झाशीची राणी लक्ष्मीबाई माहिती Rani Laxmibai Information in Marathi

Rani Laxmibai Information in Marathi झाशीची राणी लक्ष्मीबाईं या इतिहासातील एक कर्तुत्ववान महिला होत्या. यांची विचारसरणी अतिशय वेगळी होती, इतकंच नव्हे तर जेव्हा झाशी संस्थान युद्धात सापडले होते तेव्हा त्या स्वतः तलवार घेऊन रणांगणात उतरल्या. अगदी वयाच्या १८ व्या वर्षात त्या एका राज्याच्या म्हणजेच झाशीच्या राणी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. राणी लक्ष्मीबाई या लहानपणापासूनच स्वतंत्र विचाराच्या होत्या लहानपणापासूनच त्यांची विचारसरणी थोडी वेगळी होती त्यांच्यामते स्त्री आणि पुरुष हे समांतर आहेत तसेच स्त्रिया देखील ती सर्व कामे करू शकतात जे पुरुष करतात.

rani laxmibai information in marathi
rani laxmibai information in marathi

झाशीची राणी लक्ष्मीबाई माहिती – Rani Laxmibai Information in Marathi

नाव (Name)झाशीची राणी लक्ष्मीबाईं
जन्म (Birthday)१८३५ मध्ये १९ नोव्हेंबरला
जन्मस्थान (Birthplace)उत्तर प्रदेशातील काशी
वडील (Father Name)मोरोपंत तांबे
पती (Husband Name)राजा गंगाधरराव नेवाळकर
घोड्याचे नावबादल
मृत्यू (Death)जून १८ इसवी सन १८५७
लोकांनी दिलेली पदवीमनु, झाशीची राणी

राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म कधी झाला:

झाशीची राणी अशी ज्या कर्तुत्वान स्त्रीची ओळख आहे, अशा थोर राणीचा जन्म १८३५ मध्ये १९ नोव्हेंबरला झाला. मनिकर्णिका मोरोपंत तांबे हे झाशीची राणी यांचं लग्न आधीच मूळ नाव होतं. परंतु लग्नानंतर त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर असं ठेवण्यात आलं. राणी लक्ष्मीबाई यांचा खरं नाव मनिकर्णिका असल्यामुळे लहानपणी त्यांचे टोपण नाव मनु असं होतं.

राणी लक्ष्मीबाई यांचे वडील म्हणजेच मोरोपंत तांबे हे पुण्या मधील पेशव्यांच्या इथे सेवेत होते. तांबे घरानं हे मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावातलं आहे परंतु महाराणी लक्ष्मीबाई यांच जन्मस्थळ उत्तर प्रदेशातील काशी आहे.

आई भागीरथी बाई यांच राणी लक्ष्मीबाई यांच्या जन्मानंतर तीन-चार वर्षांमध्ये निधन झालं त्यामुळे राणी लक्ष्मीबाई पोरक्या झाल्या होत्या त्यामुळे त्यांचे वडील मोरोपंत त्यांना बाजीराव पेशवे द्वितीय यांच्या दरबारात घेऊन जायचे. असं म्हणतात की राणी लक्ष्मीबाई यांचे घराणे राजघराणं नसलं तरी राणी लक्ष्मीबाई यांचा वावर राजघराण्यातील माणसांशी व्हायचा पेशव्यांच्या दरबारात जाऊन राणी लक्ष्मीबाई यांनी तलवारबाजी कला हस्तगत केली.

इतकच नव्हे तर त्या घोडेस्वारी आणि युद्ध शास्त्रांमध्ये देखील माहीर झाल्या राणी लक्ष्मीबाई यांचे बालपण वेगवेगळ्या प्रकारच्या शिकण्यात गेलं.

झाशीच्या राणीच्या घोड्याचे नाव काय:

राणी लक्ष्मीबाई या लहानपणापासूनच स्वतंत्र विचाराच्या होत्या लहानपणापासूनच त्यांची विचारसरणी थोडी वेगळी होती त्यांच्यामते स्त्री आणि पुरुष हे समांतर आहेत तसेच स्त्रिया देखील ती सर्व कामे करू शकतात जे पुरुष करतात. त्यामुळे राणी लक्ष्मीबाई यांनी लहानपणीच तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतलं त्यासोबतच त्यांनी मल्लखांब घोडेस्वारी कौशल्य देखील शिकून घेतली घोडेस्वारीमध्ये त्या माहीर झाल्या होत्या. राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे त्यांचा स्वतःचा असा प्रिय घोडा देखील होता त्याचं नाव आणि बादल असं होतं.

राणी लक्ष्मीबाई यांचे माहेरचे पूर्ण नाव काय:

राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ नाव मनिकर्णिका मोरोपंत तांबे होतं.

राणी लक्ष्मीबाई विवाह:

पूर्वीच्या काळात बालविवाह करण्याची प्रथा होती त्यामुळे राणी लक्ष्मीबाई यांचा विवाह देखील इसवी सन १८४२ मध्ये झाला. त्यावेळी त्या फक्त अठरा वर्षाच्या होत्या राणी लक्ष्मीबाई यांचा विवाह झाशी राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला आणि लग्नानंतर मणिकर्णिका यांचे रूपांतर झाशीची राणी लक्ष्मीबाई यामध्ये झालं लग्नानंतर राणी लक्ष्मीबाई यांचे जीवन संपूर्णपणे बदलून गेलं खूप लहान वयामध्ये त्या झाशी संस्थानच्या महाराणी बनल्या.

पुढे जाऊन राणी लक्ष्मीबाई यांना एक मुलगा देखील झाला परंतु तीन महिन्यांमध्ये तो मरण पावला गंगाधरराव यांना राणी लक्ष्मीबाई यांचे दरबारात वावरण व राजकारणाच्या गोष्टी हाताळणे काही पटत नव्हतं त्यामुळे राणी लक्ष्मीबाई यांनी आपला वेळ घोडेस्वारी तलवारबाजी मल्लखांब या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवला.

राणी लक्ष्मीबाई इतिहास (कार्य, लढाई):

राणी लक्ष्मीबाई या लहानपणापासूनच धाडसी कर्तुत्ववान होत्या त्यांना नेहमीच असे वाटत आले की जे काम पुरुष करू शकतात तेच काम स्त्रियादेखील करू शकतात म्हणूनच राणी लक्ष्मीबाई त्यांच्या पतीचे निधन झाल्यावर झाशी संस्थानच्या राणी बनल्या आणि झाशी संस्थान राणी लक्ष्मीबाई यांच्या हाताखाली आलं.

राणी लक्ष्मीबाई यांच्यात आणि ब्रिटिश झाशीच्या संस्थानांमध्ये मैत्री होती त्यामुळे राणी लक्ष्मीबाई यांना असं वाटत आलं की या कंपनीद्वारे ब्रिटिश हे झाशी संस्थानाची विभागणी करणार नाहीत. राणी लक्ष्मीबाई यांनी स्वतः या कामात लक्ष घातले त्या स्वतः कंपनीशी पत्रव्यवहार करायच्या आणि एकदा त्यांनी कंपनी चा घोटाळा आणि बेकायदेशीररीत्या होणारे कामकाजाची पोल खोलली.

गव्हर्नर जनरल डलहौसीने भारतातील खूप सारी संस्थाने विभागण्याचा बेत आखला होता त्याच प्रमाणे त्याने झाशी संस्थानाची देखील विभागणी केली. १३ मार्च १८५४ रोजी एक जाहीरनामा बनवण्यात आला त्या जाहीरनाम्या प्रमाणे दत्तक विधानाला नामंजुरी देवून झांशी संस्थान ब्रिटिश मध्ये सामाविष्ट करण्यात आले आणि झाशीच्या राणीला पदावरून उतरवण्यात आले राणी स्वतःचा किल्ला सोडून जवळपासच्या शहरांमध्ये राहण्यासाठी निघून गेली.

संपूर्ण हिंदुस्तानाला मध्ये झालेला १८५७ उठाव हा सगळ्यांनाच माहित आहे. याच वर्षी झाशीच्या किल्ल्यावर देखील ब्रिटिशांनी हल्ला केला पण तिकडे उपस्थित ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले त्यावेळी राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिश सरकारची वाट न बघता त्या स्वतः जाऊन किल्ल्यावर राहू लागल्या आणि त्याच्यानंतर जुलै महिन्यामध्ये ब्रिटिश संस्थानाने स्वतः राणी लक्ष्मीबाई यांना किल्ल्याचे त्यांचे पूर्वीचे पद पुन्हा दिल.

ज्यावेळी राणी लक्ष्मीबाई यांच्या हातामध्ये राज्यकारभार आला त्यावेळी राज्याची आणि जनतेची अवस्था फारशी चांगली नव्हती परंतु राणी लक्ष्मीबाई यांनी कंबर कसून पुन्हा त्यांच्या जनतेला विश्वास मिळवून दिला की हे राज्य आपलेच आहे. राणी लक्ष्मीबाई यांचा स्वभाव दयाळू मायाळू असल्यामुळे त्यांनी स्वतःची काळजी न करता जनतेची सुरक्षा केली.

त्यांनी इंग्रजांशी लढताना देखील त्यांची जनता कशी सुरक्षित राहिल आणि जनतेचा आनंद जपला त्यांनी राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सुरू केले जनतेला जे करावंसं वाटेल त्या प्रकारे त्यांनी कार्यक्रम आखले हळदी कुंकू नाटक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले पुन्हा विश्वासू अधिकारी बोलावून घेऊन सगळ्यांना महत्त्वाचे अधिकार पद दिले.

राज्यातील खजिना रिकामा झाला असून राज्याची परिस्थिती अतिशय वाईट असून देखील राणी लक्ष्मीबाई यांनी राज्य सुसंस्कृत सुरक्षित आणि जनतेचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न केला. ह्यू रोज हा एक कर्तबगार राजकारणी आणि कर्तुत्वान सेनानी होता याने झाशीच्या राणीला लढाईचे आवाहन दिले. त्याने झाशीचा किल्ला जिंकण्यासाठी आधी आजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली.

तेव्हा झाशीची राणी यांनी तात्या टोपे यांच्याकडे काही सैन्य आणि युद्धासाठी लागणारा सांधन त्यांच्याकडे पाठवून त्यांना ब्रिटिशांविरुद्ध युद्ध करण्यास सांगितले. हे युद्ध नऊ दिवस चालू होतं पुढे राज्यातील काही फितुरांना ब्रिटिशांना मिळून झाशीच्या किल्ल्यावरील मोठी विहीर ज्यातून पूर्ण झाशी राज्याला पाणी जायचं आणि जिथे दारुगोळा निर्माण व्हायचा तेच दोन ठिकाणं उध्वस्त केली.

पेशव्यांच्या मदतीवर आता झाशी की राणी यांची आशा होती त्या वेळी तात्या टोपे यांचे सैन्य झाशी येथे पोचलं परंतु ब्रिटिशांनी समोर ते काही जास्त वेळ टिकले नाही. खुदाबक्ष आणि घौसखान राणीचे उजवे आणि डावे हात मानले जायचे यांचादेखील ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारा मध्ये मृत्यू झाला तेव्हा राणी स्वतः जनतेला आणि सैनिकांना धीर देत त्या स्वतः रणांगणा मध्ये उतरण्यासाठी तयार झाल्या त्या इतकच नव्हे तर त्या असे देखील म्हटल्या होत्या रणांगणात जर तुम्हाला मृत्यू आला तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची सोय मी करेल हे त्यांनी त्यांच्या सैनिकांना सांगितलं.

प्रत्यक्ष झाशीची राणी स्वतः मैदानात रणांगणात उतरले आणि त्यांनी त्यांची तलवार ब्रिटिशांनी वर चालवायला सुरुवात केली परंतु पुढील परिस्थिती बघता काही प्रमुख सैनिकांनी राणीला पुन्हा किल्ल्यावर नेले तिकडे राणी मुख्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्याच रात्री राणी किल्ला सोडून ग्वाल्हेरला पेशव्यांस सोबत निघून गेल्या.

पुढे जाऊन १८ जून १७५८ मध्ये ब्रिटिशचा प्रमुख अधिकारी स्मित हा त्याचं सैन्य घेऊन ग्वाल्हेरला पोचला त्याच वेळी राणी लक्ष्मीबाई यांनी कुठल्याच गोष्टीचा विचार न करता त्या रणांगणात उतरल्या स्मित याने हल्ला केला ब्रिटिशांशी लढून राणीच्या अंगावर अनेक वार झाले होते त्यामुळे त्या अशक्त झाल्या होत्या त्या युद्धातून बाहेर आल्या आणि घोडा चालवताना त्या घोड्यावरून खाली कोसळल्या राणी घायाळ झाल्या होत्या.

त्या वेळी त्यांच्या एका सैनिकाने राणीला मदत करत एका मठामध्ये आणलं परंतु राणीची अशी इच्छा होती की त्यांच्या मरणानंतर त्यांच्या देहाला ब्रिटीशांचा हात लागू नये म्हणून त्या सेवकाने राणीला अग्नि दिला अशा प्रकारे राणी यांना अगदी २३ व्या वर्षात वीरमरण आलं.

इतर माहिती:

महाराणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट पुस्तक आणि साहित्य आहेत. हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क असा ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाई यांचा उल्लेख केला आहे.

राणी लक्ष्मीबाई निधन केव्हा झाले – rani laxmibai death information in marathi

जून १८ इसवी सन १८५७ मध्ये राणी लक्ष्मीबाई यांना वीरमरण आलं त्यांच समाधी स्थळ ग्वाल्हेर येथे आहे. १९६२ मध्ये त्याच ठिकाणी अश्वरुढ झाशीची राणी यांचा पुतळा बांधण्यात आला.

झाशीची राणी सिरीयल:

झांसी की रानी ही ऐतिहासिक हिंदी भाषेतील मालिका होती या मालिकेमध्ये मनु म्हणजेच झाशी की राणी यांच्या जीवनावर आधारित ही मालिका जितेंद्र श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केली होती. या मालिकेमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच त्यांच्या लग्नानंतर जीवन कसं बदललं त्यांच्या आयुष्यात एक वेगळाच वळण आल हे दर्शवलं आहे.

२००९ मध्ये १८ ऑगस्टला या मालिकेचा पहिला भाग झी टीव्ही या चैनल वर दाखवण्यात आला आणि बघता बघता ही मालिका लोकप्रिय झाली तसेच या मालिकेमधून झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा इंग्रजांशी लढा आणि इतिहासातील त्यांचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे देखील दर्शविले आहे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची प्रतिमा कशी होती. rani laxmibai information in marathi language त्यांचा जन्म, विवाह तसेच त्यांनी केलेली कार्ये काय आहेत? त्यांचा इतिहास काय आहे व कसा आहे? अशीच संपूर्ण माहिती आम्ही लेखाद्वारे थोडक्यात पूर्ण केली आहे. jhansi ki rani biography in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information of rani laxmibai in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या zashichi rani marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही  त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!