Maza Avadta Chand Essay in Marathi माझा आवडता छंद निबंध मराठी मी लहान असताना म्हणजे शाळेत असताना माझे बाबा माझ्याकडून दररोज पुस्तकातील एक पाठ वाचून घेत असत. केव्हा केव्हा ते स्वतः मला वाचून दाखवत असत. तेव्हापासून ते आतापर्यंत मी दररोज काही ना काही तरी वाचत असते. शाळेत असताना मोकळ्या तासाला शाळेतील वाचनालयामध्ये जाऊन मी काही ना काही तरी वाचत बसायचे. असा एकही दिवस जात नाही की मी वाचले नाही. बाबांच्यामुळे लागलेली ही वाचण्याची सवय कधी माझा आवडता छंद बनला काही समजलेच नाही.
या जगात प्रत्येकाला काही ना काही छंद असतोच. कुणाला चित्र काढण्याचा, क्रिकेट खेळायचा कुणाला कविता चारोळ्या करण्याचा तर कुणाला गाणे ऐकण्याचा, गाणी गाण्याचा, नवीन खाद्य पदार्थ बनवण्याचा किंवा इतरांना बनवून घालायचा, फोटोग्राफीचा, वाचनाचा, जुनी मंदिरे, जुना वाडा, लेणी, शिल्पे अभ्यासण्याचा छंद असतो. तसेच तुमचा आवडता छंद कोणता आहे ?
असावा छंद मनाला आनंद देणारा
सर्वांपेक्षा असावा वेगळा
आयुष्याला कलाटणी देणारा
म्हणून एक तर छंद जोपासा
छंद असतील ढीग
एक मात्र आवडीचा ठेवा
साथ असेल छंदाची
म्हणून एक तर छंद जोपासा
माझा आवडता छंद निबंध मराठी – Maza Avadta Chand Essay in Marathi
माझा आवडता छंद वाचन निबंध मराठी
essay on maza avadta chand in marathi तसेच माझा आवडता छंद म्हणजे पुस्तके वाचणे. मला वाचायला खूप आवडते. हातात एखादं जुनं पुस्तक जरी लागलं तर ते पूर्ण वाचल्याशिवाय चैन पडत नाही. वाचण्यासाठी पुस्तकच हवं असं नाही जे हाताला लागेल जे मिळेल ते वाचायचे. मग ते भिंतीवर लावलेले पोस्टर असो किंवा जमिनीवर पडलेला एखादा फाटलेला एखादा कागद असो.
ती वाचल्याशिवाय पुढे जायचेच नाही. पुस्तके वाचताना ती ऐतिहासिक आहे, धार्मिक आहेत, राजकारणी आहेत की सामाजिक आहेत हे मी बघत नव्हते. पुस्तक हातात पडले की ते वाचायचे एवढेच मला माहित होते. माझे वाचन बघून माझी आई सतत काही ना काही तरी टोमणे मारायची.
आई म्हणायची लग्न झाल्यानंतर तुझे हे वाचन काही कामी येणार नाही. या व्यतिरिक्त तू घरची कामे शिक. स्वयंपाक करायला शिक. नाहीतर सासरी आमच्या नावाने खडे फोडशील. पण मी त्यांचे बोलणे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे आणि पुन्हा वाचायला लागायचे.
माझे वाचनाचे खुळ आता घरातील सर्वांना माहीत होते. वाचनाचे एवढे वेड लागले होते की मला खाण्यापिण्याची शुद्ध नसायची. कितीही वाचले काहीही वाचले तरी वाचनाची तहान काही भागत नाही. एकेदिवशी दिवाळीला भाऊबीजेला भावाला पाटावर बसवून त्याला ओवाळले, ओवाळून झाल्यावर त्याने माझ्या हातात एक बॉक्स ठेवला आणि म्हणाला की ही तुझी भाऊबीजेची माझ्याकडून भेट.
मी ति भेट घेतली मला असं वाटलं की त्या बॉक्समध्ये एखादा ड्रेस किंवा पर्स असेल पण जेव्हा तो बॉक्स मी उघडून पाहिला तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्या आनंदाला काही सीमा उरली नाही कारण त्या बॉक्समध्ये जुन्या कादंबऱ्या, काही नवीन मासिक, दिवाळी अंक व आणखी काही भरपूर पुस्तके होती. ते पाहून माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही.
- नक्की वाचा: बेटी बचाओ बेटी पढ़ाओ
माझ्याकडे पाहून घरातील सर्वांना नवल वाटले की मी पुस्तकांसाठी एवढी वेडी आहे. माझ्या मते वाचनसंस्कृतीने चांगली माणसे जोडता येतात. वाचकप्रिय व्यक्ती त्यांच्या या छंदामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समाजासमोर उलगडून दाखवण्यास समक्ष बनतात. सुरुवातीला मी लहान मुलांची पुस्तके बाल साहित्य वाचत असे.
नंतर नंतर मी अनेक दिग्गज प्रतिभावंत लेखकांची पुस्तके वाचली आहेत. व. पु. काळे, सुधा मूर्ती, साने गुरुजी, रणजित देसाई अशा अनेक लेखकांची पुस्तके मी वाचली आहेत. ऐतिहासिक कादंबऱ्या, प्रवास वर्णन, व्यक्ती चरित्र, आत्मचरित्र वाचायला मला खूप आवडतं. असे म्हणतात की पुस्तकी ज्ञान कधी वाया जात नाही ते अगदी बरोबरच आहे.
पुस्तके वाचल्यानंतर माझ्यामध्ये खूप बदल झाला आहे. वाचनामुळे आपल्या ज्ञानात खूप भर पडते. प्रसिद्ध लेखक व.पु काळे यांच्या वपुर्जा या पुस्तकात सांगितले आहे की माणसाला काही ना काही छंद हवा, स्वप्न हवीत. पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला हरवायला शिकतो. हे हरवण सापडणं प्रत्येकाचं निराळं असतं.
स्वप्न आणि छंद माणसाला पिसे लावतात वेडावून सोडतात. एक वेगळे जग एक वेगळे आयुष्य आपल्यासमोर आणून उभं करतात. जो छंद आपण जोपासतोय त्या क्षेत्रात काही तरी करायला मिळणं त्याहून सुंदर अनुभव समाधान आणि आनंद दुसरा कुठलाच नाही. या वाचनाने मला जगायला शिकवलं, जिंकायला शिकवलं, आभाळात उंच उंच भरारी घ्यायला शिकवल. म्हणून प्रत्येक माणसाने कोणता ना कोणतातरी छंद जोपासला पाहिजे.
हे छंद आपल्याला आपल्या दुःखातून बाहेर पडण्यास मदत करतात. आपल्याला मानसिक ताणतणावापासून दूर नेतात. जनमानसात आपली एक वेगळी प्रतिमा एक वेगळी ओळख निर्माण करतात. आपल्याला समृद्ध प्रकल्भ विचारवंत बनवतात. हे छंद आपल्याला आपल्यामध्ये दडलेल्या कलेला, कलाकाराला बाहेर येण्यास मदत करतात.
वाचनामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. आजूबाजूच्या गोष्टी माहीत होतात. आपले संवाद कौशल्य वाढते. वाचनाचा आपल्याला खूप फायदा होतो. वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडत जाते. मी रामायण, महाभारत, भगवद्गीता, श्यामची आई इत्यादी पुस्तके वाचली आहेत.
साने गुरुजीनी लिहिलेले श्यामची आई हे पुस्तक मला खूप आवडते. हे माझे सर्वात आवडते पुस्तक. या पुस्तकानी मला अनेक अनमोल विचार दिले आहेत. वाचनामुळे मला घरी बसून जगभराचे ज्ञान मिळत आहे. पुस्तके ही माझे खरे मार्गदर्शक आणि मित्र बनले आहेत. या वाचनामुळे मला एक वेगळी ऊर्जा एक वेगळाच आनंद मिळतो.
वाचनामुळे मला विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल मला अनेक गोष्टी समजल्या आहेत. जर कुठे बाहेर जायचे असेल लांब प्रवास असेल तर मी नेहमीच माझ्या सोबत एक तरी पुस्तक ठेवते आणि प्रवासामध्ये ते वाचून पूर्णही करते. त्यामुळे प्रवासाचा कंटाळा येत नाही. शाळेला सुट्टी पडल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दिवसातील काही तास मी वाचण्यातच घालवले.
पुस्तक असल्यामुळे फक्त ज्ञानच नाही तर एकाग्रताही वाढते. माणसाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पुस्तकांचा फार मोठा वाटा आहे. जीवनात कितीही संकटे आली तरी त्याला कसे सामोरे जायचे हे पुस्तकांनी मला शिकवले.
- नक्की वाचा: भारत माझा देश मराठी निबंध
आजच्या या धावपळीच्या युगामध्ये माणूस फार थकून गेला आहे या वाचनामुळे माणसाचा थकवा दूर होऊन माणूस प्रसन्ना आणि प्रफुल्लित होतो त्याच्यात एक नवीन ऊर्जा निर्माण होते. जगामध्ये एवढे महान व्यक्ती होऊन गेले त्या प्रत्येक व्यक्ती बद्दल वाचले तर आपल्याला समजेल की ह्या सर्व व्यक्ती वाचनातून वर आलेल्या आहेत. म्हणून रोज एक तरी पुस्तक वाचले पाहिजेत. माझा वाचनाचा छंद मी आयुष्यभर जोपासणार आहे.
आम्ही दिलेल्या maza avadta chand essay in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “माझा आवडता छंद निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maza avadta chand nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि maza chand essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर maza avadta chand marathi nibandh असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
It’s a very best eassy and so help fully eassy
thank you for your feedback keep visiting..