लोकमान्य टिळक मराठी निबंध Lokmanya Tilak Essay in Marathi

Lokmanya Tilak Essay in Marathi – Lokmanya Tilak Nibandh in Marathi लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध मित्रहो, “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हे घोषवाक्य जणू अर्धमेल्या झालेल्या समाजाला जीवन देणारी संजीवनी होती आणि अशा विश्वासाने, साहसाने आणि फक्त स्वातंत्र्यासाठी देशातील सर्व युवकांना जागृत करण्यासाठी ज्यांच्या मुखातून हे घोषवाक्य निघाले ते आपले लोकप्रिय नेते बाळ गंगाधर टिळक यांची आज इथे आपण माहित घेणार आहोत.

lokmanya tilak essay in marathi
lokmanya tilak essay in marathi

लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध – Lokmanya Tilak Essay in Marathi

Lokmanya Tilak Nibandh in Marathi

बाळ गंगाधर टिळक यांचे बालपण

मित्रहो, लोकमान्य टिळक यांचे मुळ नाव केशव गंगाधर टिळक असे असून त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात दिनांक २३ जुलै १८५६ रोजी झाला. लोकमान्य टिळक यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक तर, आईचे नाव पार्वतीबाई गंगाधर टिळक असे होते. इसवी सन १८७१ मध्ये टिळकांचे तापिबाईशी लग्न झाले आणि लग्नानंतर त्यांच्या पत्नीला सत्यभामाबाई म्हणून ओळखले गेले.

मित्रहो, लोकमान्य टिळक यांना तीन मुली होत्या आणि श्रीधर, रामभाऊ आणि विश्वनाथ असे तीन मुले होती. इसवी सन १८६६ मध्ये गंगाधरपंत यांची बदली पुण्यास झाली. त्यामुळे, लोकमान्य टिळक आपल्या आई आणि वडिलांबरोबर पुण्यात आले. पुण्यात राहून पुढे त्यांनी १८७२ मध्ये आपले मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे १९७६ मध्ये त्यांनी आपले बी.ए. पूर्ण करून पुढे एल.एल.बी.ची पदवी घेतली. असा लोकमान्य टिळकांनी आपला शैक्षणिक प्रवास पूर्ण केला.     

लोकमान्य टिळकांचे शैक्षणिक कार्य

मित्रहो, लोकमान्य टिळकांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत असताना, त्यांची आगरकर यांच्याशी मैत्री जमली आणि दोघांनीही देश कार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना १ जानेवारी १८८० रोजी केली.

लोकमान्य टिळक हे गणित आणि संस्कृत विषय शिकवत होते पण, त्यांनी विनावेतन शिक्षकी पेशा स्वीकारला आणि आगरकर व चिपळूणकर यांच्या मदतीने इसवी सन १८८१ मध्ये आर्यभूषण हा छापखाना काढून “केसरी” व “मराठा” ही दोन वृत्तपत्रे चालू केली.

पुढे वृत्तपत्रांच्या मदतीने लोकमान्य टिळकांनी राजकीय जागृती, शैक्षणिक कार्य, लोकशिक्षण आणि  शासकीय अन्यायाचा प्रतिकार करत, त्यांनी आपले ऐतिहासिक कार्य चालू केले. लोकमान्य टिळकांनी आपल्या वृत्तपत्रातून इंग्रज सरकार यांच्या गैर कारभाराबद्दल आणि गैरवर्तवनुकीबद्दल कडाडून टीका केली.

त्यासाठी, टिळक आणि आगरकर यांना चार महिन्याची शिक्षा ठोठावत डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले आणि दिनांक २६ ऑक्टोंबर १८८२ रोजी त्यांची सुटका करण्यात आली. इसवी सन १८८२ मध्ये विष्णुशास्त्री मरण पावल्यानंतर टिळक आणि आगरकर यांनी दांडेकर, तेलंग, भांडारकर, वेडर बर्न, मंडलिक, य. मो. केळकर अशा राजकीय व्यक्तींच्या मदतीने,

इसवी सन १८८४ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि याच संस्थेच्या मार्फत इसवी सन १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालय स्थापन करून आपल्या शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याला एक वेगळीच कलाटणी दिली.

लोकमान्य टिळक यांनी धर्माचा अभ्यास केला होता. त्यांनी, तत्वज्ञान, गीता, उपनिषदे ,आचार्यांचे भाष्ये, धर्मशास्त्रे यांचा देखील अभ्यास केला होता. टिळकांना आपल्या राष्ट्राइतकाच हिंदू धर्माचा खूप अभिमान होता. ज्या व्यक्तीस हिंदुत्वाचा किंवा हिंदू धर्माचा अभिमान नाही, त्या व्यक्तीने हिंदू लोकांनी काय समाज सुधारणा कराव्यात हे सांगण्याचा सुद्धा अधिकार नाही, असे त्यांचे स्पष्ट वक्तव्य होते.

यातूनच समजून येते की, टिळकांचे आपल्या धर्मावर किती प्रेम होते आणि ते त्याच निष्ठेने, विश्वासाने; हिंदू प्रेम, धर्म प्रेम आपल्या कार्याद्वारे पोहोचवत होते. त्यांच्या मतानुसार, हिंदुत्व हे स्वत्वाचे फळ आहे.

पुढे जाऊन लोकमान्य टिळकांनी डेक्कन एज्युकेशन संस्था सोडून आपले विविध पातळीवर कार्य सुरू केले त्यामध्ये हिंदुमुसलमानांचे दंगे, ग्रामण्य प्रकरण, रमाबाईचे शारदा सदन, सार्वजनिक समाजकार्य असे विविध विषय त्यांनी हाताळले. त्यांच्या या कार्यात स्वराज्य हा त्यांचा मूळ हेतू होता. लोकांच्या मनात ज्वलंत देशाचा अभिमान आणि देश प्रेम निर्माण करून करून स्वातंत्र्यासाठी लढण्याची ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य लोकमान्य टिळक करत होते.

त्यासाठी ते राजकीय पक्षाविरूद्ध सतत संघर्ष करून इंग्रजी सत्तेविरुद्ध आणि त्यांच्या कारभाराविरुद्ध आपल्या प्रखर लेखनाने आपल्या वृत्तपत्रातून कडाडून विरोध करत होते.त्यांच्या या लेखाने प्रेरित होऊन चाफेकर बंधूंनी २२ जून १८९७  रोजी कमिशनर रेंड ओरो लेफ्टनंट चा खून केला. त्यामुळे त्यांना इंग्रज सरकारने देशद्रोही या आरोपाखाली सहा वर्षे हद्दपार केले व त्यांना बर्माच्या मांडले तुरुंगात ठेवण्यात आले.

इसवी सन १९०८ ते इसवी सन १९१४ या सहा वर्षाच्या कालावधीत त्यांनी तुरुंगामध्ये ‘गीतारहस्य’ हे पुस्तक लिहिले. इंग्रजी सत्ता ही ईश्वरी अंश आहे आणि उदारमतवादी इंग्रजी सत्ता भारताच्या राजकीय हक्क आणि मागण्या मान्य करतील तसेच इंग्रजी सत्तेच्या अनुसार आणि त्यांच्या नियमावर अवलंबून राहणे यातच आपले हित आहे; ही रुड झालेली परंपरा मोडून काढत ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’या सिंहगर्जनेने सर्व देशभरात लोकांच्या मनात स्वातंत्र्य आणि स्वराज्य याचे बीज पेरायला सुरुवात केली.

मित्रहो, लोकमान्य टिळक हे चांगले संपादक तर होतेच पण, ते गणित, खगोलशास्त्र, संस्कृत या भाषांमध्ये देखील पारंगत होते. शिवाय, त्यांनी ‘ओरायन’, आर्टिक होम ऑफ वेदाज’,’ गीतारहस्य’ अशी कठीण पण नावीन्यपूर्ण भरलेली पुस्तके त्यांनी .

सार्वजनिक उत्सवांची सुरुवात

लोकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी गणेशोत्सव इसवी सन १८९३ साली साजरा करण्यास सुरुवात केली. तसेच, महात्मा फुले यांच्या मदतीने त्यांनी शिवजयंती सारखे उत्सव सुद्धा साजरे करण्यास सुरुवात केली. या सार्वजनिक उत्सवातून लोकांना एकत्रित येऊन सरकार विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी मनापासून चालना दिली.

लाल-बाल-पाल असे त्रिकूट समीकरण

मित्रहो, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांशी कसा व्यवहार करावा यासाठी तेथे दोन मतप्रवाह होते एक मवाळ वाद आणि दुसऱ्या जहालवाद. मवाळवादी विचाराने प्रेरित झालेले नेते इंग्रजी सरकारशी मिळते-जुळते घेऊन शांततेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी प्रयत्न करत होते. तर, जहालवादी विचाराचे नेते याच्या अगदी विरुद्ध होते.

इंग्रजी सरकारने भारताला स्वातंत्र्य दिलेच पाहिजे त्यासाठी कोणत्याही प्रकारची विनंती अथवा मनधरणी केली जाणार नाही. वेळ प्रसंगी आंदोलने किंवा कायदेशीर कारवाया करण्याचे विचार हे जहालवादी नेत्यांचे होते. लोकमान्य टिळक हे पूर्णता जहालवादी विचाराचे होते त्यामुळे बिपिन चंद्र पाल, लाला लजपतराय यांचे विचार लोकमान्य टिळक यांच्याशी पूर्णता मिळतेजुळते असल्यामुळे त्यांना ‘लाल बाल पाल’ असे त्रिकूट नामकरण मिळाले.

संशोधन व साहित्य

मित्रहो ‘मराठा’ आणि ‘केशरी’ ही दोन वृत्तपत्रे  तर होतीच, पण त्यांच्या मदतीने टिळक यांनी वेगवेगळे विषय मांडण्याचे देखील सुरू केले. इसवी सन १८७१ पासून ते इसवी सन १९२० पर्यंतच्या या काळामध्ये त्यांनी ‘टिळक सुटले काय’, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय’, ‘उजाडले पण सूर्य कुठे आहे’, ‘प्रिन्सिपॉल’, ‘शिशुपाल की पशुपाल’, ‘हे आमचे गुरूच नव्हते’, ‘बादशहा ब्राह्मण झाले ‘अशाप्रकारे एकूण पाचशे तेरा अग्रलेख आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी प्रसिद्ध केले.

एवढेच नाही तर, बालविवाह प्रथा, शिक्षणाचा अधिकार, विधवांचे विपणन करणे, समाजातील अनिष्ट रूढी प्रथा, चालीरीती अंधविश्वास यावर कडाडून टीका केली. त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना असंतोषाचे जनक असे संबोधले पण स्वातंत्र्य, स्वराज्य, हिंदू प्रेम आणि लोक प्रेम, देशासाठी त्यांची असलेली तळमळ निष्ठा आणि सामाजिक राजकीय कार्य पाहून त्यांना’लोकमान्य’ या उपाधीने सन्मानित केले.

अशा या महान युगपुरुषाचे अखेरीस १ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने देशभरात पूर्णता शोककळा पसरली. दूरवरून लोक त्यांच्या अंतिम दर्शनाला येत होते. त्यांच्या या महान कार्यामुळे देशात आमूलाग्र बदल घडून आला.

आम्ही दिलेल्या lokmanya tilak essay in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या short essay on lokmanya tilak in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि lokmanya tilak marathi nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये essay on lokmanya tilak in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!