हडप्पा संस्कृतीची माहिती Harappa Sanskriti Information in Marathi

Harappa Sanskriti Information in Marathi – Hadappa Sanskruti हडप्पा संस्कृतीची माहिती जगातील ताम्रयुगीन संस्कृतीमधील एक म्हणून ओळखली जाणारी प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा असणारी एक महत्वाची  संस्कृती म्हणजे हरप्पा संस्कृती जिला सामान्यता हडप्पा संस्कृती या नावाने ओळखले जाते. हडप्पा संस्कृती हि जगातील एक प्राचीन संस्कृती आहे आणि या संस्कृतीला कला आणि संस्कृती आणि वास्तुकलेचे केंद्र असल्याचे मानले जात होते. हडप्पा हे शहर खंडातील एक जुने शहर म्हणून ओळखले जाते म्हणजे हे शहर ४७०० वर्षापूर्वीचे आहे.

हडप्पा हे शहर लोथल, मोहेंजोदारो, धोलावीरा आणि कालीबंगन या सारख्या शहरांचा शोध लागल्यानंतर लगेचच शोधले गेले आणि हडप्पा शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. हडप्पा या शहराचा शोध हा सिंधू नदीच्या आसपासचा असल्यामुळे या प्रदेशाला सिंधू संस्कृती असे देखील संबोधले जाते.

harappa sanskriti information in marathi
harappa sanskriti information in marathi

हडप्पा संस्कृतीची माहिती – Harappa Sanskriti Information in Marathi

शहराची रचना 

हडप्पा हे  प्राचीन काळातील ताम्रयुगीण संस्कृती जपणारे हे शहर मुख्यता २ विभागामध्ये विभागले होते. ज्यामध्ये शहराचा पश्चिमेकडील भाग हा तुलनेने पूर्वेकडील भागापेक्षा लहान होता पण शहराच्या या भागाला शहराच्या मुख्य किल्ला म्हणून संबोधले जात होते. तसेच या शहराचा पुर्वेकाधील भाग हा मोठा होता आणि या भागाला पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी लोअर टाउन असे नाव दिले होते.

हडप्पा संस्कृतीमधील ऐतिहासिक इमारती आणि वस्तू ह्या दगड, शेल आणि धातू पासून बनलेल्या होत्या आणि सर्व साधने, शस्त्रे, दागिने आणि भांडी तयार करण्यासाठी तांबे आणि कांस्य वापरले जात होते. त्याचबरोबर तेथील बांधकाम केलेल्या विटा ह्या इतक्या मजबूत आहेत कि हजारो वर्षापासून आजपर्यंत मजबूत आहेत आणि त्या विटांच्यापासून बनवलेल्या भिंती देखील खूप मजबूत आहेत.

हडप्पा या शहरामध्ये घरे, धन्य कोठारे, तटबंदी, स्नानगृहे, असेंब्ली हॉल, सार्वजनिक इमारती, धार्मिक इमारती आणि सांडपाण्याची व्यवस्था या सारख्या सर्व बांधकामाची सुविधा या शहरामध्ये होती. या शहरामध्ये मध्य भागी रस्ता आणि लोकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक किंवा दोन मजली घरे बांधली ज्यामध्ये अंगणाच्या भोवती खोल्या बांधल्या होत्या तसेच साफसफाईच्या उद्देशाने तपासणीच्या छिद्रांसह सरळ रेषांमध्ये घातलेल्या दगडी स्लॅबसह नाले देखील झाकलेले होते.

मोहेंजोदरो, हडप्पा आणि लोथलमध्ये धान्य साठवण्यासाठी वापरण्यात येणारे प्रचंड भांडार होते आणि म्हणून त्यांना धान्याचे कोठार म्हटले जात असे तसेच कालीबंगन आणि लोथल येथे मोठ्या अग्नी वेदी आढळतात ज्याचा वापर यज्ञ करण्यासाठी केला जातो.

शेती पध्दत 

हडप्पा येथील शेतकरी आणि मेंढपाळांनी वापरलेल्या काही शेती पद्धती आणि संगोपन खाली दिले आहे.

 • हडप्पा संस्कृतीच्या शेती पद्धतीमध्ये अनेक विकसित आणि सुधारक शेती कामे आणि विकास होवून गेले. त्यांनी नांगर म्हणून ओळखली जाणारी काही नवीन साधने देखील विकसित केली आणि त्यांचा वापर बियाणे लावण्यासाठी आणि माती फिरवण्यासाठी किंवा मातीची मशागत करण्यासाठी केला जावू लागला.
 • हडप्पा संस्कृतीतील शेती करणारे लोक हे गहू, बार्ली, तांदूळ, डाळी, तीळ, मटार, अलसी आणि मोहरी या सारखे पिक शेतामध्ये घेत होते.
 • हडप्पा संकृतीच्या काळामध्ये पाऊस पडण्याचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे तेथी शेतकऱ्यांनी सिंचन पध्दत वापरली आणि बहुतेक या सिंचन पध्दतीचा उपयोग सर्वप्रथम हडप्पा संस्कृतीमध्ये केला असावा ( म्हणजे त्यांनीच या पध्दतीचा शोध लावला ).
 • त्या काळामध्ये हडप्पा संस्कृतीतील लोकांनी मेंढ्या, शेळ्या आणि म्हैस या सारखे पाळीव प्राणी देखील पाळले त्याचबरोबर लोक त्या काळी अन्नासाठी फळे आणि मासे गोळा करत असत तसेच ते वन्य प्राण्यांची शिकार देखील करू लागले.

कला 

हडप्पा संस्कृतीमध्ये अनेक अशी सुंदर आणि प्राचीन कला संस्कृती आहे आणि या सुंदर आणि प्राचीन कला संस्कृतीची काही उत्तम उदाहरणे म्हणजे शिल्पे, सील, मातीची भांडी, सोन्याचे दागिने आणि टेराकोटा, कांस्य आणि स्टीटाइटमधील शारीरिकदृष्ट्या तपशीलवार मूर्ती इत्यादींचा समावेश आहे.

या ठिकाणी एक कास्य पासून बनवलेली मूर्ती आहे ज्याला ‘डान्सिंग गर्ल’ या नावाने ओळखले जाते. टेराकोटाच्या कला कामामध्ये गाय, अस्वल, माकड आणि कुत्र्यांचाही समावेश होता. त्याचबरोबर पुतळ्यांव्यतिरिक्त, सिंधू नदीच्या खोऱ्यातील लोकांनी हार, बांगड्या आणि इतर दागिने तयार केल्याचे म्हंटले जाते.

हडप्पा या शहरामध्ये घरे, धन्य कोठारे, तटबंदी, स्नानगृहे, असेंब्ली हॉल, सार्वजनिक इमारती, धार्मिक इमारती आणि सांडपाण्याची व्यवस्था या सारख्या सर्व बांधकामी देखील येथील कला दर्शवतात.

धर्म 

इजिप्शियन आणि मेसोपोटेमियन सभ्यतेच्या उलट सिंधू संस्कृती सभ्यतेमध्ये धार्मिक मंदिरे किंवा विशिष्ट देवतांचा स्पष्ट पुरावा देणारी कोणतीही मंदिरे किंवा वाड्यांचा अभाव असल्याचे दिसून आले. पण सिंधू व्हॅली सीलमध्ये असणारी स्वस्तिक चिन्हे असे दर्शवतात कि तेथे हिंदू, बौद्ध आणि जैन धर्म समाविष्ट असावेत आणि ते नंतरच्या काळात भारतीय धर्मांमध्ये म्हणजेच हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मासह समाविष्ट केले गेले.

सिंधू संस्कृती वैशिष्ट्ये

 • हडप्पा या संस्कृतीचे अवशेष हे हडप्पा या म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे नाव पडले.
 • हडप्पा सभ्यता भारतीय उपखंडातील पहिली शहरी सभ्यता मानली जाते.
 • या संस्कृतीचा विस्तार हा उत्तर भागातील जम्मू या ठिकाणापासून ते दक्षिणेस नर्मदा नदीच्या किनाऱ्यापर्यंत आणि पश्चिमेस बलुचिस्तानच्या मकरान किनाऱ्यापासून ईशान्येकडील मेरठपर्यंत विस्तारलेली आहे.
 • हडप्पा संस्कृतीमधील ऐतिहासिक इमारती आणि वस्तू ह्या दगड, शेल आणि धातू पासून बनलेल्या होत्या आणि सर्व साधने, शस्त्रे, दागिने आणि भांडी तयार करण्यासाठी तांबे आणि कांस्य वापरले जात होते.
 • हडप्पा संस्कृतीला त्याचे मुख्य शहर मोहेंजोदडोच्या उत्खननामुळे सिंधू संस्कृतीचे नाव मिळाले. कारण सिंधू नदीच्या काठावर मोहेंजोदडो उत्खनन झाले होते आणि या सिंधू नदीमुळे या संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हटले जाऊ लागले.
 • हडप्पा संस्कृती हि इ.स.पू. २५०० ते इ.स.पू. १५०० पर्यंत प्रगतीस आली आणि या संस्कृतीची भरभराट देखील झाली.
 • हडप्पा संस्कृती हि इजिप्शियन संकृतीपेक्षा मोठी आहे.
 • लोथल, मोहेंजोदारो, धोलावीरा आणि कालीबंगन हि शहरे हडप्पा संस्कृतीतील मोठी आणि मुख्य शहरे होती.
 • हडप्पा संस्कृतीतील शेतकरी लोकांनी नांगर म्हणून ओळखली जाणारी काही नवीन साधने देखील विकसित केली आणि त्यांचा वापर बियाणे लावण्यासाठी आणि माती फिरवण्यासाठी किंवा मातीची मशागत करण्यासाठी केला जावू लागला.
 • वर्ष १९९९ पर्यंत सिंधू किंवा हडप्पा संस्कृतीमध्ये १०५६ शहरे शोधली गेली होती.
 • हडप्पा या ठिकाणाचे एकूण क्षेत्रफळ हे १२९९६०० चौरस किलो मीटर इतके आहे.
 • हडप्पा संस्कृतीतील लोक त्यांच्या दागिन्यांमध्ये सोने, चांदी, तांबे, धातू वापरत होते त्याचबरोबर तेथील लोक मौल्यवान दगडांनी बनवलेले दागिने मोठ्या उत्साहाने परिधान करत असत.

आम्ही दिलेल्या harappa sanskriti information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर हडप्पा संस्कृतीची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या harappa sanskriti information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of harappa sanskriti in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये harappan civilization in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!