लाल बहादूर शास्त्री निबंध मराठी Lal Bahadur Shastri Essay in Marathi

Lal Bahadur Shastri Essay in Marathi लाल बहादूर शास्त्री निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्यावर निबंध लिहिणार आहोत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर लगेच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे दुसरे पंतप्रधान हे लाल बहादूर शास्त्री हे होते. लाल बहादूर शास्त्री यांना एक शांती पुरुष म्हणून ओळखले जायचे तसेच त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ ह्या वाक्याची रचना देखील केली होती. ‘जय जवान, जय किसान’ या वाक्याचा अर्थ असा होतो कि त्यांनी कायम भारतीय सैनिकांचा आणि शेतकऱ्याचा जयजयकार केला.

लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म भारतातील उत्तर प्रदेश या राज्यातील मुगलसराय या गावामध्ये २ ऑक्टोबर १९०४ मध्ये झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव मुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव असे होते आणि त्यांच्या आईचे नाव रामदुलारी असे होते. लाल बहादूर शास्त्री यांचे वडील हे प्रथम प्राथमिक शिक्षक होते व त्यानंतर त्यांच्या वडिलांनी महसूल विभागामध्ये लिपिकाची नोकरीसाठी गेले आणि तेथे नोकरी करू लागले.

lal bahadur shastri essay in marathi
lal bahadur shastri essay in marathi

लाल बहादूर शास्त्री निबंध मराठी – Lal Bahadur Shastri Essay in Marathi

Essay on Lal Bahadur Shastri in Marathi

लाल बहादूर शास्त्री यांच्या जन्मानंतर लगेच १८ महिन्यांनी त्यांचे वडील मरण पावले. लाल बहादूर शास्त्री यांनी वाराणसीच्या पूर्व इंटर कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले आणि मग त्यांनी पुढे इ. स. १९२६ मध्ये त्यांनी कशी विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी त्यांच्या पदवीचा एक भाग म्हणून त्यांना शास्त्री हि पदवी देण्यात आली होती आणि त्यानंतर हि पदवी त्यांच्या नावाचा एक भाग म्हणून वापरली जावू लागली आणि म्हणूनच त्याच्या नावामध्ये लाल बहादूर शास्त्री असे आहे.

लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधी यांचा खूप प्रभाव होता त्यामुळे ते त्यांच्यापासून प्रेरित होवून त्यांनी देखील समाजातील असहाय्य, दुर्बल आणि गरीब लोकांच्या विकासासाठी अनेक कामे करण्यास सुरुवात केली. लाल बहादूर शास्त्री यांचा विवाह १६ मे १९२८ मध्ये ललिता देवी यांच्याशी झाला. लाल बहादूर शास्त्री हे एक सक्रीय नेते होते ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या सामाजिक सेवेमध्ये ते अगदी हिरहिरीने भाग घ्यायचे.

लाल बहादूर शास्त्री यांनी इ. स १९२० मध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपले चांगले योगदान दिले होते तसेच त्यांनी असहकार चळवळीमध्ये देखील सहभाग घेतला होता. लाल बहादूर शास्त्री यांच्या या वाढत्या सहभागामुळे ते अडचणीमध्ये आले कारण त्यांनी ब्रिटिशांनी काही काळ तुरुंगामध्ये ठेवण्यात आले होते परंतु ते खचून गेले नाहीत तर त्यांनी पुढे अनेक गोष्टींचा सामना केला.

इ. स १९३० मध्ये मिठाचा सत्याग्रह झाला आणि त्यांनी मिठाच्या सत्याग्रहामध्ये देखील सहभाग घेतला आणि यांनी सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला म्हणून लाल बहादूर शास्त्री यांना इस्ट इंडिया कंपनीने त्यांना दोन वर्ष करावासामध्ये राहण्याची शिक्षा सुनावली होती. दोन वर्षाची कारावासाची शिक्षा पूर्ण करून आल्यानंतर ते इ. स १९३७ मध्ये युपीच्या संसदीय मंडळामध्ये संघटक सचिव म्हणून रुजू झाले. त्यांनी परत १९४२ मध्ये भारत छोडो ह्या महात्मा गांधींनी केलेल्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि त्यांना आणि त्यांच्यासोबतच्या अनेक नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.

लाल बहादूर शास्त्री यांनी फक्त स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला नाही तर त्यांनी हुंडा, बेरोजगार आणि गरिबी या विरोधात लढले सूद्धा. तसेच लाल बहादूर शास्त्री यांना लेखनाची खूप आवड होती त्यामुळे ते लेखन देखील करत होते. ज्यावेळी ते अनेक प्रकारच्या चाल्वालीमध्ये भाग घेवून त्यांना तुरुंगामध्ये घालण्यात आले त्यावेळी त्यांनी तुरुंगा मध्ये आपला वेळ न वाया घालवता त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे लेखन आणि वाचन केले तसेच भारतीय साहित्यामध्ये देखील भर टाकली.

त्यांनी तुरुंगातील वेळेचा सदुपयोग करून त्यांनी मॅडम / मादाम क्युरी यांच्या चरित्राचे हिंदीमध्ये भाषांतर केले तसेच त्यांनी अनेक सुधारक, क्रांतिकारक आणि परदेशी विचारवंतांच्या पुस्तकांचा अभ्यास देखील केला. अश्या प्रकारे त्यांनी त्यांचा तुरुंगातील वेळ देखील सद्मार्गी लावला. अनेक क्रांतीकारांच्या आणि त्यांच्या प्रयत्नाने शेवडी ब्रिटिशांना भारत देश सोडून जावा लागला आणि भारताला ब्रिटीश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले आणि आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला.

स्वातंत्र्य नंतर लगेचच त्या वर्षी देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची नियुक्ती झाली तसेच इ. स १९४७ मध्ये लाल बहादूर शास्त्री हे पोलीस आणि वाहतूक मंत्री झाले आणि ते त्यावेळी या संबधित सर्व कामे पाहू लागले आणि हळू हळू ते त्यांचे क्षेत्र ( पोलीस आणि वाहतूक ) विकासाच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करू लागले.

इ. स १९५१ मध्ये त्यांची ऑल इंडिया कॉंग्रेस या पक्ष्याच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आणि ह्या पदावर त्यांनी एक वर्ष काम केले. त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी तसेच स्वातंत्र्य चळवळी मध्ये त्यांनी दिलेल्या लढ्यासाठी त्यांना लोक चांगल्या प्रकारे ओळखत होते आणि अश्या प्रकारचा चांगला नेता आपल्या देशासाठी लाभला तर ते आपल्या सोबतच देशासाठी देखील खूप चांगले आहे असे लोकांना वाटले आणि इ. स १९५२ मध्ये ते उत्तर प्रदेशचे राज्यसभेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले.

तसेच इ. स १९५५ मध्ये त्यांची रेल्वे मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यावेळी त्यांनी रेल्वे विभागामध्ये अनेक असे बदल घडवले होते तसेच रेल्वे क्षेत्राला विकासाच्या मार्गावर नेवून ठेवले होते. त्यांनी पोलीस आणि वाहतूक क्षेत्रामध्ये त्यांच्या पोलीस आणि वाहतूक मंत्री या कालावधी मध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना इ. स १९५७ मध्ये परत पोलीस आणि वाहतूक मंत्री बनवले होते.

त्याचबरोबर इ. स १९६१ मध्ये त्यांना गृहमंत्री बनण्याचे भाग्य लाभले आणि त्यावेळी त्यांनी देशामध्ये होणारा भ्रष्टाचार मोडून काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी इ. स १९६४ मध्ये ते देशाचे पंतप्रधान बनले आणि त्यांना देशाचा दुसरा पंतप्रधान बनण्याचा मान मिळाला आणि आज देखील त्यांची ओळख सांगताना लोक देशाचे दुसरे पंतप्रधान म्हणून ओळख सांगतात. असे हे क्रांतिकारी आणि अन्याया विरुद्ध लढणारे असे नेतृत्व ११ जानेवारी १९६६ मध्ये हरपले म्हणजेच ११ जानेवारी १९६६ मध्ये ते मृत्यू पावले.

आम्ही दिलेल्या lal bahadur shastri essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लाल बहादूर शास्त्री निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on lal bahadur shastri in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on lal bahadur shastri in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये lal bahadur shastri in marathi essay Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!