गौरी सावंत माहिती Gauri Sawant Biography in Marathi

Gauri Sawant Biography in Marathi – Gauri Sawant Information in Marathi गौरी सावंत माहिती आपल्या समाजामध्ये स्त्री व पुरुष ही दोन लिंग सोडली तर अजून इतर लिंग हि आढळतात. त्यातीलच एक म्हणजे तृतीयपंथीय. तृतीयपंथी हा एक असा वर्ग आहे, जे शारीरिक पुरुष असून त्यांची लिंग, वेशभूषा आणि लिंग अभिव्यक्ती स्त्रीप्रमाणे असते. त्यांच्या अशा दिसण्यामुळे त्यांच्या बद्दल नेहमीच समाजातील इतर वर्गांच्या मनामधे एक वेगळीच नावडती भावना असते. तृतीयपंथीयांना समाजातील अगदी मूलभूत सेवासुविधांन पासून वंचित राहावं लागतं.

समाजाच्या याच मानसिकतेला आळा घालण्यासाठी व तृतीयपंथीयांना त्यांच्या मूलभूत सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी व त्यांना त्यांच्या हक्कासाठी आणि अस्तित्त्वासाठी लढणाऱ्या एकमेव महान व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री गौरी सावंत. आजच्या लेखामध्ये आपण गौरी सावंत यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

gauri sawant biography in marathi
gauri sawant biography in marathi

गौरी सावंत माहिती – Gauri Sawant Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)गौरी सावंत
जन्म गाव (Birth Place)महाराष्ट्रातील रत्नागिरी
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय

Gauri Sawant Information in Marathi

जन्म

गौरी सावंत यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे झाला. परंतु त्यांचा बालपण पुणे येथे गेलं. गौरी सावंत यांच मूळ नाव गणेश सावंत असं होतं. गौरी या शरीराने जरी पुरुष असल्या तरी त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून हावभावातून, त्यांच्या वेशभूषेतून एक स्त्रीत्व दिसायचं. गणेश जसजसा मोठा होत गेला तसतसे त्याचे रुपांतर गौरी मध्ये होत गेलं. आणि गणेशच असं बायकी वागणं त्याच्या घरच्यांना पसंत पडत नव्हतं. गणेश अगदीच लहान होता तेव्हा त्याच्या आईचं आजारपणामुळे निधन झाले आणि जेव्हा गणेशला जाणीव झाली कि तो एक तृतीयपंथी आहे तेव्हा त्याच्यापासून त्याच्या जवळची सगळी नाती दुरावली आणि तो कायमचा एकटा पडला.

गणेश ते गौरी हा प्रवास

गौरी सावंत यांचे मुळनाव गणेश सावंत असं होतं. त्यांचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला त्यांचे वडील एक पोलीस अधिकारी आहेत. गणेशच बालपण सुरळीत चाललं होतं परंतु गणेश सात वर्षांचा असताना त्याच्या आईचं निधन झालं. घरातील सगळ्यात आवडती व्यक्ती कोण असेल तर ती म्हणजे त्याची आई. शाळेत असताना गणेशला आपल्या शरीराची थोडीफार समज येऊ लागली होती.

गणेशला देवाने जरी शरीर पुरुषांच दिल असल तरी त्याला मुलींसारखं राहायला आवडायचं, मुलींसारखं नटायला आवडायचं परंतु त्याचं हेच वागणं त्याच्या घरच्यांच्या डोळ्यात खूपायचं. वडिलांचं गणेश वर प्रेम तर होतं परंतु त्याच्या अशा वागण्यामुळे वडील त्याला बेदम मारायचे. घरातले सगळे त्याच्याशी विचित्र वागू लागले होते. शाळेमध्ये त्याच्या समन्वयाचे मुलं त्याला हिजरा, छक्का म्हणून चिडवायचे तर सोसायटीमध्ये देखील लोक त्याला बाईल वेडी चाळे करतो म्हणून चिडवू लागले होते.

गणेशचे वडील एक पोलीस अधिकारी होते आणि समाजामध्ये त्यांचे नाव खराब होऊ लागलं होतं याची धास्ती गणेशला होती आणि म्हणूनच त्याने एक दिवशी टीव्ही जवळील टेबलवर ठेवलेले साठ रुपये उचलले आणि घर सोडलं ते कायमचंच. आणि तिथून सुरु झाली ती नवीन सुरुवात गौरीची. गणेश आपलं नाव बदलून गौरी सावंत असं ठेवलं. वयाच्या सतराव्या वर्षी गौरी तीचे राहते घर सोडून व सगळी नाती तोडून समाजामध्ये तिच्या हक्कांसाठी लढण्यासाठी बाहेर पडली.

गौरीला स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची होती. तिला कशाचीच कल्पना नव्हती की ती इथून पुढे काय करणार आहे? कुठे राहणार आहे? परंतु तिला इतकं नक्कीच माहीत होतं की तिला एका स्त्री सारख जगायचं आहे. तिला स्वातंत्रता हवी आहे. पुण्यातील राहतं घर सोडून गौरी मुंबईला निघून आली आणि तो दिवस तिने दादर स्टेशन वरच घालवला आणि दुसऱ्या दिवशीचा दिवस तिने जुहू बीच वर घालवला. लहान असताना जेव्हा तिने गायक उषा उत्तप यांना टीव्हीवर पाहिलं तेव्हापासूनच तिला त्यांच्यासारखं बनायचं होतं.

त्यांच्या मनगटातील त्या बांगड्या, हातामध्ये साडीचा पदर आणि कपाळाला शोभणारी मोठी टिकली गौरीला नेहमीच आकर्षित करायची गौरीला मोठ झाल्यावर उषा उत्तप यांच्यासारखाच दिसायचं होतं. लहानपणी गणेशला जेव्हा त्याच्या एका नातेवाईकांनी विचारलं की तुला मोठे होऊन काय बनायचे आहे तेव्हा गणेशने उत्तर दिलं की त्याला आई बनायच आहे. परंतु तिचा हा सर्व प्रवास फार खडतर होता. स्त्री बननं तिचे स्वप्न होतं आणि तिने ते सत्यात उतरवलं.

घर सोडल्यावर ती अनेक वर्ष मुंबई मध्ये एकटी राहिली. हमसफर ट्रस्टच्या मदतीने गौरीच्या आयुष्याला एक वेगळं वळण लागलं. तिला तिच्या कुटुंबीयांचा पाठिंबा मिळाला नव्हता आणि शिवाय मुंबईमध्ये ती एकटी रहात होती राहण्यासाठी घर नसल्यामुळे तिचा गणेश ते गौरी पर्यंतचा रस्ता अगदी काट्याकुट्याचा होता. सगळ्या अडचणींचा सामना करत सर्व चढ-उतारांना सामोरी जात गौरी यांनी आपली एक स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली.

गौरी यांना कळाल होतं की या समाजामध्ये आपण एकटे नाही आहोत आपल्या सारखी अनेक लोक या समाजामध्ये वावरत आहेत आणि म्हणूनच त्यांच्या सारख्या इतर तृतीयपंथी वर्गांसाठी गौरी सावंत यांचा लढा सुरू झाला. मालाड येथे गौरी सावंत यांनी स्वतःची एक एनजीओ संस्था स्थापन केली या संस्थेचे नाव होतं सखी चार चौघी. समाजातील तृतीयपंथी वर्गाला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे व ते कोणत्याही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहू नयेत म्हणून लढा देणे हे या एनजीओच मुख्य ध्येय होतं.

गौरी सावंत आज एक मुंबई मधील भारतीय ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या आहेत. त्या सखी चार चौघी या एनजीओ ट्रस्टच्या संस्थापक आहेत. हा ट्रस्ट ट्रांसजेंडर लोकांना आणि एचआयव्ही ग्रस्त लोकांना मदतीचा हात पुढे करतो. ही संस्था त्यांनी तृतीयपंथी आणि वेशांसाठी सुरु केली आहे. आज सर्व समाज त्यांना गौरीजी म्हणून ओळखतो. हा ट्रस्ट २००० मध्ये स्थापन करण्यात आला होता आणि आज वीस वर्षानंतर १५० कामगारांच्या टीम सह गौरीजी आजही या एनजीओ द्वारे सुरक्षित लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देत आणि ट्रान्सजेंडर लोकांना समुपदेशन प्रदान करतात.

२०१४ मध्ये ट्रान्स जेंडर लोकांच्या हक्कासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या त्या पहिल्या ट्रान्सजेंडर व्यक्ती बनल्या. गौरी जी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण प्रकरणातील याचिकाकर्त्यां होत्या ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने तृतीय लिंग म्हणून लिंगबदलाला मान्यता दिली. इतकेच नव्हे तर गौरी जी ज्या भागातून सखी चार चौघी ही संस्था चालवतात तो भाग म्हणजे मालाड मधील मालवणी. या भागांमध्ये त्यांना त्यांची मुलगी गायत्री देखील मिळाली.

गायत्री ही गौरी जी यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे. समाजाने गौरी जी यांना स्त्री होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला परंतु गौरी जी यांनी आई होऊन दाखवलं. गायत्री ही एका देहविक्रय बाई ची मुलगी होती तिच्या आईचा एचआयवी मुळे मृत्यू झाला होता. घरी वसुलीला आलेल्या गुंडांनी गायत्रीला देखील विकण्यासाठी घेऊन जाऊ लागले आणि ते गौरी जी यांना सहन झालं नाही आणि त्यांनी गायत्रीला स्वतःकडे ठेवून घेतलं आणि तिथूनच गौरीजी यांचा मातृत्वाचा प्रवास सुरू झाला.

त्यांनी गायत्रीला आपल्या मुलीसारख वाढवलं. त्यांना लहानपणापासूनच आई होण्याची इच्छा होती परंतु या ठिकाणी येण्यासाठी त्यांना अनेक परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. शिवाय समाजाची मानसिकतेला तोंड देणं ही त्यांच्यापुढे उभी राहिलेली सर्वात मोठी अडचण होती. या सगळ्यातून वर येऊन देखील त्यांनी गायत्री वर अतिशय चांगले संस्कार केले आज गायत्री चांगलं शिक्षण घेत आहे. शरीराने त्या आई होऊ शकल्या नाहीत परंतु त्या मनाने आई झाल्या.

गायत्रीला देखील आईचं प्रेम मिळालं. गौरीजी ने गायत्रीला तिच्या वाढत्या वयाबरोबर तिच्या शरीरात होणारे बदल व चुकीच्या स्पर्श यांविषयी तिला प्रशिक्षित करणं हे सगळं गौरीजीं साठी नवीनच होतं परंतु यामधूनच त्यांच्यातील आई घडत गेली. गौरी सावंत यांनी आपल्या एका मुलाखतीतून सांगितलं होतं की, मातृत्वाची भावना ही लिंगभेदाचा पलीकडील आहे. स्त्री प्रमाणेच एखाद्या पुरुषाला ही मातृत्वाचा अनुभव येतो आणि याला आम्हीही अपवाद नाही आज मी काय गायत्रिची कागदोपत्री आई नसले तरी तिने मला आईपण दिले आणि तिला मी माझं नाव दिलेल आहे.

गायत्री तिच्या नावापुढे गौरी सावंत हे नाव लावते याचा गौरीजीं ना खूपच अभिमान आहे. गायत्री ही मोठी होऊन एक माणूस म्हणून संवेदनशील बनेल याची खात्री गौरीजी यांनी घेतली आहे. बालपणा मध्येच गौरीजीं ना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागले त्यामुळे त्यांनी बालपणाचा आनंद कधी घेतलाच नाही परंतु गायत्रीच्या येण्यानं त्यांनी त्यांच बालपण पुन्हा एकदा नव्याने जगलं. गौरीजी तृतीयपंथी असल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक समस्यांना तोंड दिल.

तसेच गायत्रीला देखील अगदी सामान्य मुलगी असून सुद्धा समाजाच्या मानसिकतेला तिला देखील सामोरे जाव लागलं आणि इतक्या खडतर प्रवासामधून देखील ही माय लेकीची जोडी आज समाजासमोर एक नवीन आदर्श उभा करत आहे. आजही गौरीजीं चा तृतीयपंथीयांच्या हक्कासाठीचा लढा कायम चालू आहे.

आम्ही दिलेल्या gauri sawant biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गौरी सावंत माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gauri sawant information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of gauri sawant in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!