कपिल देव यांची माहिती Kapil Dev Information in Marathi

Kapil Dev Information in Marathi कपिल देव यांची माहिती क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध आणि नावाजलेले खेळाडू म्हणजे कपिल देव. कपिल देव हे अष्टपैलू भारतीय खेळाडू असून यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंड मध्ये भारताने आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. एक ऑल राऊंडर म्हणून क्रिकेट विश्वामध्ये त्यांनी आपली ओळख निर्माण केली. उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी, अचूक नेतृत्व, खेळाच्या बाबतीत असणारी दूरदृष्टी या सगळ्या घटकांच्या आधारे क्रिकेट क्षेत्रांमध्ये त्यांनी भरभरून नाव कमावलं आणि एक   दिग्गज खेळाडू म्हणून नावाजले जाऊ लागले. कपिल देव यांनी क्रिकेट क्षेत्रांमध्ये दिलेले योगदान अधिक आहे.

कपिल देव हे भारतीय क्रिकेटपटू, समालोचक, क्रिकेट विशेषज्ञ, अभिनेता म्हणून ओळखले जातात. आजच्या ब्लॉग मध्ये आपण कपिल देव यांच्या जीवनाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

kapil dev information in marathi
kapil dev information in marathi

कपिल देव यांची माहिती – Kapil Dev Information in Marathi

पूर्ण नाव (Name)कपिल देव
जन्म (Birthday)६ जानेवारी १९५९
जन्म गाव (Birth Place)चंदीगड
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

जन्म

भारतातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांचा जन्म चंदीगड येथे ६ जानेवारी १९५९ रोजी झाला. रामलाल निखंज आणि राजकुमारी लाजवंती हे कपिल देव यांच्या आई वडिलांचे नाव असून या दाम्पत्या पासून झालेल्या सात अपत्यांपैकी कपिल देव हे सहावे अपत्य होते‌. त्यांचे वडील राम लाल हे फाळणीच्या वेळी चंदीगडला येऊन स्थलांतरित झाले.

त्यांच्या वडिलांच बांधकाम साहित्य व लाकडे पुरवण्याचा व्यवसाय होता. प्राथमिक शिक्षण चंदीगड येथील डी.ए.व्ही या शाळे मधूनच पूर्ण झालं. कपिल देव यांच पुढील शिक्षण सेंट एडवर्ड कॉलेजमधून पूर्ण झालं. इसवी सन १९८० मध्ये कपिल देव यांचा विवाह रोमी भाटिया यांच्या सोबत झाला. पुढे त्यांना एक कन्यारत्न देखील प्राप्त झालं.

कपिल कपिल देव यांच क्रिकेट विश्वातील योगदान

कपिल देव अगदी बारा वर्षांचे असल्यापासून त्यांना क्रिकेट या खेळाविषयी प्रचंड प्रेम होतं. प्रसिद्ध कोच देश प्रेम आझाद यांच्या नेतृत्वाखाली कपिले यांनी क्रिकेटचे धडे गिरवले. कपिल देव यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वप्रथम सामना १९७५ साली नोव्हेंबरमध्ये खेळला. पंजाब विरुद्धच्या या सामन्यांमध्ये सहा खेळाडूंना बाद करून पंजाबला फक्त ६३ धावा मिळवून दिल्या.

पुढील तीन सामान्या मधून त्यांनी बारा खेळाडू बाद केले. १९७६-७७ च्या हंगामामध्ये जम्मू-काश्मीरच्या विरोधात खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये कपिल देव यांनी समोरच्या संघाला ३६ धावा देत आठ खेळाडू बाद केले. हरियाणा कडून पदार्पण करत हा सामना हरियाणाने जिंकला.

या हंगामामध्ये बंगाल विरुद्धच्या सामन्यांमध्ये कपिल देव यांनी दुसऱ्याच डावामध्ये फक्त नऊ षटकांत २० धावा दिल्या आणि आठ खेळाडू बाद केले. या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे बंगालला फक्त एकोणीस षटकांत सर्वबाद ५८ धावा करता आल्या. १९७८ – १९७९ या हंगामात इराणी चषकाच्या सामन्यांमध्ये फलंदाजीसाठी आठवा क्रमांक पटकावून कपिल देव यांनी ६२ धावा काढल्या होत्या.

याशिवाय दुलीप चषकाच्या अंतिम सामन्यांमध्ये सात खेळाडूंना बाद करत उत्तर विभागाच्या संघात प्रवेश मिळवला आणि याच हंगामामध्ये कपिल यांनी आपल्या पहिला कसोटी सामना देखील खेळला होता. १९७९-८० या हंगामात कपिलदेव यांनी दिल्ली विरुद्ध १९३ धावाची खेळी करत आपलं पहिलं प्रथमश्रेणी शतक गाठलं.

हरियाणा संघाचा कर्णधार म्हणून या हंगामात त्याची निवड करण्यात आली होती. त्याच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत विजय मिळवला होता. १९९०-९१ च्या हंगामामध्ये रणजी सीझनमध्ये हरियाणा साठी खेळताना आपल्या संघाला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यात कपिल यशस्वी ठरले.

बंगाल विरुद्धच्या उपांत्य सामन्यात १४१ धावांनी आणि संघाला ६०५ धावांचा टप्पा मिळवून दिला याशिवाय गोलंदाजीमध्ये पाच खेळाडूंना बाद केलंऋ रणजी फायनलचा सामना हा लक्षवेधी ठरला. कारण यामध्ये कपिल देव, चेतन शर्मा, अजय जडेजा यासारखे दिग्गज हरियाणा संघातून खेळत होते.

तर संजय मांजरेकर, विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, सलील अंकोला यांन सारख्या खेळाडूंनी मुंबई संघामध्ये हजेरी लावली होती. मुंबई संघाला पराभूत करून हरियाणा संघाचा विजय झाला. १ ऑक्टोंबर १९७८ रोजी फैसलबाद येथे पाकिस्तान विरोधात खेळल्या गेलेल्या क्रिकेट कसोटी सामन्यांमध्ये कपिलदेव यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केलं आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने त्यांनी पाकिस्तानच्या सादिक मोहम्मदची पहिली विकेट घेतली.

३३ चेंडूमध्ये ५० धावांची खेळी करत सर्वात जलद अर्धशतक रचलं. कपिल देव यांनी क्रिकेट विश्वामध्ये अविस्मरणीय कामगिरी करून ठेवली आहे. वेस्टइंडीज संघाविरुद्धच्या आगामी मालिकेमध्ये कपिल देव यांनी फिरोजशहा कोटला दिल्ली येथे १२६ धावांची बाजी लावत १७ खेळाडू बाद केले होते.

एक दिवसीय क्रिकेट आणि कसोटी सामन्यांमध्ये कपिल देव यांचा नेहमीच सहभाग असायचा. त्याचां पहिला एक दिवसीय क्रिकेट सामना हा पाकिस्तानच्या विरोधात होता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये कपिलदेव यांनी २८ खेळाडूंना बाद करत एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पद मिळवलं. कपिलदेव यांना दुखापत झाली असून देखील त्यांनी आपल लक्ष नेहमीच खेळावर ठेवलं.

ऑस्ट्रेलियाची मधली फलंदाजांची फळी बाद करत कपिल देव यांनी १६ षटकांमध्ये फक्त २८ धावा देऊन चार खेळाडू बाद करून भारतासाठी हा सामना जिंकून दिला होता. १९८२-८३ या दरम्यान झालेल्या विश्वचषक सामन्यामध्ये कपिल देव यांनी आपल्या भारताचे प्रतिनिधित्व केलं होतं. ३२ सामन्यांमध्ये ६०८ धावा आणि ३४ खेळाडूंची विकेट घेऊन क्रिकेट विश्वामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली.

१९८३ मध्ये भारताने झिंबाब्वे या देशाविरुद्ध क्रिकेटचा सामना खेळला होता. या खेळा मध्ये फलंदाजास सह फलंदाजी करत कपिल देव यांनी मदन लाल आणि रॉजर बिन्नी या खेळाडूंच्या साथीने आपल्या भारतीय संघाला एका वेगळ्या धावसंख्येवर नेलं होतं कपिल देव यांनी या सामन्यांमध्ये १०० चेंडूमध्ये शतक पटकावलं होतं या सामन्यात नऊ विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली होती.

१३८ चेंडूमध्ये १७५ धावा आणि त्यामध्ये नाबाद असा लढा देत हा सामना भारताने ३१ धावांनी जिंकला होता. उपांत्य फेरीमध्ये भारताचा सामना इंग्लंड सोबत होता या सामन्यांमध्ये कपिल देव यांनी पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करून तीन विकेट घेऊन इंग्लंडला २१३ धावांवर रोखून ठेवलं होतं आणि हा सामना भारताने जिंकून अंतिम फेरीमध्ये जाण्याचा टिकीट मिळवलं.

वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये वेस्टइंडीजने भारताला फक्त १८३ धावा करून दिल्या तर भारताने वेस्ट इंडिज चा संपूर्ण खेळ १४० धावांवर संपवला. हा सामना भारताने जिंकला भारताचा पहिलाच विश्वचषक होता. कपिलदेव यांनी या मालिकेमध्ये ३०३ धावा, बारा विकेट आणि सात झेल घेतले होते.

१९८७ पर्यंत क्रिकेट विश्वचषकात कपिलदेव यांना कर्णधार पदावर कायम ठेवण्यात आलं होतं त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये भारत पराभूत झाल्याने कपिलदेव यांना या पराभवासाठी जबाबदार ठरवण्यात आले त्यामुळे कपिल देव यांनी कर्णधार पदावरून राजीनामा दिला.

भारताचा वेगवान गोलंदाज म्हणून १९९० साली संघामध्ये कपिल देव यांचा समावेश करून घेतला होता. इसवी सन १९९९ मध्ये कपिल देव हे रीचर्ड हाडली चा विक्रम मोडत सर्वाधिक कसोटी विकेट घेणारे खेळाडू म्हणून ओळखले जाऊ लागले. कपिल देव अष्टपैलू खेळाडू आहेत ज्यांनी चार हजार कसोटी धावा आणि चारशे कसोटी क्रिकेटमध्ये घेतल्या आहेत.

१८४ धावांमध्ये कधीच धावबाद न होणारा खेळाडू म्हणून कपिलदेव यांची ओळख आहे. याशिवाय कपिल देव हे सर्वात युवा कसोटी क्रिकेटपटू आहेत ज्यांनी १००, २००, ३०० विकेट घेतल्या आहेत. कसोटी सामन्यांमध्ये नऊ विकेट घेणारा एकमेव कर्णधार असाही रेकॉर्ड कपिल देव यांनी मोडला आहे.

शिवाय कर्णधार म्हणून कसोटी सामन्यांच्या डावातील सर्वोत्तम गोलंदाजीची आकडेवारी धावा देत ९ विकेट्स. कपिल देव यांनी एक दिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये केलेले रेकॉर्ड म्हणजे १९७८ ते १९९४ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट- २५३. वर्ल्डकपच्या इतिहासात सहा किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करत करत सर्वाधिक धावा- १८५.

नाबाद वन डे इतिहासातील सहाव्या स्थानावर फलंदाजी करताना सर्वाधिक चेंडू खेळणे- १३८. कपिल देव हे अष्टपैलू होते त्यांनी दिल्लगी ये दिल्लगी, इकबाल, चेन कुली की मेन कुली या सगळ्या काही हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत याशिवाय आता कपिल देव यांच्या वर ८३ या नावाचा चित्रपट कबीर खान हे १९८३ मध्ये कपिल देव यांनी भारतातील पहिला विश्व चषक कसा जिंकून दिला याच्या वर आधारित काढत आहेत.

पुरस्कार

कपिलदेव यांना १९७९ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यानंतर १९८२ साली कपिल देव यांना भारताचा सर्वश्रेष्ठ मानला जाणारा पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आला. १९८३ मध्ये विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर. १९९१ मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

२००२ मध्ये विस्डेन शतकातील भारतीय क्रिकेटर हा अवॉर्ड त्यांना प्राप्त झाला होता. २०१० मध्ये आईसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम हा पुरस्कार देखील कपिलदेव यांना प्रदान करण्यात आला होता. २०१३ मध्ये सी के नायडू लाइफ टाइम अचीव्हमेंट या पुरस्काराने देखील कपिल देव यांचा सन्मान करण्यात आला होता.

२००८ मध्ये कपिल देव यांची लेफ्टनंट कर्नल भारतीय प्रादेशिक सेना. २०१९ मध्ये हरियाणाच्या क्रीडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून कपिल देव यांची नियुक्ती करण्यात आली होती.

आम्ही दिलेल्या kapil dev information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कपिल देव यांची माहिती मराठी kapil dev all information in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kapil dev cricketer information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of kapil dev in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kapil dev information in marathi for project Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!