Mahatma Gandhi Speech in Marathi – Speech On Mahatma Gandhi in Marathi महात्मा गांधी जयंती भाषण मराठी आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महोदय, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सूत्रसंचालक, उपस्थित मान्यवर तसेच, आयोजक वर्ग या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. कारण, त्यांच्यामुळे मला आज याठिकाणी महात्मा गांधीजींविषयी बोलण्याची संधी मिळतेय. खरंतर मित्रांनो, आपल्या भारतमातेचे थोर सुपूत्र, भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तसेच, संपूर्ण विश्वाला अहिंसेचा महान संदेश देणारे, आपल्या भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे वंदनीय युगपुरूष होते.
देशाच्या स्वातंत्र्यकालीन इतिहासातील महानक्रांतिकारक, शांतता व अहिंसेचे पुजारक ‘महात्मा गांधी’ यांचा जन्म सन २ ऑक्टोबर १८६९ साली गुजरात राज्यामधील पोरबंदर या शहरात झाला होता. महात्मा गांधींचे पूर्ण नाव ‘मोहनदास करमचंद गांधी’ असे होते. परंतु, आपल्या भारतातील लोक प्रेमाने त्यांना बापू असे म्हणत असतं. रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या बापूंना सर्वप्रथम “महात्मा” ही उपाधी धारण केली होती.
“बापू सन्मान करतो आम्ही,
तुमच्या महान नेतृत्वाचा.
भारत देश गुलामगिरीतून मुक्त झाला,
हा दाखला आहे तुमच्या कर्तुत्वाचा!”
महात्मा गांधी भाषण मराठी – Mahatma Gandhi Speech in Marathi
Mahatma Gandhi Bhashan
तसेच, सन १९४४ साली सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना “राष्ट्रपिता” म्हणून पहिल्यांदा संबोधले होते. महात्मा गांधी यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई असे होते. महात्मा गांधी यांचे वडिल करमचंद गांधी हे तत्कालीन काठेवाड प्रांतामधील पोरबंदर या ठिकाणी दिवाण म्हणून काम करीत असतं.
करमचंद गांधी यांची चार लग्न झाली होती, त्यातील पुतळाबाई या करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी होत्या. त्याकाळी, आताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उपलब्ध असलेले दवाखाने नव्हते, त्यामुळे करमचंद गांधी यांच्या आधीच्या तीन पत्नींचे प्रसूतीदरम्यानच निधन झाले होते. त्यामुळे, त्यांनी चौथे लग्न महात्मा गांधीजींच्या मातोश्री म्हणजेच पुतळाबाई यांच्यासोबत केले होते.
करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी पुतळाबाई या महात्मा गांधी यांच्या आई होत. पुतळाबाई या खूपच धार्मिक वृत्तीच्या होत्या, त्या सतत उपवास करीत असतं.
पुतळाबाईंनी महात्मा गांधीजींच्या मनावर बालवयात केलेल्या धार्मिक संस्कारांचा प्रभाव आपणा सर्वांना त्यांच्या पुढील जीवनात झालेला दिसून येतो. मोहनदास करमचंद गांधी यांच्या मनावर त्यांच्या मातोश्रींनी त्यांच्या बालपणीच अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता यांसारख्या तत्वांचे बीज रुजवले होते.
शिवाय, प्राणिमात्रांवर दया करणे, त्यांच्यावर करुणा दाखवणे, गरजूंना मदत करणे आणि स्त्रियांचा आदर करणे, यासारखे अनेक संस्कार गांधीजींच्या मनावर त्यांच्या आईकडूनच गिरवण्यात आले होते. महात्मा गांधीजींच्या लहानपणी त्यांच्या आई पुतळाबाई त्यांना जैन संकल्प आणि त्यांच्या प्रथांबद्दल माहिती सांगत असतं.
- नक्की वाचा: स्वातंत्र्य दिनाचे भाषण
यामुळे, लहानपणापासूनच महात्मा गांधीजींना उपवास करण्याची सवय लागली होती. जैन धर्मातील संकल्पांचा आणि प्रथांचा त्यांच्या मनावर खूप मोठा प्रभाव पडला होता.
मित्रांनो, महात्मा गांधीजी एक गोष्ट स्वत: कबूल करतात की, पौराणिक कथेतील श्रावणबाळ आणि राजा हरीश्चंद्र या दोन कथांतील व्यक्तीमत्वांचा त्यांच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडला होता. स्वातंत्र्य पूर्व काळात आपल्या भारत देशामध्ये बालविवाह करण्याची प्रथा अस्तित्वात होती.
त्या प्रथेनुसार महात्मा गांधी यांचा विवाह इ.स. १८३३ साली वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी असताना, ‘कस्तूरबा माखनजी कपाडिया’ यांच्यासोबत झाला होता. गांधीजी त्यांना प्रेमाने “बा” असे म्हणत. लग्नानंतर महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी या प्रथेप्रमाणे बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच राहिल्या.
यामुळे, महात्मा गांधी यांच्या शालेय शिक्षणात एक वर्षाचा खंड पडला होता. इ.स. १८८५ साली महात्मा गांधीजी फक्त पंधरा वर्षांचे असताना, त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याचवर्षी महात्मा गांधीजींना एक अपत्य देखील झाले होते. परंतु, ते जास्त काळ जगू शकले नाही.
यानंतर महात्मा गांधी यांना चार मुले झाली. ती पुढीलप्रमाणे; इ.स. १८८८ साली हरीलाल, इ.स. १८९२ साली मणिलाल, इ.स. १८९७ साली रामदास आणि इ.स. १९०० साली देवदास. महात्मा गांधी यांची लहानपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती. परंतु, त्यांच्या वडिलांची त्यांना सरकारी नोकरीत दाखल करण्याची इच्छा होती.
त्यामुळे, इसवी सन १९८८ साली आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर महात्मा गांधीजी उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला गेले. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी ‘इनर टेंपल’ या गावी राहून, भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा भरपूर अभ्यास केला. अशा प्रकारे, महात्मा गांधीजींनी लंडनच्या विद्यापीठामधून आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.
वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, महात्मा गांधीजी इंग्लंडमध्ये गेले होते, तिथे त्यांना इंग्लंड देशाचे सर्व रीतीरिवाज समजून घेण्यात काही वेळ लागला.
खरंतर मित्रांनो, इंग्लंडमध्ये सर्व पदार्थ मांसाहारी मिळत असल्याने, महात्मा गांधीजींना शाकाहारी पदार्थ जेवायला मिळेपर्यंत उपाशी राहावं लागतं असे. महात्मा गांधीजी हे आपल्या आईला दिलेल्या वचनाशी कटीबद्ध असल्याने, त्यांनी त्या ठिकाणी मांसाहार, मद्यपान करणे वर्ज्य केले. त्याठिकाणी त्यांनी शाकाहारी माणसे शोधली आणि त्यांची एक संघटना स्थापन केली.
अशा पद्धतीने, महात्मा गांधीजी स्वतः त्या संघटनेचे अध्यक्ष बनले. महात्मा गांधीजी लंडनमध्ये ज्या शाकाहारी लोकांना भेटले होते, त्यातील काही लोक हे ‘थीयोसोफिकल सोसायटी’ चे सदस्य देखील होते.
महात्मा गांधीजींनी त्याठिकाणी राहून तेथील चालीरीती शिकण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, बापू बॅरिस्टर बनून सन १८९१ साली आपल्या भारत देशात परत आले आणि भारतात आल्यानंतर ते वकिली करू लागले.
- नक्की वाचा: शिक्षक दिनाचे भाषण
ज्यावेळी त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली होती, त्यावेळी त्यांना न्यायादिशासमोर एखादा मुद्दा मांडणे म्हणजे खूप कठीण वाटत होते. मित्रहो, सुरुवातीला त्यांना वकिलाचे हे काम अजिबात जमत नव्हते. बापू आपल्या लाजाळू वृत्तीच्या स्वभावामुळे कोर्टात कुणाशीही फार बोलत देखील नसत.
सन १८९३ साली वयाच्या २४ व्या वर्षी महात्मा गांधी हे भारतीय व्यावसायिकांचे न्यायालयीन सल्लागार म्हणून दक्षिण आफ्रिकेला गेले होते. मित्रांनो, त्याकाळी दक्षिण आफ्रिका ही एक इंग्रजांची वसाहत होती. त्याठिकाणी कार्य करण्यासाठी महात्मा गांधीजींनी आपल्या आयुष्याची २१ वर्षे घालविली.
दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना आपल्या प्रिय महात्मा गांधीजींनी आपले राजकीय दृष्टीकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व अशा त्यांनी स्वतःतील अनेक कौशल्यांचे बारकाईने धडे गिरविले. महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये राहत असताना, समाजात अस्तित्वात असलेल्या विकलांगपणाची जाणीव झाली.
भारतीय संस्कृती आणि धर्म यामध्ये असणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्येपासून आपण भरपूर दूर आहोत याची जाणीव त्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये झाल्यानंतर, त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये राहून भारतीय लोकांचे प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेत उद्योग, व्यवसाय आणि इतर कामधंद्यासाठी त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या भारतीय लोकांचे प्रश्न समजावून घेवून त्यांचे निराकरण करण्याचा गांधीजींनी आपला प्रयत्न सुरू केला.
खरंतर मित्रहो, आपल्या बापूंची अशी धारणा होती की; अशा पद्धतीने जर आपण भारतवासियांचे प्रश्न समजावून घेतले, तरच आपण खऱ्या दृष्टीने भारत देशाला समजून घेऊ. पण, याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजींना गंभीरपणे वांशिक वर्ण भेदाचा सामना देखील करावा लागला.
त्याठिकाणी भारतीय लोकांना देण्यात येणारी अपमान जनक वागणूक त्यांनी स्वतः अनुभवली. एके दिवशी महात्मा गांधीजी रेल्वेचा प्रवास करीत असताना, त्यांच्याजवळ पहिल्या वर्गाचे तिकीट असताना सुद्धा त्यांना ‘पीटर मारित्झबर्ग’ येथील रेल्वे स्थानकावर एका रेल्वे अधिकाऱ्याने खाली उतरवले आणि महात्मा गांधीजींना तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले होते.
यावेळी, महात्मा गांधीजींनी तिसऱ्या वर्गाच्या रेल्वेच्या डब्यात स्वतः बसण्यास त्या अधिकाऱ्याला नकार दिला. तेंव्हा, त्या अधिकाऱ्याने गांधीजींना गाडी बाहेर ढकलून दिले आणि जोरदार ढकल्याने गांधीजी रेल्वेच्या खाली पडले. मित्रांनो, त्यादिवशी आपल्या बापूंनी संपूर्ण रात्र फलाटावर काढली होती.
- नक्की वाचा: छत्रपती शिवाजी महाराज भाषण
बापूंच्या मनात आलं असत तर ते त्या इंग्रज अधिकाऱ्याला धडा शिकवू शकले असते. परंतु, सुडाच्या भावनेतून कोणाला शिक्षा करणे असा त्यांचा कधीच हेतू नव्हता. आपले महात्मा गांधीजी हे अहिंसावादी असल्याने, केवळ अन्यायकारक व्यवस्था बदलणे हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधीजींना अशा अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता.
शिवाय, त्यांना त्याठिकाणी असणाऱ्या समाजातील अनेक मुळ समस्येंचा देखील अनुभव आला होता. उदाहरणार्थ, प्रवाशांना वाट काढून न दिल्यामुळे, महात्मा गांधीजी यांना मार देण्यात आला होता.
गांधीजी हॉटेलमध्ये वास्तव्यास असताना, त्यांना हॉटेलमधून देखील बाहेर काढून देण्यात आलं होत. याशिवाय, महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतील ‘डर्बन’ या शहरात वकिली करीत असताना, त्यांना तेथील न्यायाधीशांनी डोक्यावरील टोपी काढून ठेवण्याचा आदेश दिला होता. परंतु, आपल्या बापूंनी यावेळी सुध्दा न्यायाधीशाचा आदेश अमान्य केला.
अश्या प्रकारचे अनेक अनुभव आपल्या पाठीशी घेतल्यानंतर, महात्मा गांधीजींनी एक सामाजिक नागरिक म्हणून ब्रिटीश राज्यातील आपल्या लोकांच्या समस्यांविषयी प्रश्न मांडण्यास सुरुवात केली. भारतीय लोकांवर होणारे अन्याय, अत्याचार आणि आपलं स्वतःचं सामाजिक स्थान निर्माण करण्याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला.
गांधीजींच्या मनात असे विचार चालू असताना, सन १९०६ साली मात्र ब्रिटीश सरकारने दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू केला.
त्यावेळी बापूंनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी आपलं तेथील मुक्काम वाढवलं आणि भारतीय नागरिकांना राजकीय व सामाजिक हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देखील दिली. त्याचबरोबर, गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेच्या ब्रिटीश सरकारकडे भारतीय लोकांच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला.
मित्रांनो यावेळेस, आपल्या बापूंनी आपल्या अहिंसेच्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग केला होता. सन १८९४ साली त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील वेगवेगळ्या समाजात विखुरलेल्या भारतीय नागरिकांना एकत्रित करून ‘नाताळ भारतीय कॉन्ग्रेस‘ नावाचा एक राजकीय पक्ष देखील स्थापन केला.
यानंतर, सन ९ जानेवारी १९१५ साली काँग्रेसचे उदारमतवादी नेता “गोपाळ कृष्ण गोखले” यांच्या सल्ल्याने महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून आपल्या मायदेशी परत आले. खरंतर मित्रहो, महात्मा गांधीजी “गोपाळ कृष्ण गोखले” यांना आपले राजकीय गुरु मानत असतं.
ज्यावेळी महात्मा गांधीजी भारतात परत आले होते, त्यावेळी त्यांनी स्वतःची राष्ट्रवादी नेता, तसेच संयोजक आणि संघटक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवली होती. आपल्या राजकीय कार्याला सुरुवात करण्याच्या प्रारंभी महात्मा गांधीजी यांच्या मनावर गोपाळ कृष्ण गोखले यांच्या संयम, संतुलन आणि कोणत्याही व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करणे, यासारख्या विचारांचा प्रभाव पडला होता.
मित्रहो, गोपाळ कृष्ण गोखले हे त्यावेळेला “भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे” अध्यक्ष होते. भारत देशात परत आल्यानंतर महात्मा गांधीजी देशाच्या विविध भागात जावून तेथील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. शिवाय, आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांचे दु:ख आणि दारिद्र्य पाहून महात्मा गांधीजी हे स्वतः देखील दु:खी झाले होते.
अहमदाबाद जवळील साबरमती नदीच्या काठी असलेल्या एका आश्रमात महात्मा गांधीजी वास्तव्य करू लागले.
“साबरमतीचे संत तुम्ही महान,
सत्य-अहिंसेचे शस्त्र तुम्ही आम्हांला दिले छान.
सर्व जगी अहिंसेचे पुजारी म्हणून,
ठेवू आम्ही पहिला तुमचा मान!”
भारत देशातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांनी अहिंसावादी सत्याग्रह करण्याचे एक नवीन अभिनव तंत्र स्वतःच्या अंगी अंगिकारले. महात्मा गांधीजी हे अहिंसेचे पुजारी असल्याने इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी असहकार, अहिंसा आणि शांततामय या तीन तत्वांचा आपल्यामध्ये अवलंब केला होता.
सन १९१९ साली पंजाबमधील जालियानवाला बाग हत्याकांड प्रकरणामुळे देशातील लोकांच्या मनात इंग्रज सरकारबद्दल क्रोधाचा भडका उडाला होता. त्यामुळे, या घटनेच्या निषेधार्थ भारत देशात जागोजागी मोर्चे निघाले होते आणि ते मोर्चे दडपून काढण्यासाठी इंग्रज सरकारला खूप दमछाक देखील करावी लागली होती.
- नक्की वाचा: राजमाता जिजाऊ भाषण मराठी
अशावेळी, महात्मा गांधीजी यांनी जालियानवाला बाग हत्याकांड प्रकरणी इंग्रज सरकारचा निषेध केला. खरंतर मित्रांनो, सहकार चळवळ सुरु करण्यामागे महात्मा गांधीजींचा असा हेतू होता की, भारतातील ब्रिटीशांचे राज्य हे केवळ भारतातील लोकांच्या सहकार्यावर अबलंबून आहे;
त्यामुळे, जर भारतीयांनी त्यांना विरोध केला तरच त्यांचे शासन पूर्णपणे ढासळून जाईल. मित्रहो, अशा हेतूने महात्मा गांधीजींनी जनतेला आपल्या असहकार आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले. असहकार आंदोलन सुरू असताना, सन १९२० साली लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि टिळकांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय सभेचे संपूर्ण नेतृत्व महात्मा गांधीजी यांच्याकडे आले.
अशा प्रकारे, असहकार चळवळीनुसार आपल्या देशातील नागरिकांनी शासकीय कार्यालये, न्यायालये, परदेशी वस्तू, सरकारी शाळा आणि महाविद्यालये यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मित्रहो, असे केल्याने इंग्रज सरकार आपल्याला स्वातंत्र्य देण्याबाबत काही पाऊले उचलतील; असे आपल्या राष्ट्रीय सभेच्या सदस्यांना वाटत होते.
परंतु, गांधीजींचे हे आंदोलन फार काळ टिकू शकले नाही. सन १९२२ साली उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपुर जिल्हाच्या चौरीचौरा या भागात एका शांततापूर्ण चाललेल्या मिरवणुकीवर पोलीसांनी गोळीबार केला.
पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे असहकार चळवळीत सहभागी असलेल्या नागरिकांना खूप राग आला आणि या रागातच घडलेल्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी तेथील एक पोलीस चौकी जाळून टाकली. या जाळपोळीत एक पोलीस अधिकारी व २२ पोलीस ठार झाले. या घटनेची माहिती जेंव्हा बापूंना समजली, तेंव्हा त्यांना खुप वाईट वाटलं आणि ते एकदम अस्वस्थ झाले.
गांधीजींना वाटू लागलं की, आपण असहकार आंदोलन सुरु करून लोकांना अहिंसेच्या मार्गावर चालायला लावलं. परंतु, अहिंसेच्या मार्गावर चालणे इतक सोप नाही शिवाय, तसे करणे सर्वांनाच शक्य होणार नाही, म्हणून महात्मा गांधी यांनी आपली असहकार चळवळ मागे घेतली. मित्रहो, याशिवाय सन १९१८ साली गुजरातमधील खेडा या गावात सतत पडलेल्या पावसामुळे संपूर्ण गाव हे दुष्काळग्रस्त झालं होत. तेथील पिकांची अवस्था खूपच वाईट होती.
खेडा या गावात अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा इंग्रज सरकार मात्र भारतीय शेतकऱ्यांकडून सक्तीने शेतसारा वसूल करीत होते. परिणामी, या सगळ्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अजुन खूप बिकट, गुंतागुंतीची आणि वाईट बनली. अशावेळी, महात्मा गांधीजींनी त्याठिकाणी राहत असणाऱ्या लोकांसाठी एक आश्रम उभारला आणि आपल्या लहान मोठ्या सर्व अनुयायांना एकत्रित केलं.
याशिवाय, महात्मा गांधीजींनी गावातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना आपल्या विश्वासात घेतले. शेतकऱ्यांना महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांकडे यावेळी शेतसारा न भरण्याचा आदेश दिला, तेंव्हा सन १९१८ साली शेतकऱ्यांनी शेतसारा बंदीची चळवळ सुरु केली आणि महात्मा गांधीजींना या चळवळीचे अध्यक्ष बनवले.
महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांनी येथील शेतकऱ्यांच्या समस्येसंबंधी इंग्रज सरकारसोबत चर्चा केली.
शेवटी, ब्रिटीश सरकारने त्यांची मागणी मान्य करून, तुरुंगात कैद्य केलेल्या सर्व लोकांची सुटका केली. या चळवळीमुळे महात्मा गांधीजींची प्रसिद्धी संपूर्ण जगभर पसरली होती. याशिवाय, इसवी सन १९१४ साली झालेल्या पहिल्या महायुद्धानंतर आपल्या भारत देशात खूप महागाई वाढली होती आणि या वाढलेल्या महागाईत अहमदाबाद येथील कामगारांनी वेतनवाढीकरीता गिरणी मालकांकडे विनंती केली.
परंतु, कामगारांची ही मागणी मान्य करण्यात आली नाही. यावेळी, महात्मा गांधीजींनी स्वतः त्याठिकाणी जावून संप पुकारला आणि तिथे ते उपोषणाला बसले. महात्मा गांधीजींसोबत गिरणी कामगार देखील उपोषणाला बसले होते. शेवटी, महात्मा गांधीजींच्या या अहिंसावादी आंदोलनासमोर गिरणी मालकांनी हार पत्करली आणि गिरणी कामगारांना वेतनवाढ दिली.
पण मित्रांनो, अशा या थोर आणि जागृत विचारवंताचा मृत्यू मात्र खूप भयानक पद्धतीने आणि अनपेक्षितपणे झाला.
३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजी दिल्ली येथील बिर्ला बागेत आपल्या सहकाऱ्यांसोबत फिरत असताना ‘नथुराम गोडसे’ या व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. महात्मा गांधीजी यांना गोळी लागताच ते जमिनीवर कोसळले. मित्रहो, गांधीजींच्या मृत्यूबद्दल लोकांची अशी धारणा आहे की, महात्मा गांधीजी यांनी मृत्युपूर्वी आपल्या मुखातून ‘हे राम’ असे उद्गार काढले होते.
सन १९४९ साली महात्मा गांधीजींच्या मारेकऱ्याला आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यात आले व त्यांच्यावर खटला देखील चालविण्यात आला. भारत सरकारने आपल्या कायद्यानुसार नथुराम गोडसे या खूनीला आणि त्यांच्या साथीदारांना फाशीची शिक्षा देण्याचे ठरवले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी, समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि निवारण्यासाठी, जातीभेदेची दरी कमी करण्यासाठी या महामानवाने खरच खूप मोलाची कामगिरी केली होती. म्हणूनच, आपल्या भारत देशात आज सुद्धा भारतीय जनतेच्या मनामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याबद्दल भरपूर आदर आहे.
खरंतर, महात्मा गांधीजींनी केलेल्या या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल महात्मा गांधीजी हे फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण विश्वात देखील ओळखले जातात. म्हणूनच मित्रांनो, केवळ भारत देशासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी आदर्शवादी असणाऱ्या महात्मा गांधीजींचा जन्मदिन हा सगळीकडे अहिंसादिन म्हणून साजरा केला जातो. अशा या महान राष्ट्रपित्याला माझा कोटी कोटी प्रणाम! जय हिंद! जय भारत!
“ज्यांनी लिहीली,
पारतंत्र्य मुक्तीची गाथा.
त्या राष्ट्रपित्याच्या,
चरणी ठेविते आज माथा!”
– तेजल तानाजी पाटील
बागीलगे, चंदगड.
आम्ही दिलेल्या mahatma gandhi speech in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “महात्मा गांधी भाषण मराठी” speech on mahatma gandhi in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mahatma gandhi jayanti speech in marathi या mahatma gandhi bhashan marathi article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mahatma gandhi marathi bhashan माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण mahatma gandhi bhashan marathi madhe या लेखाचा वापर mahatma gandhi information in marathi speech असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट