नाम म्हणजे काय व नामाचे प्रकार Noun Meaning in Marathi

noun meaning in marathi – noun definition in marathi नाम म्हणजे काय व नामाचे प्रकार आज आपण या लेखामध्ये नाम म्हणजे काय आहे आणि नाम चे कोणकोणते प्रकार आहेत ते पाहणार आहोत. नाम हि एक व्याकरण मधील संकल्पना आहे आणि याला इंग्रजीमध्ये ( noun ) म्हटले जाते. नाम म्हणजे काय हे सर्वांना माहीतच आहे, नाम म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, प्राण्यांना, एखाद्या ठिकाणाला तसेच कोणत्याही गावाला किंवा शहराला ज्या नावाने ओळखतो किंवा ज्या नावाने ते आपल्याला समजते त्याला नाम म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला किंवा ठिकाणाला नवा असल्यामुळे ती वस्तू, ठिकाण किंवा व्यक्ती ओळखणे सोपे जाते.

जसे कि मीरा गाणे खूप सुंदर गाते यामध्ये मीरा आणि गाणे हे नाम आहे आणि या मुळे त्या संबधित व्याक्यीला ओळखणे खूप सोपे जाते आणि अश्या अनेक जगामध्ये गोष्टी, वस्तू, ठिकाण अनो व्यक्ती आहेत.

ज्याना वेगवेगळी नावे आहेत आणि यालाच नाम म्हणतात आणि यामुळे आपण वस्तू, व्यक्ती किंवा गोष्टींना ओळखू शकतो. नामाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते म्हणजे सामान्य नाम, भाववाचक नाम, योग्य नाम आणि विशेष नाम इत्यादी. चला तर खाली आपण नाम विषयी आणखीन माहिती जाणून घेवूया.  

noun meaning in marathi
noun meaning in marathi

नाम म्हणजे काय व नामाचे प्रकार – Noun Meaning in Marathi

नामाची व्याख्या – noun definition in marathi

नाम म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, प्राण्यांना, एखाद्या ठिकाणाला तसेच कोणत्याही गावाला किंवा शहराला ज्या नावाने ओळखतो किंवा ज्या नावाने ते आपल्याला समजते त्याला नाम म्हटले जाते.

उदा :

 • ते आंब्याचे झाड आहे : या मध्ये आंब्याचे झाड हे नाम आहे  आणि यामुळे आपल्याला समजते कि ते झाड कोणत्या फळाचे आहे.
 • गीता पुस्तक वाचते : यामध्ये गीता हे एका व्यक्तीचे नाव आहे आणि यामुळे आपल्याला त्या व्यक्तीची ओळख समजण्यास मदत होते.
 • गोवा हे पर्यटक स्थळ आहे : या गोवा हे ठिकाण आहे आणि गोवा या नावामुळे आपल्याला या ठिकाणाची ओळख समजते.

नाम हे व्यक्ती, गोष्टी आणि ठिकाण याच्याशी संबधित असते

नाम हे एखाद्या व्यक्तीला, वस्तूला किंवा ठिकाणाला दिलेले असते आणि आपण व्यक्ती, गोष्टी आणि ठिकाण या मध्ये काय काय येते ते पाहूया.

 • ठिकाण : ठिकाणांना नाव देण्यासाठी वापरलेले नावे ज्याला नाम म्हणतात जसे कि गाव, शहर, रस्ता, बाग, घर, नदी, कार्यालय आणि शाळा यासारखी ठिकाणे.
 • व्यक्ती : एखाद्या व्यक्तीचे नाव हे नाम असू शकते जसे कि आई, वडील, भाऊ, बहिण, काका, मामा, विद्यार्थी, शिक्षक या सारख्या अनेक शब्दांचा वापर हा व्यक्तीच्या अनेक नामासाठी वापरले जातात.
 • गोष्टी : वस्तू किंवा प्राण्यांना ओळखण्यासाठी जे नाव दिलेले असते जसे कि प्राण्यांना कुत्रा आणि मांजर आणि वस्तू टेबल, खुर्ची, बॉल या सारख्या गोष्टी.

नामाचे प्रकार किती – Types of noun in Marathi

नाम म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, प्राण्यांना, एखाद्या ठिकाणाला तसेच कोणत्याही गावाला किंवा शहराला ज्या नावाने ओळखतो किंवा ज्या नावाने ते आपल्याला समजते त्याला नाम म्हटले जाते. नामाचे काही वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण खाली पाहणार आहोत.

 • योग्य नाम 

योग्य नाम हे एक नाव आहे जे विशिष्ट व्यक्ती, ठिकाण किंवा वस्तू ओळखते, उदा. दिल्ली, स्टीव्हन,  आफ्रिका, लंडन,  सोमवार. लिखित इंग्रजीमध्ये, योग्य संज्ञा मोठ्या अक्षरांनी सुरू होतात.

 • भाववाचक नाम / अमूर्त नाम 

भाववाचक नाम / अमूर्त नाम ही एक संज्ञा आहे जी कल्पना, गुण आणि परिस्थितींचा संदर्भ देते. ज्या गोष्टी पाहिल्या जाऊ शकत नाहीत किंवा स्पर्श केल्या जाऊ शकत नाहीत आणि ज्या गोष्टींना कोणतेही भौतिक वास्तव नाही. उदा . सत्य, आनंद,  वेळ,  धोका, मैत्री, विनोद .

 • सामान्य नाम 

सामान्य संज्ञा ही एक संज्ञा आहे जी सर्वसाधारणपणे लोक किंवा गोष्टींना संदर्भित करते, उदा. मुलगा, देश, पूल, शहर, जन्म, आनंद. सामान्य नाम हे काही वेळा जातीवाचक असल्यामुळे त्याचे अनके वाचन होते.

 • समूहवाचक नाम 

सामूहिक संज्ञा लोकांच्या किंवा गोष्टींच्या गटांचा संदर्भ देतात, उदा. प्रेक्षक, कुटुंब, सरकार, संघ.

नामाची काही उदाहरणे – noun examples in marathi

 • माझी आई आमच्यासाठी रोज जेवण बनवते : या मध्ये आई आणि जेवण हे नाम आहे.
 • सीता हुशार मुलगी आहे : या मध्ये सीता हे नाम आहे.
 • महाबळेश्वर हे एक प्रसिध्द हे प्रेक्षणीय स्थळ आहे. : या मध्ये महाबळेश्वर नाम आहे.
 • आमची आत्या आमच्या घरामध्ये काही दिवसासाठी राहते : या मध्ये आत्या हि व्यक्ती आहे आणि व्यक्ती म्हणजे नाम असते.
 • तिला तिच्या कामासाठी नवीन संगणक घेणे खूप गरजेचे आहे : या मध्ये संगणक म्हणजे वस्तू आहे आणि वस्तू देखील नाम या संकल्पनेत समाविष्ट आहे.
 • मी रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करतो : यामध्ये सकाळ आणि व्यायाम हे नामामध्ये मोडतात कारण ते एखाद्या गोष्टीबद्दल सांगतात.
 • नेहा रोज शाळेला जाते : या मध्ये नेहा आणि शाळा हि दोन नाम आहेत आणि यामध्ये नेहा हि व्यक्ती आहे आणि शाळा हे ठिकाण आहे.

आम्ही दिलेल्या noun meaning in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नाम म्हणजे काय व नामाचे प्रकार माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या noun meaning in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि noun examples in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये noun in marathi with examples Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!