मिसळ पाव रेसिपी मराठी Misal Pav Recipe in Marathi

Misal Pav Recipe in Marathi – Misal Recipe in Marathi मिसळ पाव रेसिपी मराठी मिसळ म्हटलं कि सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते कारण हा पदार्थ त्याच्या झणझणीत पणामुळे आणि त्याच्या चवीसाठी खूप लोकप्रिय आहे आणि हा पदार्थ लोक हॉटेल मध्ये, धाब्यामध्ये किंवा घरामध्ये अगदी आवडीने खातात. मिसळ हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि तो कमी वेळेत बनत असल्यामुळे गडबडीच्या वेळी आपण मिसळ बनवून खावू शकतो. मिसळ पाव हा मटकीच्या मोडाच्या आमटीचा एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड प्रकार आहे.

ज्यामध्ये त्या आमटी वर बारीक चिरलेला कांदा, फरसाण (तळलेले चवदार मिश्रण), लिंबाचा रस, कोथिंबीर घालून ते मऊ पाव बरोबर सर्व्ह केले जाते. मिसळ हि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते जसे कि काही ठिकाणी मटकीच्या मोडाची आमटी बनवली जाते.

तर काही ठिकाणी मिक्स मोडाची म्हणजेच त्यामध्ये मटकी, मुग, वाटणे, मसूरा, आणि हरभरे या सारखी कडधान्ये असतात आणि या कडधान्यांना मोड आणलेले असते.

आता आपण या लेखामध्ये मिसळ कशी बनवली जाते याबद्दल माहिती घेणार आहोत. यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे साहित्य वापरले जाते आणि कश्या पध्दतीने मिसळ बनवली जाते या सर्वाबद्दल माहिती घेणार आहोत.

misal pav recipe in marathi
misal pav recipe in marathi

मिसळ पाव रेसिपी मराठी – Misal Pav Recipe in Marathi

तयारी करण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
शिजवण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन (कोल्हापूर मिसळ  किंवा पुणेरी मिसळ )
वाढणी२ ते ३ व्यक्ती

मिसळ कशी बनवली जाते – How to Make Misal Pav in Marathi

मिसळ हा पदार्थ महाराष्ट्रीयन पदार्थ आहे आणि हा त्याच्या झणझणीत पनासाठी ओळखली जाते आणि हा असा पदार्थ आहे जो भारतीय पाककलेमध्ये वारंवार बनवला जातो आणि खाल्ला जातो. त्यामुळे हा पदार्थ कसा बनवायचा आणि या साठी कोणकोणते साहित्य लागते ते आपण खाली पाहू.

तयारी करण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
शिजवण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन (कोल्हापूर मिसळ  किंवा पुणेरी मिसळ)
वाढणी२ ते ३ व्यक्ती

मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Ingredients Needed to Make Misal Pav in Marathi

मिसळ बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही म्हणजे जे साहित्य मिसळ बनवण्यासाठी लागते ते घरामध्ये पूर्वीपासून उपलब्द असू शकते. आता आपण मिसळ बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • २ कप मटकी मोड (घरगुती किंवा विकत आणलेले).
  • १ मोठा कांदा (मसाला बनवण्यासाठी).
  • २ मध्यम आकाराचे कांदे (बारीक चिरलेले).
  • १ मोठा चमचा मिसळ मसाला.
  • २ चमचा आलं लसून पेस्ट.
  • २ मोठे चमचे तीळ.
  • १ चमचा जिरे.
  • १ चमचा मोहरी.
  • १ दालचीन तुकडा.
  • २ वेलदोडे.
  • १ मसाला वेलदोडा.
  • १ बदाम फुल.
  • १ तमाल पत्री पान.
  • १ मोठा चमचा लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा हळद.
  • बटाटा (बारीक चिरलेला).
  • टोमॅटो (चिरलेला).
  • मीठ (चवीनुसार).
  • पाणी (आवश्यकतेनुसार).
  • १ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर.
  • १ आणि १/२ मोठा चमचा तेल.
  • १ कप फरसाणा (सर्विंगसाठी).
  • पाव किंवा ब्रेड (सर्विंगसाठी).

मिसळ बनवण्यासाठी केली जाणारी कृती – kolhapuri misal recipe in marathi

  • मिसळ बनवताना सर्वप्रथम जो खडा मसाला साहित्यामध्ये सांगितला आहे जसे कि तीळ, जिरे, दालचिन, वेलदोडे, मसाला वेलदोडे, बदाम फुल आणि तमाल पत्री गरम कढई मध्ये गरम करून घ्या.
  • आणि मग ते गार झाल्यानंतर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
  • त्यानंतर कढईमध्ये खोबरे आणि कांदा भाजून घ्या आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे, भाजलेला कांदा, आलं लसून पेस्ट, कोथिंबीर घालून त्याची चांगली पेस्ट करा आणि त्यामध्ये खड्या मसाल्याची केलेली पावडर मिक्स करा आणि त्यामध्ये थोडे पाणी घालून ते मिक्सरला चांगले फिरवा.
  • आता एक मोठे भांडे घ्या आणि ते मध्यम आचेवर गरम करा आणि त्यामध्ये १ मोठा चमचा तेल घाला एकदा तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी टाका आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये लगेच थोडासा बारीक चिरलेला कांदा घाला आणि २ सेकंद हलवा, कांदा थोडा लालसर दिसू लागला कि त्यामध्ये टोमॅटो आणि बटाटा घाला आणि ते चांगले भाजून घ्या.
  • मग त्यामध्ये मटकीचे मोड घाला आणि ते तेलामध्ये चांगले मिक्स करा.
  • मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मिसळ मसाला आणि आपण तयार केलेला घाला आणि ते सर्व मिश्रण मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यामध्ये पाणी घाला आणि ते आमटी सारखे करा मग त्यामध्ये मीठ (चवीनुसार) घाला आणि त्यामधील मटकी आणि बटाटा शिजेपर्यंत ते शिजवा.
  • तुमची मिसळ आमटी सर्विंग करण्यासाठी तयार आहे.

मिसळ वाढण्याच्या पद्धती – methods to serve 

मिसळ हे शक्यतो पाव किंवा ब्रेड सोबत खाल्ले जाते आणि हे सर्विंग करण्याचे दोन प्रकार आहेत.

  • मिसळ आमटी आपण एका वाटीमध्ये वाढून त्यामध्ये फरसाण, कांदा आणि कोथिंबीर घातली जाते आणि बाजूला प्लेटमध्ये लिंबू आणि पाव ठेवला जातो.
  • आणि दुसऱ्या प्रकारामध्ये मिसळ आमटी एका वाटीमध्ये वाढली जाते आणि फरसाण, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू पाव किंवा ब्रेड प्लेटमध्ये बाजूला वाढला जातो.

घरगुती पद्धतीने मोड कसे बनवायचे

  • जर तुम्हाला घरगुती पद्धतीने मोड बनवायचे असल्यास आणि जर तुम्हाला फक्त मटकीचे मोड बनवायचे असल्यास चांगली आणि स्वच्छ मटकी घ्या आणि ती साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि मग ती मटकी कोमट पाण्यामध्ये ५ ते ६ तास भिजत घाला.
  • ५ ते ६ तासांच्या नंतर त्यामधील पाणी काढून ते एका पांढऱ्या कापडामध्ये घालून ते ९ ते १० तासासाठी दडपून ठेवा त्यामुळे मटकीला मोड आलेल आपल्याला पाहायला मिळतील.
  • आणि जर तुम्ही मिक्स मोड आमटी साठी आवश्यक असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य वापरा जसे कि (मुग, हरभरा, मटकी, मसूरा) आणि ते स्वच्छ धुवून ते कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि मग ५ ते ६ तासांच्या नंतर त्यामधील पाणी काढून ते एका पांढऱ्या कापडामध्ये घालून ते ९ ते १० तासासाठी दडपून ठेवा त्यामुळे मटकीला मोड आलेल आपल्याला पाहायला मिळतील.

आम्ही दिलेल्या misal pav recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मिसळ पाव रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या puneri misal pav recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि how to make misal pav recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये misal pav in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!