केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय Hair Growth Tips in Marathi

fast hair growth tips in marathi – kes dat honyasathi gharguti upay केस वाढण्यासाठी टिप्स, केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये केस लवकर कसे वाढवायचे या बद्दल माहिती घेणार आहोत. जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हि आपल्या सौंदर्याकडे खूप लक्ष देत असते आणि सध्या तर प्रदूषणामुळे आणि दुषित हवामानामुळे आपल्या चेहऱ्याकडे, केसांच्याकडे तसेच आपल्या त्वचेकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे आणि म्हणून आपण रोजच्या रोज आपल्या सौंदर्याची काळजी घेतली पाहिजे आणि केस हे देखील आपल्या सौंदर्याचाच भाग आहे.

काही लोक हे आपल्या एकूणच सौंदर्याबद्दल खूप चिंतित असतात आणि त्यांना सर्वांच्यापेक्षा वेगळे आणि चांगले दिसायचे असते आणि म्हणून ते आपले सौंदर्य खुलून दिसण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि केस हा देखील सौंदर्याचा भाग आहे. विशेषता स्त्रीयांच्यामध्ये केस जितके लांब, दाट आणि काळेभोर असतील तितके तिचे सौंदर्य खुलून दिसते. त्यामुळे त्या आपल्या केसांच्या विषयी खूपच काळजी घेतात. स्त्रियांच्या मध्ये वाढलेले काळभोर आणि लांबलचक केस हे खूप छान दिसतात आणि त्याच्या या लांब केसामुळे त्यांचे सौंदर्य आणखीनच उटून दिसते.

तसेच स्त्रियांचे केस लांब असतील त्यांच्या केसांच्या वेगवेगळ्या हेअर स्टाईल देखील करता येतात. परंतु सध्या कामाच्या दगदगीमुळे केसांच्या कडे लक्ष न दिल्यामुळे किंवा अनेक आरोग्य समस्यांमुळे केस वाढत नाहीत किंवा ते सतत तुटतात अश्या स्त्रिया आपल्या केसांच्या विषयी चिंतिती असतात परंतु असे काही घरगुती टिप्स असतात ज्यामुळे आपले केस लांबलचक वाढू शकतात किंवा किंवा काळेभोर आणि घनदाट होऊ शकतात. चला तर आता आपण केस वाढवण्याच्या काही टिप्स पाहूया.

hair growth tips in marathi
hair growth tips in marathi

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय – Fast Hair Growth Tips in Marathi

Hair Care Tips in Marathi

केस वाढवण्याच्या टिप्स – kes dat honyasathi gharguti upay

केस हे आपले सौंदर्य आहे आणि आपण ह्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे आणि आपण केस वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय करून केस वाढवू शकतो म्हणून खाली आपण केस वाढवण्याच्या काही टिप्स (Tips for fast hair growth) पाहणार आहोत. चला तर आता आपण केस वाढवण्याच्या टिप्स काय काय आहेत ते पाहूया. 

kes galti var upay

  • लांबलचक केस हे आपले सौंदर्य वाढवू शकतात आणि त्यासाठी आपण जर केसांना आठवड्यातून एकदा कडूलिंबाच्या पाल्याचा रस लावला तर आपले केस वाढू शकतात. परंतु कडूलिंबाच्या पाल्याचा रस काढून तो १५ ते २० मिनिटे केसांना मसाज करा आणि आणि तो रस तसाच केसांना लाऊन २० ते २५ मिनिटे तसाच ठेवा आणि मग ते स्वच्छ पाण्याने तुम्हाला सुट होणाऱ्या शाम्पूने केस धुवा. असे केल्याने आपले केस झटपट वाढण्यास मदत होते.
  • सध्या कांद्याच्या तेलाचा वापर हा खूप होत आहे आणि सध्या बाजारामध्ये देखील कांद्याचे तेल उपलब्ध आहे पण आपण कांद्याचे तेल घरामध्ये देखील बनवू शकतो आणि कांद्याचे तेल केसांना आठवड्यातून दोन वेळा लावल्यामुळे केस दाट आणि लांबलचक होण्यासाठी मदत होते.
  • कांद्याचे तेल घरी बनवताना प्रथम कांद्याचा रस काढून घ्या आणि मग तो रस चांगला गाळून घ्या आणि मग एक वाटी तुमचे केसांना लावायचे तेल घ्या आणि त्यामध्ये अर्धीवाटी कांद्याचा रस घाला आणि ते तेल उकळा आणि ते गार झाल्यानंतर ते गाळून ते एका डब्यामध्ये भरून ठेवा आणि ते आठवड्यातून दोन वेळा लावा. त्यामुळे तुमचे केस वाढण्यास मदत होईल.
  • केस सतत धुतल्यामुळे तुमचे केस सतत तुटतात आणि तुमच्या केसांची वाढ खुंटते आणि त्यामुळे तुमचे केस वाढत नाहीत. म्हणून तुम्ही सतत केस धुणे टाळा आणि केसावर खूप गरम पाणी देखील ओतून घेवू नका त्यामुळे देखील केस वाढू शकत नाहीत
  • पूर्वीच्या काळापासून शिकेकाई देखील केसांच्या सौंदर्यासाठी वापरली जाते आणि शिकेकाई मध्ये देखील असे आयुर्वेदिक गुणधर्म असतात जे केस वाढवण्यासाठी मदत करते. ज्या वेळी आपण केस धुणार असतो त्यावेळी जर शिकेकाई पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे उकळून ते पाणी गाळून ते थंड करू त्याने आपले केस धुतले तर आपले केस हे झपाट्याने वाढतात आणि दाट आणि काळेभोर देखील होतात.
  • जर तुम्हाला तुमचे केस लांबलचक आणि काळेभोर बनवायचे असेल तर त्यावर जास्वंदीचे तेल हे देखील एक रामबाण उपाय आहे आणि हे जास्वंदीचे तेल आपण घरच्या घरी अगदी सहजपणे बनवू शकतो. जास्वंदीचे तेल बनवताना ५ ते ६ जास्वंदीची फुले घ्या आता एका खोल भांड्यामध्ये १ मोठी वाटी तेल घाला आणि त्यामध्ये फुले कुस्करून घाला आणि ते मिश्रण चांगले १० मिनिटे उकळून घ्या आणि उकळ्यानंतर गॅस बंद करा आणि ते थंड होऊ द्या. तेल थंड झाले कि ते एका बाटलीमध्ये काढा आणि ते तेल आठवड्यातून एकदा केसांना लावा.
  • जर आपल्याला कोणत्या गोष्टीचे टेन्शन किंवा डोक्याला सततचा ताण असेल तरी देखील आपले केस वाढत नाहीत किंवा आपल्या केसांची वाढ खुंटते म्हणून तुम्ही तुमच्या डोक्याचा ताणताणाव कमी करा.
  • केस वाढण्यासाठी आणि दाट होण्यासाठी योगासन आणि व्यायाम करणे देखील फायद्याचे ठरते आणि हकेसांची वाढ खुंटणे आणि केस गळतीवर उपाय म्हणून शीर्षासन हा व्यायाम खूप उपयोगाचा आहे कारण हा व्यायामामुळे आपल्या केसांना रक्तपुरवठा होतो आणि केसांची वाढ खुंटणे आणि केस गळती या समस्या दूर होतात.
  • तुम्ही तुमच्या केसांना सूट होणारा शाम्पू लावा त्यामुळे तुमचे केस वाढतील.
  • कोरफड मध्ये देखील अनेक चांगले गुणधर्म असतात आणि हे केसांच्यासाठी देखील उपयुक्त ठरते. केसांच्या वाढीसाठी कोरफड हे खूप वापरले जाते. कोरफडचा गर केसांना लावून ते १५ ते २० मिनिटे तसे ठेवून ते पाण्याने स्वच्छ धुतले तर केस वाढतात आणि केस दाट देखील होतात.
  • आवळा व शिकेकाई हे दोन्ही एका भांड्यामध्ये पाण्यात भिजत घाला आणि हे मिश्रण दोन दिवसांनी त्यामधील बिया काढा आणि हे मिश्रण मिक्सरवर वाटून घ्या आणि मग त्यामध्ये दही आणि मेहंदी मिक्स करा आणि ते मिश्रण केसांना लावा यामुळे केस लांबलचक होतील तसेच केस दाट आणि मऊ देखील होतील.
  • आपण केसांची निगा रोजच्या रोज राखल्यामुळे देखील आपले केस हे वाढण्यास मदत होते आणि आपले केस चांगले दिसतात देखील.
  • खोबरे हे देखील केसांच्यावाढीसाठी खूप उपयुक्त आहे आणी खूप पूर्वीपासून खोबरेल तेलाचा वापर हा केसांच्या वाढीसाठी केला जातो. खोबर्याचे तेल हे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेच परंतु केसांच्या वाढीसाठी नारळाचे दुध देखील उपयुक्त ठरू शकते. नारळाचे दुध हे ऑलिव्ह ऑईलमध्ये मिक्स करा आणि ते मिश्रण आठवड्यातून केसांच्या मुळाला मसाज करा त्यामुळे देखील आपले केस वाढण्यास मदत होईल.
  • बदामाचे तेल जर केसांना लाऊन मसाज केला आणि ते तेल एक दिवस तसेच ठेऊन मग धुतले कि केस चांगले मऊ, काळे आणि लांबलचक बनतात.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या fast hair growth tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ayurvedic tips for hair growth in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि atm information in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!