महर्षी धोंडो केशव कर्वे यांची माहिती Maharshi Karve Information in Marathi

Maharshi Karve Information in Marathi – Maharshi Dhondo Keshav Karve Information in Marathi महर्षी धोंडो केशव कर्वे यांची माहिती एक जेष्ठ सुधारक म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी उर्फ अण्णा कर्वे हे फार मोठे समाजसुधारक होऊन गेले आहेत. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी व विधवा पुनर्विवाह साठी समाजाच्या बुरसटलेल्या विचारांशी लढा दिला. समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यामध्ये महर्षी कर्वे यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्या योगदानासाठी भारत सरकार द्वारे भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.

maharshi karve information in marathi
maharshi karve information in marathi

महर्षी धोंडो केशव कर्वे यांची माहिती – Maharshi Karve Information in Marathi

पूर्ण नाव महर्षी धोंडो केशव कर्वे
जन्म१८ एप्रिल १८५८
जन्म गावरत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली या गावी
राष्ट्रीयत्व भारतीय
पुरस्कारभारतरत्न
मृत्यू०९ नोव्हेंबर १९६२
टोपणनावमहर्षी उर्फ अण्णा कर्वे

जन्म

महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली या गावी झाला. महर्षी कर्वे यांचे संपूर्ण नाव धोंडो केशव कर्वे असे आहे. लाडाने सगळेजण त्यांना अण्णा अशी हाक मारायचे. कोकणातील मुरुड येथे त्यांनी त्यांच्या आयुष्यातील बराच काळ घालवला. महर्षी कर्वे यांच घराण साधं होतं. महर्षी यांचे कुटुंब गरीब होतं.

आई लक्ष्मीबाई केशव कर्वे या गृहिणी होत्या तर वडील केशव बापूराव कर्वे. महर्षी कर्वे यांना शिक्षणासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. प्राथमिक शिक्षण मुरुड व रत्नागिरी येथून पूर्ण केले. अर्थात महर्षी कर्वे यांचे बालपण कोकणातच गेल. मॅट्रिकची परीक्षा पूर्ण झाल्यावर इसवी सन १८८१ मध्ये ते मुंबईला गेले आणि मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये महर्षी कर्वे यांनी आपला दाखला नोंदवला.

याच कॉलेजमधून अण्णासाहेबांनी गणिताची पदवी देखील प्राप्त केली. पुढे १८९१ पर्यंत महर्षी कर्वे यांनी बि.ए ची पदवी संपादन केली. १४ वर्षाचे होते अण्णा साहेब जेव्हा ते लग्नबंधनात अडकले त्यांचा आठ वर्षाच्या राधाबाईशी पहिला विवाह झाला. परंतु बाळंतपणामुळे राधाबाई फार काळ जगू शकल्या नाही आणि त्यांचं निधन झालं.

पुढे अण्णासाहेबांनी वयाच्या ४५ व्या वर्षी दुसरा विवाह केला तो पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी. अण्णांना रघुनाथ, भास्कर, दिनकर, शंकर अशी चार अपत्ये झाली.

स्त्री शिक्षण व समाजसुधारणा

अठराव्या शतकामध्ये मुलींच्या शिक्षणावर बंदी होती. मुलींनी शिक्षण घेणे म्हणजे पाप करण्या समान होतं. त्याकाळी बालविवाहाची प्रथा होती. सात-आठ वर्षांच्या मुलीची लग्न तीस-पस्तीस वर्षाच्या पुरुषांशी लावून दिली जायची. विधवा स्त्रियांच्या पुनर्विवाहसाठी समाजाच्या विरोध होता. त्या वेळेस फक्त पुरुषांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता परंतु महर्षी कर्वे यांना जाणीव झाली की समाजातील प्रत्येक माणसाला शिक्षणाचा अधिकार आहे.

शिवाय आपली मते मांडण्याचा देखील अधिकार आहे. त्यांनी स्त्री शिक्षणाला पाठिंबा दिला स्त्रीशिक्षण समाजात राबवण्याचा प्रयत्न केला स्त्रियांनी स्वतः शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि स्वयंपाक घराबाहेर देखील जग असतं याची जाणीव महर्षी कर्वे यांनी समाजाला करून दिली. स्त्रियांच्या हक्कासाठी लढताना महर्षी कर्वे यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला.

जेव्हा महर्षी कर्वे यांनी त्यांची दुसरी पत्नी गोदूबाई यांच्याशी विवाह केला तेव्हा समाजाने महर्षी कर्वे यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. कारण महर्षी कर्वे यांची दुसरी पत्नी ही विधवा होती आणि त्यावेळेस विधवांना पुनर्विवाह साठी बंदी होती. महर्षी कर्वे यांना रुढी-परंपरा मान्य नव्हते म्हणूनच त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांमधून प्रोत्साहित होऊन मुलींच्या शिक्षणावर आणि विधवा पुनर्विवाह वर जोर दिला.

जेव्हा महर्षी कर्वे पत्नीसोबत मुरूडमध्ये होते तेव्हा त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. या प्रसंगाला हसत तोंड देत या प्रसंगातून प्रोत्साहित होत त्यांनी मुलींसाठी शाळा खोलण्याचा निर्णय घेतला. अण्णासाहेबांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यावर फर्ग्युसन महाविद्यालयांमध्ये अण्णा साहेबांना गणित विषय शिकवण्याची संधी मिळाली.

इसवी सन १८९१ ते इसवी सन १९१४ या प्रदीर्घ काळापर्यंत त्यांनी या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून सेवा दिली. समाजामध्ये स्त्री शिक्षण व महिला पुनर्विवाह या दोन विचारांची पायमल्ली करण्यासाठी महर्षी कर्वे यांनी २१ मे १८९४ रोजी विधवा विवाह प्रतिबंध निवारक या मंडळाची स्थापना केली. हे मंडळ पुनर्विवाह वर बंदी आणार्या जुन्या विचाराने बुरसटलेल्या प्रवृत्तींना आवर घालण्याचे काम करते.

इसवी सन १८९६ मध्ये महर्षी कर्वे यांनी सहा विधवा महिलांच्या साथीने अनाथ बालिकाआश्रम काढलं. या अश्रमामुळे बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपण यासारख्या विचित्र रुढींनचा सामना कराव्या लागणाऱ्या स्त्रियांची सुटका झाली. पुढे महर्षी कर्वे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली.

या मंडळाद्वारे विधवा पुनर्विवाह या संकल्पनेकडे असणारी समाजाची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला गेला. समाजामध्ये हे सगळे बदल घडवून आणताना महर्षी कर्वे यांना काही वाईट गोष्टींचा देखील सामना करावा लागला होता. परंतु या सर्व काळामध्ये त्यांची दुसरी पत्नी त्यांच्यासोबत होती खरं तर त्याच महर्षी कर्वे यांना प्रोत्साहित करत होत्या.

समाजामध्ये होणारे बदल पाहून रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णा म्हणजेच महर्षी कर्वे यांनी केलेलं हे कार्य पाहून त्यांना हिंगणे येथील एक एकर जमीन समाजकार्यासाठी सुपूर्त केली. या एक एकर जमिनीवर अण्णा साहेबांनी एक झोपडी बांधली जी स्त्री शिक्षण संस्था म्हणून उदयास आली. इसवी सन १९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे देखील हिंगणी येथे स्थलांतर झाले.

याच ठिकाणी १९०७ मध्ये अण्णा साहेबांनी महिला विद्यालयाची स्थापना केली. महर्षी कर्वे यांच्या या कामगिरीमुळे स्त्रियांना शिक्षणाचा महत्व समजलं शिवाय साक्षरते मध्ये देखील वाढ झाली स्त्रियांना त्यांच्या हक्काची जाणीव झाली. १९१० मध्ये शाळा आणि आश्रमाला मनुष्यबळ मिळावं म्हणून महर्षी कर्वे यांनी निष्काम कर्म मठा या संस्थेची स्थापना केली.

हळूहळू महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांना देखील शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केले. ग्रामीण भागांमध्ये स्त्रियांसाठी प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापन केलं आणि त्याच्यातून पुढे अनेक शाळा उदयास आल्या. महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या या तीन संस्थांमधून पुढे जाऊन एक भलीमोठी संस्था निर्माण झाली ज्याचं नाव “हिंगणे स्त्री शिक्षण संस्था” ठेवण्यात आलं.

या शिक्षण संस्थेचा खूप मोठा प्रचार आणि प्रभाव समाजावर पडला आणि या संस्थेचे पुढे जाऊन “महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था” म्हणून नवे नाव समाजासमोर आले. एकशे चार वर्ष महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणा विरुद्धचा लढा चालूच ठेवला आणि अखेर त्यांच्या या लढ्याला यश आलेच.

महर्षी कर्वे यांच्या या कार्याचा श्री गणेशा होऊन १०० वर्ष पूर्ण झाल्यामुळे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या स्त्रियांना “बाया कर्वे” हा पुरस्कार प्रदान करते. महर्षी कर्वे यांच्या दुसऱ्या पत्नीचा तो पण नाव बाया असं होतं. महर्षी कर्वे यांनी जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिली होती.

त्यातूनच ते प्रोत्साहित झाले होते पुढे पुन्हा भारतात परतून इसवी सन १९१६ मध्ये पुण्यामध्ये भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन केलं. महर्षी कर्वे यांच्यासाठी हे खूप मोठे यश होतं. आज बऱ्याच स्त्रिया या संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. महर्षी कर्वे यांच्या चारही अपत्यांनी त्यांचा हा वारसा पुढे चालवला.

पुरस्कार

आपल्या आयुष्याची एकशे चार वर्ष महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षण व समाज सुधारणा मध्ये लावली. स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांनी दीर्घकाळ समाजाशी सामना केला. त्यांच्या स्त्री शिक्षण आणि समाज सुधारणा या क्षेत्रांमधल्या कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कार जाहीर झाले. इसवी सन १९५८ मध्ये महर्षी कर्वे यांना भारत सरकार द्वारे सर्वोच्च मानला जाणारा “भारतरत्न” हा नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सन १९५७ मध्ये मुंबई विद्यापीठातर्फे महर्षी कर्वे यांना एल.एल.डी ही पदवी जाहीर करण्यात आली. इसवी सन १९५५ मध्ये भारत सरकारद्वारे सर्वोच्च पुरस्काराने पैकी एक मानला जाणाऱ्या “पद्मविभूषण” पुरस्कार देऊन महर्षी कर्वे यांचा सत्कार करण्यात आला. एस.एन.डी.टी विद्यापीठातर्फे इसवी सन १०५४ मध्ये डि. लिट पदवी दिली.

सन १९५१ मध्ये पुणे विद्यापीठातर्फे तर इसवी सन १९५२ मध्ये बनारस विद्यापीठातर्फे महर्षी कर्वे यांना डि. लिट ही पदवी देण्यात आली. महर्षी कर्वे यांचं वय १०५ होतं जेव्हा त्यांचं निधन झालं. ९ नोव्हेंबर १९६२ रोजी महर्षी कर्वे यांचा निधन झालं. त्यांच्या स्मरणार्थ हिंगणे या गावास “कर्वेनगर” असं नाव देण्यात आलं आहे.

शिवाय “आचार्य अत्रे” यांनी “अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील एक चमत्कार आहेत” या शब्दांमध्ये त्यांचा वर्णन केले आहे. महर्षी ही पदवी ज्यांनी अव्वल कामगिरी बजावली आहे त्यांना दिली जाते. जनतेने स्वयंप्रेरणेने “महर्षी” ही पदवी कर्वे यांना दिली.

आम्ही दिलेल्या maharshi karve information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर महर्षी धोंडो केशव कर्वे यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maharshi dhondo keshav karve information in marathi wikipedia या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of maharshi karve in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dhondo keshav karve marathi mahiti Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!