिस्ट्रेशन केले आणि त्यानंतरच मग बाबासाहेब भारतात परतले.
आपल्या स्वदेशात परतल्यानंतर त्यांनी प्रथम शिष्यवृत्तीच्या नियमानुसार बडौदा येथील राजांच्या दरबारात सैनिक अधिकारी आणि वित्तीय सल्लागार म्हणून आपल्या कामाची जबाबदारी स्विकारली. आपल्या बाबासाहेबांनी राज्याचे रक्षा सचिव या रूपात देखील काम केले.
खरंतर मित्रांनो, असे काम करणे त्यांच्याकरता मुळीच सोपे नव्हते. कारण, जातिपातीच्या भेदभावामुळे त्यांना फार त्रास सहन करावा लागत होता; शिवाय मित्रांनो इतकेच नव्हे तर संपुर्ण शहरात त्यांना भाडयाने घर देण्यास देखील कुणी तयार होत नव्हते.
- नक्की वाचा: छत्रपती शिवाजी महाराज भाषण
अशा अनेक कारणांमुळे भिमराव आंबेडकरांनी काही काळानंतर सैन्य मंत्री ही नौकरी सोडली आणि एक खाजगी शिक्षक आणि अकाउंटंट म्हणुन काम करण्याची त्यांनी नोकरी पत्करली. येथे ते सल्लागार व्यवसाय देखील करू लागले. परंतु, इथे देखील बाबासाहेबांना अस्पृश्यतेच्या मनोवृत्तीने पिच्छा सोडला नाही.
त्यामुळे, अशा सामाजिक स्थितीमुळे त्यांचा हा व्यवसाय देखील ठप्प पडला. अखेरीस ते या भीषण परिस्थितीला कंटाळून मुंबईला परतले. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी मुंबईत आले होते तेंव्हा येथे त्यांची मदत मुंबई गव्र्हनमेंटने केली आणि ते मुंबईतील ‘सिडेनहम काॅलेज आॅफ काॅमर्स अॅण्ड इकाॅनाॅमिक’ या कॉलेजला ते राजनैतिक अर्थशास्त्राचे प्रोफेसर बनले.
मुंबईत आल्यानंतर या दरम्यान त्यांनी आपल्या पुढच्या शिक्षणाकरीता पैसे जमविले आणि आपले शिक्षण सुरू ठेवण्याकरीता १९२० साली पुन्हा एकदा ते भारताबाहेर इंग्लंडला गेले.
१९२१ साली त्यांनी ‘लंडन स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्स अॅण्ड पाॅलिटीकल सायन्स’ मधुन मास्टर डिग्री प्राप्त केली आणि दोन वर्षानंतर डी.एस.सी पदवी देखील मिळवली. अशा कष्टी असलेल्या डॉ. भिमराव रामजी आंबेडकरांनी बाॅन, जर्मनी विश्वविद्यालयात देखील अध्ययनाकरीता काही काळ घालवला.
१९२७ साली त्यांनी अर्थशास्त्रातुन डी.एस.सी केले आणि त्यानंतर न्यायशास्त्राचा अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांनी ब्रिटिश बारमध्ये बॅरिस्टर म्हणुन काम केले. ८ जून १९२७ रोजी त्यांना कोलंबिया विश्वविद्यालयामार्फत डाॅक्टरेट या पदवीने सन्मानित करण्यात आले. आपले संपूर्ण शिक्षण पूर्ण करून, जेंव्हा बाबासाहेब आंबेडकर भारतात परत आले, तेंव्हा भारतात परतल्यानंतर बाबासाहेबांनी जातीपातीच्या भेदभावाविरोधात लढण्याचा निर्णय घेतला.
कारण समाजाच्या या जातीपातीच्या धोरणामुळे त्यांना कित्येकदा अपमानाचा, अनादराचा सामना करावा लागला होता. बाबासाहेबांना आपल्या जीवनात अतोनात कष्टाला देखील सामोरे जावे लागले होते. अशा रीतीने मित्रांनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पवित्र कार्याला सुरुवात केली.
सुरुवातीला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यास केला की कश्या तऱ्हेने अस्पृश्यता आणि धर्मजाती भेदभाव सर्वत्र पसरला आहे! अशा मानसिकतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिक उग्र रूप धारण केले होते. आंबेडकरांनी या सर्व गोष्टींना देशाच्या बाहेर घालवण्याला, आपले कर्तव्य समजले आणि समाजातील या जातीयतेच्या भेदभावाविरोधात त्यांनी मोर्चा उघडला.
- नक्की वाचा: राजमाता जिजाऊ भाषण मराठी
नंतर, १९१९ साली भारत सरकार अधिनियमाच्या तयारी करता दक्षिणबोरो समितीपुढे आंबेडकर म्हणाले की, अस्पृश्य आणि अन्य समुदायांकरता वेगळी निवडणुक प्रणाली असायला हवी. त्यांनी दलितांकरता व खालच्या जातींकरता आरक्षणाचा हक्क देण्याचा प्रस्ताव देखील या समितीपुढे ठेवला.
जातीपातीचा भेदभाव संपवण्याकरता, लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याकरता, समाजात पसरलेली किड आणि मनोवृत्ती समजण्याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी एक नवीन शोध सुरू केला. जातीगत भेदभावाला संपविण्याकरीता, अस्पृश्यतेला मिटविण्याकरता डॉ. आंबेडकरांनी ‘बहिष्कृतांच्या हिताकरता सभा’ हा पर्याय शोधला.
बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या या संघटनेचा मुख्य उद्देश हा मागासलेल्या वर्गात असलेल्या लोकांचा शैक्षणिक दर्जा वाढवणे आणि त्याचबरोबर, मागासलेल्या समाजात सामाजिक तसेच, आर्थिक सुधारणा करण्याचा होता. यानंतर, १९२० ला त्यांनी कलकापुरचे महाराजा शाहजी व्दितीय यांच्या मदतीने ‘मुकनायक’ या सामाजिक पत्राची स्थापना केली.
आंबेडकरांच्या या भुमिकेने सामाजिक आणि राजनितीक क्षेत्रात खळबळ उडवुन उडाली होती. याशिवाय मित्रांनो, सगळ्या लोकांमध्ये भीमराव आंबेडकरांची ओळख देखील निर्माण होऊ लागली होती. डाॅक्टर भीमराव आंबेडकर यांनी आपले न्यायालयीन शिक्षण पुर्ण केल्यानंतर वकिलीचे काम सुरू केले.
जातीपातीच्या प्रकरणांमध्ये भेदभाव करण्याचा आरोप त्यांनी ब्राम्हणांवर लावला आणि कित्येक गैरब्राम्हण नेत्यांविरोधात न्यायालयीन लढा देखील दिला. मित्रांनो, या जातीयतेच्या लढ्यामध्ये बाबासाहेबांनी उल्लेखनीय यश देखील मिळविले.
या विजयामुळे बाबासाहेबांना दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी आधार गवसला आणि त्यांच्यातील आत्मविश्वास देखील वाढला. इसवी सन १९२७ सालाच्या दरम्यान महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता मिटवण्याकरीता आणि जातिगत भेदभावाला पुर्णतः संपविण्याकरीता सक्रीय स्वरूपात काम केले आणि याकरीता त्यांनी हिंसेचा मार्ग न स्विकारता, अहिंसेचा मार्ग पत्करला.
अशा पद्धतीने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा गांधींच्या पदचिन्हांवर चालले होते. अशा प्रकारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित लोकांच्या अधिकाराकरीता पुर्णगतिने आंदोलनाला सुरूवात केली. यादरम्यान मित्रांनो, दलितांना त्यांचे अधिकार मिळवून देत असताना त्यांना खूप जणांशी लढावे देखील लागले.
खरंतर, दलितांसाठी कार्य करताना त्यांना अनेक प्रकारच्या कठीण परिस्थितीला देखील सामोरे जावे लागले होते. या आंदोलना दरम्यान त्यांनी ही मागणी केली की सार्वजनिक पाण्याचे स्त्रोत सर्वांकरता खुले केले जावेत आणि सर्व जातींकरीता मंदिरातला प्रवेश देखील खुला करण्यात यावा.
मित्रहो, बाबासाहेब आंबेडकर दलितांसाठी एवढीच मागणी करून थांबले नाहीत, तर महाराष्ट्रातील नाशिक शहरात असलेल्या काळाराम मंदिरात प्रवेश करताना हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या विरोधाचा त्यांनी कडाडुन समाचार देखील घेतला आणि प्रतिकात्मक प्रदर्शन देखील केले. त्यांच्या या कार्यामुळे इसवी सनाच्या १९३२ साली दलितांच्या अधिकारांकरीता एखाद्या धर्मयुध्दातील योध्दयाप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लोकप्रीयता देखील वाढत गेली.
हे सर्व आपल्या भारत देशात चालू असताना, दुसरीकडे मात्र लंडनमधल्या गोलमेज संमेलनात सहभागी होण्याचे त्यांना आमंत्रण आले होते. या संमेलनात सहभागी होण्यासाठी आंबेडकरांनी महात्मा गांधींच्या विचारधारेचा देखील याठिकाणी विरोध केला आणि त्यांनी वेगळया मतदारांविरोधात आवाज उठविला होता, ज्यात दलित लोकांना त्यांच्या निवडणुकीत सहभागी होण्याची मागणी केली होती.
पण, नंतर महात्मा गांधीजींच्या विचारांची त्यांना उकल झाली. खरंतर, यालाच ‘पुना संधी’ देखील म्हटले जाते. महात्मा गांधीजींच्या मते एका विशेष मतदाराऐवेजी, क्षेत्रीय विधानसभा आणि राज्यातील केंद्रिय परिषदेत दलित वर्गाला आरक्षण देण्यात आले होते.
पुना संधी वर डाॅक्टर भिमराव आंबेडकर आणि ब्राम्हण समाजाचे प्रतिनीधी पंडित मदन मोहन मालवीय यांच्यात सामान्य मतदारांमध्ये तात्पुरत्या असलेल्या विधानसभांच्या दलित वर्गांकरीता राखीव जागा आरक्षणासाठी पुना संधी वर स्वाक्षरी देखील करण्यात आली होती.
अशा रीतीने, १९३५ साली बाबासाहेब आंबेडकरांना सरकारी कॉलेज असलेल्या ‘लाॅ काॅलेजचे’ प्रधानाचार्य म्हणुन नियुक्त करण्यात आले. या पदावर बाबासाहेबांनी दोन वर्ष काम केलं. यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईत स्थायिक झाले आणि त्यांनी या ठिकाणी मोठे घर देखील बांधले.
- नक्की वाचा: महात्मा गांधी भाषण मराठी
मित्रांनो, आता मी जे तुम्हाला सांगणार आहे कदाचित ते ऐकल्यानंतर तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटेल परंतु, बाबासाहेब आंबेडकरांच्या या घरात त्यांच्या खाजगी पुस्तकालयात जवळजवळ पन्नास हजारांपेक्षा देखील जास्त पुस्तके होती. डाॅक्टर भिमराव आंबेडकरांनी १९३६ साली स्वतंत्र लेबर पार्टीची स्थापना केली आणि पुढे इसवी सन १९३७ साली झालेल्या केंद्रिय विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पार्टीने पंधरा सीटस् जिंकल्या.
खरंतर, त्याच वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले पुस्तक ’द एनीहिलेशन आॅफ कास्ट’ प्रकाशित केले होते, ज्यात त्यांनी हिंदू रूढिवादी नेत्यांची आणि देशात प्रचलीत जाती व्यवस्थेची कठोर निंदा केली. त्यानंतर, त्यांनी आणखीन एक पुस्तक प्रकाशित केले ‘Who were the Shudras?’ म्हणजेच ‘शुद्र कोण होते?’ या पुस्तकात त्यांनी दलित वर्गात एकसंघपणा असल्याची व्याख्या केली.
१५ आॅगस्ट १९४७ या मंगलमय दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाल्याबरोबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या स्वतंत्र लेबर पार्टीला ‘अखिल भारतीय अनुसूचीत जाती संघ’ (आॅल इंडिया शेड्यूल) या कास्ट पार्टीत परिवर्तीत केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नविन नामांकन झालेली ही पार्टी १९४६ ला झालेल्या भारताच्या संविधान सभेच्या निवडणुकीत चांगले प्रदर्शन करू शकली नाही. पुढे काँग्रेस आणि महात्मा गांधींनी दलित वर्गाला हरिजन असे नाव दिले. ज्यामुळे, मागासलेल्या जाती या हरिजन या नावाने देखील ओळखल्या जाऊ लागल्या.
परंतु, आपल्या निश्चयाविषयी दृढ असलेल्या आणि भारतीय समाजातुन अस्पृश्यतेला कायमस्वरूपी मिटवण्यासाठी अखंड प्रयत्न करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधीजींनी दिलेले हरिजन हे नाव अजिबात आवडले नाही आणि या विषयाचा त्यांनी जोरदार विरोध केला.
त्यांचे म्हणणे होते की “अस्पृश्य समाजातील लोक देखील आपल्या समाजाचाच एक भाग आहेत आणि ते सुध्दा समाजातील अन्य सदस्यांसारखेच सामान्य माणसं आहेत.” पुढे डाॅक्टर भिमराव आंबेडकरांना व्हाॅइसराय एक्झीकेटीव्ह कौंसिलमध्ये श्रम मंत्री व रक्षा सल्लागार म्हणुन नियुक्त करण्यात आले.
त्याग, संघर्ष, आणि समर्पणाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारताचे पहिले कायदे मंत्री झाले. मित्रांनो, दलित असुनदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मंत्री होणे, त्यांच्या जीवनातील मोठया यशापेक्षा काही कमी नव्हते.
परंतू, आपल्या समाजात असलेल्या जातीयतेच्या अस्पृश्यतेला मुळापासुन नष्ट करणे व अस्पृश्यता मुक्त समाजाची निर्मीती करून, समाजात क्रांती आणणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ हेतू होता आणि सोबतच सर्वांना समानतेचा अधिकार देणे हा त्यांचा प्रयत्नही होता. शेवटी, २९ आॅगस्ट १९४७ साली डॉ. भीमराव आंबेडकरांना संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणुन नियुक्त करण्यात आले.
आपल्या सर्वांच्या प्रिय आणि आदरार्थी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील सर्व वर्गांमध्ये समांतर पुलाच्या निर्माणावर भर दिला. त्यांच्या मते देशातील वेगवेगळया वर्गांमधील अंतर कमी केले नाही तर देशाची एकता टिकवणे कठीण होईल.
या व्यतिरीक्त त्यांनी धार्मिक, लिंग आणि जाती समानतेवर देखील विशेष भर दिला. डॉ. भिमराव रामजी आंबेडकर यांनी शिक्षण, सरकारी नोकऱ्या, नागरी सेवा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये अनुसुचीत जाती आणि अनुसूचीत जनजातीतील लोकांसाठी आरक्षण सुरू करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि शेवटी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विधानसभेचे समर्थन मिळवण्यात यशस्वी राहिले.
डॉ. भिमराव आंबेडकरांनी समता, समानता, बंधुता आणि मानवतेवर आधारित भारतीय संविधानाला जवळजवळ दोन वर्षे, अकरा महिने आणि सात दिवसांच्या या अथक परिश्रमाने २६ नोव्हेंबर १९४९ यादिवशी तयार करून, तत्कालीन भारताचे राष्ट्रपती असलेल्या डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करीत, देशातील सर्व नागरिकांना राष्ट्रीय एकता, अखंडता आणि व्यक्तीची स्वाभिमानी जीवन पध्दतीने भारतीय संस्कृतीला गौरवान्वित केले.
मित्रांनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारतीय संविधानाच्या निर्मीतीतील आपल्या भुमिके व्यतिरीक्त भारताच्या वित्त आयोगाच्या स्थापनेत देखील मदत केली होती. त्याचबरोबर, त्यांनी आपल्या नितीमुल्यांच्या माध्यमातुन देशाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत बदलाव करून प्रगती केली आणि याशिवाय, त्यांनी स्थिर अर्थव्यवस्थेबरोबरच मुक्त अर्थव्यवस्थेवर देखील जोर दिला.
डॉ. बाबासाहेबांनी निरंतर महिलांच्या स्थितीत सुधारणा करण्याचा देखील प्रयत्न केला होता. इसवी सनाच्या १९५१ साली बाबासाहेब आंबेडकरांनी महिला सशक्तीकरणाचे हिंदू संहिता विधेयक पारीत करण्याचा प्रयत्न केला, याच्या मंजुर न होण्याने त्यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मित्रांनो, यावरून आपल्या लक्षात येईल की इतरांच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी कित्येक पदांचा आणि त्यांच्या सुखाचा त्याग केला होता.
आपल्या कायदे मंत्रिपदाचा त्याग केल्यानंतर, भीमराव आंबेडकरांनी लोकसभेची निवडणुक देखील लढली परंतु यात त्यांना अपयश आले. पुढे त्यांना राज्यसभेत नियुक्त करण्यात आले, आपल्या मृत्युपर्यंत बाबासाहेब आंबेडकर हे राज्यसभेचे सदस्य १९५५ साली झाले.
मित्रांनो, बाबासाहेबांनी आपला ग्रंथ अनेक राज्यांतील भाषांचा विचार करून प्रकाशीत केला होता. आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र यांसारख्या राज्यांमध्ये पुर्नगठीत करण्याचा प्रस्ताव बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांसमोर एका बैठकीत ठेवला होता.
मित्रहो, बाबासाहेबांनी हा प्रस्ताव ठेवल्यावर पुढील ४५ वर्षांनंतर काही प्रदेशांमध्ये हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आणि या प्रस्तावाच्या मान्यतेसोबतच माझ्या बाबासाहेबांचे स्वप्नदेखील साकार झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्वाचन आयोग, योजना आयोग, वित्त आयोग, महिला आणि पुरूषांकरता समान नागरी हिंदु संहिता, राज्य पुर्नगठन, मोठया आकाराच्या राज्यांना लहान आकारात संघटीत करणे, राज्याचे निती निर्देश तत्व, मौलिक अधिकार, मानवाधिकार, नियंत्रक आणि महालेखापरिक्षक, निर्वाचन आयुक्त आणि राजनैतिक सरंचना मजबुत करणारी सशक्त, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व विदेशी अशी अनेक धोरणे देखील तयार केली होती.
मित्रहो, इतकेच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या पुढच्या जिवनात सुद्धा समाजपरिवर्तनासाठी सतत प्रयत्न करत राहिले. त्यांनी आपल्या कठिण संघर्षाने व प्रयत्नांच्या माध्यमातुन लोकशाही मजबुत करणे, राज्यातील तिन अंगांना म्हणजेच स्वंतत्र न्यायपालिका, कार्यकारी, विधानमंडळ यांना वेगवेगळं केलं, सोबतच त्यांनी समान नागरिक अधिकाराअनुरूप ‘एक व्यक्ति, एक मत व एक मुल्य’ या अर्थपूर्ण तत्वाला प्रस्थापीत केले.
विलक्षण प्रतिभेचे धनी मानले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायपालिकेत, कार्यकारी व कार्यपालिकेत अनुसुचित जाती आणि जनजातीच्या लोकांचा सहभाग संविधानव्दारे सुनिश्चित केला आणि भविष्यात कोणत्याही प्रकारच्या निवडीत जसे की ग्राम पंचायत, जिल्हा पंचायत, पंचायत राज यात त्यांच्या सहभागाचा मार्ग प्रशस्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सहकारी आणि सामूहिक शेती सोबत उपलब्ध जमिनीचे राष्ट्रीयीकरण करून, जमिनीवर राज्याचे स्वामित्व स्थापीत केले.
याशिवाय, सार्वजनिक प्राथमिक व्यवसाय, बँकिंग, विमा या उपक्रमांना राज्याच्या नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी त्यांनी जोरदार समर्थन देखील दिले. शिवाय, शेतकऱ्यांच्या लहान पिकांवर अवलंबुन असणाऱ्या बेरोजगार मजुरांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हाव्यात; यासाठी, त्यांनी औद्योगिकीकरण या क्षेत्राच्या प्रगतीसाठी बरेच कार्य केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता केलेले कार्य, समाजातील लोकांच्या मनातील दलितांबद्दलचे विचार बदलण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान खरंच किती महान आहे! म्हणूनच मित्रांनो, बाबासाहेबांच्या सन्मानाकरीता आपल्या भारतातील अनेक ठिकाणी त्यांच्या स्मारकाची निर्मीती करण्यात आली.
त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने १४ एप्रिल यादिवशी भारतातील अनेक ठिकाणी आंबेडकर जयंती खूप मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने साजरी केली जाते.
त्यांच्या जन्मदिनाला ‘नॅशनल हाॅलिडे’ म्हणजेच ‘सार्वजनिक सुट्टी’ आपल्या भारतभर घोषीत करण्यात आली आहे. शिवाय, यादिवशी सर्व खाजगी आणि सरकारी शैक्षणिक संस्थांना देखील सुट्टी असते. चला तर मित्रांनो, अशा महान महापुरुषाला आपण सर्वजण वंदन करूयात आणि त्यांच्या विचारांची धारा आपल्या जीवनामध्ये उतरुयात!
“फुलेंची विचारधारा अंगी जोपासल्याने,
सुशिक्षित म्हणून जगतो आम्ही!
निरक्षर तेचं कलंक महापुरुषाने पुसल्याने,
बाबासाहेबांना स्मरतो आम्ही!
– तेजल तानाजी पाटील
बागीलगे, चंदगड.
आम्ही दिलेल्या dr babasaheb ambedkar speech in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण” speech on dr babasaheb ambedkar jayanti in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या babasaheb ambedkar speech in marathi या dr babasaheb ambedkar bhashan marathi article मध्ये upadate करू, मित्रांनो हि dr babasaheb ambedkar bhashan माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण dr babasaheb ambedkar writings and speeches in marathi pdf या लेखाचा वापर dr babasaheb ambedkar jayanti speech in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट