रत्नागिरी जिल्ह्याची माहिती Ratnagiri District Information in Marathi

Ratnagiri District Information in Marathi रत्नागिरी जिल्ह्याची माहिती कोकण भागातील एक सुंदर आणि आकर्षित समुद्र किनारा लाभलेला एक मोठा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा. आज या लेखामध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत. रत्नागिरी हा जिल्हा एकूण नऊ तालुक्यांनी बनलेला असून रत्नागिरी या शहरामध्ये या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आपण आपले विश्रांतीचे दिवस घालवू शकतो कारण या जिल्ह्याला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. जे आपले मन अगदी प्रसन्न करून टाकते. या जिल्ह्याबद्दल विशेष सांगायचे म्हंटले तर ह्या जिल्ह्याला सुंदर अरबी समुद्र किनारा लाभलेला आहे.

तसेच या जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वत रंग आहेत आणि ह्या जिल्ह्यामध्ये बाळ गंगाधर ठीळक यांचा जन्म झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा रायगड, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसोबत आहेत, आणि हा एक किनारपट्टीचा जिल्हा आहे. ज्याची सीमा अरबी समुद्राशी जोडलेली आहे.

ratnagiri district information in marathi
ratnagiri district information in marathi

रत्नागिरी जिल्ह्याची माहिती – Ratnagiri District Information in Marathi

जिल्हारत्नागिरी
भागकोकण
क्षेत्रफळ८२४९ चौरस किलो मीटर
लोकसंख्या१६,९६,७७७
जिल्ह्याचे वर्णनरत्नागिरी हा जिल्हा महाराष्ट्राच्या नैरुत्या भागामध्ये अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेला एक जिल्हा आहे आणि या जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वत रांगा आहेत. या जिल्ह्यामध्ये १५१५ गावे आणि ८१०२ वस्त्या आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ८५ टक्के पेक्षा जास्त भूभाग डोंगराळ आहे.

रत्नागिरी जिल्हा विशेष माहिती

कोकण भागातील सर्वात मोठा आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी हा जिल्हा महाराष्ट्राच्या नैरुत्या भागामध्ये अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेला एक जिल्हा आहे, आणि या जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वत रांगा आहेत. रत्नागिरी हा जिल्हा एकूण नऊ तालुक्यांनी बनलेला असून रत्नागिरी या शहरामध्ये या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

दापोली आणि चिपळूण हे शहरे या जिल्ह्याची उपविभाग आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा रायगड, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांशी जोडलेल्या आहेत आणि या जिल्ह्यामध्ये वसिष्ठी, रत्नागिरी, शास्त्री, जैतापूर आणि वाघोठण या वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत आणि जिल्ह्यातील सर्व नद्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये उगम पावून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत अरबी समुद्रात विलीन होतात.

रत्नागिरी या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८२४९ चौरस किलो मीटर आहे आणि या जिल्ह्याची लोकसंख्या १६,९६,७७७ इतकी आहे. या जिल्ह्याची उत्तर दक्षिण लांबी २२५ किलो मीटर आहे आणि पूर्व पश्चिम लांबी ६४ किलो मीटर आहे. या जिल्ह्यामध्ये १५१५ गावे आणि ८१०२ वस्त्या आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ८५ टक्के पेक्षा जास्त भूभाग डोंगराळ आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका लिस्ट

ratnagiri district taluka list रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये एकूण ९ तालुके येतात ते म्हणजे दापोली, खेड, चिपळूण, मंडणगड, संगमेश्वर, गुहागर, लांजा, राजापूर आणि रत्नागिरी.

इतिहास 

रत्नागिरी हा जिल्हा समुद्र किनारपट्टीवर असल्यामुळे या ठिकाणी समुद्र किनारपट्टीवर व्यापारी बंदरे होती आणि तेथून राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय व्यापार होत असल्यामुळे या भागामध्ये वेगवेगळ्या देशाचे व्यापारी या ठिकाणी व्यापार करण्यासाठी येत होते आणि त्यामुळे या भागावर अनेक विदेशी लोकांनी राज्य केले आहे.

जसे कि ब्रिटीश, पोर्तुगीज. पण या सर्व विदेशी राजवटीपासून समुद्र किनारपट्टीवरील लोकांना दूर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक किल्ला बांधला होता आणि तेथून समुद्र किनारपट्टीवरील हालचाली पाहिल्या जायच्या. इ.स १८१८ मध्ये हा ब्रिटीशांच्या कडे गेला होता पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यावरील ब्रिटीशांचे राज्य गेले तसेच रत्नागिरी ही एके काळी विजापूर राज्यकर्त्यांची प्रशासकीय राजधानी होती.

१३ व्या वर्षी तीर्थयात्रा करून पांडव रत्नागिरी जिल्ह्याच्या लगतच्या प्रदेशात स्थायिक झाले होते आणि कुरुक्षेत्र येथे पांडव आणि कौरवांचे प्रसिद्ध युद्ध झाले होते, तेव्हा या प्रदेशाचा राजा वीरवत रे सोबत आला होता असे देखील म्हंटले जाते.

रत्नागिरी जिल्ह्याची ऐतिहासिक ओळख 

रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये साने गुरुजी, लोकमान्य बाळ गंगाधर ठीळक आणि केशव सुत या सारख्या महान पुरुषांचा जन्म या जिल्ह्यामध्ये झाला. या जिल्ह्यातील थिबा राजवाड्याला एक ऐतिहासिक महत्व आहे कारण एके काळी या ठिकाणी मनमारचा माननीय राजाचे निवास्थान होते.

रत्नागिरी पाहाण्यासारखी ठिकाणे

कोकण भागातील सर्वात मोठा आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी हा जिल्हा महाराष्ट्राच्या नैऋत्य भागामध्ये अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेला एक जिल्हा आहे आणि या जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वत रांगा आहेत.

त्यामुळे रत्नागिरी हा जिल्हा पर्यटकांच्यासाठी एक उत्तम जिल्हा आहे. रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आपल्याला गणपतीपुळे, चिपळूण, खेड, दाभोळ, वडे पडेल लेणी, संगमेश्वर, पावस, गौहणी वेलगाव आणि परशुराम मंदिर हि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख आकर्षणे आहेत.

गणपतीपुळे 

रत्नागिरी पासून २० ते २५ किलो मीटर अंतरावर आहे आणि त्या ठिकाणी समुद्र किणाऱ्यावर गणपतीचे मंदिर आहे. गणपती पुळे हे ठिकाण पर्यटकांच्यासाठी उत्तम ठिकाण आहे कारण या ठिकाणी पर्यटकांना गणपतीचे दर्शन घेता येते तसेच समुद्राचा आणि समुद्र किनाऱ्यावरील दृश्यांचा आनंद घेता येतो.

गणपतीपुळ्याचे पाणी स्फटिकासारखे स्वच्छ आणि प्राचीन आहे आणि समुद्रकिनाऱ्याचा संपूर्ण भाग ताज्या हिरवाईने व्यापलेला आहे. अरुंद रस्ते, लाल माती, छप्पर असलेली घरे, स्वच्छ अंगण, असंख्य फळझाडे हे सर्व पाहून मन अगदी मोहक होते. गणपतीपुळे हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा समुद्रकिनारा मानला जातो आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतो ही या सुंदर समुद्रकिनाऱ्याची वैशिष्ट्ये आहेत.

जयगड दीपगृह 

रत्नागिरीतील भेट देण्याच्या ठिकाणांचा विचार करत असाल तर जयगड दीपगृह हे सर्वोच्च प्राधान्य देण्यासारखे ठिकाण आहे आणि ते जयगड किल्ल्याच्या पश्चिमेकडील बुरुजांपैकी एक आहे.

जयगड किल्ला 

जयगड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड या गावामध्ये आहे आणि गणपतीपुळे (जयगड पासून हा किल्ला १० ते १५ किलो मीटर अंतरावर आहे) या प्रसिध्द देवस्थानापासून खूप जवळ आहे. हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजून जमीन आहे. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटी पासून ५५ मीटर इतकी आहे आणि हा किल्ला १२ एकर मध्ये विस्तारलेला आहे.

पांद्रे समुद्र 

पांद्रे समुद्र हा महाराष्ट्रातील एक समुद्रकिनारा आहे, जो रत्नागिरी शहरातील सर्व समुद्रकिनाऱ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय आहे. हे चंदेरी वाळू, शांत पाणी तसेच समुद्राच्या शंखांसाठी आणि एकूणच पर्यटकांसाठी आरामदायी वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.

रत्नागिरी किल्ला 

रत्नागिरी किल्ला किंवा भगवती किल्ला म्हणून ओळखला जाणारा रत्नागिरी किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. तिन्ही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेले असल्याने, सर्व बाजूंनी तटबंदी आणि बुरुजांच्या रूपात भक्कम सीमा असलेला किल्ला आहे.

गणपतीपुळे बीच 

स्वच्छतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील मोजक्याच पर्यटन स्थळांपैकी गणपतीपुळे बीच हे एक आहे आणि हा सुंदर समुद्र किनारा त्यामध्ये असलेल्या सरोवरांसाठी देखील ओळखला जातो.

जय विनायक मंदिर 

विनायक मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक नवीन बांधलेले मंदिर आहे. मंदिर स्वच्छ आणि सुंदर सजवलेल्या बागेसाठी आणि पर्यटकांसाठी ताजी हवा आणि थंड वातावरणासाठी ओळखले जाते.

रत्नागिरी जिल्हा कशासाठी प्रसिध्द आहे ? 

रत्नागिरी हा जिल्हा महाराष्ट्राच्या नैरुत्या भागामध्ये अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेला एक जिल्हा आहे आणि या जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वत रांगा आहेत त्यामुळे या जिल्ह्याला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. त्यामुळे हा जिल्हा पर्यटन स्थळांच्यासाठी प्रसिध्द आहेच, पण ह्या जिल्ह्यातील आंबे देखील भारतामध्ये तसेच बाहेरील देशामध्ये देखील प्रसिध्द आहेत.

आंब्याच्या सीजन मध्ये येथील ‘रत्नागिरी हापूस आंबा’ बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विकला जातो आणि या आंब्याला भारताच्या बाहेर देखील खूप मागणी असते.  

रत्नागिरी जिल्ह्याविषयी काही मनोरंजक तथ्ये – facts about ratnagiri district 

  • या जिल्ह्यामध्ये गणेश चतुर्थी आणि होळी हे सण मोठ्या आनंदाने साजरे केले जातात.
  • जिल्ह्यातील विविध भागात गरम पाण्याचे झरे आढळतात आणि या झऱ्यांचे तापमान ३३.५ °से ते ६१°से. दरम्यान असते.
  • या जिल्ह्याची उत्तर दक्षिण लांबी २२५ किलो मीटर आहे आणि पूर्व पश्चिम लांबी ६४ किलो मीटर आहे.
  • गरम पाण्याचे झरे संगमेश्वर, राजवाडी, आरवली आणि उन्हावरे या ठिकाणी आहेत.
  • रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा रायगड, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसोबत आहेत.
  • रत्नागिरी हा जिल्हा हापूस आंब्यांच्यासाठी खूप प्रसिध्द आहे आणि या ठिकाणी आंब्याचे सीजनल पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

कसे जायचे 

रेल्वेमार्गे 

जर तुम्हाला रत्नागिरी मध्ये जायचे असल्यास तुम्हाला कोणत्याही मुख्य शहरातून जेथे रत्नागिरीला येणारी रेल्वे आहे तेथून रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरावे लागते आणि तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामधील ठिकाणे पाहण्यासाठी टॅक्सी पकडावी लागेल.

रस्तामार्गे 

आपण खाजगी कारणे गेलो तर ते खूप सोयीस्कर होईल कारण आपण रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक बीच, किल्ले आणि इतर पर्यटन स्थळे पाहू शकतो.

आम्ही दिलेल्या ratnagiri district information in marathi pdf माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रत्नागिरी जिल्ह्याची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ratnagiri district court information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of ratnagiri district in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ratnagiri district all information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!