Medu Vada Recipe in Marathi – Udid Vada Recipe in Marathi मेदू वडा किंवा उडीद वडा रेसिपी मेदू वडा किंवा उडीद वडा हा एक दक्षिण भारतीय प्रकार असून हा पदार्थ तेथे सकाळच्या नाश्त्यामध्ये जरी इडली, आप्पे, डोसा जरी असला तरी मेदू वडा हा रोजच्या नाश्त्यामध्ये ठरलेला पदार्थ आहे कारण तो वडा उडदाच्या डाळीपासून बनवला जातो आणि या डाळीमध्ये अनेक पोषक घटक असतात. जेव्हा लोक कुटुंबासोबत दक्षिण भारतीय पदार्थ खायला जातात तेव्हा ते मेदू वडा नक्कीच ऑर्डर करतील पण तुम्ही कधी हा पदार्थ तुमच्या घरी बनवण्याचा विचार केला आहे का ? आणि जर हा पदार्थ कधी तुम्ही घरामध्ये केला नसेल तर एकदा करून पहा कारण हा घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे.
आणि खूप कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनतो आणि ते खाण्यासाठी आपल्याला कोणत्याही हॉटेल मध्ये जावे लागत नाही. चला तर मग पाहूयात मेदू वडा घरगुती पद्धतीने कसा बनवायचा.
मेदू वडा किंवा उडीद वडा घरामध्ये बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि हे बनवण्यासाठी भिजवलेली उडीद डाळ वाटून घ्यावी आणि त्यामध्ये आल्याची पेस्ट, मिरचीची पेस्ट, वाटलेले जिरे, चिरलेला कडीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून त्याला वड्यासारखा आकार देवून ते तेलामध्ये तळावेत.
मेदू वडा किंवा उडीद वडा रेसिपी – Medu Vada Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
तळण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० मिनिटे |
पाककला | दक्षिण भारतीय |
मेदू वडा हि रेसिपी कोठून आली
मेदू वडा ज्याला उडीद वडा या नावाने देखील ओळखले जते आणि हा पदार्थ दक्षिण भारतामधील एक लोकप्रिय आणि वरवर खाल्ला जाणारा पदार्थ आहे. दक्षिन भारतातील लोक मेदू वडा हा नाश्त्यामध्ये बनवतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये जरी इडली, आप्पे, डोसा जरी असला तरी मेदू वडा हा रोजच्या नाश्त्यामध्ये ठरलेला पदार्थ आहे कारण तो वडा उडदाच्या डाळीपासून बनवला जातो आणि या डाळीमध्ये अनेक पोषक घटक असतात त्यामुळे तेथील लोक मेदू वडा रोजच्या नाश्त्यामध्ये खातात.
- नक्की वाचा: मिसळ पाव रेसिपी
उडीद डाळ : उडीद डाळ हा या पदार्थातील महत्वाच्या घटक आहे कारण त्या शिवाय हा पदार्थ बनूच शकत नाही कारण हे या पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामधील मुख्य घटक आहे आणि एकादुसरे कोणतेही साहित्य नसले तरी चालेले पण उडीद डाळ हि मेदू वडा बनवण्यासाठी गरजेची आहे.
मीठ आणि मिरची : मीठ आणि मिरची हे देखील उडीद वडा किंवा मेदू वडा बनवण्यासाठी आवश्यक आहे कारण मीठ हे कोणत्याही पदार्थामध्ये चवीसाठी वापरले जाते तसेच या पदार्थामध्ये देखी वापरले जाते आणि मिरचीमुळे वड्याला चांगला तिखट पणा येतो आणि त्यामुळे वड्याची टेस्ट चांगली लागते.
तेल : तेल हा देखील मेदू वडा बनवण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक आहे कारण तेलाशिवाय आपण वडे तळू शकत नाही.
- नक्की वाचा: कोथिंबीर वाडी रेसिपी
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
तळण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० मिनिटे |
पाककला | दक्षिण भारतीय |
मेदू वडा हि रेसिपी घरामध्ये बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि एकदा पीठ भिजलेले असले कि हि अगदी कमी वेळे मध्ये बनणारी रेसिपी आहे. मेदू वडा हा पदार्थ कसा बनवायचा हे आपण खाली पाहू.
मेदू वाद वडा बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही आणि जे साहित्य लागते ते घरामध्ये बहुतेक वेळा उपलब्द असू शकते. मेदू वडा किंवा उडीद वडा बनवण्याच्या साहित्याची यादी खाली दिली आहे.
- १ वाटी उडीद डाळ.
- १/२ चमचा मेथीचे दाने.
- २ ते ३ हिरव्या मिरच्या.
- ६ ते ७ कढीपत्ता पाने.
- १ चमचा छोटे छोटे आल्याचे तुकडे.
- २ ते ३ चमचे नारळाचा खीस.
- १/२ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर.
- मीठ ( चवीनुसार ).
- तेल ( तळण्यासाठी ).
- सर्वप्रथम एक वाटी उडीद डाळ घेवून ती चांगली निवडून ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी.
- त्यानंतर डाळीमध्ये ३ ते ४ वाट्या पाणी घालून ते डाळ ४ ते ५ तास चांगली भिजवून घ्या आणि हि डाळ चांगली भिजली कि ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये मिरची आणि आले घालून ती डाळीची अगदी बारीक करा.
- मग त्यामध्ये मीठ, चिरलेली कोथिंबीर, चिरलेला कढीपत्ता आणि नारळाचा खीस घाला आणि ते चांगले एकत्र करून घ्या.
- मग मध्यम आचेवर एका कढईमध्ये वडे तळण्यासाठी तेल ठेवा. एकदा तेल गरम झाले कि एका मोठ्या गोल चमच्यावर पाणी लावून हे उडदाचे थोडेसे बॅटर चमच्यावर घालून त्यावर एक होल पाडा आणि तो चमच्या गरम तेलामध्ये तसाच धरा जोपर्यंत तो पर्यंत वडा चमचा पासून वेगळा होत नाही आणि तो वेगळा झाला कि तो दोन्ही बाजूने चांगला टाळून घ्या.
- तुमचा मेदू वडा सर्विंग करण्यासाठी तयार झाला. हा वडा खोबऱ्याच्या चटणी सोबत चानागाला लागतो.
मेदू वडा कश्या सोबत खाल्ला जातो – serving suggestions
मेदू वडा हा दक्षिण भारतातील स्वादिष्ट पदार्थ आहे. मेदू वडा रेसिपी ही सहसा सकाळच्या नाश्त्यात बनवली जाते आणि ती नारळाची चटणी आणि सांबार सोबत खूप चविष्ट लागते.
- नक्की वाचा: इडली रेसिपी मराठी
- ज्यावेळी आपण भिजलेली डाळ मिक्सरमध्ये बारीक करत असती त्यावेळी पाण्याचा वापर कमी करा त्यामुळे वाडे चांगले होतील.
- मेदू वड्यामध्ये आपण काळी मिरी पावडर देखील घालू शकतो.
- जर तुम्हाला मेदू वडा क्रिस्पी आवडत असेल तर उडदाच्या बॅटरमध्ये रवा किंवा तांदळाचे पीठ घालू शकता.
- मेदू वडा फेटलेल्या दह्यासोबत देखील खावू शकतो.
- काही लोकांना कढीपत्ता किंवा कोथिंबीर आवडत नाही त्यामुळे वड्यामध्ये कढीपत्ता किंवा कोथिंबीर घातली नसली तरी चालते.
आम्ही दिलेल्या medu vada recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मेदू वडा किंवा उडीद वडा रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या udid vada recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि medu vada sambar chutney recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये medu vada recipe madhura in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट