मारुती माने माहिती Maruti Mane Biography in Marathi

Maruti Mane Biography in Marathi – Maruti Mane information in marathi मारुती माने यांचा जीवन परिचय पूर्वीच्या काळी कुस्तीला फार प्राधान्य दिलं जायचं. प्रत्येक गावात एक तरी पैलवान असायचाच. कुस्ती हा अतिशय प्राचीन खेळ असून हा एक मर्दानी खेळ आहे. कुस्तीमध्ये दिला जाणारा सर्वात मोठा किताब किंवा पुरस्कार म्हणजे हिंदकेसरी होय आणि हा पुरस्कार मिळवण्यासाठी अनेक पहिलवान आपल्या जीवाची बाजी लावतात. या लेखामध्ये देखील आपण हिंदकेसरी मारुती माने यांच्या विषयी माहिती घेणार आहोत.

maruti mane biography in marathi
maruti mane biography in marathi

मारुती माने माहिती – Maruti Mane Biography in Marathi

जन्म (Birthday)२७ डिसेंबर १९३८
जन्म गाव (Birth Place)सांगली येथील कवठेपिरां या मिरज तालुक्यातील छोट्याशा
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)पैलवान
मृत्यू२७ जुलै २०१०

Maruti Mane information in marathi

जन्म व वैयक्तिक आयुष्य 

संपूर्ण नाव मारुती ज्ञानू माने. हिंदकेसरी मारुती माने म्हणून प्रसिद्ध.. मारुती ज्ञानू माने यांचा जन्म २७ डिसेंबर १९३८ रोजी सांगली येथील कवठेपिरां या मिरज तालुक्यातील छोट्याशा गावांमध्ये त्यांचा जन्म झाला. बालपणीचे दिवस फारसे सुखाचे नव्हते लहानपणापासूनच कष्ट, दारिद्र्य त्यांच्या वाट्याला आलं. गरीब शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. परंतु ते स्व-बळावर हिंदकेसरी झाले. भाऊ या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व सर्वांनाच भावणारे होते.

कारकीर्द

मारुती माने यांनी महाराष्ट्रातील एका अशा खेड्यामध्ये जन्म घेतला ज्याचं नाव देखील क्वचित लोकांना माहीत असेल. अशा खेड्यापाड्यातून स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली. मारुती माने आठ वर्षाचे असताना पहिल्यांदा कुस्तीच्या आखाड्यात उतरले आणि तिथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांचे वस्ताद मारेकरी यांनी मारुती माने यांच्या मधील कौशल्य ओळखले आणि त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

सुप्रसिद्ध वस्ताद दुडापप्पाण्णा यांच्या सोबत मारुती माने यांनी कुस्तीचे धडे गिरवले. पहाटे उठून मारुती माने दररोज २५०० जोर व तीन हजार बैठका मारायचे सोबतच सकाळी एक लिटर व सायंकाळी एक लिटर दूध, दुपारी थंडाई एक लिटर. या व्यतिरिक्त विविध प्रकारची फळे, एक किलो लोणी, अर्धा किलो तूप, अर्धा किलो मटण, एकावेळी एक डझन केळी असा त्यांचा खुराक होता. त्यांची धिप्पाड शरीरयष्टी आणि आवाजामध्ये भारदस्तपणा असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं.

पूर्वीच्या काळी कुस्तीला भरपूर प्रमाणात प्राधान्य दिलं जायचं आणि गावांमध्ये पैलवानांचा एक वेगळाच रुबाब असायचा तोच रुबाब मारुती माने यांचा देखील होता. मारुती माने यांनी २४ जुलै १९५८ रोजी अण्णा पाटोळे या पैलवान विरुद्ध कुस्ती खेळली आणि विजय प्राप्त करून ते सर्वत्र नावाजले जाऊ लागले. १९६४ मध्ये मारुती माने यांनी मल्लसम्राट विष्णूपंत सावर्डेकर यांच्यासोबत कुस्ती लढली जी साधारणता दोन तास ४५ मिनिटे चालू होती या दीर्घकाळ लढ्यानंतर मारुती माने यांचा विजय झाला.

६ मार्च १९६५ रोजी ज्यावेळी ही कुस्ती खेळली हा दिवस ऐतिहासिक दिवस मानला जातो. या कुस्तीसाठी जवळपास एक लाखांहून अधिक लोकांनी गर्दी लावलेली होती. काही कुस्त्या खेळल्यानंतर मारुती माने यांच्यामध्ये आत्मविश्वास जागा झाला होता व त्यानंतर त्यांनी कधी पाठीमागे वळून बघितलेच नाही. १८ एप्रिल १९५९ रोजी पहिले महाराष्ट्र केसरी पैलवान दिनकर यांच्याशी कुस्ती होऊन ती बरोबरीत सुटली. १९६२ मध्ये मारुती माने यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू झाली.

१९६२ मध्ये जकार्ता येथे आयोजित केलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा मध्ये मारुती माने यांनी सुवर्ण पदक पटकावलं. त्या वेळी फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारासाठी त्यांना सुवर्ण पदक मिळालेल्या व ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात त्यांनी रौप्यपदक मिळवलं. १९६३मध्ये जागतिक स्तरावरील कुस्ती स्पर्धा रशिया येथे त्यांना कुस्ती खेळण्याचा मान मिळाला त्यांनी तेव्हा रौप्यपदक पटकावले. १९६४ मध्ये पंजाब येथे अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये विजय प्राप्त करून मारुती माने यांनी हिंदकेसरी पद मिळवले.

मारुती माने यांच्या या यशामुळे त्यांच्या गावाजवळ आपल्या महाराष्ट्राचे नाव मोठं झालं त्यांना हिंदकेसरी हा कुस्ती क्षेत्रातील एक मोठा पुरस्कार मानला जातो‌. हिंदकेसरी झाल्यानंतर मारुती माने यांचा मान सन्मान वाढू लागला. १९६४ मधील दिल्ली येथील अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवलं. ते पै. भीमसेन यांच्या विरुद्ध विजेतेपद मिळवलं. १९६४ मध्ये कोल्हापूर येथे पैलवान मोहम्मद हनीफ यांच्याविरुद्ध कुस्ती खेळून विजेतेपद मिळवलं.

१९६५ मध्ये अखिल भारतीय स्पर्धा ओरिसा येथे त्यांना सुवर्णपदक जाहीर झालं. १९६६ मध्ये बेळगाव येथे पैलवान चंदगीराम यांच्याविरुद्ध कुस्ती खेळून विजेतेपद पटकावलं. १९६७ साली पैलवान अलेक्झांडर ‌मिद्विद् यांच्याविरुद्ध कुस्ती खेळून रौप्यपदक मिळवलं. १९६९ मध्ये आयोजित केलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य पदकाचे मानकरी ठरले. १९७० मध्ये कोल्हापूर येथे पैलवान सादिक यांच्याविरुद्ध कुस्ती खेळून विजेतेपद पटकावले.

१९७२ मध्ये कोल्हापूर येथे पैलवान दत्ता सिंग यांच्या विरुद्ध कुस्ती खेळून विजेतेपद मिळवलं. मारुती माने यांना १९८१ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अखिल भारतीय कुस्ती निवड समितीचे ते दोन वर्षे अध्यक्ष होते. त्यानंतर १९८१ ते १९८५ पर्यंत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चे अध्यक्ष पद त्यांच्याकडे होतं अखिल भारतीय माजी मल्ल संघटना उपाध्यक्षपद १९९२ पासून त्यांच्याकडे होतं. कुस्ती ही महाराष्ट्राची परंपरा आहे.

असे अनेक पैलवान आहे ज्यांनी महाराष्ट्राच्या या परंपरेला नावलौकिक मिळवून दिला. परंतु या मध्ये उच्च स्थानावर जर कोणाचं नाव असेल तर ते मारुती माने यांच आहे. मारुती माने यांची कुस्ती खेळण्याची शैली विशिष्ट होती ते कुस्ती खेळताना दुहेरी पट आणि हात काढून घिस्सा या हुकमी डावांचा वापर करायचे. दिल्लीच्या पैलवान मध्ये त्यांची दहशत होती. दिल्लीचे पैलवान त्यांना घाबरायचे. आपल्या छोट्याशा गावाचे नाव त्यांनी सातासमुद्रापार नेलं. कवठेपिरान ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून मारुती माने यांनी सलग पंचवीस वर्ष काम केलं.

१९६० ते १९७२ पर्यंत मारुती माने सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य होते. १९७० ते १९८० पर्यंत मारुती माने वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक व उपाध्यक्ष होते. १९८५ ते १९८६ पर्यंत राज्यसभेत खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. मारुती माने यांनी स्वतःच्या हिमतीवर इतका मोठे यश प्राप्त केले आहे.

ते उत्तम कुस्तीपटू होते त्यांना पारंपरिक कुस्तीचे प्रतीक म्हणून संबोधले जाते. त्यांनी आपल्या महाराष्ट्राची परंपरा असलेल्या कुस्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ओळख मिळवून दिली. साडेसहा फूट उंची, धिप्पाड शरीर,‌‌ डोक्यावर फेटा, अंगात धोतर असा त्यांचा पेहराव होता. मारुती माने म्हणजे तळागाळातून वर आलेलं व्यक्तिमत्व होतं. ऐसा पैलवान महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही.

प्रमुख कारकीर्द

मारुती माने हे भारताचे माजी कुस्तीपटू होते ज्यांनी १९६४ मध्ये उन्हाळी ऑलम्पिक मध्ये सहभाग घेतला. १९६२ ते १९७२ यादरम्यान त्यांनी वेगवेगळ्या कुस्ती खेळून चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी उत्कृष्ट शानदार कामगिरी केली होती. १९७० च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी अमर्याद फ्रीस्टाइल स्पर्धेत रौप्यपदक मिळवलं. १९६२ साली घडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी ९७ किलो फ्री स्टाईल मध्ये सुवर्ण आणि ९७ किलो ग्रीको-रोमन स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.

पुढे राजस्थानचे पैलवान मयूर उद्दीन यांचा पराभव करून त्यांनी १९६४ मध्ये मानाने हिंदकेसरी चा मुकुट मिळवला. ते एकेकाळी संपूर्ण जगातील उत्कृष्ट सर्वोत्तम कुस्तीपटू मध्ये गणले जायचे. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केल्या बद्दल केंद्र सरकारने त्यांची दखल घेतली आणि त्यांना प्रतिष्ठित ध्यानचंद पुरस्कार प्रदान केला. मारुती माने अतिशय मेहनती होते त्यांनी दररोज दहा ते बारा तास कसरत केली होती. १९६७ मध्ये सर्व विजेत्या रशियन कुस्तीपटू अलेक्झांडर ‌मिद्विद् याच्याशी अकरा मिनिटांची खेळी रचली आणि रौप्य पदक पटकावलं.

मृत्यू

२७ जुलै २०१० मध्ये मारुती माने यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता. शिवाय त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि कोल्हापुरातील जेष्ठ वस्तादंसह मल्ल व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसोबत अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या शोककळा व्यक्त केल्या.

त्यांना महाराष्ट्राच्या मातीतील कोहिनूर हिरा, वस्तादांचा वस्ताद, जाणता कुस्तीगार अशा वेगवेगळ्या नावांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. त्यांच्या निधनामुळे कुस्ती क्षेत्रामध्ये पोकळी निर्माण झाली आहे आणि ही पोकळी सहजासहजी भरता येणार नाही आहे. येणाऱ्या भावी कुस्तीपटूंना मारुती माने यांच्या कारकिर्दीचे दाखले दिले जातात.

आम्ही दिलेल्या Maruti Mane Biography in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मारुती माने माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Maruti Mane information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Maruti Mane in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!