सचिन तेंडुलकर निबंध मराठी Essay on Sachin Tendulkar in Marathi

Essay on Sachin Tendulkar in Marathi Language सचिन तेंडुलकर निबंध मराठी क्रिकेट आपल्या भारताचा अतिशय लोकप्रिय खेळ आहे. भारतातील प्रत्येक कोपऱ्यांमध्ये रस्त्यांवर गल्ल्यांमध्ये क्रिकेट हा खेळ अतिशय आवडीने खेळला जातो. भारतामध्ये क्रीडाक्षेत्रात क्रिकेट खेळाचे फार महत्त्व आहे. क्रिकेट खेळणे आपल्या भारताला अनेक उत्कृष्ट खेळाडू दिले आहेत ज्यांनी क्रिकेट क्षेत्रांमध्ये आपल्या भारताचे नाव यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवले आहे. त्यातीलच एक लोकप्रिय नाव म्हणजे सचिन तेंडुलकर. क्रिकेट हा खेळ सर्वांनाच आवडतो आणि सचिन तेंडुलकर देखील. सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये फार मोठी कारकीर्द रचली आहे.

क्रिकेट क्षेत्रातील सचिन तेंडुलकर यांचे स्थान न बदलता येणारे आहे. उत्कृष्ट फलंदाजी खेळाविषयी असणारी जिद्द दूरदृष्टी या घटकांच्या जोरावर सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट क्षेत्रांमध्ये भरभरून नाव कमावलं आणि एक दिग्गज खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकर यांची ख्याती भारताबाहेर देखील पसरली. सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेट खेळामध्ये असणारे कौशल्य असामान्य आहेत. म्हणूनच सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव असे देखील संबोधले जाते.

असे क्रिकेटचे देव संबोधले जाणारे सचिन तेंडुलकर हे भारताचे माजी क्रिकेट खेळाडू आहेत सचिन नि त्यांच्या खेळाच्या स्टाईल नेम भारतातील प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनावर राज्य केलं आहे क्रिकेट विश्वामध्ये सचिन तेंडुलकर यांचे अनेक चाहते आहेत. सचिन तेंडुलकर यांचा क्रिकेट विश्वामध्ये इतका धबधबा आहे की ज्यांना क्रिकेट आवडत नाही त्यांना देखील सचिन तेंडुलकर यांचा अभिमान आहे इतकी मोठी कीर्ती सचिन तेंडुलकर यांनी केली आहे.

essay on sachin tendulkar in marathi
essay on sachin tendulkar in marathi

सचिन तेंडुलकर निबंध मराठी – Essay on Sachin Tendulkar in Marathi

Sachin Tendulkar Essay in Marathi

प्रत्येक भारतीयाला सचिन तेंडुलकर यांचा अभिमान वाटतो आणि फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर देखील सचिन तेंडुलकर यांचे अनेक चाहते आहेत व बरीच लोक आहेत जे सचिन तेंडुलकर यांना आपलं आदर्श मानतात. क्रिकेट विश्वामध्ये सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचं देव संबोधलं जाण्या मागचं कारण म्हणजे त्यांचा खेळण्याचा अंदाज व क्रिकेट विश्वातील सर्वात जास्त धावा केलेल्या चा विक्रम आहे. सचिन तेंडुलकर यांची फलंदाजी म्हणजे एक अद्भुत शक्ती आहे.

जागतिक स्तरावर सचिन तेंडुलकर हे डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर चे दुसरे उत्कृष्ट खेळाडू आहेत. सचिन तेंडुलकर यांची मास्टर-ब्लास्टर सचिन अशी देखील ओळख आहे. मुंबईतील एका साध्या मराठी कुटुंबांमध्ये सचिन तेंडुलकर यांचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला. सचिन तेंडुलकर यांचे वडील एक कादंबरीकार आणि लेखक होते. तर आई विमा एजंट होत्या. सचिन तेंडुलकर यांचे प्राथमिक शिक्षण शारदाश्रम विद्यामंदिर या शाळेतून पार पडलं.

सचिन तेंडुलकर यांना लहानपणी टेनिस खेळायची आवाड होती. अमेरिकेचे प्रसिद्ध टेनिस खेळाडू जॉन मॅकनराॅ ‌ हे सचिनचे आदर्श होते. पुढे जाऊन सचिन तेंडुलकर यांच मन क्रिकेट या खेळाकडे वळले त्यांचे मोठे भाऊ अजित यांनी लहानपणी सचिन यांना क्रिकेट संदर्भात बऱ्याच गोष्टींमध्ये मार्गदर्शन केलं. पुढे जाऊन सचिन तेंडुलकर यांनी डॉक्टर अंजली यांच्याशी विवाह केला आज या दाम्पत्यांना अर्जुन आणि सारा अशी दोन अपत्य आहे. सचिन तेंडूलकर हे क्रिकेट विश्वातील नावाजलेले व नामांकित खेळाडू आहेत.

सध्या जरी ते निवृत्त झाले असले तरी क्रिकेट खेळातील त्यांची कारकीर्द फार मोठी आहे. लहानपणापासून सचिन तेंडुलकर यांना क्रिकेट खेळायची फार आवड होती. सुरवातीला ते आपल्या भावासोबत क्रिकेट खेळायचे. आपल्या भावाचे क्रिकेट खेळातील असलेले कलागुण अजित तेंडुलकर यांनी ओळखले होते. त्यांचे हे कौशल्य गांभीर्याने घेऊन त्यांनी सचिन तेंडुलकर यांना क्रिकेट मध्ये आपलं करिअर घडविण्यासाठी कल्पना दिली आणि सचिन तेंडुलकर यांची ओळख प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याशी करून दिली.

ह्यांच्या मार्गर्शनाखाली त्यांनी क्रिकेट चा श्रीगणेशा केला. शाळेतल्या मित्रपरिवार सोबत हॅरिस शिल्ड सामन्यात विनोद कांबळी ह्यांच्या भागीदारीने ६६४ धावांची खेळी रचली होती. १४ वर्षाचा सचिनची अशी अव्वल कामगिरी बघून त्याच्या घरच्यांसाठी व त्याच्या प्रशिक्षकासाठी हे खूप कौतुकास्पद बाब होती.

१९८८ मध्ये सचिन ने आपला पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला ज्यामदे तो १०० धावांवर नॉट आउट राहीला. त्या वेळी तो मुंबई संघासाठी आणि गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. सचिन ने लहान वयातच खूप मोठं यश गाठायला सुरुवात केली होती. असा विक्रम करणारा तो सर्वात तरुण खेळाडू होता. बघता बघता सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पाऊल ठेवण्यास सुरुवात केली. १९८९ साली पाकिस्तानातील कराची येथे सचिन तेंडुलकरने यांनी आपल्या आयुष्यातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सुरुवातीला त्यांना यश मिळू शकल‌ं नाही परंतु फैसलाबाद येथे झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकर यांनी पहिले अर्धशतक झळकावून आपल्या क्रिकेट करिअरची वाटचाल सुरू केली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये देखील सचिनची सुरुवात तशी फार चांगली झाली नाही, परंतु निराश न होता संयमाने सचिन कठोर परिश्रम सराव करून सचिनने इसवी सन १९९० साली झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर सचिन तेंडुलकर यांनी आपलं पहिलं कसोटी शतक पूर्ण केले.

अवघ्या अकरा वर्षापासून सचिन तेंडुलकर क्रिकेटचे धडे गिरवत होते आणि त्वरित त्यांचे क्रिकेट संबंधित असलेले कौशल्य बाहेर येऊ लागले होते. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केल्यानंतर जरी त्यांना हवी तशी खेळी करता आली नसली तरी, इसवी सन १९९१ -११९२ मध्ये सचिन तेंडुलकर यांची क्रिकेट क्षेत्रातील खरी वाटचाल सुरू झाली. ऑस्ट्रेलियन दौऱ्यामध्ये पर्थम येथील वेगवान आणि उसळत्या मैदानावर अतिशय अविस्मरणीय शतकी खेळी रचली.

सचिन तेंडुलकर यांना आज पर्यंत कसोटी सामन्यांमध्ये तब्बल अकरा वेळा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. ९ सप्टेंबर १९९४ साली सचिन ने एकदिवसीय आतरराष्ट्रीय सामन्यातील पाहिलं शतक नोंदवल. सचिन तेंडुलकर यांचं क्रिकेट मध्ये असलेले कौशल्य इतके अप्रतिम आहते की ते एकमेव क्रिकेट विश्वातील खेळाडू आहेत ज्यांनी रणजी चषक, दुलीप चषक आणि इराणी चषक मधील पहिल्याच सामन्यात शतक नोंदवला आहे. सचिनने १९९७ साली हजार कसोटी धावा केल्याचा विक्रम नोंदवला.

याच वर्षी सचिनला विस्डेन तर्फे सर्वोत्तम वार्षिक क्रिकेटपटू म्हणून घोषित केलं. सचिन तेंडुलकर यांनी हजार धावा करण्याचा विक्रम तब्बल सहा वेळा नोंदवला आहे. १९९८ मध्ये सचिन तेंडुलकर यांनी १८९४ एक दिवसीय धावा नोंदवल्या आहेत. सचिन तेंडुलकर यांचा कसोटीमध्ये ४९ शतके आणि वन-डेमध्ये एकावन्न शतकांचा विक्रम आजपर्यंत कोणताही खेळाडू मोडू शकला नाही आहे.‌

सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेट कौशल्य विषयी सांगायचं झालं तर ते देवाकडून मिळालेलं वरदानच आहे. अवघ्या १६ व्या वर्षी सचिनने कसोटी सामन्या मध्ये पदार्पण केलं होतं. सचिनने आतापर्यंत २०० कसोटी सामने खेळले आहेत आणि या सामन्यांमध्ये त्याने १५९२१ धावा केल्या आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी ५३.७९ इतकी आहे.

कसोटी सामन्यांमध्ये ५१ शतके आणि ६८ अर्धशतके झळकावली आहेत. सचिन ४६३ एक दिवसीय सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता. एकदिवसीय सामन्यांमध्ये १८४२६ धावा केल्या आहेत. ४९ शतके आणि ९६ अर्धशतके नोंदवली आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकर यांची फलंदाजीची सरासरी ४४.८३ इतकी आहे. फ्रॅंचाईजी क्रिकेटमध्ये ३०७ सामन्यांमध्ये २५२२८ धावा आणि ८१ शतक आणि ११४ अर्धशतक केली आहेत. लोकल क्रिकेट मध्ये ५५१ सामन्यात २१९९९ धावा केल्या आहेत.

तर साठ शतक आणि ११४ अर्धशतक केली आहेत. आज सचिन तेंडुलकर जरी निवृत्त झाले असले तरी त्यांच्यासारखा रत्न भारताला पुन्हा मिळणे नाही. सचिन तेंडुलकर ज्या वेळी मैदानात उतरायचे त्यावेळी संपूर्ण चोहीकडून त्यांच्या नावाचा जय घोष ऐकू यायचा. आज ते ज्या स्तरावर उभे आहेत त्याचं सर्व श्रेय त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासून घेतलेल्या परिश्रमांना जातं. सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वातील बऱ्याच खेळाडूंचे प्रेरणास्थान आहेत आदर्श आहेत.

बऱ्याच युवा तरुणांना त्यांच्या कडून बळ, साहस आणि प्रेरणा मिळते. सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट विश्वामध्ये अतिशय अविस्मरणीय कामगिरी करून ठेवली आहे. सचिन तेंडुलकर यांनी २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात ३०००० धावांचा टप्पा पार केला आहे. सचिन तेंडुलकर यांना सर्वोच्च नागरी भारतरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेल पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, पद्मविभूषण असे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

आम्ही दिलेल्या essay on sachin tendulkar in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सचिन तेंडुलकर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या short essay on sachin tendulkar in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि 100 words essay on sachin tendulkar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये types of yoga information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!