प्रा. एन डी‌ पाटील यांची माहिती ND Patil Information in Marathi

ND Patil Information in Marathi – ND Patil Wikipedia in Marathi प्रा. एन डी‌ पाटील यांची माहिती शोषितांचा आधारवड हरपला!! जेष्ठ नेते, विचारवंत प्रा. एन डी‌ पाटील यांचं महाराष्ट्रात सामाजिक व राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे योगदान आहे. सर्वसामान्यांच्या अडचणी साठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे पुरोगामी विचारवंत प्रा. एन डी पाटील यांचं आज वृद्धापकळनं निधन झालं आहे. त्यांच्या कार्याला सलाम करत त्यांच्या आठवणींना उजाळा देत आपण आजच्या लेखामध्ये प्रा.‌ एन‌ डी‌ पाटील यांच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.

nd patil information in marathi
nd patil information in marathi

प्रा. एन डी‌ पाटील यांची माहिती – ND Patil Information in Marathi

ND Patil Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म (Birthday)१५ जुलै १९२९
जन्म गाव (Birth Place)सांगली जिल्ह्यातील ढवळी
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)जेष्ठ नेते, विचारवंत

जन्म 

पूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील. सांगली जिल्ह्यातील ढवळी येथे शेतकरी कुटुंबात १५ जुलै १९२९ रोजी नारायण पाटील यांचा जन्म झाला. नारायण यांना शिक्षणाची आवड होती.‌ १९५५ मध्ये पुणे विद्यापीठातून नारायण पाटील यांनी अर्थशास्त्रात एम. ए ही पदवी संपादन केली त्यानंतर १९६२ मध्ये पुणे विद्यापीठातून एलएलबीच शिक्षण घेतलं. पुढे नारायण पाटील यांनी अध्यापन राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आणि संपूर्ण महाराष्ट्रात ते प्रा. एन डी‌ पाटील या नावाने प्रसिद्ध झाले.

अध्यापन कार्य व शैक्षणिक क्षेत्र

इसवी सन १०५४ मध्ये प्रा. एन डी‌ पाटील यांनी अध्यापन क्षेत्रात प्रवेश केला शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रा.एन डी‌ पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. म्हणून प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांना शिक्षणसम्राट असं संबोधलं जातं. सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये १९५४ ते १९५७ पर्यंत प्राध्यापक म्हणून सेवा दिली. त्याच वेळी ते कमवा व शिका या योजनेचे प्रमुख व रेक्टर म्हणून कार्य करत होते.

१९६० मध्ये त्यांनी इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून सेवा दिली. प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांच्या विचारसरणीवर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा पगडा होता. प्रा.‌एन‌ डी‌ पाटील हे १९६२ मध्ये शिवाजी विद्यापीठातील पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य बनले. शिवाजी विद्यापीठात १९६५ मध्ये सिनेट सदस्य म्हणून त्यांची निवड झाली.

इसवी सन १९६५ ते इसवी सन १९७८ पर्यंत शिवाजी विद्यापीठात कार्यकारिणी सदस्य म्हणून सेवा दिली १९७६ मध्ये शिवाजी विद्यापीठातील सामाजिकशास्त्र विभागाचे डीन पद प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांच्या हाती गेलं. ही जबाबदारी त्यांनी पुढील दोन वर्ष उत्तम रित्या सांभाळली. इसवी सन १९९१ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण आयोगाचे सदस्य म्हणून सेवा दिली.

प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांनी १९५९ पासून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य म्हणून काम केलंय. इसवी सन १९९० मध्ये रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन पद प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलं. बेळगावच्या दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून इसवी सन १९८५ पासून प्रा.‌एन‌ डी‌ पाटील काम करत होते.

शिवाजी विद्यापीठ आणि रयत शिक्षण संस्थेतील अत्यंत महत्त्वपूर्ण पद निष्ठेने व जाणीवपूर्वक प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांनी हाताळली. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन पद ‌ मिळाल्यावर प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांनी अमुलाग्र बदल घडवून आणले. औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केली, आश्रम शाळा साखरशाळा नापासांची शाळा, श्रमिक विद्यापीठ, संगणक शिक्षण केंद्र स्थापन केलं,‌ कर्मवीर भाऊराव पाटील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, गुरुकुल प्रकल्प, लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना सुरू केली, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना राबवली, दुर्बल शाखा विकास निधी.

राजकीय कार्य

राजकीय क्षेत्रामध्ये अवर्णनीय कामगिरी करून प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांनी समाजावर आपल्या कार्याचा आणि विचारांचा ठसा उमटवला आहे. १९४८ मध्ये प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षात पाऊल ठेवलं. १९५७ मध्ये मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस पद हाती घेतलं. महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे.

इसवी सन १९६०-१९६६ त्यानंतर १९७०-१९८२ अठरा वर्ष ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. १९६९ ते १९७८ व १९८५ ते २०१० या कालावधीत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस म्हणून कार्य केलं. १९७८ पासून १९८० पर्यंत प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री म्हणून सेवा दिली. १९८५ ते १९९० यादरम्यान महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. १९९९ ते २००२ लोकशाही आघाडीचे निमंत्रक म्हणून कार्य.  प्रा.‌एन‌ डी‌ पाटील हे महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य होते व सीमा चळवळीचे प्रमुख नेते देखील होते.

सामाजिक कार्य

सामाजिक कार्यामध्ये प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांचा हात कोणीही धरू शकत नाही. प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यासाठी व्यतीत केलं. विविध मंडळाच्या सदस्यपदी कार्यरत असताना त्यांनी सर्वसामान्य माणसांची प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रा.‌एन‌ डी‌ पाटील रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी नेहमीच तत्पर असायचे.

सीमाभागातील मराठी भाषिक विषयी प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. या चळवळीत त्यांनी जीव तोडून काम केलं. सीमा भागाचा लढा, शेतकऱ्यांचा आंदोलन, कोल्हापूर येथील टोल नाक्याचा लढा, आणि इतर अनेक सामाजिक अडचणींवर प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांनी नेहमीच आवाज उठवला.

महत्त्वपूर्ण कामगिरी

प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांनी विविध संस्थांची विविध मंडळाची वेगवेगळी पदे हाताळली आहेत आणि काही पदे हाताळताना त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यातीलच काही पदे म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काऊन्सिल सदस्यपद, इचलकरंजीच समाजवादी प्रबोधिनी उपाध्यक्षपद, महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्षपद, सातारा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अकादमीचे अध्यक्षपद, जागतिकीकरण विरोधी कृती समितीच मुख्य निमंत्रक म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी, इस्लामपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष‌ म्हणून प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांनी मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समितीचे सदस्य म्हणून महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

पुरस्कार

प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांचं महाराष्ट्र मध्ये शिक्षण क्षेत्रात राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात खारीचा वाटा आहे. सामाजिक कार्यामध्ये त्यांनी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध योजना राबवल्या विविध संस्था स्थापन केल्या शिक्षणा बद्दल जागृती निर्माण केली. राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण पदे हाताळली.

प्रा.‌एन‌ डी‌ पाटील‌ यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना अनेक महत्त्वपूर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल.‌ १९९४ मध्ये प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांना भाई माधवराव बागल पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांना १९९९ मध्ये नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातर्फे डिलीट पदवी मिळाली.

प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांना शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे प्रा.‌ एन‌ डी‌ पाटील यांना २००० साली डिलीट पदवी प्रदान करण्यात आली. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठामध्ये वेगवेगळी पद सांभाळताना प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्यासाठी शिवाजी विद्यापीठातर्फे त्यांना डिलीट पदवी देण्यात. १९९८ – २००० राष्ट्रीय बियाणे महामंडळ भारत सरकार (अध्यक्षपद).

प्रा.‌एन‌ डी‌ पाटील यांनी लिहिलेली पुस्तके

समाज विकास योजनेचे वस्त्रहरण, शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा, काँग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट, शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण, वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट, महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे कृष्ण स्वरूप. प्रा.‌ एन‌ डी‌ पाटील यांचे इत्यादी लेखन प्रसिद्ध झाले.

मृत्यू

संपूर्ण समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रा.‌ एन‌ डी‌ पाटील लढवय्ये झाले आणि प्रत्येक मोहीम फत्ते केली. प्रा.‌ एन‌ डी‌ पाटील या ज्येष्ठ विचारवंताचा १७ जानेवारी २०२२ रोजी निधन झालं. ९३ वर्षाचे प्रा.‌ एन‌ डी‌ पाटील यांच्यावर कोल्हापूर मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. वातावरणात झालेल्या बदलामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत होता त्यासाठी त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले

आणि तिथेच त्यांना दोन बेन स्ट्रोक येऊन गेले त्यामुळे त्यांचं बोलणं देखील बंद झालं होतं शिवाय आजारपणामुळे पोटात अन्नाचा कण देखील नव्हत्या आणि शेवटी १७ जानेवारीला त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या जाण्याने आता शोषितांचा आधारवड हरपला आहे.

आम्ही दिलेल्या nd patil information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर प्रा. एन डी‌ पाटील यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nd patil biography in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of nd patil in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information about nd patil in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!