मराठी लेखक व त्यांची पुस्तके Marathi Writers Information in Marathi

marathi writers information in marathi – marathi lekhak मराठी लेखक व त्यांची पुस्तके, भारतातील मराठी साहित्य आणि लेखन हे खूपच वेगळे आणि प्रेरित करणारे आहे आणि या साहित्याच्या वाचनामुळे वाचणाऱ्याला एक चांगली प्रेरणा आणि नवी उमेद मिळते. मराठी साहित्यामध्ये अनेक वेगवेगळे पराक्र आहेत आणि ते म्हणजे कथा, नाटक, कादंबरी, कविता, ललित प्रकार, पोवाडा, बाल साहित्य, विनोद सुविचार, लोकगीत, लावणी, भारुड, ओव्या, चारोळ्या, व्यक्तीचित्र, उखाणे, गोंधळ या सारखे आणि साहित्य प्रकार आहेत आणि या साहित्य प्रकारामध्ये अनेक लेखकांनी, नाटककारांनी, कवींनी आणि कथाकारांनी मोलाची भर पाडली आहे आणि आज आपण या लेखामध्ये काही लेखकांच्या विषयी माहिती घेणार आहोत.

marathi writers information in marathi
marathi writers information in marathi

मराठी लेखक व त्यांची पुस्तके – Marathi Writers Information in Marathi

मराठी लेखक माहिती – famous marathi writers information in marathi

पाच लेखकांची नावे – 5 writers information in marathi

आपण मराठी साहित्याविषयी बोलताना आपल्या तोंडामध्ये येणारे पहिले नाव म्हणजे पु.ल.देशपांडे कारण ते लेखक म्हणून तर लोकप्रिय होतेच परंतु त्यांनी दिग्दर्शक, नाटककार, अभिनेता, संगीतकार म्हणून देखील मराठी साहित्यामध्ये आपला ठसा उमटवला. त्यांनी त्यांचे बी.ए (B.A) चे शिक्षण हे पुणे या शहरामधून केले आणि त्यांनी त्यांची एम.ए (M.A.) शिक्षण हे सांगली या शहरामध्ये केले. त्यांनी खिल्ली, उरलं सुरलं, असा मी असामी, गोळाबेरीज, बटाट्याची चाळ, खोगीरभरती हि प्रसिध्द पुस्तके लिहिली.

विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणून देखील ओळखले जाते आणि यांनी देखील मराठी साहित्यामध्ये मोलाची भर टाकली आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांना त्यांच्या कवितांच्या रचनेसाठी सार्वजन ओळखतात आणि ते कवी, कादंबरीकार, नाटककार, कथाकार म्हणून प्रसिध्द होते. त्यांनी नाशिकमध्ये बी.ए ( B.A ) चे शिक्षण पूर्ण केली आणि मग ते १९३४ मध्ये चित्र व्यवसायामध्ये काम करण्यास रुजू झाले आणि त्यांनी २ वर्ष यामध्ये काम केले. चाफा, जाईचा कुंज, माधवी, श्रावण, स्वगत, अक्षरबाग, किनारा या सारख्या प्रसिध्द कविता लिहिल्या. त्यांचा जन्म दिवस हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

  • वसंत बापट 

वसंत बापट हे मराठी कवी होते आणि त्यांनी सेतू, शींगा फुंकले राणी, शततारका, राजसी, साकीना, मानसी आणि प्रवासाची कविता या सारख्या काव्यसंग्रहाचा समावेश हा त्यांच्या नावे आहे. वसंत बापट याचा जन्म २५ जुलै १९२२ मध्ये महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामधील कराड या ठिकाणी झाला आणि यांना विश्वनाथ वामन बापट या नावाने देखील ओळखले जात होते. अकरावी दिशा आणि साकीना हे त्यांच्या बिजली या काव्यसंग्रहानंतरचे लिहिलेले काव्यसंग्रह होती.

चंगा मंगा, अबडक तबडक आणि परीच्या राज्यात ह्या कविता बालकविता आहेत. तसेच त्यांनी बाला नाटके देखील लिहिली होती आणि त्यामधील लोकप्रिय बालनाटक म्हणजे बाल गोविंद हे आहे. वसंत बापट यांनी कविते सोबत अनेक कृतींचा देखील समावेश आहे आणि त्या कृती म्हणजे जिंकुनी मरणाला, विसाजीपंतांची बखर, बारा गावचे पाणी इत्यादी.

प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड या ठिकाणी झाला होता आणि हे महाराष्ट्रामधील एक अष्टपैलू व्यक्ती होते. प्रल्हाद केशव अत्रे यांना आचार्य अत्रे या नावाने देखील ओळखले जाते.त्यांना कथाकार, कवी आणि लेखक म्हणून ओळखले जात होते आणि त्यांनी कशी आहे गम्मत, बत्ताशी, फुले आणि मुले अश्या कथा लिहिल्या तसेच त्यांनी लिहिलेली झेंडूची फुले हि कविता प्रसिध्द आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांनी मोहित्यांचा शाप आणि चांगुणा ह्या कादंबऱ्या देखील लिहिल्या.

  • व. पु. काळे

व. पु. काळे यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये २५ मार्च १९३२ मध्ये झाला आणि त्यांचे पूर्ण नाव वसंत पुरुषोत्तम काळे असे आहे परंतु त्यांना व.पु.काळे ह्या नावानेच जास्त लोक ओळखतात. व. पु. काळे हे असे लेखक आहेत ज्यांच्या काही कथा, कविता किंवा कोट्स वाचायला घेतले तर आपल्यामध्ये एक धाडस येते किंवा आपल्यामध्ये एक चांगली उमेद जागी होते आणि हीच त्यांच्या लिखाणाची ताकद आहे.

त्यांनी त्यांच्या मराठी साहित्य लेखनामध्ये अनेक कविता, कथा, कोट्स, ललितप्रकार, कादंबरी, व्यक्तिचित्र, पत्रसंग्रह या सारखे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केल. गुलमोहर, तप्तपदी, दोस्त, ऐक सखे, का रे भुललास, महोत्सव, कर्मचारी, मायबाजार, मी माणूस शोधतोय या प्रकारच्या कथा लिहिल्या तसेच त्यांनी हि वाट एकटीची, ठिकरी, पार्टनर, तू भ्रमत आहासी ह्या काही काद्बार्या देखील लिहिल्या. .पु.काळे यांचा मृत्य हृदय विकाराच्या झटक्याने २६ जून २००९ मध्ये झाला.

भारतामधील मराठी साहित्यामध्ये अनेक कवी आणि कवियित्री होवून गेले त्यामधील काहींनी अश्या कविता आणि रचना लिहिल्या कि त्या वाचून मन अगदी समाधानी होवून जाते. त्यामधील एक पूर्वीच्या काळातील प्रसिध्द आणि लोकप्रिय कवियित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी आणि त्यांच्या कविता आजही तितक्याच प्रसिध्द आणि लोकप्रिय आहेत.

बहिणाबाई चौधरी ह्या जरी अशिक्षित असल्या तरी त्यांनी रचलेल्या कविता आणि काव्य वाचले कि वाटते कि हि काव्ये आणि कविता कोणत्यातरी अनुभवी आणि सुशिक्षित व्यक्तीने लिहिली असावी. त्यांनी रचलेली काव्य आणि कविता ह्या संसार, शेती आणि शेतीची साधने, माहेर, सण आणि काही ओळखीच्या व्यक्ती या सारख्या विषयांवर त्यांनी कविता रचल्या आणि आपल्या मराठी साहित्यामध्ये भर टाकली. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तव्हां मियते भाकर हि त्यांची एक लोकप्रिय झालेली कविता आहे.

आम्ही दिलेल्या marathi writers information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मराठी लेखक व त्यांची पुस्तके माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या 5 writers information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि marathi lekhak माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!