मी झाड झाले तर निबंध मराठी If I Become a Tree Essay in Marathi

If I Become a Tree Essay in Marathi – Mi Zad Zalo Tar Marathi Nibandh मी झाड झाले तर निबंध मराठी मित्रांनो, आपल्या सभोवतालच्या अथवा आजूबाजूच्या पर्यावरणातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे झाड होय. कारण, झाडांमुळे या पृथ्वीतलावर सजीवसृष्टी जिवंत आहे. शिवाय, सर्व सजीवांना जगण्यासाठी अत्यावश्यक असलेला प्राणवायू अर्थात ऑक्सिजन वायू केवळ झाडांमुळेचं आपल्यापर्यंत पोहचतो. मित्रांनो! आपल्याला आपल्या निसर्गामधून  अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी प्राप्त होतात जसे की, इंधन, पाणी, डोंगर, पर्वत, दऱ्या, विशाल महासागर, समुद, नदी-नाले तसेच, झाडे इत्यादी.

खरंतर, अशा अनेक मौल्यवान गोष्टी म्हणजे निसर्गाने संपूर्ण जीवसृष्टीला  दिलेली सर्वात सुंदर अशी बहुमोल देणगी आहे. तसेच, निसर्गातून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या गोष्टी या आपल्या दैनंदिन जीवनासाठी खूप महत्वाच्या आणि जीवनावश्यक असतात. परंतू, या सर्व गोष्टींमध्ये  निसर्गातील झाडे मात्र पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून ठेवण्यासाठी अत्यंत गरजेची आहेत.

 if i become a tree essay in marathi
if i become a tree essay in marathi

मी झाड झाले तर निबंध मराठी – If I Become a Tree Essay in Marathi

मी झाड झाले तर निबंध – Mi Zad Zalo Tar Marathi Nibandh 

तसेच मित्रहो, आपल्या पृथ्वीवर गुण्यागोविंदाने आणि आनंदाने आपले जीवन जगत असलेली संपूर्ण सजीव सृष्टी ही केवळ झाडांमुळेच शक्य झाली आहे. कारण, सर्व सजीवांना आवश्यक असलेला प्राणवायू हा केवळ झाडांपासूनच उपलब्ध होतो, आपणा कुणालाही हा ऑक्सिजन दीर्घकाळासाठी किंवा कायमस्वरूपी वापरण्यासाठी तयार करता येणार नाही.

खरंतर, निसर्गामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मानवाला निर्माण करणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे, आपण सर्वांनी निसर्गाने आपल्याला दिलेल्या या अनमोल संपत्तीचा उपयोग खूप जपून केला पाहिजेत. जर आपल्या पृथ्वीवर झाडे नसती, तर संपूर्ण जीवसृष्टी ही ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अगदी कमी वेळेमध्ये मृत्युमुखी पडली असती.

मित्रांनो, कल्पना करा की सर्व सजीवांना उपयुक्त पडणारे आणि अत्यावश्यक असलेले झाड जर मी झाले असते तर, किती मज्जा झाली असती ना!

खरंच, मी झाड झाले तर माझे विचार, माझ्या भावना किंवा प्रतिक्रिया या कशा असतील? जर मी झाड झाले असते तर माझ्यापासून सर्व सजीवांना पाने, फळे, फुले, लाकूड तसेच, औषधी गुणधर्म इत्यादी सर्व गोष्टी घेणं शक्य झालं असतं. शिवाय, सर्व सजीव जीवांना जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू मी मोठ्या प्रमाणावर सगळयांना दिला असता.

खरंच मित्रहो, सजीवांना प्राणवायू देण्यासाठी आपल्या पर्यावरणातील झाडे किती महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्याचबरोबर, आपल्या सभोवतालच्या वातावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी आणि संपूर्ण पर्यावरण स्वच्छ व शुद्ध करण्यासाठी झाडे खूप मेहनत करत असतात. त्यामुळे मित्रहो, जर मी झाड झाले तर मी देखील अशाच प्रकारे माझी सगळी कर्तव्ये आणि महत्वाच्या भूमिका पार पाडेन.

शिवाय, मी झाड झाले असते तर कुणामध्येही भेदभाव न करता सर्वांना अगदी समप्रमाणात प्राणवायू वाटला असता आणि त्याचबरोबर, वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड हा घातक वायू शोषूण घेऊन वातावरणाला शुद्ध करण्यामध्ये मदत देखील केली असती.

मित्रांनो, झाडे केवळ मनुष्यांना फायद्याची ठरत नाहीत तर संपूर्ण सजीवसृष्टीला अर्थात आपल्या पृथ्वीतलावर असणाऱ्या प्रत्येक सजीवाला म्हणजेच सर्व प्राण्यांना, पक्ष्यांना तसेच, कीटकांना महत्वाची ठरतात. त्यामुळे, जर मी झाड झाले तर पृथ्वीवरील सर्व सजीवांना ऑक्सिजन पुरवण्याचे काम अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे करीन, तसेच माझ्या आजूबाजूला कितीही संख्येने सजीव असले तरीदेखील मी सर्वांना माझ्यापासून शक्य होईल तेवढी सगळी मदत करीन.

मित्रहो, आपणा सर्वांना हे मान्य करावं लागेल की मनुष्य जातीवर झाडांचे असंख्य उपकार आहेत. त्यामुळे, आपण सर्वांनी त्यांच्याबद्दल नेहमी सहानुभूती आणि कृतज्ञता दाखवली पाहिजेत. जर मी झाड झाले तर मला एका गोष्टीचा खूप अभिमान वाटेल की माझ्या सर्व भागांचा उपयोग सर्व सजीव आपल्या  फायद्यासाठी करून घेत आहेत. त्यामुळे, एका बाजूने विचार केला असता मला दुसऱ्याच्या कामी येण्याचे अमूल्य सौभाग्य प्राप्त झाले असते.

यांखेरीज, जर मी झाड झाले असते तर उन्हाळ्याच्या कडक दिवसांमध्ये उन्हाच्या तीव्र झळांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेक सजीवांनी माझ्या सावलीचा सहारा घेतला असता, त्यामुळे माझ्या थंड सावलीमध्ये बसलेल्या निरागस जीवांकडे पाहून मला माझ्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले असते, त्याचबरोबर मला खूप आनंद देखील झाला असता.

जर एखाद्या व्यक्तीला  भूक लागली असती तर त्यांनी माझ्या झाडाची फळे तोडून, त्यातून स्वतःची भूक भागवली असती. शिवाय, माझ्यापासून मिळणाऱ्या लाकडांचा उपयोग ग्रामीण भागातील अनेक लोकांनी अन्न शिजवण्यासाठी केला असता.

मित्रहो, केवळ एवढेच नाही तर माझ्यापासून मिळणाऱ्या लाकडांचा उपयोग करून टेबल-खुर्ची, घराच्या खिडक्या, दरवाजे, खेळणी, कित्येक प्रकारचे फर्निचर तसेच, शोभेच्या वस्तू इत्यादी वस्तू बनवून, त्यांची बाजारात विक्री केली जाते.

तसेच सणादिवशी, उत्सवादिवशी अथवा शुभ कार्यक्रमांमध्ये माझ्या सुंदर, सुवासिक फुलांचा आणि हिरव्यागार पानांचा उपयोग सर्व मानवांनी आपापली घर सजवण्यासाठी अथवा दरवाजाला तोरण बांधण्यासाठी केला असता. अशा प्रकारे, मी सर्व प्राण्यांना, पक्ष्यांना आणि मनुष्याला सर्व अंगांनी उपयोगी पडत आहे हे पाहून मला खूप समाधान वाटले असते.

याखेरीज, जर मी झाड असते तर मला येणाऱ्या निरनिराळ्या अन् रंगीबेरंगी अशा फुलांना आणि चविष्ट फळांना पाहून कित्येक पक्षी माझ्याकडे धाव घेतील. शिवाय, ते माझ्या स्वादिष्ट व चवदार अशा फळांचा आस्वाद घेऊन माझ्या झाडाच्या सावलीत अथवा पानांच्या कुशीत शांतपणे झोपी जातील.

यासोबतच, कित्येक प्रकारच्या पक्षांनी माझ्यावर घरटी बांधून, त्यामध्ये आपल्या इवल्या-इवल्या पिलांना जन्म दिला असता. जर मी झाड झाले असते तर मी मनुष्याला, प्राण्यांना आणि पक्षांना माझी थंडगार सावली, सुवासिक व आकर्षक फुले, स्वादिष्ट फळे, हिरवीगार पाने आणि बहुपयोगी लाकूड अशा सर्व गोष्टी अगदी हसत-हसत दिल्या असत्या.

मित्रांनो, आजकाल आपल्या पृथ्वीवर ज्या विविध प्रकारच्या समस्या किंवा अडचणी उद्भवलेल्या पहायला मिळतात जसे की हवा प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, कमी पाऊस, जास्त पाऊस, महापूर, दुष्काळ, जमिनीची धूप शिवाय, वेगवेगळे रोग आणि महामाऱ्या इत्यादी. या केवळ मनुष्याच्या बेजबाबदार वागण्यामुळे.

परंतू, याची जाणीव असूनदेखील मी जर झाड झाले असते तर या सर्व समस्यांमधून अथवा संकटांतून मनुष्याला मुक्त करण्याकरिता मी शक्य ती मदत केली असती. जर मी झाड झाले असते तर, माझ्यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्माचा वापर करून मी वेगवेगळ्या रोगांवर आणि महामारीवर विजय मिळवला असता आणि सगळ्या लोकांची यांतून सुटका देखील केली असती.

शिवाय, जर मी झाड असते तर मी माझी मुळं जमिनीच्या आत खोलवर रुजवली असती आणि अशा पद्धतीने मी मृदा प्रदूषण होण्यास अटकाव आणला असता.

तसेच, जमिनीची मोठ्या प्रमाणावर होणारी धूप देखील थांबवली असती. याशिवाय मित्रहो, जर मी झाड झाले असते तर वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साईड वायू शोषून घेतला असता, जेणेकरून दिवसेंदिवस वाढत चाललेलं वायुप्रदूषण मला रोखता आलं असतं.

मित्रहो, आपल्याला माहीत आहे की झाडांमुळे जागतिक तापमानवाढ रोखणे शक्य होते, शिवाय एवढेच नसून जर पृथ्वीवरील झाडांचे प्रमाण वाढले तर वर्षाचक्र देखील व्यवस्थितरीत्या आपले कार्य करेल, त्यामुळे पावसाबाबत भविष्यात कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. अशाप्रकारे, मी जर झाड झाले असते तर मनुष्याच्या सर्व गरजांचे मला शक्य होईल तसे पुर्ण समाधान केले असते.

आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये झाडं खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे, आजकाल मोठ्या प्रमाणात होणारी  झाडांची अमानुष तोड आपण सर्वांनी एकत्रितरित्या कुठंतरी थांबविली पाहिजेत. तसेच, झाडांचे आपल्या आयुष्यातील महत्व समजून घेऊन, आपण सर्वांनी अगदी गंभीरपणे झाडांची लागवड करण्यास सुरुवात केली पाहिजेत.

नाहीतर, एकाएकी भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या भयंकर समस्येवर आपल्याला पटकन तोडगा काढता येणार नाही. त्यामुळे मित्रांनो, आपण आतापासूनच भविष्यात थोपवणाऱ्या संकटांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

                      तेजल तानाजी पाटील

                         बागिलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या if i become a tree essay in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मी झाड झाले तर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mi zad zalo tar marathi nibandh या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि autobiography of a tree in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये marathi nibandh on trees Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!