वीरेंद्र सेहवाग यांची माहिती Virendra Sehwag Information in Marathi

Virendra Sehwag Information in Marathi वीरेंद्र सेहवाग यांची माहिती क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांचा जन्म दिनांक २० ऑक्टोबर १९७८ रोजी हरियाणामधील समृद्ध आणि एकत्रित अशा कुटुंबात झाला होता. वीरेंद्रचे वडील धान्याचा व्यवसाय करीत होते तर, त्यांच्या मातोश्री या गृहिणी होत्या. वीरेंद्रच्या परिवारात त्यांना दोन मोठ्या बहिणी व एक धाकटा भाऊ होता. त्यांना त्यांच्या लहानपणापासूनच क्रिकेट या खेळामध्ये रस होता, त्यामुळे त्यांनी कधीही अभ्यासाकडे जास्त लक्ष दिले नाही. वीरेंद्र यांनी आपले प्राथमिक शिक्षण अरोरा विद्या स्कूल, दिल्ली आणि जामिया मिलिया इस्मालिया कॉलेज, नवी दिल्ली येथून पूर्ण केले.

इसवी सन २००४ मध्ये त्यांनी आरती अहलावत या मुलीशी लग्न केले. सेहवागला लग्नानंतर आर्यवीर आणि वेदांत असे दोन मुलगे झाले. क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागच्या खाण्याच्या आवडी निवडीबद्दल बोलायचे म्हटल्यास, त्याला शाकाहारी जेवणाची खूप आवड आहे. खरंतर, ही आवड लक्षात घेऊनच त्यांनी दिल्लीमध्ये एक रेस्टॉरंट उघडले आहे. 

virendra sehwag information in marathi
virendra sehwag information in marathi

वीरेंद्र सेहवाग यांची माहिती – Virendra Sehwag Information in Marathi

पूर्ण नाव वीरेंद्र सेहवाग
जन्म२० ऑक्टोबर १९७८
राष्ट्रीयत्व भारतीय
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने ऑफ स्पिन
जन्मगावहरियाणा

बालपण

क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांचा जन्म दिनांक २० ऑक्टोबर १९७८ रोजी हरियाणामधील समृद्ध आणि एकत्रित अशा कुटुंबात झाला होता. वीरेंद्रचे वडील धान्याचा व्यवसाय करीत होते तर, त्यांच्या मातोश्री या गृहिणी होत्या. वीरेंद्रच्या परिवारात त्यांना दोन मोठ्या बहिणी व एक धाकटा भाऊ होता.

“अव्वल क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग हा भारत देशाचा असा एक फलंदाज आहे की जगातील प्रत्येक गोलंदाजाला त्याची भीती वाटते” इमरान खानच्या रिचर्ड हेडली आणि बॉब विलिस यांच्या हृदयात भीती तयार करणारे विव्हियन रिचर्ड्स यांचा हा विश्वास आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात युसूफ पठाणने एक आक्रमक खेळी खेळल्यानंतर पत्रकारांना सांगितले की, वीरेंद्र सेहवागच्या निर्भय आणि बिनधास्त शैलीने त्याला असे खेळण्याची प्रेरणा मिळाली.

“नवाफगडचा नवाब”, “मुलतानचा सुलतान” आणि “झेन मास्टर ऑफ मॉडर्न क्रिकेट” अशा निरनिराळ्या टोपण नावांनी ओळखल्या जाणार्‍या वीरेंद्र सेहवाग इसवी सन १९९९ मध्ये पाकिस्तान देशाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये सेहवागने एक धाव घेतली व दिली आणि नंतर गोलदाजी दरम्यान त्यांनी  तीन षटकांत ३५ धावा काढल्या. 

या सामन्यानंतर मात्र दीर्घकाळापर्यंत वीरेंद्र सेहवागचा संघात समावेश झाला नाही. जवळजवळ एक वर्षांनंतर म्हणजे डिसेंबर २००० मध्ये वीरेंद्र सेहवागला पुन्हा झिम्बाब्वेविरुद्धच्या घरच्या मालिकेत संघात स्थान देण्यात आले. यानंतर, ऑगस्ट २००१ मध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या तिरंगी मालिकेत वीरेंद्र यांनी डाव उघडताना कारकिर्दीतील पहिले अर्धशतक गाठले होते.

न्यूझीलंड विरुद्धच्या याच मालिकेत सेहवाग यांनी ६९ चेंडूत शतक गाठून आपले अनोखे कौशल्य सर्वांना दाखवले. मित्रहो, जोपर्यंत वीरेंद्र सेहवाग क्रीजवर राहील अगदी  तोपर्यंत क्रीजवर त्याच्या उपस्थितीची भीती स्पष्टपणे त्याच्या विरोधकांच्या कपाळावर दिसून येते. 

कसोटी सामना

वीरेंद्र सेहवाग यांनी इसवी सन २००२ मध्ये इंग्लंड आणि झिम्बाब्वेविरुद्ध घरची मालिका खेळली आणि दुसर्‍या कसोटी सामन्यात शतक ठोकले. यांनतर, इसवी सन २००३ मध्ये त्यांनी वेस्ट इंडीज विरुद्धची पहिली मुख्य मालिका खेळली, ज्यामध्ये  त्याने १४० धावा पूर्ण केल्या आणि शतक ठोकले. त्याच्या या कामगिरीसाठी त्यावेळी त्याला सर्वोच्च गुण मिळविण्याचे शीर्षक देखील मिळाले होते.

याशिवाय, वीरेंद्र सेहवाग यांनी इसवी सन २००३ मध्ये मोहाली याठिकाणी न्यूझीलंडविरुद्ध १३० धावा पूर्ण केल्या आणि इसवी सन २००३ च्या सुरुवातीला मुल्तान याठिकाणी पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत ३०९ धावा फटकावल्या. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत ३०९ धावा काढून सेहवागने मागील सर्व विक्रम मोडले.

शिवाय, हा एकविसावा कसोटी सामना होता, ज्यामध्ये वीरेंद्र सेहवाग याने त्याचे सहावे शतक पूर्ण केले होते. यानंतर, मात्र लाहोरमध्ये पुढील टेस्ट सामन्यात त्याने जवळपास ९० धावा फटकावून सामनावीर  म्हणून सामना जिंकला. 

इसवी सन २००४ साली वीरेंद्र सेहवाग क्रिकेटपटू बंगळुरूमध्ये सुनील गावस्कर ट्रॉफीसाठी खेळला होता, ज्यामध्ये एम्पायर बिली बाऊडनने त्यांना एलबीडब्ल्यू म्हणून सामन्यातून बाद केले होते. मात्र, यानंतर वीरेंद्र सेहवागने चेन्नईत १२५ धावा काढल्या. परंतू, चेन्नईत झालेल्या भरमसाठ पावसामुळे सामना पुढे ढकलला गेला.

चेन्नईत झालेल्या सामन्यानंतर देखील वीरेंद्रकडे अजुन एक संधी अगदी त्याच वर्षी चालून आली होती. साउथ आफ्रिकेविरूद्ध घरच्या मालिकेतील पहिल्या टेस्ट सामन्यात कानपूरमध्ये १६४ धावा आणि कोलकत्ता याठिकाणी झालेल्या सामन्यात ८८ धावांनी वीरेंद्र सेहवाग यांनी भारतीय संघाला दुसरे मानाचे स्थान मिळवून दिले, ज्यासाठी वीरेंद्र सेहवाग यांना ‘मॅन ऑफ द सीरिज’चा पुरस्कार देखील सन्मानित करण्यात आला होता. 

इसवी सन २००५ मध्ये मुख्य मालिकेदरम्यान वीरेंद्र सेहवाग यांनी महोलीमध्ये १३० धावा आणि बंगळुरूमध्ये झालेल्या सामन्यात २०१ धावा प्राप्त केल्या. ज्यासाठी, त्यांना पुन्हा एकदा ‘मेन ऑफ द सीरिज’चा पुरस्कार प्राप्त झाला. यानंतर, बंगळुरू येथे झालेल्या एका कसोटी सामन्यात सेहवाग यांनी ३००० धावांचा विक्रम पार केला होता.

या कसोटी सामन्यात सर्वांत वेगवान धावा काढल्यामुळे वीरेंद्र सेहवाग यांना ‘आयसीसी कसोटी टीम ऑफ द इयर’चा किताब मिळाला, ज्यामुळे त्यांचे नाव पुढे कसोटीपटू म्हणून निवडले गेले होते. इसवी सन २००६ मध्ये वीरेंद्र सेहवाग याने लाहोरचा पहिला कसोटी सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला होता.

लाहोरच्या कसोटी सामन्यात त्याने २२५ धावा काढल्या आणि कसोटीत सर्वाधिक धावा काढून दुहेरी शतक देखील  ठोकले. त्यानंतर, राहुल द्रविडची भागीदारी करत वीरेंद्र यांनी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ४१० धावा पूर्ण करत, कसोटी सामन्यांचे पुन्हा एकदा सर्व विक्रम मोडले. 

यानंतर, इसवी सन २००६ मध्ये वेस्ट इंडीजमधील दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या फेरीत वीरेंद्र सेहवाग अनेक वेळा पुष्कळ अशा कमी धावांवर बाद झाला, पण नंतर त्याने एकशे नव्वदीच्या सामन्यात शतक झळकावून टाकले आणि वीरेंद्र पुन्हा एकदा सामनावीर ठरला.

इसवी सन २००८ मध्ये वीरेंद्र सेहवाग यांनी पुन्हा घरच्या मालिकेत पुनरागमन केले आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात  चांगला सामना खेळला. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने जवळपास ३१९ धावा पूर्ण केल्या आणि या कसोटी सामन्यात २०८ चेंडूत ३०० धावा फटकावून अत्यंत वेगवान तिहेरी शतकी खेळीचा इतिहास रचला.

विवाद आणि पुरस्कार

इसवी सन २००१ रोजी एलिझाबेथच्या सेंट जॉर्ज पार्क या ठिकाणी, जेथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आयसीसी सामना चालू होता, रेफरी माईक डेनेसने एका कसोटी सामन्यात “ठाम अपीलिंग” वर बंदी घातली. या कसोटी सामन्यात पहिल्या सहा खेळाडूंची नावे देण्यात आली, जी नंतर चार झाली, या खेळाडूंसाठी सामन्यासाठी बंदी घालण्यात आली, जो त्यावेळी सगळ्यात मोठा मुद्दा बनला होता.

सर्व चौकशीनंतर माईक डेनेस यांना रेफरीपदावरून काढून टाकण्यात आले. काही काळापूर्वी केरळमधील काही प्रकरणात आदिवासी माणसाच्या हत्येबद्दल त्यांनी चुकीचे ट्विट केले होते, यामुळे ते वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले होते, त्यानंतर त्याने सोशल मीडियावर माफी देखील मागितली.

याव्यतिरिक्त वीरेंद्र सेहवाग यांना इसवी सन २००२ मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता. याशिवाय, वर्ल्ड अवॉर्डमधील वेस्डेन अग्रगण्य क्रिकेटर इसवी सण २००८ मध्ये प्राप्त झाला होता. यानंतर, सन २०१०  मध्ये वीरेंद्र यांना आयसीसीचा ‘कसोटी प्लेयर ऑफ द ईयर’ छा पुरस्कार मिळाला होता आणि याच वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. 

                    तेजल तानाजी पाटील

                       बागिलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या virendra sehwag information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर वीरेंद्र सेहवाग यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या virendra sehwag full information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of virendra sehwag in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये virendra sehwag information in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!