राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील Pratibha Patil Information in Marathi

Pratibha Patil Information in Marathi – Pratibha Devi Singh Patil महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ब्युटी क्वीन ते भारताची पहिली महिला राष्ट्रपती अशी प्रतिभाताई पाटील यांची ओळख आहे.प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. प्रतिभा ताई यांचा महिला राष्ट्रपती होण्यापर्यंतचा प्रवास खूप कौतुकास्पद आहे. ज्या काळामध्ये मुलींना शिक्षणाची सोय नव्हती त्या काळामध्ये देखील प्रतिभाताईंनी आपल्या शिक्षण पूर्ण केलं. आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून ओळखू जाऊ लागल्या. या सर्व गोष्टींमध्ये त्यांना त्यांचे वडील आणि त्यांचे पती या दोघांची भक्कम साथ मिळाली.

प्रतिभा ताई फक्त एक राजकारणी नव्हत्या तर त्यांनी सामाजिक कार्यामध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आजच्या ब्लॉग मध्ये आपण प्रतिभाताई पाटील यांचा पहिली महिला राष्ट्रपती होण्यापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत.

खूप जिद्द, चिकाटी आणि चातुर्य असणाऱ्या प्रतिभा ताई पाटील यांच्या बद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर चला बघूया आपल्या ब्युटी क्वीनचा राष्ट्रपती होण्यापर्यंतचा प्रवास.

pratibha patil information in marathi
pratibha patil information in marathi

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची माहिती – Pratibha Patil Information in Marathi

नाव(Name)श्रीमती प्रतिभाताई पाटील
जन्म (Birthday)१९ डिसेंबर १९३४
जन्मस्थान (Birthplace)महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यात
वडील (Father Name)नारायणराव पाटील
पती (Husband Name)डॉक्टर देवसिंह रणसिंह शेखावत
मुलेराजेंद्र सिंह आणि मुलगी ज्योती
राजकीय पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेस

जन्म

प्रतिभा ताईंचा जन्म एका राजकीय घराण्यात झाला. १९ डिसेंबर १९३४ ही प्रतिभा ताई यांची जन्मतारीख असून त्यांचा जन्म महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील नारायणराव पाटील हे स्वतः एक राजकारणी होते कदाचित त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन प्रतिभा ताई देखील राजकारणाकडे वळल्या असतील.

प्रतिभाताई यांचे बालपण सुखात गेले‌. परंतु त्या लहान असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं त्यानंतर प्रतिभाताई आणि त्यांच्या भावंडांची देखरेख त्यांचे वडील आणि इतर नातेवाईकांनी केली सर्वात महत्त्वाचं त्यांच्या वडिलांनी सगळ्यांवर खूप छान संस्कार केले. असे संस्कार जे प्रतिभाताई यांना पुढे जाऊन कामी आले.

वडिलांनी दिलेले संस्कार, काम करण्याची जिद्द, हुशार व्यक्तिमत्व, व्यवहारात चोख‌ नात्यांची ओळख या सगळ्या गुणांनी संपन्न प्रतिभाताई पाटील पुढे जाऊन आपल्या भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या.

शिक्षण

शिक्षण हाच उज्ज्वल भविष्याचा मार्ग असतो याची जाणीव प्रतिभा ताई यांच्या घरच्यांना होती म्हणूनच त्यांनी प्रतिभा ताई यांना चांगलं शिक्षण देण्याचं ठरवलं. प्रतिभाताई यांचे प्राथमिक शिक्षण जळगाव मध्येच झालं. जळगाव मधील आर आर या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. पुढचं पदवी शिक्षण घेण्यासाठी त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला.

पुणे विद्यापीठाशी जोडलेलं मुलजी जेठा महाविद्यालय येथे त्यांनी त्यांचं पदवी शिक्षण पूर्ण केलं. त्यांचे वडील वकील होते त्यामुळे त्यांच्या वडिलांनी प्रतिभाताई यांना वकिलीचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केलं ज्याचा उपयोग प्रतिभाताई यांना त्यांच्या पुढील आयुष्यात झाला. प्रतिभा ताई यांनी वकिलीचा अभ्यास मुंबईच्या शासकीय महाविद्यालयातून केला.

अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र मध्ये प्रतिभाताई पाटील यांनी एम.ए ही पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण करता करता त्यांना खेळामध्ये ही आवड निर्माण झाली मैदानी खेळ खेळणे त्यांच्या आवडीचं काम होतं. त्या एक उत्तम‌ टेबल टेनिस खेळाडू आहेत. त्यांनी आपल्या महाविद्यालय आणि विद्यापीठाचं कित्येक वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. प्रतिभा ताई ब्युटी विथ ब्रेन आहेत. कॉलेजमध्ये असताना त्यांची ब्युटी क्वीन म्हणून ओळख होती.

वैयक्तिक आयुष्य

प्रतिभा ताई यांचे वडील नारायणराव पाटील हे जळगाव मध्ये सरकारी वकील होते. त्यामुळे शिस्त ही कायम असायची. प्रतिभाताई यांचे बालपण त्यांच्या वडिलांच्या शिस्ती खालीच गेलं त्या मुळे प्रतिभाताईंच्या प्रत्येक कार्यामध्ये चोख शिस्त दिसून येते. शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रतिभाताई यांचं १९६५ मध्ये डॉक्टर देवसिंह रणसिंह शेखावत यांच्याशी विवाह सोहळा संपूर्ण पडला.

देवसिंह यांनादेखील सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये थोडी फार आवड होती त्यामुळे देवसिंह यांचा नेहमीच प्रतिभाताई पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पाठिंबा होता. प्रतिभा ताई यांचे पती देवीसिंह हे प्रोफेसर होते त्यामुळे शैक्षणिक विभागांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे. प्रतिभाताई यांना दोन मुलं देखील आहेत त्यातील एक मुलगा राजेंद्र सिंह आणि मुलगी ज्योती. प्रतिभाताई यांना टेबल टेनिस खेळाची देखील आवड आहे.

राजकीय आयुष्य

प्रतिभा ताई या राजकारणात येण्या आधी एक उत्तम समाजसेविका होत्या. त्यांना मनापासून समाजाची सेवा करणं आवडायचं त्यांच्या मते समाजात बदल घडवून आणणं गरजेचं होतं. त्याच प्रकारे त्यांनी समाज कार्य करायला सुरुवात देखील केली. स्त्रियांसाठी महिला होमगार्डची स्थापना केली.

महिलांनी देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावं म्हणून गरीब आणि होतकरू स्त्रीयांसाठी त्यांनी संगणक, शिवणकाम इत्यादींचे प्रशिक्षण देणारे केंद्र सुरू केलं. कामामुळे आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या स्त्रीयांसाठी त्यांनी मुंबई, दिल्ली येथे वस्तीगृह स्थापन केलं. महिलांनी शिक्षण घेणे गरजेचे आहे.

परंतु गरीब घरातल्या मुली किंवा मागास लेल्या मुलीं शिक्षणासाठी पैसे कुठून आणणार या विचाराने प्रतिभाताई यांनी अशा मुलींसाठी नर्सरी स्कूल सुरू केली. अमरावती येथे दृष्टिहीनां साठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन केली. अनुसूचित जनजाति मधील युवांसाठी जळगाव मध्ये इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं.

प्रतिभाताईंनी श्रमसाधना ट्रस्टच्या कार्यकारी ट्रस्टी म्हणून आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली. महिला विकास मंडळ स्थापन करण्यात त्यांचा हातभार होता. प्रतिभाताईंनी जळगाव मध्ये महिला कोऑपरेटिव बँकेची स्थापना केली. अमरावती मध्ये कृषी विज्ञान केंद्र स्थापन केलं हे केंद्र शेतकऱ्यांसाठी होतं शेतीमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित व्हावे व शेतीची कामे योग्य प्रकारे व्हावी आणि भरपूर उत्पन्न मिळावे म्हणून उभारण्यात आलं.

समाज सेवा करत करत त्या राजकारणा कडे वळल्या. १९६२ मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीतला सुरुवात झाली. जळगाव मधून विधानसभा सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. सलग चार वर्ष त्या मुक्ताईनगर विधानसभा सीट साठी काँग्रेसकडून निवडणूक लढत होत्या व निवडून देखील यायच्या व एम एल ए पदावर होत्या.

१९६७ ते १९७२ या काळामध्ये महाराष्ट्राची राज्यमंत्री म्हणून जनआरोग्य, संसदीय कार्य, आवास, पर्यटन अशी मुख्य विभाग प्रतिभाताई यांच्या हाताखाली होती. सगळी विभागं, कामे आणि पद प्रतिभाताई अगदी मनापासून सांभाळत होत्या. १९७२ मध्ये प्रतिभा ताई त्यांच्या कष्टाच्या बळावर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जिंकल्या. 

महाराष्ट्र शासनात कॅबिनेट मंत्री म्हणून महत्वाच पद त्यांच्या हाती आलं. त्यावेळी समाज कल्याण, पर्यटन अशी महत्वाची विभाग सांभाळत होत्या. पुढचे काही वर्ष त्या कॅबिनेट मंत्री म्हणूनच सर्व महत्त्वाची खाती सांभाळत होत्या आणि सांस्कृतिक विभाग पुनर्वसन ही सगळी विभाग देखील बघत होत्या.

१९७९ ते १९८० हे दोन वर्ष त्या महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष प्रमुख होत्या. १९८० मध्ये सलग पाच वर्ष निवडून येऊन विजय प्राप्त केला. १९८५ पर्यंत प्रतिभाताई महाराष्ट्र सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री होऊनच बाकीची खाती सांभाळत होत्या. १९८६ मध्ये प्रतिभाताईंनी राज्यसभेत आपलं उपसभापती पद मिळवलं.

१९९१ पर्यंत त्या राज्य सभेतच कार्यरत होत्या पुढे त्यांना पहिल्यांदा अमरावती मध्ये निर्वाचन क्षेत्रात संसद सदस्य हे पद मिळालं. प्रतिभाताई यांची राजकीय कारकीर्द पाहून तसेच त्याच्या प्रकारे त्यांना दिलेले विभाग सांभाळतात तसेच त्यांच्या कार्यामुळे होणारे सामाजिक बदल पाहून राजस्थान चा २४ वा राज्यपाल होण्याची संधी मिळाली.

२००७ ते २०१२ हे पर्व प्रतिभाताई पाटील यांच्या आयुष्यातील खूप महत्त्वपूर्ण ठरलं कारण या काळात त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कार्यरत होत्या. प्रतिभाताई पाटील यांचे सामाजिक कार्य देखील कौतुकास्पद आहे. सामाजिक कार्याची तर तलवारच हाती घेतली होती. राजकारणात असतानादेखील त्यांचं सामाजिक कार्य थांबलं नाही.

गरिबांसाठी आणि शेतकरी विभागासाठी देखील प्रतिभाताई यांनी अनेक योजना राबवल्या.प्रत्येक महिलेसाठी त्या प्रेरणास्त्रोत आहेत. गरीब व होतकरू महिलांसाठी प्रतिभाताई यांनी आज पर्यंत अनेक कार्यक्रम राबवले. खरंच एक मुलगी शिकून स्वतःसोबत घराला आणि समाजाला देखील सुशिक्षित बनवते. प्रतिभाताई पाटील या कित्येक मुलींसाठी आदर्श ठरल्या आहेत. प्रत्येकाला प्रतिभाताई यांच्यावर गर्व व्हावा असा इतिहास त्यांनी रचला आहे.

आम्ही दिलेल्या pratibha patil information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील” यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about pratibha patil in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि pratibha devi singh patil माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये pratibha devi singh patil information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!