डॉक्टर राजेंद्र प्रसाद Dr Rajendra Prasad Information in Marathi

Dr Rajendra Prasad Information in Marathi डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची माहिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारतरत्न पुरस्काराचे मानकरी व आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी राष्ट्रपतीपदावर बारा वर्ष राज्य केलं. या काळात त्यांनी देशांमध्ये अनेक बदल घडवून आणले. सुरुवातीला ते वकील म्हणून राजकारणात आले होते. परंतु राजकीय क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केलं. त्यामुळे भारताचे संविधान स्थापन झाल्यावर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती बनण्याचा मान मिळाला. आजच्या लेखामध्ये आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

dr rajendra prasad information in marathi
dr rajendra prasad information in marathi

डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची माहिती – Dr Rajendra Prasad Information in Marathi

नाव(Name)डॉक्टर राजेंद्र प्रसाद
जन्म (Birthday)३ डिसेंबर १८८४
जन्मस्थान (Birthplace)ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतामध्ये (जे आज बिहार म्हणून ओळखलं जातं)
वडील (Father Name)महादेव
आईचे नाव (Mother Name)कमलेश्‍वरी
पुरस्कारभारतरत्न
मृत्यू (Death)२९ फेब्रुवारी १९६३

जन्म

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता. त्यामुळे ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतामध्ये (जे आज बिहार म्हणून ओळखलं जातं) जेरादेई हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं जन्मस्थान आहे. डॉक्टर प्रसाद यांची जन्मतारीख डिसेंबर ३ इसवी सन १८८४ अशी आहे. हिंदू घराण्यात डॉक्टर प्रसाद यांचा जन्म झाला. वडील संस्कृत व पारशी भाषेचे विद्वान होते आईचा स्वभाव अतिशय धार्मिक.

वडील महादेव आणि आई कमलेश्‍वरी त्यांचे धार्मिक संस्कार डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना लाभले. घरामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक विचारांची देवाण-घेवाण व्हायची आई डॉक्टर राजेंद्र यांना रामायणातल्या गोष्टी सांगायची.

शिक्षण

डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची एखादी गोष्ट आत्मसात करण्याची क्षमता अतिशय उत्तम होती. प्रसाद यांना पाच वर्ष पूर्ण होताच त्यांच्या आईवडिलांनी त्यांना शालेय शिक्षण देण्याचं ठरवलं. हिंदू, उर्दू, पारशी या भाषांचे प्रशिक्षण डॉक्टर प्रसाद यांनी फक्त पाच वर्षाचे असताना घेतलं. इतक्या लहान वयामध्ये इतक्या कठीण भाषेच शिकणं घेण काही सोप्प काम नाही. परंतु डॉक्टर प्रसाद या भाषांमध्ये पारंगत झाले.

प्रसाद यांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या स्थाईक ठिकाणी जेरादेई येथून पूर्ण झालं. दोन वर्ष ते त्यांच्या मोठ्या भावासोबत टि. के. घोष या अकॅडमीमध्ये शिक्षण घेत होते. उच्च शिक्षण घेण्यासाठी ते कलकत्ता येथे पोचले. तिकडे त्यांना कलकत्ता यूनिवर्सिटी मध्ये प्रवेश देखील मिळाला आणि जे अपेक्षित होतं तेच घडलं कलकत्ता यूनिवर्सिटी मध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला.

डॉक्टर प्रसाद कर्तृत्ववान व हुशार होते त्यांनी त्यांच्या हुशारीच्या बळावर प्रति महिना तीस रुपयांची शिष्यवृत्ती मिळवली. त्यावेळी तीस रुपये खूप मोठी गोष्ट होती. सन १९०२ मध्ये कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेज येथे विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलं आणि सन १९०५ मध्ये फर्स्ट क्लास ने ते पास झाले.

डॉक्टर प्रसाद इथवरच थांबले नाहीत त्यांनी अर्थशास्त्र या विषयावर एम.ए. हि पदवी प्रथम श्रेणी मधून उत्तीर्ण होऊन प्राप्त केली. पुढे त्यांनी लाॅ या विषयाच प्रशिक्षण घेऊन याच विषयात पुढे पीएचडी केली. आपल्या विद्यार्थी काळामध्ये ते सार्वजनिक कार्य देखील करायचे.

वैयक्तिक आयुष्य 

सन १८९६ मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद बारा वर्षाचे असताना त्यांचा विवाह राजवंशी देवी यांच्याशी झाला. पुढे प्रसाद यांनी त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करून व वकिलीची पदवी मिळवली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे एक उत्तम शिक्षक होते. त्यांनी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये एक शिक्षक म्हणून सेवा दिली आहे.

अर्थशास्त्रात एम ए ही पदवी घेतली आणि बिहार मध्ये लंगत सिंग कॉलेज ऑफ मुजफ्फरपूर येथे इंग्रजीचे प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य म्हणून सेवा दिली. १९०९ मध्ये ते कायद्याचं शिक्षण घेत होते. तेव्हा त्यांनी कलकत्ता सिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य केलं. १९१५ मध्ये मास्टर्स इन लाॅ ही परीक्षा प्रसाद यांनी दिली आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण देखील झाले.

त्यांना या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे सुवर्णपदक देखील मिळालं होतं. अलाहाबाद विद्यापीठातून १९३७ मध्ये लाॅ मध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. कायद्याचं शिक्षण झाल्या वर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पटना येथे वकिली सुरू केली. तिथून पुढे त्यांची वकिली प्रसिद्ध होऊ लागली. विद्यार्थी असताना ते समाज कार्य देखील करायचे.

देशाबद्दल असलेले प्रेम व देशाला स्वातंत्र्य मिळावे अशी दृढ इच्छा त्यांच्या मनात होती. त्यांना जेव्हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल कळलं तेव्हा त्यांनी या चळवळींमध्ये सहभाग घेतला आणि देश सेवेत स्वतःला झोकून दिलं.

भारत स्वातंत्र्य चळवळ

डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा वकीलीचा व्यवसाय होता. ते एक नावाजलेले वकील होते. परंतु देश प्रेमापुढे त्यांना काही महत्त्वाचं नव्हतं. त्यांनी वकिली सोडून स्वातंत्र्यचळवळीत सहभाग घेतला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे डॉक्टर प्रसाद आधी एक सदस्य होते. त्यांचा काँग्रेस पक्षाशी संबंध १९०६ मध्ये आला.

कोलकत्ता येथे अनेक अधिवेशन आयोजित केली जायची. त्यावेळी १९११ मध्ये त्यांनी भारतीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनऊ अधिवेशनात १९१६ मध्ये डॉक्टर प्रसाद यांची भेट महात्मा गांधी यांच्याशी झाली. डॉक्टर प्रसाद हे देश प्रेमी होते. सहाजिकच आहे त्यांच्या विचारांवर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता.

एकदा महात्मा गांधी यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना चंपारण येथे भेटीसाठी बोलावलं. पुढे त्यांनी १९२० मध्ये गांधीजी सोबत असहकार चळवळीत भाग घेतला. गांधीजींनी शैक्षणिक संस्थांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन दिलं होतं त्यावेळी प्रसाद यांनी त्यांच्या मुलाला इंग्रजी विद्यापीठातून काढून त्याचा प्रवेश बिहार विद्यापिठात करवून दिला.

१९१४ मध्ये बिहार व बंगाल मध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पुरामुळे पीडितांना मदत करण्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा मोठा सहभाग होता. इतिहासात नोंदवण्यात आलेल्या मोठ मोठ्या चळवळीं मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मोठा सहभाग घेतला होता. जसं गांधीजी सोबत्यांनी १९१७ मध्ये चंपारण्य सत्याग्रह.

पुढे १९३० मध्ये मिठाचा सत्याग्रह आणि १९४२ मध्ये चले जाव आंदोलन या सगळ्या चळवळींमध्ये ते गांधीजी सोबत सहभागी झाले होते. या दरम्यान त्यांना अनेक वेळा तुरुंगात जावं लागलं होतं.

राजकीय आयुष्य

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती बनण्याचा मान डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना मिळाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतात संविधान स्थापन करण्यात आलं. २६ जानेवारी १९५० मध्ये भारतीय संविधानाची स्थापना झाली. १९११ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये डॉक्टर प्रकाश यांनी प्रवेश केला. सण १९३४, १९३९ आणि १९४७ अशी तीन वर्ष डॉक्टर प्रसाद काँग्रेसचे अध्यक्ष होते.

सन १९०६  मध्ये डॉक्टर प्रसाद अन्न व कृषी मंत्री पदावर होते. डॉक्टर प्रसाद यांना दिलेली सगळी विभाग उत्तम रित्या सांभाळत होते. म्हणून ११ डिसेंबर १९४६ मध्ये संविधान समितीचे अध्यक्षपद डॉक्टर प्रसाद यांच्या हाती आलं. सण १९४९  मध्ये त्यांना पुन्हा संविधान समितीचे अध्यक्ष बनवण्यात आलं.

संविधानाची स्थापना झाल्यावर राजकीय क्षेत्रात डॉक्टर प्रसाद यांचे योगदान पाहून त्यांना राष्ट्रपती पद देण्यात आलं. भारताच्या राज्यघटनेत राष्ट्रपतीपद हे सर्वोच्च मानलं जातं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हुशार, कर्तृत्ववान व यांच्याकडे असणारी कुशाग्र बुद्धिमत्ता, राष्ट्रभक्ती व देशप्रेम आणि देशसेवा या सगळ्या घटकांना लक्षात घेता स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती पद डॉक्टर प्रसाद यांच्या हाती देण्याचा निर्णय अगदी योग्य होता.

राष्ट्रपतीपद डॉक्टर प्रसाद यांनी खूप छान प्रकारे सांभाळलं. सन १९५० ते १९६२ या काळ दरम्यान राष्ट्रपती पद डॉक्टर प्रसाद यांच्याकडे होतं. बारा वर्ष डॉक्टर प्रसाद यांनी राष्ट्रपती पद सांभाळले.

इतर माहिती 

डॉक्टर प्रसाद हे एक शिक्षक, वकील व राजकीय नेते होते त्यासोबतच त्यांना लेखनाची आवड देखील होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यातीलच काही पुस्तक म्हणजे इंडिया डिवाइडेड, भारतीय शिक्षा, आत्मकथा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद एट द फिट ऑफ महात्मा गांधी आणि बिहार, चंपारण मधील सत्याग्रह, युनिटी ऑफ इंडिया इत्यादी.

१९६२ मध्ये भारत सरकार द्वारे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना “भारतरत्न” हा भारताचा सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांचा गौरव करून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. डॉक्टर प्रसाद यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.

मृत्यू

२९ फेब्रुवारी १९६३ मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं पटना येथे निधन झालं. राष्ट्रपती पदावरून निवृत्ती घेतल्यावर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सामाजिक कार्य सुरू केलं.

आम्ही दिलेल्या dr rajendra prasad information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डॉक्टर राजेंद्र प्रसाद बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about dr rajendra prasad in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of dr rajendra prasad in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर dr rajendra prasad mahiti असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!