मल्हारगड किल्ला माहिती Malhargad Fort Information in Marathi

malhargad fort information in marathi मल्हारगड किल्ला माहिती, महाराष्ट्र या राज्यामध्ये किल्ल्यांचा इतिहास हा अलौकिक आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक असे ऐतिहासिक किल्ले आहेत आणि महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये तर आपल्याला अनेक जुने किल्ले पहायला मिळतात आणि त्यामधील पुणे जिल्ह्यामध्ये असणारा मल्हागड विषयी आज आपण या लेखामध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यामध्ये सह्याद्रीच्या भुलेश्वर या पर्वतरांगेवर मल्हारगड हा किल्ला वसलेला आहे आणि हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची उंची ३१६६ फुट इतकी आहे आणि या किल्ल्याजवळचे गाव हे सासवड आहे.

मल्हारगड हा किल्ला पेशवे सरदारांनी बांधला होता आणि या किल्ल्याबद्दल असे म्हटले जाते कि हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील शेवटचा बांधलेला किल्ला आहे आणि हा किल्ला मराठा साम्राज्याचा देखील शेवटचा किल्ला होता. या किल्ल्याच्या पायथ्याशी सोनोरी हे गाव वसलेले आहे आणि या पायथ्याशी वसलेल्या गावामुळे या किल्ल्याला सोनोरी किल्ला म्हणून देखील ओळखले जाते.

मल्हारगड हा किल्ला पुणे शहरापासून ३० किलो मीटर अंतरावर वसलेला आहे आणि हा किल्ला भुलेश्वर डोंगर रांगेवर वसलेला आहे आणि याच डोंगर रांगेवर पुरंदर, सिंहगड आणि वज्रगड हे किल्ले देखील वसलेले आहेत. चला तर खाली आपण मल्हारगड या किल्ल्याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेवूया.

malhargad fort information in marathi
malhargad fort information in marathi

मल्हारगड किल्ला माहिती – Malhargad Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावमल्हारगड किल्ला
स्थापना / निर्मिती१७६३ ते १७६५ या काळातील
प्रकारगिरिदुर्ग
ठिकाणपुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यामधील सोनोरी या गावाजवळ
उंची३१६६ फुट
पाहण्यासारखी ठिकाणेखंडोबा मंदिर, किल्ल्याची तटबंदी, राजवाड्याचे अवशेष, महादेव मंदिर आणि मुख्य दरवाजा किंवा महादरवाजा.

मल्हारगड किल्ल्याविषयी माहिती – information about malhargad fort in marathi

मल्हारगड हा किल्ला मराठा साम्राज्यातील शेवटचा किल्ला आहे आणि या किल्ल्याची निर्मिती हि १७६३ ते १७६५ या काळातील आहे. मल्हारगड या किल्ल्याचे बांधकाम हे १७६३ मध्ये पेशवे सरदार भीमराव पानसे आणि कृष्णाजी पानसे यांनी सुरुवात केली होती आणि या किल्ल्याचे संपूर्ण बांधकाम हे १९६५ मध्ये पूर्ण झाले.

मल्हारगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यामधील सोनोरी या गावाजवळ वसलेला आहे त्यामुळे या किल्ल्याला सोनोरीगड म्हणून देखील ओळखले जाते. मल्हारगड हा किल्ला भुलेश्वर पर्वत रांगेवर वसलेला आहे आणि हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून या किल्ल्याची उंची ३१६६ फुट इतकी आहे.

या किल्ल्याविषयी असे म्हटले जाते कि ज्यावेळी या किल्ल्याच्या निर्मितीच्या वेळी त्या जागेवर कुदळीने जमिनीवर घाव केल्यानंतर जमिनीतून रक्त वाहत होते आणि त्यावेळी भीमराव पानसे यांनी खंडोबाला साकडे घातले आणि त्यांनी त्याठिकाणी सर्वप्रथम खंडोबाचे मंदिर उभारले आणि नंतर मग किल्ल्याची बांधणी सुरु केली.

किल्ल्यावर आपल्याला खंडोबाचे मंदिर तर पाहायला मिळतेच तसेच त्या ठिकाणी किल्ल्याची तटबंदी, राजवाड्याचे अवशेष असे अनेक ऐतिहासिक अवशेष आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळतात.

मल्हारगड किल्ल्याचा इतिहास – malhargad fort history in marathi

या किल्ल्याची निर्मिती हि १७६३ ते १७६५ या काळातील आहे. मल्हारगड या किल्ल्याचे बांधकाम हे १७६३ मध्ये पेशवे सरदार भीमराव पानसे आणि कृष्णाजी पानसे यांनी सुरुवात केली होती आणि या किल्ल्याचे संपूर्ण बांधकाम हे १९६५ मध्ये पूर्ण झाले. मल्हारगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील शेवटचा आणि मराठा साम्राज्याचा देखील शेवटचा किल्ला होता.

मल्हारगड किल्ल्याची रचना – structure of fort

मल्हारगड हा किल्ला सह्याद्रीच्या भुलेश्वर पर्वत रांगेवर बांधलेला आहे आणि हा या रांगेवर टेकडीच्या माथ्यावर त्रिकोणी आकाराच्या पठारावर बांधला आहे. या किल्ल्याचा मुख्य दरवाजा किंवा प्रवेश दरवाजा हा सोनोरी या गावाकडे आहे आणि या किल्ल्याच्या भिंती ह्या खूप जाड आहेत आणि त्या भिंती दगडांच्यापासून बांधले आहे.

तसेच किल्ल्यावर पोहचण्यासाठी आपल्याला पायऱ्या आहेत. किल्ल्यावर आपल्याला खंडोबा मंदिर, राजवाड्याचे अवशेष, बालेकिल्ल्याची तटबंदी, किल्ल्याची तटबंदी, मुख्य दरवाजा, बुरुज आणि महादेव मंदिर या सारखी ठिकाणे आपल्याला पहायला मिळतात.

मल्हारगड किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे – what to see

मल्हारगड हा किल्ला मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला आहे आणि हा किल्ला पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात आणि या किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक अवशेष आणि ठिकाणे पहायला मिळतात जसे कि खंडोबा मंदिर, राजवाड्याचे अवशेष, बालेकिल्ल्याची तटबंदी, किल्ल्याची तटबंदी, मुख्य दरवाजा, बुरुज आणि महादेव मंदिर इत्यादी.

  • खंडोबा मंदिर : खंडोबा मंदिर हे किल्ल्याची बांधकाम करताना सरदार भीमराव पानसे यांनी बांधले आहे आणि हे १७६३ मध्ये बांधलेले मंदिर हे आज देखील चांगल्या स्थितीमध्ये आहे.
  • राजवाड्याचे अवशेष : बालेकिल्ल्याच्या तटबंदीच्या अगोदर आपल्याला मल्हारगडावर राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात.
  • प्रवेश दरवाजा : या किल्ल्याला एक प्रवेश दरवाजा देखील आहे ज्याला महादरवाजा म्हणून देखील ओळखले जाते आणि हा दरवाजा सध्या देखील सुस्थितीमध्ये आहे आणि हा दरवाजा सोनोरी या गावाकडे आहे आणि या गावामधून आपण किल्ला चढून किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकतो.
  • महादेव मंदिर : मल्हारगड किल्ल्यावर महादेव मंदिर देखील बांधलेले आहे आणि या किल्ल्यावर आपण भगवान महादेवाचे देखील दर्शन घेऊ शकतो.
  • इतर ठिकाणे : आपल्याला किल्ल्यावर किल्ल्याची तटबंदी, बाले किल्ल्याची तटबंदी, बालेकिल्ला आणि टेहळणी बुरुज असे बांधकाम देखील पाहता येतात.

मल्हारगडवर कसे पोहचायचे – how to reach

मल्हारगड हा किल्ला पुणे शहरापासून खूप जवळ आहे त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम बसने, रेल्वेने किंवा विमानाने पुणे शहरामध्ये यावे आणि तेथून या किल्ल्यावर जाण्यासाठी दिवे घाटातून पुणे सासवड रस्त्याने जावे लागते, दिवे घाटातून या किल्ल्याचे अंतर हे ८ किलो मीटर आहे. मल्हारगड किल्ल्याकडे १ किलोमीटर नंतर डावीकडे वळण घ्या कारण हा रस्ता मल्हार किल्ल्याकडे जातो आणि या रस्त्यावरून जात असताना आपल्याला सुंदर नजारे पाहायला मिळतात.

आम्ही दिलेल्या malhargad fort information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मल्हारगड किल्ला माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या malhargad fort history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about malhargad fort in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!