कच्छी दाबेली रेसिपी मराठी Dabeli Recipe in Marathi

Kacchi Dabeli Recipe in Marathi कच्छी दाबेली रेसिपी मराठी दाबेली हा एक पदार्थ आहे जो भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट आहे आणि हा पदार्थ भारताच्या काही ठिकाणी अगदी आवडीने बनवला जातो आणि खाल्ला जातो. दाबेली हा पदार्थ आपल्याला मुंबई आणि गुजरात मध्ये रस्त्यावरील खायच्या गाड्यांवर हमखास मिळतो आणि हा पदार्थ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनवला जातो. दाबेली म्हणजे बटाट्च्या एक मसालेदार सारण बनवले जाते आणि पावाला ग्रीन चटणी किंवा तिखट चटणी आणि लाल चिंच लावली जाते तसेच त्यामध्ये बटाट्याचे सारण भरले जाते. दाबेली हा पदार्थ आपल्याला परवडणारा आहे.

तसेच या पदार्थाची चव देखील समाधान कारक आहे कारण हा पदार्थ आंबट, गोड आणि तिखट अशी चव असते. हि रेसिपी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी मोठी असली तरी हा पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला असे वाटते कि आपण वापरलेल्या साहित्याचे काही तरी मोल झाले.

दाबेली हि रेसिपी इतकी प्रसिध्द आहे कि हि लहानांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांना आवडते म्हणून आज आपण या लेखामध्ये तिखट अमाब आणि गोड अश्या तिन्हीही स्वाद असणारी दाबेली रेसिपी कशी बनवायची.

 dabeli recipe in marathi
dabeli recipe in marathi

कच्छी दाबेली रेसिपी मराठी – Dabeli Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ३० ते ३५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
एकूण लागणारा वेळ५५ मिनिटे
पाककलाभारतीय

दाबेली महणजे काय ?

दाबेली म्हणजे बटाट्च्या एक मसालेदार सारण बनवले जाते आणि पावाला ग्रीन चटणी किंवा तिखट चटणी आणि लाल चिंच लावली जाते तसेच त्यामध्ये बटाट्याचे सारण भरले जाते.

दाबेली रेसिपी – kacchi dabeli recipe in marathi

मुंबई आणि गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात बनवला जाणारा हा स्ट्रीट फूड या प्रकारातील पदार्थ आता भारतामध्ये अनेक भागांमध्ये बनवला जातो. हा पदार्थ बनवण्यासाठी सोपा असला तरी तो बनवण्यासाठी वेळ लागतो आणि साहित्याची यादी देखील मोठी असते. चला तर मग पाहूयात दाबेली रेसिपी कशी बनवायची आणि ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ३० ते ३५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
एकूण लागणारा वेळ५५ मिनिटे
पाककलाभारतीय

दाबेली बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make dabeli recipe 

दाबेली बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी हि थोडी मोठी असते त्यामुळे दाबेली बनवण्यासाठी लागणारे सगळेच साहित्य आपल्याला घरामध्ये उपलब्ध असू शकत नाही त्यामुळे ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चाल तर मग पाहूयात दाबेली बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

  • ५ ते ६ पाव ( लादी पाव किंवा पाव भाजीचे पाव ).
  • २ मध्यम आकाराचे बटाटे ( उकडलेले आणि सोलून कुस्करलेले ).
  • २ ते ३ चमचे दाबेली मसाला ( घरी बनवलेला किंवा विकत आणलेला ).
  • १/२ छोटी वाटी डाळिंबाचे दाने.
  • १ वाटी भाजून, सोलून पाकळ्या केलेले शेंगदाणे.
  • १/२ चमचा हळद.
  • १ चमचा लाल मिरची पावडर.
  • १ वाटी बारीक चिरलेला कांदा.
  • कोथिंबीर ( आवश्यकतेनुसार )
  • १ छोटी वाटी हिरवी चटणी.
  • १ छोटी वाटी गोड चटणी किंवा चिंच चटणी.
  • बारीक शेव ( सजावटीसाठी ).
  • २ चमचे तेल.
  • तूप किंवा बटर ( दाबेली भाजण्यासाठी ).

दाबेली बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make dabeli recipe 

  • दाबेली बनवताना सर्वप्रथम आपल्याला जे साहित्य लागते ते सर्व साहित्य काढून घ्या तसेच या रेसीपीसाठी काही चटण्या लागतात त्या बनवून घ्या.
  • सर्वप्रथम दाबेली साठी लागणारी हिरवी चटणी बनवण्यासाठी १ मोठी वाटी कोथिंबीर, २ ते ३ हिरव्या मिरच्या, सोललेला लसून, २ चमचे लिंबू रस, चवीनुसार मीठ आणि साखर आणि थोडेसे पाणी घालून ती मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पेस्ट करून घ्या आणि ती एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवा.
  • आता चीच चटणी बनवण्यासाठी १/२ छोटी वाटी चिंच घ्या आणि त्यामध्ये २ ते ३ चमचे किसलेला गुल घाला आणि त्यामध्ये एक वाटी पाणी घालून मध्यम आचेवर शिजवून घ्या आणि शिजवतेवेळी त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घाला आणि ते थोडे होईपर्यंत शिजवा आणि मग गॅस बंद करा आणि ते मिश्रण थोडे थंड झाले कि ते गाळण्यामध्ये ओतून चिंचेचा रस घालून घ्या. तुमची गोड आणि आंबट चिंच चटणी तयार झाली.
  • आता आपण सारण बनवू, सारण बनवण्यासाठी एक भांडे घ्या आणि ते भांडे गॅसवर अमाध्याम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि ते गरम झाले कि त्यामध्ये दोन चमचे तेल घाला आणि मग ते गरम झाले त्यामध्ये कांदा घाला आणि तो कांदा थोडावेळ भाजा.
  • आता यामध्ये हळद, तिखट, दाबेली मसाला घाला आणि ते मिश्रण तेलामध्ये चांगले मिक्स करून १ सेकंदासाठी भाजा. मग त्यामध्ये कुस्करलेला बटाटा, हिरवी चटणी, लाल चटणी, शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ घालून ते मिश्रण चांगले एकत्र करा आणि त्याला एक वाफ येवू द्या.
  • सारण तयार झाले कि गॅस बंद करा आणि सारण बाजूला ठेवा.
  • लादी पाव घ्या आणि आपण जसे वडा पाव सर्व्ह करायला पाव कट करतो तसे पाव कट करून घ्या.
  • आता बटाट्याच्या मिश्रणाचे चपटे छोटे छोटे गोल थापा ( जे चपटे गोल पावमध्ये बसतील ) आणि त्यावर डाळिंबाचे दाने आणि आणि थोडे शेंगदाने लावा आणि ते बाजूला ठेवा ( टीप : या मिश्रणाचे ५ ते ६ चपटे गोळे होतील ).
  • मग कट करून ठेवलेले पाव घ्या आणि पावाच्या आतल्या वरच्या बाजूला लाल चटणी आणि खालच्या बाजूला हिरवी चटणी लावा आणि मग त्यामध्ये बटाट्याच्या सारणाच्या छोट्या टिक्क्या घाला आणि मग पावाच्या ३ कडांना लाल चटणी लावा आणि त्याला थोडे शेंगदाणे लावा आणि मग त्या तिन्ही कडा शेवमध्ये बुडवा.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर तवा गरम करण्यासाठी ठेवा आणि त्या तव्यावर तूप किंवा बटर घालून ते दाबेलीच्या दोन्ही बाजूला बटर किंवा तूप लावून पावाच्या दोन्ही बाजू भाजून घ्या.
  • आणि गरमागरम दाबेली त्यावर थोडे डाळिंबाचे दाने आणि शेव घालून सर्व्ह करा.

आम्ही दिलेल्या kacchi dabeli recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कच्छी दाबेली रेसिपी मराठी kacchi dabeli recipe बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dabeli recipe in marathi pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि kacchi dabeli masala recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये how to make kacchi dabeli recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!