Me Pakshi Zalo Tar Nibandh in Marathi – Mi Pakshi Zalo Tar Essay in Marathi मी पक्षी झालो तर…मी माझ्या लहानपणी शाळेला मे महिन्याची उन्हाळी सुट्टी पडली की मामाच्या गावी जायचे. तिथे मी आणि माझ्या मैत्रिणी खूप फिरायचो, निसर्गाच्या सान्निध्यात एकरूप होऊन खेळायचो. सकाळची संध्याकाळ कशी व्हायची हे आमच्या लक्षातच येत नसायचं. सगळीकडे फिरत असताना आम्हाला मध्ये थांबुच नये असं वाटायचं, पण काय करणार; चालून चालून पाय तर खूप दुखायचे. तेंव्हा आकाशात मुक्तपणे विहार करणाऱ्या पक्षांकडे पाहून वाटायचं की मी जर पक्षी झाले असते, तर खूप दूरवर फिरायला गेले असते.
खरंच, मी पक्षी झाले तर मला आकाश ठेंगणे होईल. घराबाहेर फिरताना आजूबाजूचे लोक नुसत अभ्यास करायला सांगतात, पण मी पक्षी झाले तर स्वच्छंद बाहेर आनंदाने संचार करेन. माझे घर अर्थात माझे सुंदर घरटे मी माझ्या मनासारखे बांधेन.
मी माझे घर नियमितपणे निरनिराळ्या सुंदर फुलांनी सजवेन. त्याला झाडांच्या पानांचे तोरण बांधून, गवताचे दार बनवेन. अशा या छानशा घरात मी नेहमी आनंदात राहीन.
मी पक्षी झालो तर निबंध Me Pakshi Zalo Tar Nibandh in Marathi
Mi Pakshi Zalo Tar Nibandh
सकाळ झाली की आपल्याला सगळ्या पक्षांचा किलबिलाट ऐकायला येतो. त्यांच्या मंजूळ आवाजाने सर्वजण झोपेतून जागे होतात. सगळेजण उठण्याआधी पक्षी सर्वांत आधी उठून स्वच्छ आणि ताज्यातवाण्या हवेत फेरफटका मारून येतात. मी देखील त्यांच्याप्रमाणेच माझ्या मंजूळ आणि गोड आवाजाने सारे गाव, शिवार जागे करेन. स्वच्छ हवेत मी मोकळा श्वास घेईन.
सर्व पक्षांशी मी घट्ट मैत्री करेन, त्यांना एकीचे बळ पटवून देईन. याशिवाय, माझ्या जातीतल्या तसेच अन्य पक्ष्यांसोबत देखील मी दूर दूरचे देश पाहून घेईन. माणसांप्रमाणे कोणत्याही प्रकारचा पासपोर्ट किंवा तिकीट न काढता मी हव्या त्या ठिकाणी फिरू शकेन. पृथ्वीवरील सर्व ठिकाणांना भेट देईन. त्या त्या ठिकाणी असणाऱ्या निसर्ग सौंदर्याचा मी मनमोहकपणे आस्वाद घेईन.
- नक्की वाचा: सूर्य मावळला नाही तर
जमिनीवर राहून मानवाला कितीतरी प्रकारच्या प्रदूषणांचा त्रास सोसावा लागतो. त्याचबरोबर, या जीवघेण्या प्रदूषणांमुळे होणाऱ्या परिणामांना मानवाला सामोरे जावे लागते. शहरी भागात तरी या प्रदुशणांबद्दल बोलणे म्हणजे व्यर्थ ठरेल.
शहरामध्ये राहणारा माणूस शुध्द हवेसाठी आज पैसे मोजताना आपल्याला दिसतोय. दिल्ली सारख्या ठिकाणी अनेक माणसे पैसे देऊन ऑक्सिजन वायू घेतात. पण, मी जर पक्षी झाले तर मला शुध्द हवेसाठी कुणालाही पैसे द्यावे लागणार नाहीत. डोंगर – दरीतून मला मनसोक्त भटकता येईल.
मी खेळामध्ये पक्षांसोबत स्पर्धा लावून विमानांपेक्षाही जलद गतीने प्रवास करेन. मला जगातील सर्व महत्वाच्या आणि मनाला मोहून टाकणाऱ्या स्थळांना भेटी देता येतील. दिवसभर फिरून झाले की मी संध्याकाळी विश्रांती घेण्यासाठी माझ्या घरट्याकडे वळेन आणि तिथे शांतपणे झोपी जाईन.
मला आवडतील अशी ताजेतवानी, गोड फळे मी दररोज खाईन. निसर्गाच्या झऱ्यातील गोड पाणी मी समाधानाने पीईन. दिवसाच्या अखेरी जेंव्हा सूर्य मावळेल तेंव्हा मी घरट्यात आल्यावर हिरव्या हिरव्या मऊशार गवतावर मस्त झोपी जाईन. एकूण काय सगळा आनंदीच आनंद.
झाडाच्या उंच फांदीवर बसून मी लांब लांब झोके घेईन. माझ्या भारत देशाचे साैंदर्य मी डोळे भरून पाहीन. ढग, वारा आणि पाऊस यांच्याशी मला खेळता येईल. त्यांचा सहवास मला जवळून घेता येईल. अस म्हटलं जात की फक्त माणसांच्याच नाही तर, सर्व सजीवांच्या आयुष्यामध्ये अडचणी या असतातच.
- नक्की वाचा: मी पंतप्रधान झालो तर
सर्व सजीवांना या अडचणींवर मात करून सुंदर आयुष्य जगायचे असते. मानवाला देवाने इतर सजिवांपेक्षा जास्त बुध्दी दिली आहे. म्हणून तर माणसाला बुद्धिमान अस म्हटलं जातं. मानवाला त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींची आत्ताच्या नवीन तंत्रज्ञानामुळे आधीच जाणीव होते. त्यामुळे, त्यांना अशा अनेक संकटांतून मार्ग काढण्यासाठी वेळ मिळतो.
पण, इतर सजीवांना त्यांच्यासमोर येणाऱ्या संकटांची जाणीव नसते. ते त्यापासून अज्ञात असतात. त्यामुळे त्यांना येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर त्या त्या वेळीच मार्ग काढून त्यातून सुटका करून घ्यावी लागते. त्यामुळे, मी देखील त्यांच्याप्रमाणे निसर्गातील संकटांचा, वातावरणात होणाऱ्या बदलांचा व्यवस्थित सामना करून आनंदी जीवन जगेन.
मी जर पक्षी झाले तर पक्ष्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग मला अनुभवता येतील. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सुख – दुःखांची मला जाणीव होईल. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग मी स्वतः उपभोगेन. मी आठवीमध्ये असताना संजय गांधी विद्यालयाला शिकायला होते. तेथे माझी ओळख आम्हाला मराठी शिकवणाऱ्या बाईंशी झाली.
त्या बाई मराठी खूप छान शिकवत असायच्या. एकदा बाईंनी आम्हाला एक नवीन कविता शिकवायला घेतली होती. कविता शिकवताना बाई अगदी कवितेमध्ये रंगून गेल्या होत्या. त्या कवितेमध्ये एका सासरवाशिणीला तिच्या माहेरी जायचं असत, परंतु तिच्या सासरची मंडळी तिला माहेरी जाण्यास परवानगी देत नसतात.
माहेरच्या आठवणीन तिचं लक्ष कशातच लागतं नसत. काही दिवसानंतर ती अजुनच अस्वस्थ होते. ती जेवणाला हात देखील लावत नाही. अशावेळी, तिची सासरची मंडळी एका चीठीमध्ये तिच्या माहेरच्या मंडळींना संदेश लिहून एका कबुतराच्या चोचीत ती चिठ्ठी देतात.
- नक्की वाचा: मी चित्रकार झालो तर
कबुतराकडे पाहून त्या सासरवाशिनिला त्याचा मोह येतो. त्यावेळी, तिच्या मनात वाटून जातं की जर आपणही पक्षी असतो तर सहजपणे माहेरी गेलो असतो. त्या सासरवाशिनीच्या या कल्पनेतील पक्षी होण्याच्या स्वप्नावर ती कविता अवलंबून होती.
त्या कवितेतील सासरवाशिनीच्या मनातील पक्षी झाल्यानंतरच्या कल्पना इतक्या आकर्षक होत्या की ती कविता बाईंनी शिकवल्यानंतर मलाही त्यावेळी पक्षी होण्याची आस लागली होती. आज विज्ञानामुळे मानवाला विमानाच्या माध्यमाने गगनात झेप घेणे खूप सोपे झाले आहे. पण, पक्षी होऊन निळ्याभोर आभाळात विहार करण्याची, उंच आकाशात मुक्तपणे भरारी घेण्याची मज्जा काही वेगळीच असते.
अनेक कवींनी देखील आकाशाची ही ओढ आपल्या काव्यातून व्यक्त केली आहे. अशीच एक कवयित्री स्वतःचा ‘आकाशवेडी’ म्हणून उल्लेख करताना एका कवितेमध्ये सुंदर काव्य लिहते.
मी पक्षी झाले तर कविता
“वाटे मजला पक्षी व्हावे,
स्वच्छंद आकाशी उडावे.
नको चिंता व्यर्थ कशाची,
आनंदे नभासी भिडावे.”
“अशी झेप घ्यावी अन असे सुर गावे,
घुसावे ढगामधी बाणपरी.
ढगांचे ते अबोली, भुरे, केशरी रंग,
माखून घ्यावेत पंखांपरी.”
या कवयित्रीच्या मनातील पक्षी होण्याची इच्छा अनोखी आहे जणू! मला एक गोष्ट इथ सांगावीशी वाटते. पक्षांमध्ये मी जर चिमणी झाले असते तर कितीही पाऊस आला तरी लहानपणीच्या गोष्टींमध्ये असणाऱ्या लबाड कावळ्याला मी अजिबात माझ्या घरट्यात घेणार नाही. मला सापडलेला मोती तर त्याला मुळीच दाखवणार नाही.
- नक्की वाचा: पाऊस पडला नाही तर
माझ्या मनातील हे चिमणीच हट्टी रुप पाहून मलाच गंमत वाटते! पण, मी चिमणी झाले तर माणसांच्या घरातील किंवा गाडीवरील आरशांवर अजिबात चोच मारणार नाही, कारण मला माहित असेल की ते माझच प्रतिबिंब आहे. तस तर मला पोपट व्हायला ही आवडेल. समस्त बाळगोपालांचा आवडता पक्षी. माझ्या चतुर आणि मधूर वाणीने मी सर्वांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेईन.
पण, दुसरीकडे मला भीतीही वाटते की मला जर या लोकांनी पिंजऱ्यात कैद करून ठेवलं तर! नको रे बाबा, विचार केला तरी अंगावर काटे उभे राहतात. त्यापेक्षा मी कोकिळा होईन. मी जर कोकिळा पक्षी झाले तर वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देण्याचं काम मी अगदी आनंदान आणि उत्सुकतेने करेन.
कोकिळा झाल्यानंतर फक्त ‘कुहू कुहु’ एवढंच गाणं मी न गाता इतर गाणी देखील गाण्याचा प्रयत्न करेन. जर मी चंडोल पक्षी झाले तर उगवत्या सूर्यनारायणाच्या स्वागताला मी सज्ज होईन आणि मला जर मयुर अर्थात मोर होता आल तर पावसाच्या जलधारांसोबत आणि विजेच्या ताशांवर नाचण्याचा मला आनंद उपभोगता येईल.
पण, एका गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जर मी खरोखरच पक्षी झाले तर माझी गैरसोय देखील होईल. मला उडता येईल पण बोलता येणार नाही, हसता येणार नाही की रडता येणार नाही. माणसांप्रमाणे मला सण, उत्सव अथवा कोणतेही समारंभ साजरे करता येणार नाहीत. नवनवीन दागिने, कपडे यांची हौस मला फिटवता येणार नाही.
पाणीपुरी, भेळपुरी यांसारखे तोंडाला पाणी सुटेल असे पदार्थ मला खाता येणार नाहीत. उडण्याची नवलाई संपली की मग पक्षी होण्याचा देखील कंटाळा येईल. पण, अशा कितीही नकारात्मक गोष्टी असल्या तरीदेखील मला पक्षी व्हायला आवडेल!
शेवटी, मी पक्षी झाले तर माझे जीवन आनंदाने, सुखाने आणि आयुष्यात मिळणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये समाधान मानून मौज – मजेने व्यथित करेन. पक्षी झाल्यावर देखील इतरांना गरजेच्या वेळी मदत करण्याची भावना मी माझ्या मनात निर्माण करेन तसेच, कुणालाही त्रास होईल असे वर्तन करणार नाही. सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागण्याचा प्रयत्न करेन.
– तेजल तानाजी पाटील
बागीलगे, चंदगड.
आम्ही दिलेल्या me pakshi zalo tar nibandh in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “मी पक्षी झालो तर निबंध” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mi pakshi zalo tar essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mi pakshi zalo tar nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण mi pakshi zalo tar essay in marathi language या लेखाचा वापर if i will become a bird essay in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट