लाल बहादुर शास्त्री माहिती मराठीत Lal Bahadur Shastri Information in Marathi

Lal Bahadur Shastri Information in Marathi – Lal Bahadur Shastri Biography in Marathi लाल बहादुर शास्त्री माहिती मराठीत लाल बहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वातंत्र्य चळवळी मध्ये सहभाग घेतला. अतिशय लहान वयामध्ये आपल्या देशासाठी काहीतरी धाडसी करून दाखवाव अशी इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि देशहितासाठी त्यांनी स्वतःच संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. या लेखामध्ये आपण लालबहादूर शास्त्री यांची संपूर्ण कारकीर्द आणि त्यांचे भारताच्या क्रांतीतील महत्त्वपूर्ण योगदान जाणून घेणार आहोत.

lal bahadur shastri information in marathi
lal bahadur shastri information in marathi

लाल बहादुर शास्त्री माहिती मराठीत – Lal Bahadur Shastri Information in Marathi

पूर्ण नाव (Name)लाल बहादूर शास्त्री
जन्म (Birthday)२ ऑक्टोंबर १९०४
जन्म गाव (Birth Place)उत्तर प्रदेशातील मुघलसराई
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)भारताचे दुसरे पंतप्रधान
मृत्यू (Death)११ जानेवारी १९६६

जन्म व वैयक्तिक आयुष्य

लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोंबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशातील मुघलसराई या लहान रेल्वे गावात झाला. लाल बहादुर शास्त्री यांचे वडील शरद प्रसाद श्रीवास्तव हे शाळेत शिक्षक होते व त्यांची आई रामदुलारी देवी. शास्त्री केवळ १८ महिन्यांचे असताना त्यांच्या आयुष्यातून पितृ सुख हरवलं पुढे त्यांच्या आईने त्यांच्या तीन मुलांचा सांभाळ केला. शास्त्रींच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांची आई, शास्त्री व त्यांच्या दोन भावंडांना घेऊन रामनगर वरून मुगलसराय येथे आपल्या वडिलांच्या घरी राहायला गेल्या.

पुढे लाल बहादूर शास्त्री यांनी मुघलसराय व वाराणसी येथून पूर्व मध्य रेल्वे इंटर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं. १९२६ मध्ये लाल बहादूर शास्त्री यांच काशी विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण झालं. अतिशय हुशार होते, अभ्यासु होते त्यांच्या विद्यापीठाकडून त्यांना पुरस्काराचा एक भाग म्हणून शास्त्री म्हणजेच ‘विद्वान’ ही पदवी मिळाली. अगदी अकरा वर्षाचे असल्यापासूनच लालबहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधीलोकमान्य टिळक यांचा खूप प्रभाव पडला होता.

१६ मे १९२८ रोजी लालबहादूर शास्त्री यांनी लग्न केलं त्यांचा विवाह ललितादेवी यांच्याशी झाला. लग्नामध्ये हुंडा म्हणून त्यांनी खादीचे कपडे आणि चरखा स्वीकारला. त्यांच्या लहानपणातील आठवणीने सांगावीशी वाटणारी गोष्ट म्हणजे जवळपास दीड-दोन वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झालं त्यानंतर त्यांच्या आईने त्यांना खस्ता खात वाढवलं लहानपणी शाळेत जाताना बहादूर शास्त्री त्यांच्या घरापासून ७ मैल दूर अनवाणी चालत जायचे त्यांना शाळेत जाण्यासाठी बहुतेक वेळा नदी देखील पार करावी लागत असे त्या वेळी ते डोक्यावर पुस्तके बांधून पोहत नदी पार करायचे कारण त्यांच्याकडे बोटीमधून जाण्या इतके पैसे नव्हते. लाल बहादुर शास्त्री यांचे बालपण अतिशय गरिबीत गेलं.

कारकिर्दीस सुरुवात

लाल बहादूर शास्त्री हे सर्व्हट्स ऑफ द पीपल या लाला लजपत राय यांनी स्थापन केलेल्या सोसायटीमध्ये सदस्य म्हणून सामील झाले. या दरम्यान त्यांनी मागासवर्गीय लोकांच्या उन्नतीसाठी काम करायला सुरुवात केली आणि कालांतराने ते या सोसायटीचे अध्यक्ष झाले. १९२० मध्ये महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ घोषित केली ज्यामध्ये लाल बहादूर शास्त्री यांचा देखील समावेश होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील झाल्यामुळे त्यांना काही काळ तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. त्यावेळी ते १७ वर्षाचे अल्पवयीन असल्यामुळे त्यांना त्वरित सोडून देण्यात आले. लाल बहादुर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधीजी यांचा प्रभाव होता.

सन १९२० च्या दशकात लालबहादूर शास्त्री स्वातंत्र चळवळीत सामील झाले आणि काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून ते काम करू लागले. १९३० मध्ये लाल बहादूर शास्त्री यांचा मिठाचा सत्याग्रहात देखील सहभाग होता त्यामुळे त्यांनी दोन वर्ष तुरूंगामध्ये पाठवण्यात आले. सन १९३७ मध्ये लाल बहादूर शास्त्री यूपीच्या संसदीय मंडळाचे संघटक सचिव बनले. १९४२ ते १९४६ पर्यंत त्यांनी तुरुंगवास भोगला. १९४२ मध्ये महात्मा गांधी यांनी मुंबईत भारत छोडो भाषण दिलं आणि त्यानंतर त्यांना हा तुरुंगवास भोगावा लागला.

आयुष्यातील एकूण नऊ वर्षे त्यांनी तुरुंगामध्ये काढले परंतु लाल बहादूर शास्त्री हे हुशार होते त्यांनी या फावल्या वेळात असंख्य पुस्तके वाचून काढली. सोबतच पाश्‍चिमात्य तत्त्वज्ञ, क्रांतिकारक आणि समाजसुधारकांच्या कार्याची ओळख करून घेतली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यानंतर लाल बहादूर शास्त्री यूपी मध्ये संसदीय सचिव म्हणून रुजू झाले. १९४७ मध्ये ते पोलिस व वाहतूक मंत्री होते. जेव्हा ते परिवहन मंत्री म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदा कंडक्टर म्हणून महिलांची नियुक्ती केली होती.

पोलीस खात्याचे प्रभारी मंत्री असताना लालबहादूर शास्त्री यांनी आंदोलन केलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार न करता पाण्याचा वापर करावा असे आदेश दिले होते. १०५१ मध्ये शास्त्री यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९५२ मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले. १९५५ मध्ये रेल्वेमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी मध्ये पहिली मशीन बसवली. १९५७ मध्ये परिवहन आणि दळणवळण मंत्री म्हणून पुन्हा लालबहादूर शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी वाणिज्य व उद्योग मंत्री अशी पदे भूषवली आहेत.

त्या काळामध्ये हुंडा, जातिव्यवस्थेचा विरोधात जाऊन त्यांनी हुंडा प्रथा व जातीव्यवस्थे विरोधात आवाज उठवला होता. १९६१ मध्ये लाल बहादूर शास्त्री गृहमंत्री झाले त्या दरम्यान त्यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक समिती स्थापन केली. आसाम आणि पंजाब मधील भाषा आंदोलनाचा समावेश असलेला प्रसिद्ध शास्त्रीय फॉर्म्युला त्यांनी तयार केला. व ९ जून १९६४ रोजी लालबहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान झाले. भारतीय जनतेच्या भावना त्यांनी खऱ्या अर्थाने समजून घेतल्या वेगवेगळे उपक्रम व योजना आखून त्यांनी भारतामध्ये क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. श्वेतक्रांती दूध उत्पादन वाढविण्याचे राष्ट्रीय मोहिमेला लालबहादूर शास्त्री यांनी प्रोत्साहन दिले.

त्यांनी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड तयार केले होते ज्यामध्ये त्यांनी आनंद, गुजरात येथील अमूल दूध सहकारी संस्थेला पाठिंबा दिला होता. भारतातील अन्न उत्पादन वाढवण्यावर भर घालण्यासाठी हरितक्रांतीलाही त्यांचे प्रोत्साहन होतं. १० जानेवारी १९६६ मध्ये लाल बहादूर शास्त्री यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष मुहंमद अयुब खान यांच्यासोबत १९६५ मध्ये युद्ध संपवण्यासाठी तांश्कंद घोषणापत्रावर स्वाक्षरी केली होती. लाल बहादूर शास्त्री यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये रेल्वेमंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरूंच्या आजारपणात बिन खात्याचे मंत्री म्हणून काम केले आहे.

सोबतच मोठ्या स्तरावर पंतप्रधान म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करत त्यांनी वेगवेगळे आव्हानात्मक आणि क्रांतिकारक निर्णय घेतले आहे त्यामुळे भारतामध्ये क्रांती घडून आली. त्यांनी वेगवेगळ्या पदावर वेगवेगळी जबाबदारी पार पाडत असताना अतिशय निष्ठेने आणि त्यांच्या नम्रतेने साठी ते लोक समुदायात लोकांचे आवडते नेता बनले. लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधीजी यांचा प्रभाव होता. ते त्यांना आदर्श मानायचे आणि अतिशय आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही महान पुरुषांचा जन्मदिवस सारख्याच तारखेला आहे.

लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली आणि त्यांनी भारताचे भविष्य घडवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. लाल बहादूर शास्त्री हे उच्च आत्मसन्मान, नम्रता, नैतिकता असलेले अत्यंत शिस्तप्रिय नेते होते आणि म्हणूनच ते लोकांचे लाडके होते. अगदी पंतप्रधान झाल्यावर त्यांच्याकडे स्वतःची गाडीही नव्हती त्यांनी ज्या पदांवर काम केलं ते फक्त आणि फक्त जनतेच्या हितासाठीच केलं. आपल्या पदाचा गैरवापर व स्वहितासाठी कधीच फायदा करून घेतला नाही. ते खऱ्या अर्थाने लोकांचे नेते झाले व त्यांनी लोकांच्या समस्या, अडचणी, भावना समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले.

मृत्यू

लाल बहादूर शास्त्री हे एक भारतीय राजकारणी होते जे सामान्य माणसाची भाषा समजून घ्यायचे. नम्रता, आंतरिक शक्ती व सहनशीलता आणि दूरदृष्टी या घटकांच्या जोरावर त्यांनी भारतामध्ये क्रांती घडवून आणली. ते महान व कर्तबगार व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. महात्मा गांधीजींच्या शिकवणीचा त्यांच्यावर खूपच प्रभाव होता. परंतु ११ जानेवारी १९६६ रोजी लालबहादूर शास्त्री यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

त्यांच्या जाण्याने अर्थातच भारताला खूप मोठा धक्का पचवावा लागला. भारताचे नुकसान झाले. परंतु भारत सरकार तर्फे त्यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रदान करण्यात आला. त्यांच्या निधनामुळे सर्वसामान्य माणसांनी एक सच्चा नेता गमावला व भारताचे राजकीयदृष्ट्या नुकसान झाले.

आम्ही दिलेल्या Lal Bahadur Shastri Information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लाल बहादुर शास्त्री माहिती मराठीत बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Lal Bahadur Shastri Biography in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Lal Bahadur Shastri in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये lal bahadur shastri marathi mahiti Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!