काजू कतली रेसिपी मराठी Kaju Katli Recipe in Marathi

Kaju Katli Recipe in Marathi काजू कतली रेसिपी मराठी गोड पदार्थ फक्त म्हटलं तरी अनेक लोकांच्या तोंडाला पाणी सुटते कारण त्यांना गोड पदार्थ खूप आवडतात. ज्यामध्ये गुलाब जामून, श्रीखंड, बासुंदी, आम्रखंड, गाजर हलवा, रसमलाई हे पदार्थ बऱ्याच लोकांच्या आवडीच्या यादीतील ठरलेले पदार्थ आहेत तसेच काजू कतली हा बर्फितील एक गोड प्रकार देखील गोड खाणाऱ्या लोकांच्या आवडत्या यादीतील पदार्थ आहे. काजू कतली हा एक पारंपारिक पदार्थ आहे आणि हा पदार्थाला भारतामध्ये सर्वात जास्त मागणी असणारू मिठाई प्रकार आहे जो आपण सणांमध्ये, आनंदाच्या वेळी, घरगुती कार्यक्रमांमध्ये जेवणामध्ये वाढण्यासाठी विकत आणतो.

तसेच तुम्ही जर भारतामध्ये भारताच्या उत्तरेकडे राहत असाल तर तुम्हाला दिवाळीचे गिफ्ट म्हणून मिठाईचे बॉक्स मिळतात आणि त्यामध्ये बहुतेकदा काजू कतलीची बर्फीच असते. काजू कतली घरी बनवणे तेवढे सोपे नाही परंतु जर तुम्ही काजू कतली २ ते ३ वेळा घरी बनवून पहिली तर ती तुम्हाला चांगल्या प्रकारे जमू शकते.

काजू कतली हि लहानांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांना आवडते पण बहुतेक लोक ती घरामध्ये बनवण्याचा प्रयत्न करत नाहीत तर ते बाजारातून विकत आणतात पण जर आपण काजू कतली हा पदार्थ घरी बनवून पहा.

पहिल्यांदा बनवताना थोडी तुमची गडबड होईल परंतु दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा बनवताना ती चांगल्या प्रकारे बनवता येईल आणि घरी बनवलेली काजू कतली चवीला देखील खूप छान लागेल. चला तर आज या लेखामध्ये आपण काजू कतली रेसिपी कशी बनवायची.

Kaju Katli Recipe in Marathi
Kaju Katli Recipe in Marathi

काजू कतली रेसिपी मराठी – Kaju Katli Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणार वेळ२० ते २५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ मिनिटे
पाककलाभारतीय

काजू कतली रेसिपी – how to make kaju katli recipe in marathi

काजू कतली हि मिठाई भारतामधील प्रसिध्द मिठाई पैकी एक आहे आणि हा पदार्थ भारतामध्ये बहुतेक भागामध्ये लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत आवडीने खातात आणि हा पदार्थ आपण घरगुती समारंभांना, सणाला, आनंदाच्यावेळी बाजारातून आणतो. काजू कतली बनवण्यासाठी सोपी नसल्यामुळे भारतातील बहुतेक लोक काजू कतली हि मिठाई बाजारातून विकत आणून खातात.

पण जर आपण घरामध्ये २ ते ३ वेळा प्रयत्न करून बघितली तर आपल्याला सुध्दा बाजारातील काजू कतली प्रमाणे घरामध्ये देखील काजू कतली बनवता येते. चला तर पाहूयात काजू कतली कशी बनवायची आणि ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणार वेळ२० ते २५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ मिनिटे
पाककलाभारतीय

काजू कतली बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make kaju katli recipe 

काजू कतली बनवण्यासाठी लागणारे साहित्य जसे कि काजू, दुध, पिठी साखर, तूप, वेलची पावडर हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते त्यामुळे आपल्याला काजू कतली बनवण्यासाठी कोणतेही साहित्य बाजारातून आणावे लागत नाही.

परंतु जर तुम्ही काजू कतली वर सजावट करणार असाल तर त्यासाठी चांदीचा वर्ख पेपर गरजेचा असतो आणि तो आपल्याला बाजारातून विकत आणावा लागते. चला आता आपण काजू कतली बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • २ वाटी काजू पावडर.
  • १ वाटी पिठी साखर.
  • अर्धी वाटी दुध किंवा पाणी.
  • २ ते ३ चमचे तूप.
  • १ चमचा वेलची पावडर.
  • चंदीचा वर्ख पेपर ( सजावटीसाठी )

काजू कतली बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make kaju katli 

  • आता आपण वर दिलेले साहित्य वापरून काजू कतली कशी बनवायची ते पाहणार आहोत.
  • सर्वप्रथम काजू मिक्सरच्या भांड्यामध्ये घेवून मिक्सरला फिरवून त्याची एकदम बारीक पावडर करा आणि ती बनवलेली पावडर चाळणीने चाळून घ्या म्हंजे आपल्याला एकदम बारीक पावडर मिळेल. आता हि पावडर थोड्या वेळासाठी बाजूला एका वाटीमध्ये काढून ठेवा.
  • आता एक पॅन घ्या आणि तो पॅन गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि गरम झाला कि त्यामध्ये अर्धी वाटी दुध घाला आणि ते थोडे गरम होऊ द्या. मग त्यामध्ये साखर घाला आणि ती पिठी साखर २ ते ३ मिनिटे हलवा मग त्यामध्ये वेलची पावडर घाला आणि ते चांगले एकत्र करा.
  • आता त्या दुधामध्ये काजू पेस्ट घाला आणि ते चांगले हलवा आणि हलवताना त्यामध्ये गाठी होणार नाहीत याची काळजी घ्या.
  • आता हे मिश्रण चांगले १० ते १५ मिनिटे मंद आचेवर एकत्र केल्यानंतर ते घट्ट होऊ लागेल ते थोडे घट्ट झाले कि लगेच गॅस बंद करा.
  • आता एक पसरट ताट घ्या ज्यामध्ये आपल्याला काजू कतलीचे पीठ थापता येईल आणि त्या ताटाच्या उलट्या बाजूला तूप लावून घ्या.
  • आता जर काजूचे मिश्रण थोडे गार झाले असेल तर ते उलट्या ताटावर काढा आणि ते पातळ थापून घ्या ( काजूचे मिश्रण जास्त थंड होऊ देवू नका कारण ते थंड झाले तर ते थापता येणारा नाही कारण त्याचा थंड झाल्यावर घट्ट पणा वाढतो म्हणून ज्यावेळी काजूचे मिश्रण गरम असते त्यावेळी ते मऊ असते आणि मऊ मिश्रण चांगले थापता येते त्यामुळे थोडे थंड झाले कि मिश्रण लगेच थापा ). ( टीप : तुम्ही हे मिश्रण थापण्याऐवजी लाटण्याने लाटू देखील शकता. )
  • आणि मग त्या लाटलेल्या काजूच्या पिठलं चांदीचा वर्ख पेपर लावा आणि त्याच्या शंकरपाळी आकाराच्या वड्या पडून घ्या.
  • तुमची गोड गोड काजू कतली तयार झाली.

काजू कतली बनवण्यासाठी दिलेल्या काही टिप्स – tips to make kaju katli

  • तुम्हाला जर काजू कतली वेगवेगळ्या फ्लेवराची बनवायची असेल तर तुम्ही त्यामध्ये फ्लेवर घालू शकता जसे कि मँगो फ्लेवर.
  • काजू कतलीला चांदीचा वर्ख पेपर न वापरता जर आपण काजूच्या लाटलेल्या मिश्रणावर जर केसर धागे टाकले तर ते छान दिसतात आणि सजावट देखील होते.
  • काजू कतली बनवण्यासाठी काजूची पावडर एकदम बारीक असावी.
  • काजूचे मिश्रण मंद आचेवर चांगले वाफवावे.
  • काजू कतलीमध्ये आपण थोडासा खावा देखील वापरला तरी चालतो.

आम्ही दिलेल्या kaju katli recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर काजू कतली रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या homemade kaju katli recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि kaju katli recipe in marathi by madhura माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kaju katli recipe in marathi video Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!