Chhatrapati Rajaram Maharaj Information in Marathi छत्रपती राजाराम महाराज: राजाराम राजे हे मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती होऊन गेले. ते शिवपुत्र होते. शिवाजी महाराजांना राजाराम राजे यांच्या जन्माच्या वेळी वाटलं होतं की महाराज मोगल शत्रुना पाणी पाजतील. परंतु तसे झाले नाही पण तरीदेखील राजाराम राजे यांनी त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत मराठा साम्राज्याचा संरक्षण केलं. मराठा साम्राज्याचे रक्षण करताना त्यांच्यावर आलेले संकट आणि खडतर प्रवास याची सविस्तर माहिती आपणास या लेखामध्ये घेणार आहोत.
छत्रपती राजाराम महाराज माहिती मराठी – Rajaram Maharaj Information in Marathi
नाव (Name) | राजारामराजे शिवाजीराजे भोसले |
जन्म (Birthday) | २४ फेब्रुवारी १६७० |
जन्मस्थान (Birthplace) | राजगड किल्ला |
वडील (Father Name) | शिवाजीराजे भोसले |
आई (Mother Name) | सोयराबाई |
पत्नी (Wife Name) | जानकीबाई, ताराबाई, राजसबाई, अंबिकाबाई |
राज्याभिषेक | ९ फेब्रुवारी १६८९ |
मृत्यू (Death) | ३ मार्च १७०० |
लोकांनी दिलेली पदवी | बाळराजे |
राजाराम महाराज जन्म
छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र म्हणजेच राजाराम राजे यांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडा या गडावर झाला. महाराजांचे लष्करी शिक्षण त्यांचे सख्खे मामा हंबीरराव मोहिते यांच्या हाताखाली झालं. महाराजांना लहानाचं मोठं त्यांची आई सोयराबाई यांनी केल.
राजाराम महाराज लग्न
राजाराम राजे यांची एकूण चार लग्न झाली. त्यातील त्यांचा पहिला लग्न १५ मार्च १६८० रोजी जानकीबाई ही प्रतापराव गुजराची मुलगी यांच्याशी झालं. काही वर्षांनी जानकीबाई यांचे निधन झालं. आणि त्यानंतर महाराज यांचे दुसरे लग्न त्यांचे मामा हंबीरराव मोहिते यांची मुलगी ताराबाई यांच्याशी झालं. त्यानंतर महाराजांचा तिसरा लग्न कागलकर घाटगे यांची कन्या राजसबाई यांच्याशी झालं आणि चौथ लग्न अंबिकाबाई यांच्याशी झाला.
राजाराम महाराज वंशावळ
शहाजीराजे भोसले यांना तीन मुलं झाली. त्यातील पहिल्या मुलाचे नाव संभाजी भोसले, दुसरे मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज भोसले आणि तिसरे व्यंकोजीराजे भोसले. छत्रपती शिवाजी महाराज यांना छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम राजे असे दोन अपत्य झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि सोयराबाई यांचे पुत्र राजाराम राजे.
छत्रपती राजाराम राजे – शिवाजी महाराज (दुसरे) कोल्हापूर – संभाजी महाराज – शिवाजी महाराज (तिसरे) – राजाराम महाराज – शिवाजी महाराज (चौथे) – राजर्षी शाहू महाराज – राजाराम महाराज – शाहू महाराज.
छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्याचे मुख्य कारभारी कोण होते
छत्रपती संभाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याची घडी पूर्णपणे विस्कटली होती. आता स्वराज्याच रक्षण करण्यासाठी राजाराम राजे गादीवर बसले परंतु त्यांना राजनीति आणि जास्त अनुभव नसल्याने त्यांनी स्वराज्याचा कारभार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव असे दोन मुख्य आणि विश्वासू सेनापती निवडले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचा कारभार चालवला.
छत्रपती राजाराम महाराज यांची कारकीर्द कोणती होती:
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी आता राजाराम राजे यांच्यावर आली होती. तर झालं असं छत्रपती संभाजी महाराज मोगलांच्या तावडीत सापडले आणि आता स्वराज्याच संरक्षण करण्यासाठी एक योग्य रक्षकाची गरज होती. आणि म्हणूनच येसूबाई यांनी त्यांचा स्वतःचा मुलगा शाहू यांना गादीवर न चढवता त्यांनी अष्टप्रधान मंडळात सोबत निर्णय घेऊन राजाराम राजे यांना गादीवर बसवलं.
राजाराम राजे यांचा राज्याभिषेक करून दिला आणि ९ फेब्रुवारी १६८९ रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते स्वराज्य रक्षण करण्यासाठी स्वराज्य सिंहासनावर बसले. परंतु महाराजांना तेवढा अनुभव नव्हता म्हणून त्यांनी दोन सेनापती निवडले त्यामध्ये एक संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव होते यांच्या नेतृत्वाखाली महाराजांनी स्वराज्य चालवले.
त्यांची पहिली लढाई १० जून १६८९ रोजी लढली. ही लढाई काकरखान विरुद्ध होती राजाराम राजे यांनी व त्यांचे सर्नोबत नरवीर पिलाजी गोळे यांच्या साथीने मोगलांच्या सैन्यास पळवून लावले. स्वराज्याच्या समोर आता अनेक प्रश्न येऊन उभे राहिले होते. मोगल तर स्वराज्याच्या पाठीमागे लागले होते मोगलांनी स्वराज्य पूर्णपणे नष्ट करून टाकण्याचा ठरवलंच होतं.
एका पाठोपाठ एक स्वराज्या वरती हल्ले होत होते त्यामध्ये जनतेचे होणारे हाल आणि स्वराज्याला भासणारी पैशांची गरज. संकट एका मागोमाग राजाराम राजे यांच्या पाठी लागले होते. राजाराम राजे आधी तर सिंहासनावर बसण्यासाठी तयार नव्हते कारण शाहू म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराजांच्या सोबत कैद होते.
त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त तेच सिंहासनावर बसू शकतात म्हणूनच राजाराम राजे यांनी स्वतःला राजा न मानता त्यांना शाहू महाराजांचा एक प्रतिनिधी म्हणून सिंहासनावर बसून स्वराज्य रक्षण करण्यास सुरुवात केली. स्वराज्य पार मोडकळीला आले होते, कारण मोगल एकापाठोपाठ एक स्वराज्यावर हल्ले करत होते.
म्हणून येसुबाई यांनी राजाराम राजे यांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना कर्नाटक येथील जिंजी मध्ये जाण्यासाठी सांगितले आणि तिकडून मोगलांविरुद्ध युद्ध करण्यासाठी प्रोत्साहित केले. म्हणूनच महाराज रायगडावरून प्रतापगडाकडे गेले आणि पुढे सज्जनगड, सातारा, वसंतगड करत पन्हाळा गडावर पोहोचले त्यांच्यापाठोपाठ मोगल येतच होते.
पन्हाळ गडाला देखील मोगलांनी चारी बाजूने घेरलं. औरंगजेबाने राजाराम राजे जिथे जातील तिथे जाऊन त्यांना पकडून आणून त्यांना देखील संभाजी महाराजांच्या सारखं कैद करायचा आणि त्यांची देखील हत्या करायची अशी योजना आखली होती. परंतु राजाराम राजे यांनी कसही करून पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटून जिंजी पर्यंत पोचून तिकडून मग मोगलांवर आक्रमण करायचं असं ठरवलं होतं.
औरंगजेबाने महाराजांचे जिंजीपर्यंत पोचण्याचे सर्व मार्ग बंद करून टाकले होते. तरीपण महाराज कसं बसं करत जिंजीला पोचले. जिंजीला पोचण्यासाठी महाराजांनी पूर्वेचा मार्ग पकडला शत्रूंना भूल देण्यासाठी. महाराज गडावरून निसटले हे औरंगजेबाला कळताच त्याने अफाट सैन्य महाराजांच्या पाठीवर पाठवले.
त्यावेळी महाराजांसोबत मालोजी घोरपडे, बहिर्जी घोरपडे, संताजी जगताप आणि रूपाजी भोसले होते. त्यांना दोनदा मुघल सैन्याने पकडलं परंतु या सरदारांच्या साथीने महाराजांची सुखरूप सुटका झाली. कसं बस करत महाराज तुंगभद्रा या नदीजवळ पोहोचले. चेन्नम्मा राणी हिला शिवाजी महाराजांचा पराक्रम चांगलाच माहीत होता. शिवाजी महाराजांशी चांगले संबंध असल्यामुळे, औरंगजेबाच्या नकळत तिने राजाराम राजे सुखरूप जिंजीपर्यंत पोहोचतील याची व्यवस्था केली.
पण औरंगजेबाला हे कळताच त्याने चींनंमा राणीच्या राज्यावर हल्ला करण्यासाठी सैनिक पाठवले परंतु हे धनाजी जाधव यांना कळताच ते माघारी आले आणि त्यांनी मोगल सैन्याचा पराभव केला. पण तुंगभद्रेच्या तीरावर मुक्काम करताना एका रात्री मोगलांच्या सैन्याने महाराजांच्या सैन्यावर हल्ला केला आणि महाराज यांना कैद करून ते औरंगजेबाकडे घेऊन गेले.
परंतु तिकडे गेल्यावर लक्षात आलं की त्यांनी महाराजांना नाही तर कोणाला दुसऱ्यालाच पकडला आहे. अशा प्रकारे महाराजांची तिथून देखील सुटका झाली व पुढे जाऊन अनेक वेषांतर करत महाराज जींजी पर्यंत पोहोचले. महाराजांनी हळूहळू जिंजी आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश देखील जिंकून घेतला. आणि तिथे एका नवीन सत्तेला सुरुवात झाली.
एक नवीन पर्व सुरू झाला. पुढे औरंगजेबाने जिंजी त्याच्या ताब्यात करून घेण्यासाठी जुल्फिकार याची नेमणूक केली. १६८९ मध्ये खान अफाट सैन्य घेउन जिंजी वर चालून आला आणि जिंजीला त्याने वेढा घातला. हा वेढा तब्बल आठ वर्ष चालू राहिला त्यावेळी महाराजांनी रामचंद्र पंडित, शंकराजी नारायण, तानाजी धनाजी, संताजी यांच्या नेतृत्वाखाली मोगलांशी युद्ध केलं.
परंतु अखेर विजय मोगलांचा झाला आणि जिंजी त्यांच्या ताब्यात गेला. परंतु त्या आधीच महाराज जिंजी वरुन निसटले होते. महाराज पुन्हा महाराष्ट्रात आले आणि त्यांचा मोगलांची संघर्ष चालूच राहिला.
छत्रपती राजाराम महाराजांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा कारभार कोण पाहत होते
स्वराज्यावर होणाऱ्या सततच्या हल्ल्यामुळे येसूबाई यांनी महाराजांना गड सोडून जिंजी येथे जाण्याचा सल्ला दिला. त्यावेळी महाराजांनी स्वराज्याची सर्व सूत्रे प्रल्हाद निराजी यांच्यावर सोपवली. महाराजांनी त्यांना प्रतिनिधी पद दिलं म्हणजेच ते अष्टप्रधान मंडळाच्या देखील वरचे होते. महाराजांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा कारभार हेच पाहायचे. व महाराजांच्या अनुपस्थितीत ते कोणतेही निर्णय घेऊ शकत होते. तसेच काही निर्णय घेण्याचा अधिकार शंकराजी नारायण व रामचंद्रपंत यांना देखील होता.
राजाराम महाराजांनी धनाजी जाधव यांना कोणता किताब दिला
महाराजांनी त्यांच्या प्रमुख सेनापतींना काही किताब देऊन त्यांचा पुरस्कार केला. त्यांनी धनाजी जाधव यांना जयसिंगराव हा किताब दिला. बहिर्जी घोरपडे यांना हिंदुराव हा किताब दिला. संताजी घोरपडे यांना ममलकतमदार हा किताब देत त्यांना स्वराज्याचे आधारस्तंभ असल्याची जाणीव करून दिली. मालोजी घोरपडे यांना अमीरुलउमराव हा किताब दिला. आणि विठोजी चव्हाण यांना हिम्मतदार असा किताब देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराजांचे निधन केव्हा झाले:
मोगल राजाच्या पाठी लागले होते. त्यांना संभाजीराजांसारखा राजाराम राजे यांची देखील हत्या करायची होती. म्हणून मोगलांनी स्वराज्यावर अनेक हल्ले करण्यास सुरुवात केली. परंतु महाराजांनी स्वराज्यातून बाहेर पडून जिंजी येथे जाण्याचा निर्णय घेतला. जिंजी येथे पोहोचेपर्यंत महाराजांवर अनेक हल्ले झाले महाराजांना अनेक संघर्षांना तोंड द्यावं लागलं.
जिंजी पोहोचताच महाराजांनी जिंजी आणि त्या जवळचा प्रदेश स्वतःच्या ताब्यात केला. परंतु पुन्हा मोगलांनी तिथे येऊन युद्ध सुरू केलं. म्हणून महाराजांनी जिंजी सोडून ते पुन्हा महाराष्ट्रात आले. आणि मोगलांशी संघर्ष चालूच ठेवला परंतु त्याच दरम्यान महाराजांची प्राकृतिक परिस्थिती खालावली आणि सिंहगडावर ३ मार्च १७०० रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजांच्या जाण्यानंतर स्वराज्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं.
राजाराम भोसले वंशज़
महाराजांना एकूण दोन मुले झाली एक म्हणजे दुसरा संभाजी आणि कर्ण. महाराजांच्या मृत्यूनंतर कर्ण गादीवर बसले परंतु त्यांचे देखील तीन आठवड्यांमध्ये निधन झाले. त्यानंतर दुसरा संभाजी गादीवर बसले दुसरा संभाजी हे राजसबाई यांच्यापासून झालेले पुत्र होते.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, छत्रपती राजाराम महाराज यांची प्रतिमा कशी होती. chhatrapati rajaram maharaj information in marathi त्यांचा इतिहास काय आहे व कसा आहे? अशीच संपूर्ण माहिती आम्ही लेखाद्वारे थोडक्यात पूर्ण केली आहे. rajaram bhosale information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच chhatrapati rajaram maharaj in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही छत्रपती राजाराम महाराज यांच्या विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या chhatrapati rajaram maharaj mahiti marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट