Nana Patekar Biography in Marathi – Nana Patekar information in marathi नाना पाटेकर माहिती मराठी नाना पाटेकर हे एक भारतीय अभिनेता, लेखक, चित्रपट निर्माता व भारतीय प्रादेशिक सैन्याचे माजी अधिकारी आहेत. जे प्रामुख्याने हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम करतात.नाना पाटेकर चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ व महान कलाकार आहेत. त्यांच्या विनोदी स्वभावामुळे त्यांनी अनेक चित्रपट गाजवले आहेत भूमिका कोणतीही असो ती उत्तम रित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात ते कधीच अयशस्वी ठरले नाहीत. नाना पाटेकर यांनी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्यांचे प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. या लेखामध्ये आपण नाना पाटेकर यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
नाना पाटेकर माहिती मराठी – Nana Patekar Biography in Marathi
पूर्ण नाव (Name) | नाना पाटेकर |
जन्म (Birthday) | १ जानेवारी १९५१ |
जन्म गाव (Birth Place) | महाराष्ट्रातील मुरुड-जंजिरा |
राष्ट्रीयत्व (Citizenship) | भारतीय |
ओळख (Identity) | अभिनेता, लेखक, चित्रपट निर्माता |
जन्म व वैयक्तिक आयुष्य
नाना पाटेकर यांच संपूर्ण नाव विश्वनाथ पाटेकर आहे. परंतु चित्रपट सृष्टीतील त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण देश त्यांना नाना पाटेकर म्हणून ओळखतो. नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी महाराष्ट्रातील मुरुड-जंजिरा येथे झाला नानांच्या घरची परिस्थिती अतिशय गरीब होती. त्यांच्या वडिलांचा कपड्याचा व्यवसाय होता आणि त्यांची आई एक गृहिणी आहेत. नाना पाटेकर यांच शालेय शिक्षण समर्थ विद्यालय, दादर येथून पूर्ण झालं. नाना पाटेकर यांनी मुंबईतील जे.जे स्कूल ऑफ आर्ट येथून पुढील शिक्षण घेतल आहे.
नाना पाटेकर यांना स्केचेस बनवण्यामध्ये रस होता त्यांनी अनेकदा गुन्हेगारांच्या वर्णनावरून त्यांची रेखाचित्रे काढून दिलेली आहेत. कॉलेजमध्ये असताना नाना पाटेकर यांनी कॉलेजमधील वेगवेगळ्या नाटकांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. नाना अतिशय तळागाळातून वर आलेले एक उत्तम अभिनेता आहेत. नाना पाटेकर सत्तावीस वर्षाचे असताना त्यांचं लग्न झालं त्यांनी नीलकांती पाटेकर यांच्याशी विवाह केला आहे. नाना पाटेकर यांनी आयुष्यामध्ये अनेक खस्ता खाल्लेल्या आहेत.
त्यांच्या लग्नानंतर काही वर्षांनी त्यांचे वडील वारले आणि पुढील काळामध्ये त्यांनी त्यांचा पहिला मुलगाही गमावला. नाना पाटेकर यांना मल्हार पाटेकर नावाचा एक मुलगा आहे. नाना पाटेकर यांच्या वडिलांना नाटकाची आवड होती आणि ती अतिशय उत्साहाने नानांना देखील नाटक बघायला सांगायचे आणि त्या दरम्यानच नानांना अभिनयाची आवड निर्माण झाली. लहान वयापासूनच नाना पाटेकर खूप मस्तीखोर आहेत. नायक, सहनायक, खलनायक, चरित्र नायक अशा वेगवेगळ्या भूमिका साकारत नाना पाटेकर यांनी लोकांचं मनोरंजन केलं. भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वांचे आवडते अभिनेता म्हणून ते नावाजले जातात.
अभिनय कारकीर्द
नाना पाटेकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षी पासून अभिनय करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या नाटक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला नाना पाटेकर यांनी १९७८ मध्ये गमन या चित्रपटांमधून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं हा त्यांचा पहिला चित्रपट होता. पुढील बराच काळ नाना पाटेकर मराठी चित्रपट सृष्टी मध्ये वेगवेगळ्या भूमिका करत राहिले. नाना पाटेकर हे विजय मेहता यांच्यासोबत रंगायन या दिग्गज थेटर ग्रुपचा भाग होते. हमिदाबाईची कोठी हे उत्तम मराठी नाटक त्यांनी या ग्रुप सोबत केले आहे.
नाना पाटेकर यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत त्यातील काही भूमिका खलनायकाच्या देखील आहेत परंतु त्यांनी बहुतेक भूमिका नायक म्हणून साकारल्या आहेत. आज की आवाज या चित्रपटांमध्ये नाना पाटेकर हे सहनायक होते या चित्रपटात त्यांनी उत्तम काम केले परंतु हा चित्रपट गाजला नाही. त्यांनी साकारलेली पहिली भूमिका जी यशस्वी ठरली ती म्हणजे एन चंद्रा यांनी निर्मिती व दिग्दर्शन केलेला अंकुश या चित्रपटाद्वारे नानांना प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली.
त्यांनी साकारलेली एक सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका अविस्मरणीय ठरली. नाना पाटेकर यांनी सलाम बॉम्बे या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे त्यांची प्रशंसा करण्यात आली. पुढे परिंदा चित्रपटातील गुन्हेगारीच्या भूमिकेसाठी त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ओळखलं जाऊ लागलं ज्यामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
प्रहार या चित्रपटाचे ते दिग्दर्शक आहेत. सन १९९२ मध्ये प्रदर्शित झालेला तिरंगा हा सुपरहिट चित्रपट ज्यामध्ये नाना पाटेकर हे प्रमुख भूमिकेत होते. १९९४ मध्ये त्यांचा क्रांतीवीर चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला सोबतच फिल्मफेअर पुरस्कार आणि स्टार स्क्रीन पुरस्कार देखील मिळाला.
सन १९९७ मध्ये नाना पाटेकर यांना अग्निसाक्षी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००६ मध्ये अपहरण या चित्रपटासाठी नाना पाटेकर यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार प्रदान करण्यात आला. युगपुरुष हा त्यांचा उल्लेखनीय चित्रपट होता. राजू बन गया जेंटलमेन या चित्रपटासाठी त्यांनी १९९० च्या दशकातील अनेक व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये अभिनय केला.
अंगार या चित्रपटामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. खामोशी द म्युझिकल हा त्यांचा गाजलेला चित्रपट. सन २००० च्या सुरुवातीस शक्ती द पावर आणि अपहरण या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना प्रशंसा मिळाली. यामुळे त्यांना दुसऱ्यांदा फिल्मफेअर मध्ये सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला. त्यांनी वेलकम आणि वेलकम बॅक २ चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारली होती. राजनीति पॉलिटिकल थ्रिलर मध्ये राजकारणी म्हणून त्यांनी त्यांची भूमिका केली होती.
या काही चित्रपटांनी त्यांना सर्वाधिक कमाई मिळवून दिली. २०१४ मध्ये प्रकाश बाबा आमटे या मराठी चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांनी मुख्य भूमिका साकारली होती हा चित्रपट लोकप्रियता मिळवण्यात यशस्वी ठरला. २०१६ मध्ये त्यांनी नटसम्राट या मराठी चित्रपटात काम केलं जो विशेष गाजला. भारतीय चित्रपट सृष्टीतील नाना पाटेकर हे खऱ्या अर्थाने नटसम्राट आहेत.
सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट खलनायक या श्रेणीमध्ये पुरस्कार जिंकणारे नाना पाटेकर हे एकमेव अभिनेता आहेत. त्यांनी साकारलेले विनोदी चित्रपट विशेष गाजले. त्यांच्या विनोदी स्वभावामुळे आणि डायलॉग बोलण्याच्या शैलीमुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत.
इतर
प्रहार चित्रपटाच्या तयारीसाठी तीन वर्षाच्या प्रशिक्षण कालावधी नंतर नाना पाटेकर यांना १९९० मध्ये भारतीय प्रादेशिक सैन्यात मानद कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आले. १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान नाना पाटेकर यांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट मध्ये मानद मेजर म्हणून सेवा दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाना पाटेकर यांचे प्रेरणास्थान आहे. नाना पाटेकर हे एक प्रसिद्ध व उत्तम अभिनेता आहेत परंतु इतकी प्रसिद्धी मिळाल्यावर देखील त्यांनी साधी राहणी कधीच सोडली नाही म्हणून ते साधी राहणी आणि धर्मादाय संस्थांना देणगी देण्याच्या त्यांच्या उदाहरनेसाठी ओळखले जातात.
त्यांनी अनुभूती या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून बिहार मधील पूरग्रस्त गावांच्या पुनर्बांधणीसाठी पैसे दिले त्यांनी त्यांना मिळालेल्या कमाईतील काही पैसे वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांना दान केले होते. जेव्हा त्यांना १०००,००० रुपयांचे रोख पारितोषिक असलेला राजकपूर पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हा त्यांनी ती संपूर्ण रक्कम महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण कार्यासाठी दान केली होती.
इतकंच नव्हे तर दुष्काळ पणामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नाना पाटेकर यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. विदर्भातील ६२ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आणि मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी ११३ कुटुंबांना त्यांनी १५ हजार रुपयांचे धनादेश वितरित केले होते.
मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या सोबत नाना पाटेकर यांनी २०१५ मध्ये नाम फाउंडेशनची स्थापना केली. हि फाउंडेशन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करते. सन २०१३ मध्ये नाना पाटेकर यांना भारतातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारांपैकी एक मानला जाणारा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांना चित्रपट आणि कला क्षेत्रातील त्यांच्या योगदाना बद्दल प्रदान करण्यात आला.
आम्ही दिलेल्या Nana Patekar Biography in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर नाना पाटेकर माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Nana Patekar information in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Nana Patekar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट