ग्रंथ म्हणजे काय? Granth Information in Marathi

granth information in marathi ग्रंथ म्हणजे काय, मराठी साहित्य हे वेगवेगळ्या स्वरूपाच्या लिखाणाने श्रीमंत साहित्य आहे कारण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कविता, कथा, नाटक, कादंबरी, ग्रंथ, ललित प्रकार, आत्मचरित्र, पोवाडा, बाल साहित्य, विनोद सुविचार, लोकगीत, लावणी, भारुड, ओव्या, चारोळ्या, व्यक्तीचित्र, उखाणे, गोंधळ या सारखे वेगवेगळ्या प्रकारामधील भरगच्च असे लिखाण आहे आणि त्यामुळे आपल्याला अनेक प्राचीन विषयांच्याविषयी माहिती मिळते. त्यामधील एक प्रकार म्हणजे ग्रंथ आणि आज आपण या लेखामध्ये ग्रंथ या विषयावर संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

ग्रंथ म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये अनेक लोकप्रिय ग्रंथांची नावे आपल्या मनामध्ये येतात जसे कि ऋग्वेद, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता या सारखे ग्रंथ येतात. ग्रंथ हे आधुनिक कल्पनेनुसार पहिले तर हे एक कागदांच्या पानावर मुद्रित केलेला एक अनेक पानांचा संग्रह आहे आणि यामध्ये मनुष्याने आपले विचार, कल्पना आणि अनुभव कागदाच्या पानावर लिहून ठेवल्या आहेत. अनेक असे ग्रंथ आहेत.

ज्यामुळे आपल्याला अनेक प्रकारची शिकवण मिळते तसेच आपल्याल वेगवेगळ्या प्रकारची प्राचीन माहिती मिळते जसे रामायण आणि महाभारत या ग्रंथातून आपल्याला रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये काय झाले आणि त्यामध्ये युध्द कश्यामुळे झाले आणि कोणामध्ये झाले तसेच यामध्ये कोण बरोबर होते.

अश्या अनेक गोष्टींच्या विषयी माहिती मिळते आणि म्हणून ग्रंथ हे महत्वाचे आहेत आणि यामुळे आपल्याला माहिती मिळते आणि काही गोष्टी शिकण्यास मिळतात म्हणून याला ‘ग्रंथ हेच गुरु’ आहेत असे काहीजण म्हणतात.

granth information in marathi
granth information in marathi

ग्रंथ म्हणजे काय – Granth Information in Marathi

ग्रंथ म्हणजे काय – Granth meaning in marathi

ग्रंथ हे आधुनिक कल्पनेनुसार पहिले तर हे एक कागदांच्या पानावर मुद्रित केलेला एक अनेक पानांचा संग्रह आहे आणि यामध्ये मनुष्याने आपले विचार, कल्पना आणि अनुभव कागदाच्या पानावर लिहून ठेवल्या आहेत.

ग्रंथांची वेगवेगळी नावे – names

ग्रंथ हे एक आधुनिक लिखाणाचा प्रकार असून यामध्ये अनेक पानांचा समावेश असल्यामुळे हा एक मोठा संग्रह असतो. ग्रंथ हे अनेक वेगवेगळ्या प्रकारामध्ये आणि वेगवेगळ्या विषयावर लिहिले आहेत, जसे कि ऋग्वेद, मृत्युंजय, महाभारत, रामायण असे अनेक ग्रंथ आहेत आणि खाली आपण यामधील काही प्रसिध्द ग्रंथांच्याविषयी माहिती पाहणार आहोत.

रामायण

रामायण हा एक प्राचीन ग्रंथ आहे जो सत्य घटनेवर आधारित आहे आणि हा ग्रंथ महर्षी वाल्मिकी यांनी लिहिला आहे. रामायण हा ग्रंथ ७ कांडांमध्ये विभागला असून या रंथामध्ये एकूण २४ हजार श्लोक आहेत. रामायण या ग्रंथामध्ये सीता देवी यांचे अपहरण कसे झाले होते.

तसेच राम आणि रावण यांच्यामधील युध्द या सर्व गोष्टीच्या विषयी माहिती आहेत आणि यामध्ये राम, लक्षमण, सीता, हनुमान आणि खलनायक रावण हि महत्वाची पात्रे होती आणि हा देखील हिंदू पवित्र ग्रंथ आहे. रामायण या पुस्तकामध्ये सिया- राम आणि लक्षमण हे वनवासाला का गेले त्यांनी वनवास कसा भोगला.

तसेच रावणाने सीतेचे अपहरण कसे केले आणि प्रभू श्री राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रावणाशी कसे युध्द केले आणि सीतेला सोडवले या सर्व गोष्टीविषयी माहिती आहे.

महाभारत

महाभारत हा देखील एक प्राचीन हिंदू पवित्र ग्रंथ आहे जो काव्य प्रकारामध्ये मोडतो आणि हा ग्रंथ देखील सत्य घटनेवर आधारित लिहिलेला ग्रंथ आहे. महाभारत हा ग्रंथ व्यासमुनींनी लिहिला आहे आणि या ग्रंथाची रचना ३१०० – १२०० ईसा पूर्व मध्ये झाली होती.

या ग्रंथामध्ये अर्जुन श्री कृष्ण यांचा संवाद, द्रौपदीचे वस्त्रहरण, पांडव आणि गौरव यांच्यातील युध्द या विषयी माहिती आहे. हा एक पौराणिक, धार्मिक आणि ऐतिहासिक ग्रंथ आहे जो सर्वात मोठा साहित्यिक आणि महाकाव्य प्रकारामध्ये मोडतो.

महाभारत यामध्ये श्री कृष्ण, अर्जुन, द्रौपदी, भीष्म, पांडव, दुर्योदन, दुशासन, कुंती, गांधारी, धृतराष्ट्र, महर्षी व्यास, कर्ण, अभिमन्यू या सारखी अनेक महत्वाची पात्रे महाभारत मध्ये होती.

मृत्युंजय

मृत्युंजय हा ग्रंथ कादंबरी प्रकारामध्ये मोडतो आणि हा ग्रंथ महाभारतातील गौरवांच्यासाठी लढलेला आणि कुंतीपुत्र आणि सूर्यपुत्र असणार कर्ण ह्याच्यावर लिहिलेला आहे आणि हा ग्रंथ शिवाजी सावंत यांनी लिहिला आहे आणि यामध्ये कर्णाच्या संपूर्ण जीवनाचा परिचय करून दिला आहे.

छावा

छावा हा देखील एक ग्रंथ आहे जो कांदबरी या प्रकारामध्ये मोडतो आणि हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे आणि हा ग्रंथ शिवाजी सावंत यांनी लिहिला आहे. छावा हि कांदबरी खूप लोकप्रिया आहे आणि यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले पुत्र संभाजी महाराज यांच्या जीवन संघर्षाविषयी सांगितले आहे.

लीळाचरित्र

लीळाचरित्र हा देखील एक प्राचीन ग्रंथ आहे जो मराठी भाषेतील ग्रंथ असून हा अद्य, गद्य आणि चरित्र ग्रंथ प्रकारातील आहे. लीळाचरित्र हा ग्रंथ चक्रधर स्वामी यांच्या अतिशय वेगवेगळ्या अश्या आयुष्यावर लिहिला आहे. लीळाचरित्र या ग्रंथाची रचना पंडित म्हाइंभट सराळेकर यांनी केली आहे.

बटाट्याची चाळ

बटाट्याची चाळ हा देखील एक प्रकारचा ग्रंथ आहे जो कथासंग्रह मध्ये मोडतो आणि या कथासंग्रहामध्ये विनोदी कथा आहेत आणि हा ग्रंथ पु. ल. देशपांडे यांनी लिहिला आहे. बटाट्याची चाळ ह्या ग्रंथाची पहिली आवृत्ती हि १९६२ मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. बटाट्याची चाळ हे पुस्तक मराठी भाषेमध्ये आहे आणि या पुस्तकामध्ये एकूण १२ प्रकाराने आहेत.

भावार्थ दीपिका

भावार्थ दीपिका हा एक ग्रंथ आहे ज्याला आपण ज्ञानेश्वरी या नावाने देखील ओळखतो आणि भावार्थ दीपिका हा एक धार्मिक ग्रंथ असून हा संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला आहे.

आम्ही दिलेल्या granth information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ग्रंथ म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Granth meaning in marathi या marathi granth article मध्ये update करू, मित्रांनो हि information about granth in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Granth information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!