महाराणी येसूबाई माहिती Maharani Yesubai Information In Marathi

Maharani Yesubai Information In Marathi महाराणी येसूबाई या मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मपत्नी होत्या. खरंतर बऱ्याच लोकांना महाराणी येसूबाई यांच्या बद्दल अधिक माहिती नाही आहे कारण त्यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल तीस वर्ष मोगलांच्या कैदेत काढली. महाराणी येसूबाई यांच जन्म स्थान कोकणातील दाभोळ आहे. महाराणी येसूबाई या धाडसी, कर्तुत्ववान होत्या त्यांचा स्वतः असणारा आत्मविश्वासच त्यांना पुढे जाऊन कामी आला. महाराणी येसूबाई या इतिहासाच्या पानावरील एक कर्तुत्वान महिला होत्या. त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी स्वतःला तीस वर्ष मोगलांच्या कैदेत ठेवलं होतं, आणि त्यांच्या याच संघर्षाबद्दल ची माहिती आपण आजच्या लेखामध्ये घेणार आहोत.

maharani yesubai information in marathi
maharani yesubai information in marathi

महाराणी येसूबाई माहिती – Maharani Yesubai Information In Marathi

नाव (Name)महाराणी येसूबाई
जन्म (Birthday)14 एप्रिल १६७५
जन्मस्थान (Birthplace)कोकणातील दाभोळ
वडील (Father Name)पिराजीराव शिर्के
पती (Husband Name)छत्रपती संभाजी महाराज
मुले (Children Name)थोरले शाहू महाराज
मृत्यू (Death)१७३०
लोकांनी दिलेली पदवीमहाराणी, युवराज्ञी

महाराणी येसूबाई जन्म:

महाराणी येसूबाई यांच जन्म स्थान कोकणातील दाभोळ आहे. महाराणी येसूबाई यांची जन्मतारीख इतिहासात नोंदवली नाही आहे. महाराणी येसूबाई पिलाजीराव शिर्के यांच्या कन्यारत्न होत्या. पिराजीराव शिर्के हे मराठा साम्राज्य मध्ये एक मुख्य मराठा सैनिक होते. जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेवेत नेहमीच एकनिष्ठ राहिले. येसूबाई महाराणी यांच माहेर शृंगारपूर होतं त्यांना माहेरी राजाऊ या नावाने हाक मारली जायची.

महाराणी येसूबाई या धाडसी, कर्तुत्ववान होत्या त्यांचा स्वतः असणारा आत्मविश्वासच त्यांना पुढे जाऊन कामी आला. लहानपणापासूनच त्या अतिशय हुशार आणि चतुर होत्या. महाराणी येसूबाई स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्येष्ठ असून तसेच स्वराज्य कारभाराच्या कुलमुखत्या होत्या.

महाराणी येसूबाई विवाह:

छत्रपती शिवाजी महाराज यांना मराठा साम्राज्य वाढीसाठी जास्तीत जास्त गड-किल्ले त्यांच्या हाताखाली हवे होते. त्यातलाच एक गड जिंकण्यासाठी म्हणजेच प्रचितगड जिंकण्यासाठी महाराजांना पिलाजीराव शिर्के‌ यांची मदत झाली आणि प्रचितगड शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. यात पिलाजीराव शिर्के यांच्या झालेल्या मदतीमुळे एक तह झाला होता.

त्या तहानुसार शिवाजी महाराजांना त्यांच्या मुलाचं लग्न (म्हणजेच संभाजी महाराज) पिलाजिराव यांच्या कन्येशी करून द्यायचं होतं. त्याच नुसार महाराजांनी संभाजीराजांचे लग्न पिलाजीराव यांची कन्या जीवाबाई यांच्याशी करून दिलं. लग्नानंतर मराठी चालीरीती नुसार जीवाबाई यांचे नाव येसूबाई असं ठेवण्यात आलं. महाराणी येसूबाई आणि छत्रपती संभाजी महाराज यांना एकूण दोन अपत्य झाली. भवानी बाई आणि शाहू महाराज.

युवराज्ञी:

“नखशिखा” हा ग्रंथ संभाजी महाराजांनी त्यांची पत्नी येसूबाई यांना श्री सखी राज्ञी जयती महाराणी ही पदवी देऊन हा ग्रंथ त्यांच्या प्रेरणेतून लिहिला. यामध्ये त्यांनी युवराज्ञी या शब्दाचा उल्लेख देखील केला होता.

महाराणी येसूबाई इतिहास – maharani yesubai history in marathi

छत्रपती संभाजी महाराज मोगलांच्या तावडीत सापडल्यावर आता स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी कोणीतरी स्वराज्यरक्षक हवा होता. आता संभाजी महाराजां नंतर त्यांचा मुलगा शाहू यांचं गादीवर बसन गृहीत होतं. परंतु ते वयाने अतिशय लहान असल्यामुळे महाराणी येसुबाई यांनी आपला दीर जो त्यांना आपल्या मुलासारखाच होता त्याला गादीवर बसवलं.

म्हणजेच छत्रपति शिवाजी महाराज यांचा दुसरा मुलगा राजाराम राजे हे गादीवर बसले. चारी बाजूने हल्ले होत होते त्या मध्येच छत्रपती संभाजी महाराज मोगलांच्या कैदेत होते इतकच नव्हे तर रायगडाला देखील मोगलांनी वेढा घातला. आता रायगड वरून सुटण्यासाठी महाराणी येसूबाई यांनी एक युक्ती लढवली.

त्यांनी अधिपती म्हणजेच राजाराम महाराज त्यांना आणि त्यांच्या परिवाराला जिंजी येथे जाण्यास सांगितले आणि तिकडून मोगलांशी संघर्ष करण्याचा उपदेश दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार राजाराम राजे व त्यांचा परिवार रायगड सोडून जिंजी कडे जाण्यासाठी निघाले. आता रायगडावर फक्त उरलेले मावळे येसूबाई आणि त्यांचा सात वर्षाचा मुलगा शाहू.

महाराणी येसूबाई कैद:

छत्रपती संभाजी महाराज मोगलांच्या तावडीत सापडले होते इसवी सन १६८९ मध्ये. संभाजी महाराजांवर अनेक अत्याचार झाले. स्वराज्यावर होणारे हल्ले, शत्रु स्वराज्य उद्ध्वस्त करायला निघाले होते चारी बाजूने स्वराज्यावर संकट ओढवलं होतं. या संकटावर मात करणं इतकं सोपं नव्हतं महाराणी येसुबाई यांनी खूप खंबीर पणे या लढाईचा सामना केला त्यांचे आयुष्य आधीपासूनच संघर्षमय होतं.

अख्या राजघराण्यात त्यांच्यासारखा संघर्ष आजपर्यंत कोणीच केला नाही आहे. एकीकडे त्यांचे पती संभाजी महाराज मोगलांच्या कैदेत अडकले होते दुसरीकडे स्वराज्यावर येणारी संकटे इतक्यातच रायगडला पडलेला वेढा महाराणी येसूबाई चारही बाजूने अडकल्या होत्या राजाराम राजे व त्यांचा परिवार तर जिंजीकडे जाण्यास निघाले होते परंतु महाराणी येसूबाई आणि त्यांचा मुलगा शाहू रायगडावरच होते.

जवळपास आठ महिने महाराणी येसूबाई यांनी रायगडाच्या वेढ्याला तोंड दिलं. आणि शेवटी महाराणी येसूबाई देखील मोगलांच्या तावडीत सापडल्या. येसूबाई आणि त्यांचा मुलगा शाहू तसेच गडावरील उरलेले काही मावळे यांना मोगलांनी कैद केलं आणि जवळपास महाराणी येसूबाई यांना २९ वर्ष मोगलांच्या कैदेत रहावं लागलं. २९ वर्षाचा हा वनवासच होता.‌

शाहू महाराज औरंगझेबाचे लाडके असल्या मुळे औरंगजेबाने शाहू महाराजांना राजा बनवून गुजरात आणि खान्देश प्रदेश चालवायला दिला होता. तसेच महाराणी येसूबाई यांच्याकडे देखील काही राज्यकारभाराचे अधिकार होते परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ह्या दोघांना दिल्लीला पाठवण्यात आले.

महाराणी येसूबाई सुटका:

महाराणी येसूबाई या तब्बल २९ वर्ष मोगलांच्या कैदेत होत्यात परंतु शाहू महाराज हे केवळ १७ वर्ष मोगल कैदेत होते. १७ वर्षानंतर शाहू महाराजांना औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा याने महाराजांना कैदेतून मुक्त केलं. त्यावेळी राजाराम राजे देखील मरण पावले होते त्यानंतर स्वराज्य पूर्ण विस्कळीत झालं होतं तेव्हा ताराबाई स्वराज्य कारभार बघत होत्या.

त्यामुळे ताराबाई आणि शाहू महाराज यांच्या मध्ये फूट पाडण्यासाठी शाहू महाराज खरे स्वराज्याचे अधिपती आहेत या उद्देशाने त्यांना कैदेतून मुक्त करण्यात आलं. परंतु त्यांनी मोगलांवर हल्ला करू नये म्हणून येसूबाई यांना मोगलांच्या कैदेत ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर गादीवर बसण्यासाठी दरबारामध्ये वाद-विवाद चालू होते त्या संधीचा फायदा घेऊन बाळाजी पेशवे हे पहिले पेशवे यांनी महाराणी येसूबाई यांची सुटका केली.

महाराणी येसूबाई सुटकेनंतर काळ:

तब्बल तीस वर्षानंतर महाराणी येसूबाई या आपल्या हक्काच्या स्वराज्यात आल्या होत्या. सुटके नंतरचा काळ महाराणी येसूबाई यांनी अतिशय आनंदात घालवला. तीस वर्षे त्यांनी मोगलांच्या कैदेत राहून स्वराज्य बद्दल एकनिष्ठा दाखवली‌‌. त्यांचं स्वराज्यावरच प्रेम अपरंपार आहे हे त्यांनी दाखवलं. स्वतःचा त्याग करून त्यांनी स्वराज्याला नेहमीच मान्यता दिली.

स्वराज्यात परत येईपर्यंत महाराणी येसुबाई यांनी साठी गाठली होती. महाराणी येसूबाई यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते त्या फक्त शाहू महाराजांना आता सल्ला देण्याचं आणि आशीर्वाद देण्याचा काम करायच्या. महाराणी येसूबाई यांनी शाहू महाराजांच्या काळात होणारा स्वराज्याचा विस्तार पाहिला होता आणि त्यांनी दिलेल्या त्यागाचे फळ त्यांना निश्चित भेटले असणार.

महाराणी येसूबाई कार्य:

महाराणी येसूबाई या इतिहासाच्या पानावरील एक कर्तुत्वान महिला होत्या. त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी स्वतःला तीस वर्ष मोगलांच्या कैदेत ठेवलं होतं. लहानपणापासूनच महाराणी येसूबाई यांच्या संघर्षमय राहिलं आहे. नवरा जिवंत असताना देखील त्यांना विधवेचे सोंग आणावं लागलं होतं.

त्याशिवाय संभाजी महाराज मोगलांच्या कैदेत अडकले होते तेव्हा महाराणी येसूबाई यांच्या कानावर पडणाऱ्या संभाजी महाराजांच्या बातम्या सोबतच रायगडला पडलेला वेढा. या सगळ्यांना महाराणी येसुबाई यांनी खंबीरपणे तोंड दिलं. नवऱ्याचा मृत्यू, त्यानंतर स्वतःचा स्वराज्यासाठी दिलेला त्याग महाराणी येसूबाई यांच इतिहासातील कार्य आणि स्वराज्य रक्षण मध्ये खूप मोठं श्रेय दर्शवतो.

महाराणी येसूबाई त्याच औरंगजेबाच्या कैदेत होते ज्याने महाराणी येसूबाई यांच्या पतींची म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरपणे हत्या केली होती. अशा माणसाच्या कैदेत राहताना महाराणी येसूबाई यांच्या वर काय परिस्थिती ओढवली असेल त्यासोबतच आजूबाजूला संपूर्ण वेगळे वातावरण, वेगळी माणसं, परपुरुष तसेच पतीच्या निधनामुळे आणि स्वतःचा स्वराज्य रक्षणासाठी केलेल्या त्यागामुळे त्यांची मानसिक परिस्थिती किती खालवली असावी या सगळ्याची कल्पना करणे देखील खूप भयंकर आहे.

अशा थोर माउलीने हे सगळं प्रत्यक्षात सहन केलं यासाठी येसूबाई यांचे आपण सगळेच आभारी आहोत.

महाराणी येसूबाई मृत्यू:

महाराणी येसुबाई यांनी कैदेतून सुटल्यानंतरचा काळ अतिशय चांगला घालवला. महाराणी येसूबाई यांचा मृत्यू नैसर्गिक पद्धतीने झाला. इसवी सन १७३० मध्ये महाराणी येसूबाई यांचं निधन झालं. शाहू महाराजांनी महाराणी येसूबाई यांच्यावर विधी करून माहुली येथे कृष्णा नदीच्या काठी महाराणी येसूबाई यांची समाधी बांधली.

महाराणी येसूबाई समाधी:

महाराणी येसूबाई या इतिहासातील एक कर्तबगार धाडसी महिला होत्या. त्यांनी दिलेला स्वराज्यासाठीचा त्याग नेहमीच श्रेष्ठ राहील. महाराणी येसूबाई यांना १७३० मध्ये नैसर्गिकरीत्या मरण आलं. त्यानंतर शाहू महाराजांनी सगळे विधी पार पाडून महाराणी येसूबाई यांची समाधी क्षेत्र माहुली येथे कृष्णा नदीच्या काठावर बांधली.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, महाराणी येसूबाई यांची प्रतिमा कशी होती. maharani yesubai information in marathi language त्यांचा जन्म, विवाह तसेच त्यांनी केलेली कार्ये काय आहेत? त्यांचा इतिहास काय आहे व कसा आहे? अशीच संपूर्ण माहिती आम्ही लेखाद्वारे थोडक्यात पूर्ण केली आहे. maharani yesubai information in marathi pdf हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about maharani yesubai in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही महाराणी येसूबाई यांच्या विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या maharani yesubai wiki in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही  त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!