एकनाथ शिंदे माहिती मराठी Eknath Shinde Information in Marathi

Eknath Shinde Information in Marathi – Eknath Shinde Biography in Marathi एकनाथ शिंदे माहिती मराठी आज आपण या लेखामध्ये एकनाथ शिंदे यांच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. एकनाथ शिंदे यांचे पूर्ण नाव एकनाथ संभाजी शिंदे असे आहे आणि यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ मध्ये झाला आणि एकनाथ शिंदे यांनी आपले शालेय शिक्षण हे किसननगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या क्रमांक २३ या ठिकाणी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि मग ते ठाण्यातील मंगला हायस्कूल मध्ये केले मग त्यांनी त्यांचे ११ वी चे शिक्षण देखील मंगला हायस्कूल मध्ये पूर्ण केले.

त्यांची परिस्थिती हि बेताची असल्यामुळे त्यांनी आपल्या शिक्षणाला त्यांनी ब्रेक दिला आणि ते वयाच्या २० व्या वर्षी राजकारणात म्हणजेच त्यांनी शिवसेनेसाठी काम करण्यास सुरुवात केली होती आणि त्यावेळी ते आनंद दिघे यांच्या नेतृत्वा खाली काम करत होते.

ते राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये पडल्यानंतर त्यांनी अनेक लढाया लढल्या तसेच ते मराठी लोकांच्या हितासाठी लढू लागले तसेच त्यांनी अन्याय विरुध्द देखील आवाज उठवण्यास सुरुवात केली. राजकारणामध्ये काही काळ गेल्यानंतर त्यांनी परत शिक्षणासाठी परत सुरुवात केली आणि त्यांनी त्यांच्या पुढील शिक्षणासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा मध्ये प्रवेश मिळवला आणि त्यांनी आपले बी. ए ( B.A ) चे शिक्षण हे राजकारण आणि मराठी हा विषय घेवून त्यांनी पूर्ण केले आणि त्यांना बी. ए ( B.A ) शेवटच्या वर्षी ७७ टक्के गुण घेऊन ते बी. ए ( B.A ) ह्या पदवी घेण्यासाठी यशस्वी झाले.

गेल्या १० ते १२ दिवसामध्ये एकनाथ शिंदे यांचे नाव आपण किती वेळा ऐकले आहे कारण त्यांनी सन २०२२ म्हणजेच चालू असणाऱ्या काळामध्ये त्यांनी सदरच्या सरकार विरोधात म्हणजे मविआ ( महा विकास आघाडी ) विरोधात बंड पुकारले आणि त्यांना अनेक शिवसेनेचे आमदार शिंदे गटामध्ये समाविष्ट करून घेण्यास यश मिळाले आणि ते भारतीय जनता पार्टी सोबत पुढे गेले आणि ते सध्या म्हणजेच त्यांनी ३० जून २०२२ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि ते महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री झाले.

Eknath Shinde information in marathi
Eknath Shinde information in marathi

एकनाथ शिंदे माहिती मराठी – Eknath Shinde Information in Marathi

पूर्ण नावमा. श्री. एकनाथ संभाजी शिंदे
जन्म९ फेब्रुवारी १९६४
निवासठाणे ( महाराष्ट्र )
शालेय शिक्षणकिसननगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या क्रमांक २३ येथे पूर्ण केले.
कॉलेजयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा
ओळखमहाराष्ट्र राज्याचे ३० वे मुख्य मंत्री आहेत.

जीवन परिचय – Eknath Shinde Biography in Marathi

एकनाथ शिंदे यांचा जन्म हा ९ फेब्रुवारी १९६४ मध्ये झाला आणि त्यांचे मुळगाव हे महाबळेश्वर तालुक्यातील जरी असले तरी तरी त्यांचे बालपण हे ठाणे मधेच गेले त्यामुळे ते कायमस्वरूपी ठाणे जिल्ह्यामध्ये स्थायिक झाले. त्यांनी त्याचे शालेय शिक्षण जे किसननगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या क्रमांक २३ या शाळेमध्ये पूर्ण केले तसेच त्यांनी आपले बी. ए ( B.A ) चे शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मध्ये घेतले तसेच त्यांनी खूप कमी वयामध्ये म्हणजेच वयाच्या विसाव्या वर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या काही जबरदस्त बोलण्याला प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला.

आणि मग त्यांचा खऱ्या अर्थाने राजकीय प्रवेश सुरु झाला त्यावेळी ते अनाद दिघेंच्या नेतृत्वाखाली काम करत होते आणि अश्या प्रकारे ते अनेक संकटे मागे टाकत यशाच्या पायऱ्या चढत पुढे आले आणि ते सध्या महाराष्ट्राचे ३० वे मंत्री म्हणून ओळखले जातात आणि ते सध्या खूप चर्चेत देखील आहेत.

कौटुंबिक माहिती 

जरी एकनाथ शिंदे यांचे मुळगाव हे महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे असले तरी त्यांनी त्यांचे बालपण हे ठाण्यामध्ये घालवले तसेच त्यांचा सध्याचा निवास देखील ठाणे हा आहे. त्यांच्या वडिलांचे नाव संभाजी आहे आणि त्यांच्या पत्नीचे नाव हे लता एकनाथ शिंदे असेल आहे आणि त्यांना एक मुलगा आहे ज्याचे नाव श्रीकांत एकनाथ शिंदे असे आहे आणि त्यांनी जेमतेम परिस्थिती मुले आपल्याला शिक्षण घेता आले नाही म्हणून त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे श्रीकांत एकनाथ शिंदे याला डॉक्टर ( एमएस ( अर्थो ) ) बनवले आणि यांचा मुलगा आढ्या खासदार देखील आहे.

एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास

सुरुवातीच्या काळामध्ये त्यांची परिस्थिती हि जेमतेम असल्यामुळे ते रिक्षा चालवायचे मग ते वयाच्या खूप कमी वयामध्ये म्हणजेच २० व्या वर्षी त्यांनी शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि हा त्यांचा शिवसेना हा त्यांचा राजकीय पक्ष होता. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणामुळे प्रेरित झाले आणि त्यांनी राजकारणामध्ये म्हणजेच शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आणि मग त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला. ज्यावेळी त्यांनी शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश घेतला त्यावेळी ते आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करू लागले आणि त्यांनी आनंद दिघेंच्या सोबत अन्याय विरुध्द तसेच अनेक मराठी लोकांच्या हितासाठी लढण्यास सुरुवात केले.

इ. स १९९७ मध्ये खऱ्या अर्थाने एकनाथ संभाजी शिंदे यांच्या खऱ्या राजकारणाला सुरुवात झाली म्हणजेच त्यांना आनंद दिघेंच्या मुळे त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकी मध्ये नगरसेवकपदासाठी निवडणूक लढण्यासाठी तिकीट मिळाले आणि येथूनच त्याचा खरा प्रवास सुरु झाला. ते इ. स १९९७ महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून चांगल्या मतांनी निवडून आले आणि मग त्यांनी पुढची राजकारणातील वाटचाल चालू ठेवली.

एकनाथ शिंदे हे २००१ ते २००२, २००२ ते २००३ आणि २००३ ते २००४ मध्ये ते महानगर पालिकेच्या सभागृह पदी निवडून आले आणि मग २००४ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विधानसभा निवडणूकसाठी ठाणे मतदार संघातून उमेदवार म्हणून संधी दिली आणि ते त्यावर्षी चांगल्या मताने निवडून आले त्यावेळी त्यांना जिल्हा प्रमुख म्हणून नेमण्यात आले होते. तसेच ते २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये चांगल्या मतांनी निवडून आले.

२०१९ मध्ये महा विकास आघाडीचे सरकार बनल्या नंतर त्यांना कॅबीनेटमध्ये नगरविकास मंत्री बनवण्यात आले होते. गेल्या १० ते १२ दिवसामध्ये एकनाथ शिंदे यांचे नाव आपण किती वेळा ऐकले आहे कारण त्यांनी सन २०२२ म्हणजेच चालू असणाऱ्या काळामध्ये त्यांनी सदरच्या सरकार विरोधात म्हणजे मविआ ( महा विकास आघाडी ) विरोधात बंड पुकारले आणि त्यांना अनेक शिवसेनेचे आमदार शिंदे गटामध्ये समाविष्ट करून घेण्यास यश मिळाले आणि ते भारतीय जनता पार्टी सोबत पुढे गेले आणि ते सध्या म्हणजेच त्यांनी ३० जून २०२२ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि ते महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री झाले.

एकनाथ शिंदे यांची कामगिरी

  • एकनाथ शिंदे यांनी ते आरोग्यमंत्री असताना एमबीबीएस ( MBBS ) डॉक्टरांची ची ८०० हुंड अधिक पडे भरली तसेच ग्रामीण भागामध्ये तसेच अधिवासी भागामध्ये त्यांनी एमबीबीएस ( MBBS ) डॉक्टरांची जी मागणी १० वर्ष प्रलंबित होती ती मागणी एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली.
  • राज्यामध्ये सेवा देणाऱ्या अश्या अनेक सेवकांचे व्यतन वाढ त्यांनी केले.
  • त्यांनी २०१४ मध्ये एमएसआरडी ( MSRD ) साठी देखील काम केले. ज्यावेळी त्यांनी या खात्याचा कार्यभार स्वीकारला होता त्यावेळी एमएसआरडी ( MSRD ) संपुष्टात येण्याच्या मार्गावर होती आणि यावर सहा हजार कोटीचे कर्ज होते त्यावेळी त्यांनी एमएसआरडी ( MSRD ) ला यामधून बाहेर काढण्यासाठी काम सुरु केले म्हणजेच एमएसआरडी ( MSRD ) पुनरुजीवन करण्यास सुरु केले.
  • त्यांनी मुंबई – पुणे मार्गावरील अपघात रोखण्यासाठी देखील काम केले म्हणजेच त्यांनी या मार्गावर सूचना फलक लावले, तसेच डेल्टा फोर्सची मदत घेऊन त्या मार्गावरील पाहणी वाढवली, तसेच या मार्गावर वेगाचे पालन व्हावे म्हणून सीसीटीव्ही बसवला तसेच वेग मोजण्यासाठी अनेक उपाययोजना देखील केल्या.

 आम्ही दिलेल्या Eknath Shinde Information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर एकनाथ शिंदे माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Eknath Shinde biography in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Eknath Shinde in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!