कोशिंबीर रेसिपी मराठी Koshimbir Recipe in Marathi

Koshimbir Recipe in Marathi कोशिंबीर रेसिपी मराठी कोशिंबीर हि एक जेवणामध्ये खाल्ली जाणारी साईड डिश आहे. जी आपण काकडी पासून, टोमॅटो पासून, गाजर पासून तसेच कांद्यापासून आणि काही इतर भाज्यांच्यापासून देखील कोशिंबीर बनवली जाते आणि हा भाज्यांच्या पासून बनवलेला कोशिंबीरचा प्रकार हा खूप पौष्टिक असतो आणि हा प्रकार सर्वजन खूप आवडीने खातात. कोशिंबीर हा पदार्थ सहसा उन्हाळ्यामध्ये खाल्ला जातो आणि हा दुपारच्या जेवणामध्ये बनवला जातो. कोशिंबीर हा पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो आणि हा बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि मोजक्याच साहित्यामध्ये अगदी उत्तम बनू शकतो. चला तर आता आपण कोशिंबीरच्या वेगवेगळ्या रेसिपी कश्या बनवायच्या ते पाहूयात.

koshimbir recipe in marathi
koshimbir recipe in marathi
अनुक्रमणिका hide
1 Koshimbir Recipe in Marathi – कोशिंबीर रेसिपी मराठी

Koshimbir Recipe in Marathi – कोशिंबीर रेसिपी मराठी

तयारीसाठी लागणारा वेळ८ ते १० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ५ ते ६ मिनिटे 
एकूण लह्ग्णारा वेळ१५ ते १६ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतसोपी

कोशिंबीर बनवण्याची रेसिपी 

कोशिंबीर रेसिपी म्हंटल कि अनेकांच्या तोंडाला पाणी येते कारण त्यामध्ये असणाऱ्या क्रिमी दह्याची टेस्ट आणि वापरलेल्या वेगवेगळ्या भाज्या या मुळे अनेकांची कोशिंबीर हि प्रिय असते. कोशिंबीरची विशेषता म्हणजे आपल्याला ती बनवताना गॅसवर शिजवावी लागत नाही तसेच हि रेसिपी ८ ते १० मिनिटामध्ये तयार होते. चला तर मग आता आपण अगदी सोपी आणि मोजक्या साहित्यामध्ये बनणारी कोथिंबीर कशी बनवायची ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ८ ते १० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ५ ते ६ मिनिटे 
एकूण लह्ग्णारा वेळ१५ ते १६ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतसोपी

काकडी कोशिंबीर रेसिपी – kakdichi koshimbir recipe in marathi

आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर बनवतो आणि त्यामधील एक लोकप्रिय आणि कोशिंबीर प्रेमींच्या आवडत्या डिश मध्ये अगदी टॉपला असणारी कोशिंबीर म्हणजे काकडीची कोशिंबीर. काकडी पासून बनवलेल्या कोशिंबीरला एक वेगळीच टेस्ट असते आणि हि कोशिंबीर पौष्टिक देखील असते पण हि कोशिंबीर आपण काकडी ज्यावेळी बाजारामध्ये येते त्या सीजनमध्ये फक्त बनवू शकतो. चला तर मग पाहूयात काकडीची कोशिंबीर कशी बनवायची.

काकडी कोशिंबीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make cucumber salad 

काकडी कोशिंबीर बनवण्यासाठी ताजी काकडी वापरा आणि आपल्याला ताजी काकडी सिजनमध्ये बाजारामध्ये मिळते. तसेच काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी इतर साहित्य देखील लागते ते आपल्या घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असते. आता आपण काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • २ ते ३ मध्यम आकाराच्या ताज्या काकड्या.
  • १ कांदा ( चौकोनी बारीक चिरलेला ).
  • अर्धी छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.
  • ३ ते ४ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट.
  • १ मध्यम आकाराची वाटी दही.
  • १/२ चमचा जिरे पावडर
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).

काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी केली जाणारी कृती – cucumber koshimbir recipe in marathi

  • काकडीची कोशिंबीर बनवताना सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून घ्या आणि मग त्या काकडीच्या दोन्ही बाजू काढून टाका आणि काकडी एकदम बारीक चिरून घ्या किंवा किसून घ्या.
  • तसेच कांदा देखील बारीक चिरून घ्या.
  • त्यानंतर दही चांगले फेटून बाजूला ठेवा.
  • आता एक मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यामध्ये बारीक चिरलेली काकडी, कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट, जिरे पावडर तसेच चवीनुसार साखर आणि मीठ घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या.
  • मग त्यामध्ये फेटलेले दही घालून परत ते चांगले एकजीव करा. तुमची कोशिंबीर तयार झाली.
  • तुम्हाला जर कोशिंबीर गार हवी असेल तर ती फ्रीज मध्ये ठेवा आणि गार झाल्यानंतर खावू शकता.

गाजर कोशिंबीर रेसिपी – gajar koshimbir recipe in marathi

गाजर हि एक फळभाजी असून आपण गजरापासून वेगवेगळे पदार्थ बनवतो जसे कि गाजराचा हलवा, गाजर भाजी किंवा गाजराची कोशिंबीर. आता आपण गाजराची कोशिंबीर कशी बनवायची ते पाहणार आहोत. गाजराची कोशिंबीर हि बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि हि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनते. आपण हि कोशिंबीर डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यापासून बनवू शकतो कारण या महिन्यामध्ये गाजर बाजारामध्ये उपलब्ध असते. गाजराची कोशिंबीर खाल्ल्यामुळे पोट अगदी शांत होते त्यामुळे गाजराची कोशिंबीर उन्हाळ्यामध्ये चांगली. चला तर मग पाहूयात गाजराची कोशिंबीर कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.

गाजर कोशिंबीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make carrot salad 

गाजराची कोशिंबीर बनवण्यासाठी गाजर हा मुख्य घटक आहे तसेच गाजराची कोशिंबीर बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते. चला तर मग पाहूयात गाजराची कोशिंबीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य.

  • ३ वाटी किसलेलं गाजर.
  • १ मोठा टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
  • १ मोठा कांदा ( बारीक चिरलेला ).
  • ३ चमचे डाळींब्याचे दाने.
  • हिरवी मिरची ( बारीक चिरलेली ).
  • १ मध्यम आकाराची वाटी दही.
  • ते ४ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट.
  • १/२ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर.
  • १/२ चमचा धणे – जिरे पावडर.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).

गाजर कोशिंबीर बनवण्यासाठी केली जाणारी कृती – carrot koshimbir recipe in marathi

  • गाजर कोशिंबीर बनवताना सर्व प्रथम गाजर स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचा खालचा भाग कापून टाका आणि मग ते खिसनीवर खिसून घ्या.
  • मग एका वाटीमध्ये चमच्याने थोडे दही फेटून घ्या. दही आपण जर फेटून घेतले तर ते कोशिंबीर मध्ये चांगले मिक्स होते.
  • त्यानंतर टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या आणि बाजूला ठेवा तसेच डाळींब्याचे दाने देखील सोलून घ्या आणि ते बाजूला ठेवा.
  • आता एक मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यामध्ये खिसलेले गाजर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, डाळींब्याचे दाने घाला. मग त्यामध्ये शेंगदाण्याचा कुट, धणे – जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि ते मिक्स करा.
  • शेवटी यामध्ये दही घाला आणि ते चांगले मिक्स करा.
  • तुमची गाजराची कोशिंबीर तयार झाली.

टोमॅटो कोशिंबीर रेसिपी – tomato koshimbir recipe in marathi 

टोमॅटो हि एक फळभाजी आहे जी अनेक पोषक घटकांनी परिपूर्ण आहे. आपण टोमॅटो पासून केंव्हाही कोशिंबीर बनवू शकतो कारण त्यासाठी कोणताही सीजन लागत नाही. टोमॅटोची कोशिंबीर बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि आणि हि कोशिंबीर रेसिपी ७ ते ८ मिनिटामध्ये बनते आणि हि बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागते. चला तर मग आता आपण टोमॅटोची कोशिंबीर कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

टोमॅटोची कोशिंबीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make tomato salad 

टोमॅटो कोशिंबीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते त्यामुळे आपल्याला बाजारातून काहीही विकत आणावे लागत नाही. आता आपण टोमॅटो कोशिंबीर बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • ३ मोठे टोमॅटो ( बारीक चिरलेले ).
  • १ मोठा कांदा ( बारीक चिरलेला ).
  • ३ ते ४ चमचे कुट.
  • २ चमचे कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).
  • ३ ते ४ चमचे दही.

टोमॅटो कोशिंबीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य – process to make tomato salad 

  • आता आपण वर दिलेल्या साहित्यापासून टोमॅटो कोशिंबीर कशी बनवायची ते पाहूयात.
  • टोमॅटो कोशिंबीर बनवताना सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून ते बारीक चिरून घ्या ( चिरताना त्यामधील बी काढून घ्या ) आणि मग कांदा देखील एकदम बारीक चिरून घ्या.
  • आता चिरलेला कांदा, टोमॅटो एका मिक्सिंग बाऊल मध्ये घ्या आणि मग त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट, चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि मग त्यामध्ये दही घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या.
  • झाली तयार तुमची सोपी आणि पौष्टिक टोमॅटोची कोशिंबीर.
  • तुम्ही हि कोशिंबीर दुपारच्या जेवणामध्ये खावू शकता.

पांढऱ्या मुळ्याची कोशिंबीर रेसिपी – radish salad recipe in marathi

मुळा हा एक कंद आहे जे आपण भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी वापरून शकतो. मुळ्यामध्ये अनेक औषधी तसेच पौष्टिक गुण असतात त्यामुळे आपण मुला बाजारातून आणून त्याची भाजी किंवा कोशिंबीर बनवून खाल्ली तर ते अति उत्तम. मुळ्याची कोशिंबीर आपण केंव्हाही बनवून खावू शकतो कारण हि उन्हाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये खावी असे काही नियम नाही आहेत. चला तर मग मुळ्याची कोशिंबीर कशी बनवायची आणि ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

मुळ्याची कोशिंबीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make radish salad recipe 

मुळ्याची कोशिंबीर बनवण्यासाठी मुळा हा महत्वाचा घटक आहे आणि हा बाजारामध्ये उपलब्ध असतो. तसेच मुळ्याची कोशिंबीर बनवण्यासाठी इतर साहित्य देखील लागते आणि ते आपल्या घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असू शकते. चला तर मग आता आपण मूल्याची कोशिंबीर बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • २ वाटी खिसलेला मुळा.
  • ५ ते ६ कढीपत्ता पाने.
  • १/२ चमचा मोहरी.
  • १/४ चमचा हिंग.
  • २ ते ३ चमचे दही.
  • ३ ते ४ चमचे थोडा मोठा मोठा कुट.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).
  • २ चमचे तेल.
  • १ चमचा कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).

मुळ्याची कोशिंबीर बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make radish salad recipe 

  • आता आपण वर दिलेल्या साहित्यापासून मुळ्याची कोशिंबीर कशी बनवायची ते पाहूयात.
  • मुळ्याची कोशिंबीर बनवताना सर्वप्रथम मुळा खिसून घ्या आणि मग तो गार पाण्याने धुवा आणि मग तो परत गरम पाण्याने धुवून त्यामधील पाणी चांगले पिळून काढा आणि मुळा कोरडा करा.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर एका भांड्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये कढीपत्ता, हिंग आणि मुळा घाला आणि ते मिश्रण चांगले मिक्स कारण आणि मुळा तेलामध्ये ५ ते ६ मिनिटे भाजून घ्या.
  • आता हा फोडणी दिलेला मुळा थोडा वेळ गार होऊ द्या.
  • आता त्यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा मोठा कुट, दही, चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि मिक्स करा.
  • मग त्यामध्ये शेवटी थोडी कोथिंबीर घाला आणि हे मिश्रण चांगले एकत्र करा.
  • तुमची कोशिंबीर सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.

हरभरा डाळीची कोशिंबीर रेसिपी किंवा चणा डाळ कोशिंबीर रेसिपी – chanaa dal koshimbir recipe 

आता आपण हरभरा डाळ वापरून कोशिंबीर कशी बनवतात ते पाहूयात. हरभरा डाळ हि एक कडधान्यामध्ये मोडणारी एक डाळ आहे. आज आपण हरभरा डाळीपासून एकदम टेस्टी कोशिंबीर कशी बनवायची ते पाहूयात. डाळीची कोशिंबीर हि बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनते. हि कोशिंबीर आपण चपाती किंवा पुरण पोळी बरोबर खावू शकतो. चला तर आता आपण हरभरा डाळीची कोशिंबीर कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

हरभरा डाळीची कोशिंबीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make chanaa koshimbir recipe 

हरभरा डाळीची कोशिंबीर बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असते त्यामुळे आपल्याला बाजारातून काही विकत आणावे लागत नाही. चला तर आता आपण डाळीची कोशिंबीर बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ वाटी हरभरा डाळ.
  • २ हिरव्या मिरच्या.
  • १/२ चमचा जिरे.
  • २ चमचे दही.
  • १/२ चमचा मोहरी.
  • ५ ते ६ कढीपत्ता पाने.
  • १/२ चमचा हळद.
  • १/४ हिंग.
  • १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).
  • १ चमचा तेल.

डाळीची कोशिंबीर करण्यासाठी केली जाणारी कृती – process to make chanaa dal koshimbir 

  • आता आपण वर दिलेले साहित्य वापरून डाळीची कोशिंबीर कशी बनवायची ते पाहूयात.
  • सर्वप्रथम चणा डाळ स्वच्छ निवडून आणि धुवून ती स्वच्छ पाण्यामध्ये २ ते ३ तास भिजत ठेवा.
  • २ ते ३ तास डाळ चांगली भिजली कि तो थोडी फुगेल आणि मऊ होईल.
  • आता त्या डाळींमधील पाणी काढा आणि ती डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि मग त्यामध्ये जिरे आणि हिरवी मिरची मोडून घाला आणि ते मोठे मोठे फिरवून घ्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर एक भांडे ठेवा आणि त्यामध्ये तेल घाला आणि तेल गरम झाले कि मोहरी घाला आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये हळद, हिंग आणि कढीपत्ता घाला आणि लगेच डाळीचे मिश्रण घाला आणि ते एकत्र करा ( टीप : फोडणीची प्रक्रिया गडबडीने करा नाही तर आपली फोडणी करपण्याची शक्यता असते ). आणि लगेच गॅस बंद करा.
  • आता दल थोडी गार झाली कि त्यामध्ये दही, चवीनुसार मीठ आणि साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि मिक्स करा.
  • तुमची डाळीची कोशिंबीर सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.

टिप्स (Tips) 

  • काकडीच्या किंवा गाजराच्या कोशिंबीर मध्ये तुम्ही डाळींब्याचे दाने देखील घालू शकता.
  • काकडीच्या कोशिंबीर मध्ये अर्धे कट करून द्राक्षे घातले तर कोशिंबीर छान लागते.
  • काकडीच्या कोशिंबीरमध्ये आपण थोडीशी हळद देखील टाकू शकतो.
  • कोशिंबीर मध्ये आपण थोडी फ्रेश क्रीम देखील वापरली तरी चालेल त्यामुळे कोशिंबीरला क्रिमी टेस्ट येते.

आम्ही दिलेल्या koshimbir recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कोशिंबीर रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gajar koshimbir recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि kakdichi koshimbir recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये beet koshimbir recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!