नंदुरबार जिल्ह्याची माहिती Nandurbar District Information in Marathi

nandurbar district information in marathi नंदुरबार जिल्ह्याची माहिती, आज आपण या लेखामध्ये सातपुडा पर्वत रांगेवर वसलेले खानदेश या भागातील महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यामध्ये काही ठिकाणी अधिवासी समाज किंवा समुदाय हा मोठ्या संखेने आपल्याला पहायला मिळतो तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला अधिवासी समाज राहत असलेला आपल्याला आढळून येते आणि म्हणून या जिल्ह्याला अधिवासी जिल्हा म्हणून देखील ओळखले जाते.

नंदुरबार या जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे ५ हजार चौरस कि मी इतके असून हा जिल्हा पूर्वी धुळे जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता परंतु नंतर याचे नंदुरबार म्हणून विभाजन झाले आणि हा एक स्वतंत्र्य जिल्हा म्हणून ओळखले जाऊ लागले म्हणजेच या जिल्ह्याची स्थापना १ जुलै १९९८ मध्ये झाली.

नंदुरबार या जिल्ह्यामध्ये एकूण ९०० पेक्षा अधिक गावे आणि एकूण ९ शहरे आहेत तर हा जिल्हा एकूण ६ तालुक्यांनी विभागलेला आहे. नंदुरणार या जिल्ह्यामधील वातावरणाविषयी बोलायचे म्हटले तर या जिल्ह्यामध्ये उष्ण आणि कोरडे वातावरण जास्त प्रमाणात आहे आणि या जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि पावसाळ्यामध्ये या ठिकाणावरील वातावरण हे दमट असते.

नंदुरबार या जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे म्हणजेच चालुक्य, यादव, भिल्ल या सारख्या अनेक इतिहासातील घराण्यांचा संबध हा या जिल्ह्यांशी जोडला जातो तसेच रामायणातील अनेक पौराणिक कथा देखील या ठिकाणी सांगितल्या जातात. चला तर खाली आपण नंदुरबार जिल्ह्याविषयी संपूरणे आणि सविस्तर माहिती घेवूया.

nandurbar district information in marathi
nandurbar district information in marathi

नंदुरबार जिल्ह्याची माहिती – Nandurbar District Information in Marathi

जिल्ह्याचे नावनंदुरबार
ठिकाणनंदुरबार जिल्हा खानदेश प्रदेशामध्ये सातपुडा डोंगररांगेवर वसला आहे (महाराष्ट्र)
स्थापना१ जुलै १९९८
क्षेत्रफळ५ हजार चौरस कि मी
बोलली जाणारी भाषामराठी

नंदुरबार जिल्ह्याचा इतिहास – nandurbar history in marathi

पूर्वी नंदुरबार जिल्हा हा धुळे जिल्ह्याचा एक भाग होता म्हणजे हा धुळे जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता आणि पूर्वी धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे जिल्हे एकत्र मिळून एक खानदेशी जिल्ह्या म्हणून ओळखला जात होता परंतु त्याचे विभाजन झाले आणि हे जिल्हे स्वातंत्र्य झाले.

नंदुरबार हा जिल्हा १९९८ मध्ये धुळे जिल्ह्यापासून वेगळा झाला आणि तो एक स्वतंत्र्य जिल्हा बनला. नंदुरबार जिल्ह्याविषयी असा देखील इतिहास आहे कि या जिल्ह्यामध्ये पूर्वी नंदराजाचे राज्य होते किंवा तो या प्रदेशाचा राजा होता त्यामुळे नंदुरबारला नंद्नगरी म्हणून देखील ओळखले जात होते.

तसेच या प्रदेशावर अनेक लोकांनी राज्य केले आणि ज्यावेळी त्या संबधित राज्यकर्त्यांनी राज्य केले त्यावेळी त्यांनी या प्रदेशाचे नाव बदलले जसे कि यादव घराण्यातील सेउनचंद्र या राज्याच्या नावावरून या प्रदेशाला सेउनादेसा म्हणून ओळखले जात होते.

तर गुजरातचा अहमद खान हा या प्रदेशावर राज्य करत असताना या राज्याचे नाव हे खानदेश असे ठेवले होते आणि अश्या प्रकारे वेगवेगळ्या नावांनी इतिहासामध्ये या प्रदेशाला ओळखले जाते.

नंदुरबार या प्रदेशावर इतिहासामध्ये अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले जसे कि देवगिरीचे यादव, भिल्ल, बहामनी, चालुक्य अश्या वेगवेळ्या घराण्यातील राज्यकर्त्यांनी या भागावर राज्य केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांची विभागणी ?

नंदुरबार हा जिल्हा एकूण ६ तालुक्यांनी विभागलेला आहे आणि ते तालुके म्हणजे तळोदे, नंदुरबार, नवापुर, शहादे, अक्राणी, अक्कलकुवा इत्यादी तालुके आहेत.

नंदुरबार जिल्ह्यामध्ये बोललीजाणारी मुख्य भाषा आणि इतर भाषा – langauges

नंदुरबार या जिल्ह्यामध्ये अनके वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात परंतु या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात बोलली जाणारी मुख्य भाषा म्हणजे मराठी आणि त्याचबरोबर या राज्यामध्ये इतर भाषा देखील बोलल्या जातात जसे कि गुजरात राज्याची सीमा हि या जिल्ह्याला जोडून असल्यामुळे या ठिकाणी काही लोक गुजराती भाषा बोलतात.

त्याचबरोबर खानदेश या प्रदेशमध्ये हा जीख्या वसलेला असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये खानदेशी भाषा देखील बोलतात त्याचबरोबर या ठिकाणी इतर भाषा जसे कि कोकोनी, भिली आणि हिंदी भाषा देखील बोलली जातात.

नंदुरबार जिल्ह्यामधील काही प्रेक्षणीय स्थळे – tourist places

नंदुरबार हा जिल्हा ५ हजार चौरस कि.मी क्षेत्रफळ असणारा एक जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटकांना पाहण्यासाठी निसर्गरम्य तसेच कृत्रिम पर्यटक स्थळे आहेत आणि यामधील काही लोकप्रिय आणि प्रसिध्द पर्यटन स्थळे आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

तोरणमाळ

तोरणमाळ हे एक हिल स्टेशन आहे ज्या ठिकाणाहून पर्यंटकांना सुंदर अशी निसर्गरम्य दृष्ये पहायला मिळतात जसे कि या हिल स्टेशनवरून सीता खाणी दरी, यशवंत सरोवर, इतर पर्वत, दऱ्या आणि धबधबे या सारखे अनेक नैसर्गिक नजरे या ठिकाणाहून पहायला मिळतात जे मनाला एक वेगळाच आनंद देतात.

अस्तंबा

अस्तंबा हे एक नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक धार्मिक ठिकाण आहे आणि या ठिकाणी अनेक भाविक लोकांची गर्दी असते. या ठिकाणी एक जत्रा भरते आणि या जत्रेला अस्तंबा जत्रा म्हणून ओळखले जाते आणि हि जत्रा दहा ते पंधरा दिवस चालते.

उनापदेव

उनापदेव हे देखील एक प्रेक्षणीय स्थळ आहे आणि या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहे. जे नंदुरबार जिल्ह्यामधील शहादा जिल्ह्यातील अडावद या गावापासून ६ किलो मीटर अंतरावर आहे.

प्रकाशा

प्रकाशा हे एक नंदुरबार या जिल्ह्यातील एक लोकप्रिय पेक्षनीय ठिकाण आहे आणि या ठिकाणाला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते आणि हे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तापी नदीच्या काढावर हे ठिकाण आहे.

नंदुरबार विषयी काही विशेष तथ्ये – facts

  • नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर दोन राज्या आहेत, जिल्ह्याच्या पश्चिम उत्तर भागामध्ये गुजरात हे राज्य आहे तर उत्तर ईशान्य भागाकडे मध्य प्रदेश हे राज्य आहे.
  • नंदुरबार जिल्ह्याचे मुख्यालय हे नंदुरबार या शहरामध्ये आहे.
  • हिवाळ्यामध्ये नंदुरबारमध्ये एकदम थंड हवा आणि कोरडे असते त्यामुळे नंदुरबारला हिवाळ्यामध्ये भेट दिली तर ते उत्तम ठरेल.
  • उनापदेव हे नंदुरबार शहरातील एक सर्वात लोकप्रिय पर्यटन ठिकाण आहे.
  • नंदुरबार हे शहर मुंबई या शहरापासून २९१ किलो मीटर आहे तर हे शहर दिल्ली या शहरापासून ५३५ किलो मीटर इतके लांब आहे.

नंदुरबारला कसे जायचे – how to reach

  • नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांशी चांगला जोडलेला आहे त्यामुळे तुम्ही स्वताच्याकारणे किंवा बसने अगदी सहजपणे नंदुरबार जिल्ह्याला भेट देऊ शकता.
  • जर एखाद्या व्यक्तीला नंदुरबारला विमानाने जायचे असल्यास त्या व्यक्तीला वडोदर या ठिकाणी जावे लागेल कारण वडोदरा हे विमानतळ नंदुरबार या शहरापासून १५० किलो मीटर अंतरावर आहे आणि हे हा शहराजवळील सर्वात जवळचेविमानतळ आहे.
  • जर तुम्हाला नंदुरबार शहरामध्ये रेल्वेने जायचे असल्यास तुम्ही अगदी आरामात येऊ शकता कारण देशातील कोणत्याही मोठ्या शहरातून नंदुरबारला जाण्यासाठी आपल्याला रेल्वे मिळू शकतात.

आम्ही दिलेल्या nandurbar district information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नंदुरबार जिल्ह्याची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nandurbar district map in marathi या nandurbar district taluka list in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about nandurbar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये nandurbar history in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!