इंदुरीकर महाराज यांची माहिती Indurikar Maharaj Biography in Marathi

Indurikar Maharaj Biography in Marathi – Indurikar Maharaj Information in Marathi इंदुरीकर महाराज यांची माहिती आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आता इंदुरीकर महाराज म्हटलं तर महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये त्यांचे चाहते पाहायला मिळतील त्याचं कारण म्हणजे त्यांचं विनोदी आणि सत्य परिस्थितीची जाणीव करून देणारा किर्तन. इंदुरीकर महाराज हे असे कीर्तनकार आहेत. जे आपल्या विनोदी स्वभावातून लोकांचे मनोरंजन करत समाजामध्ये प्रबोधन घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र मध्ये यांचे कीर्तन बरेच प्रसिद्ध आहे.

Indurikar Maharaj Biography in Marathi
Indurikar Maharaj Biography in Marathi

इंदुरीकर महाराज यांची माहिती – Indurikar Maharaj Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)निवृत्ती काशिनाथ देशमुख
जन्म गाव (Birth Place)अहमदनगरच्या इंदुरी या गावात
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार

जन्म

संपूर्ण नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख. अहमदनगरच्या इंदुरी या गावात निवृत्ती देशमुख यांचा जन्म झाला या गावाच्या नावावरूनच त्यांना इंदुरीकर असं नाव पडलं आणि महाराष्ट्रात ते इंदुरीकर महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. इंदुरीकर महाराज जरी मूळचे इंदुरी येथील असले तरी सध्या ते संगमनेर येथील ओझर खुर्द जिल्हा अहमदनगर येथे स्थायिक आहेत.

इंदुरीकर महाराज यांनी बी.एससी व बी.एडी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल आहे. इंदुरीकर महाराज यांच्या कुटुंबाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला आहे त्यामुळे इंदुरकर महाराज यांनी देखील सुरूवातीचे काही काळ शिक्षणानंतर शिक्षक म्हणून सेवा दिली. आणि पुढे त्यांनी समाजप्रबोधन करण्याच्या उद्देशाने कीर्तन हे माध्यम निवडलं.

इंदुरीकर महाराज यांची पत्नी शालिनीताई निवृत्ती देशमुख या देखील एक कीर्तनकार आहेत. त्यांचा मुलगा कृष्णा आणि मुलगी ज्ञानेश्वरी हे देखील आता वारकरी संप्रदायाचा अभ्यास करू लागले आहेत.

इंदुरीकर महाराज एक प्रसिद्ध कीर्तनकार

मित्रांनो इंदुरीकर महाराज यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज भासत नाही कारण इंदुरीकर महाराज हे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये परिचयाच आहे. इंदुरीकर महाराज हे सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी, गावी जाऊन इंदुरीकर महाराज किर्तन करतात त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी हजारो लोक गर्दी करतात.

आजकालची पिढी सामाजिक माध्यमांमध्ये इतकी गुंतत चालली आहे की ही सामाजिक माध्यमे तरुणांना आभासी जगाची स्वप्न दाखवतात आणि सत्य परिस्थिती पासून त्यांना दूर ठेवतात परंतु अशा वेळी कीर्तनकारांची उत्पत्ती होते जे समाजाला सत्य परिस्थितीची जाणीव करून देतात व समाजामध्ये प्रबोधन घडवून आणतात.

असेच आपल्या सर्वांचे लाडके इंदुरीकर महाराज हे आपल्या विनोदी शैलीच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करत सामाजिक अडचणींवर प्रश्न उठवत टीका करत समाजाला आपल्या हक्कांची जाणीव करून देतात. मग तो सामाजिक विषय असो किंवा राजकीय विषय असो समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनाच्या माध्यमातून करत आहेत.

इंदुरीकर महाराज वयाच्या बाविसाव्या वर्षापासून कीर्तन करीत आहेत. इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन सर्वांना आवडण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून ते लोकांचा मनोरंजन करतात व लोकांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देतात समाजामध्ये काय बरोबर काय चूक आहे हे भोळ्याभाबड्या जनतेपर्यंत पोहोचवण्याच ते काम करतात.

इंदुरीकर महाराज एक शिक्षित व्यक्ती आहेत. त्यांना समाजात चालणाऱ्या गोष्टींची चांगलीच माहिती आहे. इंदुरीकर महाराज यांचे अनेक चाहते आहेत. अगदी लहानांपासून, तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत त्यांचे चाहते आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये इंदुरीकर महाराज यांनी घर केल आहे समाजामध्ये इंदुरीकर महाराज यांना मान सन्मान दिला जातो व त्यांची एक वेगळी जागा आहे.

महाराष्ट्रातील एक उत्तम उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून इंदुरीकर महाराज यांना संबोधलं जातं त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची कीर्तन करण्याची शैली. आपल्या समाजात अजूनही बर्‍याच जुनाट रूढी परंपरा मानल्या जातात अजूनही बरेच लोक मुलींवर अत्याचार करतात, मुलींची बाजू म्हणजे मुलींनी नेहमी मान खाली घालून चालयच, हुंडा घेणे, घरातील स्त्रियांना वर हात उचलणे या सगळ्या गोष्टींवर आळा घालण्याचं काम इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनाच्या माध्यमातून करत आहेत.

समाजाला काय चूक आहे काय अचूक आहे या गोष्टींची जाणीव करून देत आहे. समाजाला मानसिक रित्या विकासाच्या मार्गावर नेहण्याच काम इंदुरीकर महाराज करत आहेत. इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ऐकून बऱ्याच जणांनी आपल्या आयुष्याचा मार्ग बदलला आहे. महाराजांचे कीर्तना मुळे घराघरांमध्ये होणारी भांडणं थांबली, बऱ्याच ठिकाणी मध्यपानावर आळा घालण्यात आला,‌ इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या कीर्तनातून बऱ्याच लोकांना व्यसनापासून थांबवलं बऱ्याच लोकांना उपजीविकेसाठी मार्ग दाखवला.

सोशल मीडियावर देखील इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे फार चाहते आहेत. इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे सर्वांनाच वेड लावल आहे. इंदुरीकर महाराज कीर्तनच्या माध्यमातून समाजातील जातिभेद, उच्चनीचता, स्त्रियांच्या समस्या, शेतकर्‍यांच्या समस्या, व्यसन मुक्ती, राजकीय गोष्टी, अन्याय इत्यादी घटकांवर भाष्य करतात.

इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनातून बोचरा विनोद व सत्य परिस्थितीची जाणीव होते. कीर्तनकार महाराज वेगवेगळ्या गावी जाऊन किर्तन करतात दिवसाला ते साधारण तीन कीर्तन करतात. दिवसाला तीन कीर्तन म्हणजे महिन्याला साधारण ऐंशी किंवा नव्वद कीर्तन करतात. इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन इतक प्रसिद्ध आहे की त्यांचे आजच्या कीर्तनाची तारीख दोन वर्ष आधीच ठरलेली असते.

इंदुरीकर महाराज दररोज सहाशे किलोमीटर ते हजार किलोमीटर पर्यंतचा प्रवास करतात. इंदुरीकर महाराज हे एक विनोदी कीर्तनकार आहेत त्यासोबत समाज प्रबोधन करतात परंतु यासोबतच ते समाज सेवा देखील करतात. होतकरू, हतबल, गरीब मुलांसाठी इंदुरीकर महाराज यांनी शाळा सुरु केली आहेत.

कीर्तनातून इंदुरीकर महाराज यांना जे काही उत्पन्न मिळते त्याचा वापर ते त्यांनी स्वतः सुरू केलेल्या शिक्षण संस्थेसाठी करतात. इंदुरीकर महाराज यांनी ज्ञानेश्वर सेवा माऊली शिक्षण संस्था सुरू केली आहे. ही संस्था महाराजांनी २००५ मध्ये सुरू केली आहे. ज्यामध्ये ते लाखो मुलांना ज्ञानदान देतात. या शिक्षण संस्थेतर्फे शाळेतील सर्व शिक्षण अगदी मोफत दिलं जातं.

या शाळेमध्ये फक्त पाचवी ते दहावी या इयत्ताची २५० रुपये इतकीच फि घेतली जाते. या याव्यतिरिक्त कोणतीही ॲडमिशनची फी किंवा दाखल्याची फी, किंवा चाचणीची फी देखील घेतली जात नाही. इंदुरीकर महाराज यांनी सुरू केलेल्या या शाळेमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. या शाळेत ११ संगणक आहेत.

या शाळेमध्ये तब्बल दोनशे खोल्या आहेत आणि ही शाळा डिजिटल शाळा आहे. या शाळेच फर्निचर इंदुरीकर महाराजांची पत्नी यांनी स्वतः कीर्तन करून केलेल आहे. सध्या या शाळेची देखरेख इंदुरीकर महाराज यांच्या भावाच्या हाताखाली आहे. अंगावर पांढरा सदरा, खाली पांढरे धोतर डोक्यावर ती पांढरी टोपी अगदी साधा पोशाख असणारे इंदुरीकर महाराज हे समाजात खूप मोठं काम करत आहेत.

त्यांचं राहणीमान इतक साध आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की हे काय समाज प्रबोधन करत असतील परंतु इंदुरीकर महाराज कीर्तनच्या माध्यमातून समाजामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणत आहेत. त्यांच्या कीर्तनातून अनेक लोकांनी उपदेश घेऊन आयुष्यामध्ये यशस्वी झाले आहेत.

महाराष्ट्र मध्ये अनेक कीर्तनकार आहेत परंतु जी मजा इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ऐकण्यात आहे ती कुठल्या किर्तन करांमध्ये असेल याची शंकाच वाटते. इतर कीर्तनकारांपेक्षा इंदुरीकर महाराजांची किर्तन करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे ते इतके प्रसिद्ध आहेत. सध्या तर संपूर्ण जगभरामध्ये कोरोनाच सावट आहे.

सोशल मीडियावर हे खाल्लं की कोरोना होत नाही ते खाल्ले की कोरोना होत नाही अशा वेगवेगळ्या विचित्र अफवा पसरवल्या जात होत्या आणि कोरोना-या महामारीमुळे घाबरलेली भोळीभाबडी जनता भितिच्या पोटी या अंधश्रद्धांना बळी पडत होती यावर देखील इंदुरीकर महाराज यांनी भाष्य केलं होतं की अशा कुठल्याही अंधश्रद्धांना बळी पडू नका आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हे उदाहरण घेताच तुम्हाला समजलं असेल की इंदुरीकर महाराज अशा वेगवेगळ्या अंधश्रद्धांवर, वेगवेगळ्या समस्यांवर, राजकीय प्रश्नांवर, सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत असतात आपल्या कीर्तनातून ते अन्यायाविरुद्ध अंधश्रद्धा विरुद्ध आवाज उठवतात. दारूच्या अड्ड्यावर बसणारे आता किर्तनाला येऊन बसत आहेत. तमाशा बघणारे आता किर्तन बघत आहे याचं एकमेव कारण म्हणजे इंदुरीकर महाराज.

आपल्या समाजाला आज इंदुरीकर महाराज यांच्या सारख्या एका कीर्तनकाराची खरच गरज आहे. इंदुरीकर महाराज यांनी आज पर्यंत इथपर्यंत पोचायला अनेक खस्ता खाल्ल्या आहेत सत्याचा लढा हा कधीच सोपा नसतो. सत्याला त्रास आहे पण विजय निश्चित आहे. हे इंदुरीकर महाराज यांनी साध्य करून दाखवल.

आम्ही दिलेल्या Indurikar Maharaj Biography in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर इंदुरीकर महाराज यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या indurikar maharaj information in marathi wikipedia या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of indurikar maharaj in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये indurikar maharaj information in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!