Essay on Mango Tree in Marathi Language – Mango Tree Essay in Marathi माझे आवडते झाड आंबा निबंध आज आपण या लेखामध्ये आंब्याचे झाड (mango tree essay) या विषयावर निबंध लिहिणारा आहोत. मनुष्याला निसर्गाने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक देणग्या दिल्या आहेत आणि त्यामधील एक महत्वाची देणगी म्हणजे झाडे. आपण आपल्या आसपास पहिले तर आपल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडे पाहायला मिळतात आणि झाडे हि अशी नैसर्गिक संपती आहे जी पर्यावरण सुंदर ठेवतेच तसेच भरपूर झाडे असल्यास पर्यावर सुंदर दिसते. पर्यावरणामध्ये आपण अनेक प्रकारची झाडे पाहतो.
त्यामध्ये काही फुलांची काही फळांची काही शोची तर काही औषधी आणि काही इतर कारानंच्यासाठी उपयोगी असणारी झाडे असतात आणि आज आपण आपल्याला सुंदर, गोड आणि खाल्ल्यानंतर मन अगदी तृप्त करणारे फळ देणाऱ्या आंब्याच्या झाडाविषयी माहिती घेणार आहोत. आंब्याचे झाड हे कोणाला माहित नाही हे सर्वांना माहित आहे. कारण हे झाड आंबा हे फळ देते आणि आंबा हे असे फळ आहे, जे बहुतेक सर्वांना आवडते आणि आंब्याला फळांचा राजा म्हणून ओळखले जाते तसेच आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ देखील आहे त्यामुळे या फळाच्या झाडाला विशेष महत्व आहे.
माझे आवडते झाड आंबा निबंध – Essay on Mango Tree in Marathi Language
आंब्याचे झाड निबंध – Mango Tree Essay in Marathi
आपल्या आसपास वाढणाऱ्या झाडांची उंची हि एकदम लहान, मध्यम आकारात किंवा एकदम उंच वाढतात आणि आंब्याचे झाड हे मोठ्या आकारात वाढते म्हणजेच हे झाड उंच वाढते म्हणजेच हे झाड १५ ते १६ मीटर उंच वाढू शकते. आंब्याच्या झाडाची मुळे हि जमिनीमध्ये लांब आणि खोल आतमध्ये पसरतात म्हणजेच या झाडाची मुळे हि खूप घट्ट असतात तसेच या झाडाचे खोड देखील खूप जाड असते आणि ते रुंदीला देखील असते आणि उंच देखील असते.
तसेच आमच्या झाडाला अनेक फांद्या फुटलेल्या असतात आणि या फांद्यांना हिरव्या ( कोवळी असताना ती पाने केशरी – गुलाबी रंगाची असतात ) रंगाची लांबट पाने असतात. आंब्याच्या झाडाला मुख्यता वसंत ऋतूमध्ये बहार यायला सुरुवात होते आणि या झाडाला मोठ्या प्रमाणात बहार येतो आणि त्याला पांढऱ्या रंगाची फुले लागतात ( आंब्याच्या झाडाला बहार येण्याच्या प्रक्रियेला ग्रामीण भागामध्ये मोहर देखील म्हणतात ) आणि मग या फुलातून फळे निर्माण होतात आणि मग ती हळू हळू मोठी होतात.
आपण या फळाला आंबा असे म्हणतो, आंबा हे फळ अंडाकृती असून हे फळ हिरव्या, पिवळ्या आणि नारंगी रंगामध्ये असते आणि यामधील जो गाभा असतो तो पिवळ्या किवा नारंगी रंगाचा असतो आणि हा गाभा खूप गोड आणि रसाळ असतो. आंबा ह्या फळाचे रंग त्यांच्या जातीवर अवलंबून असतात. आंबा या फळाची लांबी ५ ते २० सेंटी मीटर असू शकते आणि एका आंब्याचे वजन १३५ ते १४० ग्रॅम असू शकते. आंब्याला एक मोठे बी असते ज्याला आंब्यातील कुई ( mango stone ) म्हणतात आणि हि आंब्याची कुई अखाद्य असते.
आंब्याची झाडे हि आपल्याला कोकण भागांमध्ये म्हणजेच समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात कारण आंब्याच्या झाडाचे फळ ( आंबा ) हे परिपक्व होण्यासाठी उष्ण हवामानाची गरज असते. उष्ण हवामानामध्ये अमाब्याचे झाड जगवले जावू शकते आणि त्यापासून पिक घेतले जावू शकते. आपल्या भारत देशामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि देवगड मध्ये पिकणारे आंबे खूप लोकप्रिय आहेत म्हणजे तेथील आंबे आपल्या देशामध्ये खूप लोकप्रिय आहेत आणि या प्रकारचे आंबे देशामध्ये तर पुरवले जातातच परंतु रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस हा आंबा देशाच्या बाहेर देखील निर्यात केला जातो.
जरी रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस आंबा जर देशभर प्रसिध्द असला तरी भारतामध्ये आंब्याच्या इतर जाती देखील आहेत जसे कि पायरी, तोतापुरी, सिंधू, रत्ना, केशर यासारखे आंब्याचे अनेक प्रकार आहेत. भरपूर आंब्याची झाडे असणाऱ्या शेताला ‘आमराई’ या नावाने ओळखले जाते आणि या आंब्याच्या झाडांच्या पासून मिळणारे मुख्य पिक म्हणजे आंबे आहेत कारण आंबा या फळाला बाजारामध्ये खूप मागणी आहे आणि हे बाजारामध्ये उच्च दराला विकले जातात आणि त्यामुळे आमराई असणाऱ्या व्यक्तीचा चांगला फायदा होतो म्हणजेच त्याच्या आर्थिक उत्पन्नात भर पडते.
तसेच अमाब्याचा झाडाचा उपयोग अनेक वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो जसे कि आंब्याची पाने हि अनेक धार्मिक कार्यक्रमांच्यासाठी वापरली जातात तसेच आंब्याची पाने फुलांच्या हारामध्ये तसेच शुभ क्षणी आंब्याच्या पानाचे तोरण घराच्या मुख्य चौकटीला लावले जाते. तसेच आंब्याच्या लाकडाचा उपयोग हा अनेक प्रकारे केला जातो तसेच त्यापासून अनेक वस्तू बनवल्या जातात अश्या प्रकारे आंब्याच्या झाडाचा उपयोग हा वेगवेगळ्या कारणांच्यासाठी केला जातो.
आंबा हे आपल्या आरोग्यासाठी देखील खूप चांगला आहे तसेच हे फळ खूप लोकांचे आवडते फळ असल्यामुळे या फळाला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि म्हणूनच कोकणातील शेतकरी आमराई मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची म्हणजेच वेगवेगळ्या जातीची झाडे लावून आंबा ह्या फळाचे पिक घेतात. आंबा या फळामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चे समृद्ध स्त्रोत आहेत, जे आपल्या डोळ्यांसाठी आणि आरोग्यासाठी चांगले आहेत. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ई, जस्त, लोह आणि कॅल्शियम देखील भरपूर असते त्यामुळे आंब्याच्या झाडाचे हे फळ खूप उपयुक्त असते.
आंबा या झाडाच्या जवळ जवळ १२०० ते १३०० जाती आहेत आणि त्यामधील २० ते २५ जाती ह्या व्यापारिक दृष्ट्या महत्वाच्या आहेत म्हणजेचे यामधील २० ते २५ जातींच्या झाडांचे पिक हे विक्रीसाठी घेतली जाते. आंबा या झाडाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी आपल्याला ३ वर्ष वाट बघावी लागते.
म्हणजे आपण एकदा आंब्याचे रोप लावले कि त्याला पुरेसे पाणी, खत, सेंद्रिय खत तसेच त्यावर किडे होऊ नये म्हणून औषध मारणे हे आपल्याला ३ वर्ष करावे लागते आणि हे झाड ३ वर्षांनी चांगले वाढते आणि झाडाला ३ वर्षांनी फळे लागायला सुरुवात होते आणि आंबा या फळाची तोडणी हि एप्रिल महिन्याच्या सुरुवाती असून केली जाते आणि हि जून महिन्याच्या अखेरपर्यंत केली जाते. अश्या प्रकारे आंब्याचे झाड हे आपल्यासाठी उपयुक्त असते.
आम्ही दिलेल्या essay on mango tree in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माझे आवडते झाड आंबा निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mango tree essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि my favourite tree mango essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये essay on mango tree autobiography in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट